हायकू (?)
दूर डोंगराच्या माथी
आले उतरू आभाळ
... झाडावर पानगळ
दूर क्षितिजरेषेला
फुटे प्रकाशाचा पंख
.... मनावर काळा डंख
निळ्याशार तळ्याकाठी
गूज प्रेमाचे वाजते
चैत्रचांदणी लाजते...
झुंजूमुंजू पहाटेला
किरणाचा सूर्यरंग
... ओथंबले ओले अंग
💬 प्रतिसाद
(3)
क
किसन शिंदे
Sun, 07/03/2016 - 18:20
नवीन
व्वा!! तुम्ही फार सुरेख लिहीता.
- Log in or register to post comments
र
रातराणी
Mon, 07/04/2016 - 07:23
नवीन
मस्तच!
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 07/04/2016 - 10:38
नवीन
झुंजूमुंजू पहाटेला
किरणाचा पुर्वरंग
... ओथंबले ओले अंग..
अशी दुरुस्ती कशी वाटते ते सांगा...
हायकु चांगले आहेत.
हायकु चाहता नाखु
- Log in or register to post comments