आरास...
ती दुरून दिसली जेव्हा
वठलेल्या झाडाखाली
मातीच्या गालावरती
उमटली लाजिरी लाली...
ती थोडी जवळी येता
हलकेच हासला वारा
गाभाऱ्यात मनाच्या
सजविला सुवक देव्हारा...
गुंफिली महिरपी ओठी
शतताऱ्यांची आरास
बरसुनी अंगणी गेली
चंद्रचांदण्यांची रास..
💬 प्रतिसाद
(3)
म
माहितगार
Sat, 07/02/2016 - 07:35
नवीन
वाह सुरेख, क्लास म्हणतात ते याला !
कवितेला अद्याप प्रतिसाद कसे काय नाहीत ?
- Log in or register to post comments
र
रातराणी
Sat, 07/02/2016 - 08:18
नवीन
छान आहे!
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Sat, 07/02/2016 - 09:44
नवीन
सुरेख !!
- Log in or register to post comments