Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रिमझिम पावसात बारवी धरण परिसरात!

श
शान्तिप्रिय
Fri, 07/01/2016 - 12:48
💬 41
या मंगळवारी मी काही कामानिमित्त बदलापूर ला गेलो होतो. तेव्हा रिमझिम पाऊस बरसत होता. सृष्टी हिरवेगार वस्त्र नेसून अतिशय सुंदर दिसत होती. मग काय? ठरवले बारवी धरण परिसर पाहण्याचे. त्याआधी काही मित्रांबरोबर गप्पा मारताना या मोसमात बदलापूर जवळील परिसर किती सुंदर असतो ही माहिती मिळाली. तसेच बदलापूर हे नाव कसे पडले याची रंजक माहिती मिळाली ती अशी: शिवाजी महाराज रायगडावरून सुरत किंवा त्या दिशेला स्वारी करताना याच दिशेने येत. तेव्हा त्याचे घोडे अतिशय थकलेले असत. मग याठिकाणी घोडे बदलले जायचे आणि मग सुरत कडे प्रयाण सुरू. यावरून या ठिकाणाला बदलापूर असे नाव पडले. रंजक वाटले मला हे कळल्यावर! सकाळी ११ च्या आसपास कंजूस काकांना फोन केला आणि १ वाजता आम्ही बदलापूर ला भेटलो. बदलापूर पश्चिमेला एस टी स्थानक आहे. तेथून मुरबाड ला बस आहेत. बारवी धारण मार्गे जाणारी बस पकडली आणि आमचा प्रवास सुरू! बदलापूर गावाबाहेर पडल्यानंतर बसमधून दिसणारा निसर्ग दृष्ट लागण्याजोगाच! जेमतेम १८ किमी वर बारवी धरण लागते. बारवी धरण हे कल्याण आणि नवी मुंबईला पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. सव्वीस जुलै च्या प्रलयंकारी पावसावेळी धरण पूर्ण भरले होते आणि पाणी कल्याण भिवंडीत खांद्यापर्यंत साचले होते. धरणाचा परिसर वृक्षवैविध्याने नटाला आहे. भोकर , मोह आणि इतर झाडे येथे भरभरून आहेत. धरण मोठे आहे. रिमझिम पावसामुळे या भागात फिरण्यास मजा आली . विशेष म्हणजे शनिवार रविवार न जाता आम्ही मंगळवारी भेट दिल्यामुळे गर्दी आणि हुल्लडबाजी टाळून निसर्ग जवळून बघता आला. तिथे एक स्थानिक रहिवासी आताच्या मोसमात येणाऱ्या भाज्या गोळा करत होते. कंकाकांनी या भाज्यांबद्दल लिहावे अशी विनंती. सध्या नुकताच पाऊस सुरू असलेने आजूबाजूला थोडे पाण्याचे झरे पाहिले. एकंदरीतच सुट्टी नसलेल्या दिवशी संवड काढून अशी ठिकाणे पाहणे उत्तम! पण हे कर्णोपकर्णी करु नका हं! फोटो देत आहे. बाकीचे फोटो कंकाकांनी द्यावेत अशी त्यांना विनंती करतो . रस्ता: bd1 धरण bd11 कंकाकाका आणि मी KNS परिसर pa1 pa2 pa3 pa4 pa5 रहिवासी आणि भाज्या bj1 bj2 misc1

प्रतिक्रिया द्या
13538 वाचन

💬 प्रतिसाद (41)
य
यशोधरा Fri, 07/01/2016 - 13:11 नवीन
मस्त! फक्त फोटो रिसाईझ करुन घ्या, असं सुचवते.
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 07/01/2016 - 13:11 नवीन
छान भटकंती.लहानपणी बारवी धरणाला काकाचे बोट पकडून जात असू! कोंडेश्वर पण मधल्या दिवशी बघण्यासारखं ठिकाण आहे बदलापुरातलं.शनि रवि मात्र भयानक!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 07/15/2016 - 06:06 नवीन
म्हातारपणी मी " पांडूकाका" चे बोट धरून जाणार आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
स्पा Fri, 07/15/2016 - 08:03 नवीन
:प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
सूड Fri, 07/15/2016 - 11:40 नवीन
पांडूकाकाचं बोट धरुन जायला वेटिंग लिस्ट लागली आहे म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ट
टवाळ कार्टा Fri, 07/01/2016 - 13:14 नवीन
तो ओढा डुंबायला कस्ला मस्त आहे
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 07/14/2016 - 15:27 नवीन
आमच्या घरापासून चालत जाण्याच्या अंतरावर असा ओढा होता, आता तिथे मोठा हायवे झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
श
शान्तिप्रिय Fri, 07/01/2016 - 14:18 नवीन
सर्वांना मनापासुन धन्यवाद!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 07/01/2016 - 14:26 नवीन
फोटो टाकतो नंतर. डॅम नाक्यावर वडा चहा मस्त मिळतो.( वडा प्लेट दहा रुपये , मिरचीखरडा फुकट ).
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 07/01/2016 - 14:27 नवीन
कंंजूसकाकांबरोबर भटकायला जाम मजा येते. चालता बोलता बरीच माहिती मिळत जाते.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 07/03/2016 - 05:54 नवीन
मला भटकायचा योग आला नाही पण शिवडीला फ्लेमिंगो महोत्सवाला ते, मी आणि नूलकरकाका होतो. एका तासात केवढी माहिती दिली दोघांनी! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पद्मावति Fri, 07/01/2016 - 14:30 नवीन
खूपच छान भटकंती.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 07/01/2016 - 14:36 नवीन
डोंबिवली पासून बदलापूर, आम्हाला तरी जास्त दूर नाही.....इतक्या जवळच्या गावात येवून देखील, शांतिप्रिय ह्यांची भेट न झाल्याने खंत वाटत आहे. असो, नेक्स्ट टाइम परत एकदा शांतिप्रिय ह्यांच्या बरोबर कट्टा करू.
  • Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय Fri, 07/01/2016 - 15:19 नवीन
धन्यवाद मुवि आपण ऑगस्ट्मध्ये किंवा त्याआधी भेटुच! मी कळवितो तुम्हाला येथे येणे असल्यास!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 07/02/2016 - 06:28 नवीन
ऑगस्ट मध्ये नक्की भेटू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय
क
कंजूस Sat, 07/02/2016 - 06:26 नवीन
फोटो १ ) नदी Image removed. २ ) Image removed. ३) Image removed. ४) Image removed. ५) data gprs Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 07/02/2016 - 06:54 नवीन
तसेच बदलापूर हे नाव कसे पडले याची रंजक माहिती मिळाली ती अशी
मी वेगळंच काहीतरी ऐकलंय. ब्रिटिशांनी जेव्हा रेल्वे सुरु केली तेव्हा इथे रेल्वे रुळांचे सांधे बदलले जाऊन गाडी ट्रॅक चेंज करायची त्यामुळे त्या ठिकाणाला बदलापूर म्हणायला लागले.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 07/02/2016 - 07:08 नवीन
आप्ल्या (देशी) इतीहासावर विश्वास नाही हेच वाटायला लागले आहे. सगळ इंग्रजांवर विश्वास ठेऊन. अधे मधे देशीही घेत जा (माहीती) कंजूस काकांना बरीच आडवाटेवरची ठिकाणे (आजायच्या सोप्या आणि कमी खर्चीक वाटांसह माहीती आहेत असे दिसते. चित्रे लांबवली गेलीत का मलाच दिसतात? . ता.क.ही सर्व चित्रे दिसली याचा आनंद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 07/02/2016 - 07:09 नवीन
तो प्रश्न नाही. 'बदल' हा शब्द शिवकालीन महाराष्ट्रात प्रचलित होता (किंवा अस्तित्वात होता) असे मला वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सूड गुरुवार, 07/14/2016 - 10:58 नवीन
'बदल' हा शब्द शिवकालीन महाराष्ट्रात प्रचलित होता (किंवा अस्तित्वात होता) असे मला वाटत नाही.
मग कोणता शब्द प्रचलित असावा 'असं तुम्हाला वाटतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
स्पा गुरुवार, 07/14/2016 - 13:07 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
च
चौकटराजा Fri, 07/15/2016 - 12:46 नवीन
अगदी बरोबर ! शिवकालात हा शब्द नव्हताच. तो अलिकडे पुण्यातील एका लग्न समारंभात जन्माला आला. आपण आता म्हणतोच ना बुवा 'बदल' लेत म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
श
शान्तिप्रिय Sat, 07/02/2016 - 07:10 नवीन
नावाबद्दल आणखि ही काही आख्यायीका असतिल.
  • Log in or register to post comments
ग
गौतमी Sat, 07/02/2016 - 08:25 नवीन
ती चॉकलेटी कळीसारखी भाजी आहे तीच नाव 'शेवाळं' आहे. दुसरी माहीत नाही कोणती आहे ते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 07/03/2016 - 06:33 नवीन
त्याच कंदातून( सुरणासारखा कंद कोणी खात नाहीत ) हा दुसरा तुरा पानांचा निघतो.पहिल्यातून फूल निघते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौतमी
ग
गौतमी Sat, 07/02/2016 - 08:26 नवीन
शेवळं
  • Log in or register to post comments
प
पीशिम्पी Wed, 07/13/2016 - 19:04 नवीन
डॅम चा फोटो नाहीये (जलाशयाचा)?
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/14/2016 - 11:05 नवीन
प्रतिसादातला तीन नंबरचा फोटो जलाशयाचा आहे.चार नंबरच्या फोटोतला रस्ता वळून धरणाच्या भिंतीच्या डाव्या टोकाजवळून जातो तिथून फोटो काढता येतो.तसं पाहिलं तर आता कोणत्याच धरणाच्या भिंतीवर जाता येत नाही.धरण बहुतेक सप्टेबरात भरते आणि ओवरफ्लो फार सुंदर असतो.सर्व बाजूने पाहता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पीशिम्पी
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/14/2016 - 14:12 नवीन
यन्दा मात्र उशीरा भरेल, कारण उन्ची वाढवलीय धरणाची ,पण पाण्लोट क्षेत्रात असाच पाउस सुरु राहील्यास मात्र सप्टेबर च्या आधीसुद्धा भरु शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
व
वेदांत गुरुवार, 07/14/2016 - 06:35 नवीन
छान लेख..
  • Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय गुरुवार, 07/14/2016 - 07:36 नवीन
जलाशयाचा जवळुन फोटो घेतला नाहि. त्यावेळी नुकताच पाऊस सुरु झाल्यामुळे फार पाणी नव्हते.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 07/14/2016 - 08:04 नवीन
खुप छान. पण धरणाजवळ जायला बंदी आहे ना.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/14/2016 - 11:08 नवीन
तलावाच्या मागच्या बाजूने मुरबाड म्हसा कर्जत रस्ता जातो,रस्त्यापलिकडे सिद्धगड गोरख मच्छिन्द्र आहेत.
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/14/2016 - 14:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/14/2016 - 14:26 नवीन
आता?
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/14/2016 - 15:01 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/14/2016 - 15:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/14/2016 - 15:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/14/2016 - 17:42 नवीन
फोटो मस्त, रघुनाथ .केरकर.
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर Fri, 07/15/2016 - 07:18 नवीन
_()_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ज
जागु Fri, 07/15/2016 - 08:53 नवीन
ती शेवळ आहेत आणि दुसरी भाजी पण शेवळ फुटल्यावर उगवतो तो पाला आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा