Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझे नाव

म — माहितगार, Sat, 07/02/2016 - 07:13
तुझे नाव नी केवळ भितीने गारठून जायला होते पानांवरून ओघळून गेलेला प्रत्येक थेंब डागांची लांबच रांग दुखण्याचीही थांबलेली अन तुझी आठवण म्हणजे स्मरण शब्दातील रण, सरण आणि मरण जसा सडलेल्या समुद्राने त्याच्या उदरातून ओकलेल्या सड्याचा किनार्‍यावर पसरलेला ऊग्र वास ज्या मोत्यांच्या आशेने तुम्ही एक एक शिंपले उघडत जाता त्यातून ओघळणारे रक्ताचे थेंब आणि जखमींचे आणि मृतांचे आर्त स्वर तुझ्या नावाने एक एक उचलत माळ कवट्यांची पुढच्या बळीच्या गळ्यात घालण्यासाठी आणि तुझ्या नावाच्या दहशती खाली दातखीळ बसल्यावर उच्चारून दाखवायचे 'बेहद खुबसूरत', एकच जल्लोश तुझ्या नावाचा घ्यायचा शेवटचा श्वास आणि हुतात्म्यांच्या रांगेत कवट्यांच्या माळेत रहायचे एक अदृश्य आठवण होऊन ... तुझे नाव नी केवळ भितीने गारठून जायला होते .... (भारताबाहेर कुठल्याशा देशातला दहशतवादी हिंसाचार आज सकाळी वृत्तपत्रीय मथळ्यात वाचला, व्यक्त होण्यासाठी मिपावर प्रकाशित या काव्याचे विडंबन केले त्यासाठी मिपा कवी मिसळलेला काव्यप्रेमी आणि चाणाक्य यांना क्षमस्व)

प्रतिक्रिया द्या
1105 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा