Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माऊली उत्सव

क — कवि मनाचा, गुरुवार, 06/30/2016 - 20:44
|| माऊली उत्सव || विठु तुझ्या नामानं, 'मी'पणं गळलं बासुरीगत झालं मनं, रितं न् पोकळं तुझ्या फुंकरेनं केले, स्वर हे मधाळं भक्तीरस झालं सारं, जीवन सकळं जगी नश्वरी नाही, इथे माझा राम देहभान बनले माझे, फक्त तुझा धाम तुझ्या दर्शनाची असे, आज मला आस मनमंदिरात माझ्या, फक्त तुझा वास देवा तुझ्या नामाची, चढलीया धुंदी कृतार्थाला सेवेची, दे रे एक संधी मनामधी वाहीला, तुझाच भक्तीझरा मनं माझं आतुरलेलं, मिळाया सागरा सोडूनी खेळ पाठी, हा उनसावल्यांचा चालतो मैलोन् मैल, जयघोष हरीनामाचा नाचतो मनडोलारा, नाद टाळमृदंगाचा वाहतो परमानंद डोही, वारकरी पंढरीचा मन होई रे प्रसन्न, कारणभाव सर्वसिद्धींचा तुका म्हणे तेथेचि, उत्सव 'माऊली'चा

प्रतिक्रिया द्या
2942 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
प्रसाद गोडबोले Fri, 07/01/2016 - 10:21 नवीन
राम कृष्ण हरी !!
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Fri, 07/01/2016 - 11:52 नवीन
विठु तुझ्या नामानं, 'मी'पणं गळलं बासुरीगत झालं मनं, रितं न् पोकळं या ओळी जास्ती आवडल्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा