Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लटकलेली समीकरणं

च — चाणक्य, Mon, 07/04/2016 - 14:38
समीकरणाच्या एका बाजूला कधी कधी दुसरी बाजूच सापडत नाही ते असंच लटकत राहतं मग तिज्यायला म्हणजे कसं ना, की (a+b)^2 ला पत्ताच नसतो (a^2 + 2ab + b^2) चा आणि याचा त्याला पत्ता नसतो कुणीतरी सांगतं मग की बाबा (a+b)^2= (ab)^2 किंवा असच काहितरी आणि 'यालाच जीवन म्हणायचं' वगैरे मग सुरू होते एक फरफट... कधीमधी त्याला जाणवतंही की काहीतरी चुकतंय पण हाकत राहतो तो गाडी कारण, त्याला नीटसं समजत नसतं समीकरणच चुकतंय की आपण कधी भास होत राहतात त्याला समीकरण सुटल्याचे तर कधी स्वीकारली जाते ती असमानता कधी निद्रिस्त ज्वालामुखीसारखी खदखदत राहते ती आत. मला रविवारी सुट्टी असते . . . मला रविवारी दिसतात आरश्यात माझी काही लटकलेली समीकरणं. ------------------------ (टीप:- मिकाने कवितेत सुचवलेल्या सुधारणांबद्दल त्याचे आभार)

प्रतिक्रिया द्या
1771 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्राची अश्विनी Mon, 07/04/2016 - 16:11 नवीन
छान कल्पना! आवडली.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 07/04/2016 - 17:34 नवीन
भारीये.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय माने Mon, 07/04/2016 - 18:05 नवीन
तसाच विचार केला तर असतं ज्यांना माहिती (a+b)^2 म्हणजे 'नेमकं किती' त्यांचं गणित सुटतं नक्की? (a2+2ab+b2) हे खरंच असतं, की असतो फ़क्त दिखावा? का असतं असं समीकरण, का सोडवायचं गणित, नुसती सगळी थिअरी च साली राहून जातं प्रॅक्टीकल. कोणी म्हटलं कर १०५ चा वर्ग तर नसतं काही उत्तर टाका बघू समिकरणात वरच्या करा (१००+५)^२ सापडेल कदाचित का सोडवायचं गणित आणि का म्हणायचं वयं पंचाधिकं शतम् -बळंच कवी
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 07/05/2016 - 03:44 नवीन
गमती गमतीत खुपच छान लिहीलत की मानेमामा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
ध
धनंजय माने Wed, 07/06/2016 - 08:09 नवीन
बच्चन साहेबांनी एक्स्ट्रा कलाकाराला दिलेली शाबासकी मानावी काय? का श्शा- बास्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 07/05/2016 - 03:43 नवीन
अत्यंत संवेदनशील रचना.. चाणाक्य __/\__!
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 07/06/2016 - 08:32 नवीन
दोन्ही समीकरणं, आपलं कविता आवडल्या.
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 07/06/2016 - 08:43 नवीन
क्या बात !!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा