Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भोज धरण आणि कोंडेश्वर

क
कंजूस
Sun, 07/10/2016 - 07:16
💬 38
भोज धरण २ ) भोज धरण पावसाने चांगली सुरुवात केली, मागच्या वर्षाचा राग दूर केला आणि तीन आठवड्यात निसर्गाचं रूप बदलून टाकलं.पाऊस पाहण्यात सह्याद्री पर्वतरांगात जी गम्मत आहे ती दुसरीकडे कुठेही येत नसेल.सुरुवात केली यावेळच्या भटकंतीची राजमाची गडावर ती आनंदाची झाली.पण इकडे भटकायचं तर दोन दिवस हाताशी हवेतच.आता महिन्याभरात बदललेला निसर्ग पटकन पाहायचा तर पर्वत पायथाच योग्य.भातशेतीची तयारी चाललेली असते.यासाठी बदलापुरचे भोज - कोंडेश्वर हे एक उत्तम ठिकाण. शुक्रवार होता आणि अशा ठिकाणी जाण्यासाठी शनिवार रविवारची गर्दी टाळण्यासाठी योग्यच तसेच सकाळची कामावर जाणाय्रांची धावपळ संपल्यावर रेल्वेने निघालो बदलापूरकडे. ३ ) रूट नकाशा कसे जावे -- बदलापूर स्टेशन ते भोज धरण ,कोंडेश्वर १) बदलापूर स्टेशनला ठाणे एंडकडच्या टोकाला उजवीकडे बाहेर पडा.एक मिनिटावर "भोज" गावाकडे जाणाय्रा थ्रीसिटर auto असतात.पंधरा रु/ सीटने परंतू मागे चारजण बसवतात.पुढे ड्राइवरच्या दोन्ही बाजूस दोन हाफ सीट बसतात. तुम्ही तिघे असाल तर चार सिटांचे पैसे देऊन मागे आरामात बसा. साडेपाच किमिच्या भोज गावाला सोडेल. २)भोज इथून पुढे पाच मिनीटे चालल्यावर भोज धरण डावीकडे आणि कोंडेश्वर उजवीकडे अशी पाटी दिसेल. उजवीकडे पाच मिनिटांवर धरणाचा ओवरफ्लो येईल.आणखी पुढे अर्धा तास चालल्यास शेवटचे कोंडेश्वर आहे.( भोजपासून अडिच किमी.) रूट:- बदलापूर स्टेशन - कर्जत रोडने - खरवई आंबेडकर चौक उजवीकडे वळून -जोवेली गाव -दहिवली गाव-भोज-कोंडेश्वर.(८किमी ) स्पेशल auto केल्यास रु दोनशेत स्टेशन ते कोंडेश्वर सोडतात. चहा वडा टपय्रा आहेत. मोठे टॅाइलट बांधून तयार आहे परंतू उद्घाटन व्हायचे आहे. परत येताना भोजला auto न मिळाल्यास दहिवली गावात यावे.( दहा मिनिटे ). ४ ) धरण परिसर कोंडेश्वर ,बदलापूर देवळाजवळचा धबधबा ( फक्त पाहण्यासाठी ) इथे प्रवाह फार धोकादायक असून तो धबधब्याखालचा डोह घातकी ठरल्याने देवळामागचे दोन मोठे धबधबे फक्त पाहण्यासाठी आहेत. संपूर्ण पोलिस बंदोबस्त आहे.भोज धरणाचा चांगले पोहता येणाय्रांनी वापर करावा. ५ ) मुंबईतून रेल्वेने प्रवास करताना पश्चिम रेल्वेने बोरिवली - विरार -पालघर जाताना नेहमी रेल्वे उत्तरेकडे जाते आणि रुळाच्या डावीकडे असलेला उपनगराचा भाग पश्चिम म्हणून ओळखला जाते तसेच उजवीकडचा भाग हा पूर्व. सिएसटी कडून मध्य रेल्वेने दादर -ठाणे - कल्याण - टिटवाळा - आसनगाव - कसारा असे जाताना पूर्व पश्चिम भागही असेच येतात. परंतू कर्जत - खोपोलीकडे जाताना असे होत नाही. कल्याणनंतर गाडी पूर्णपणे उलट दक्षिण दिशेला वळते त्यामुळे बदलापूर स्टेशनला डावीकडे पूर्व आणि उजवीकडे पश्चिम येते.कोंडेश्वर हे हाजीमलंग गडाच्या पायथ्याशी पण बदलापूर पश्चिमेला आहे

प्रतिक्रिया द्या
17033 वाचन

💬 प्रतिसाद (38)
च
चौकटराजा Sun, 07/10/2016 - 07:39 नवीन
कंका, खरोखरच आपल्या बरोबर एखादी सहल झाली तर मजा येणार. आपल्या फोटोवरून हे ठिकाण सुन्दर दिसते आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 07/10/2016 - 12:43 नवीन
आम्हालाही तुम्हा दोघा काकांबरोबर सहलीला यायचे आहे. फोटो छानच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
स्पा Sun, 07/10/2016 - 07:57 नवीन
एक नंबर ठिकाण, दरवर्षी जातो
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 07/10/2016 - 08:19 नवीन
जाणार. हा प्रकार बघायचाच आहे. स्पांडुरंगराव, जाणार असाल तर इंटिमेशण द्याल काय? फोटोग्राफी शिकायला येईन तुमच्याकडून.
  • Log in or register to post comments
स
स्पा Sun, 07/10/2016 - 09:21 नवीन
चलाच, या महिन्यात नक्की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
च
चौकटराजा Sun, 07/10/2016 - 09:41 नवीन
मी बी येतो.. नाहीतरी मला बुवांचा अवडता पांडू आहे कसा आननी ते पहायचेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Sun, 07/10/2016 - 09:59 नवीन
चला फोटोग्राफी कट्टा करु, अप्रतिम जागा आहे फोटोंसाठि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ब
बोका-ए-आझम Sun, 07/10/2016 - 10:18 नवीन
मी येईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
य
यशोधरा Sun, 07/10/2016 - 09:14 नवीन
सुरेख फोटो!
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sun, 07/10/2016 - 10:08 नवीन
कंजूसकाका,धन्यवाद.अप्रतिम फोटो. खफवर माहिती वाहून गेली असती म्हणून धागा काढण्याची विनंती केली.आता वाखू साठवता येईल.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Sun, 07/10/2016 - 11:30 नवीन
काका सगळे मिळून एक पावसाळी सहल करु या की. मा. शा. कुठे आहात? ते ही म्हणाले होते एक पावसाळी सहल करु या.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Sun, 07/10/2016 - 11:30 नवीन
काका सगळे मिळून एक पावसाळी सहल करु या की. मा. शा. कुठे आहात? ते ही म्हणाले होते एक पावसाळी सहल करु या.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 07/10/2016 - 13:35 नवीन
मी तयारच आहे कोणत्याही दिवशी.तुम्ही तारीख ठरवा.मा०शा० ठाण्यात आहे.बारवी डॅम ओवरफ्लो व्हायला वेळ आहे तो झाला की एकाच दिवशी बारवी डॅम आणि भोज शक्य आहे.दोन्ही जमेल.रविवारी भोजकडे गर्दी असते पण बारवीला कोणी फिरकत नाही.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 07/11/2016 - 06:58 नवीन
तर नक्की येणार (वल्ली अत्ताच शीटा पकडून ठेवणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
स्पा Mon, 07/11/2016 - 07:37 नवीन
Image removed. २.Image removed. ३.Image removed. ४.Image removed. ५.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रचेतस Mon, 07/11/2016 - 07:56 नवीन
चित्रे खूपच भडक वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
न
नीलमोहर Mon, 07/11/2016 - 08:43 नवीन
पहिले दोन फोटो खूप सुरेख आहेत, पण प्रोसेसिंग, सॅच्युरेशन जास्त वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
त
त्रिवेणी Mon, 07/11/2016 - 08:19 नवीन
सुंदर छायाचित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ब
बोका-ए-आझम Mon, 07/11/2016 - 09:26 नवीन
शेवटचं आणि त्याच्या आधीचं तर खासच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
च
चौकटराजा Mon, 07/11/2016 - 13:02 नवीन
तुम्ही कंजूस काकाचं बोट धरा.... मी पांडू काकांचं बोट धरतो. मी प्रचेतस यांचा बाय डिफोळ्ट काका असल्याने ते माझं बोट धरतील म्हणजे चुकामूक नको ..... काय .. ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
माझीही शॅम्पेन Mon, 07/11/2016 - 10:04 नवीन
तयार .. होय एका पायवर तयार आहे , कंजुस सांगतील तस रविवार गर्दी असेल तर शनिवार पण चालेल , मुंबई आणि पुणे च्या मध्यभागी असेल तर दोन्ही बाजूचे येऊ शकतील , नाही कसाही चलतय, फक्त काय अप्पा करा आम्ही हजर होऊ मी , डॉक , माप जमल तर टका (त्याला जमल तर) कंजुस ह्यातले जबरा जाणकार आहेत __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ट
टवाळ कार्टा Mon, 07/11/2016 - 12:47 नवीन
मी येणार रे...फक्त १६ चा विकांत आणि ऑगस्ट सोडून :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
म
माझीही शॅम्पेन Sat, 07/23/2016 - 07:57 नवीन
मी येणार रे...फक्त १६ चा विकांत आणि ऑगस्ट सोडून :D
ह टांगारू टका हे नाव सार्थ झालं रचाक ने मागील रविवारी बारवि धरण कट्टा एकदम झकास होऊन गेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
माम्लेदारचा पन्खा Sat, 07/23/2016 - 09:32 नवीन
ड्याम वगैरे कसले दाखवता त्याला...? ड्याम इट...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
व
वेदांत Mon, 07/25/2016 - 06:45 नवीन
पुढील वेळेस मलाही सांगा,मलाही आवडेल यायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
न
नंदन Sun, 07/10/2016 - 14:26 नवीन
डोळे निववणारी छायाचित्रं!
  • Log in or register to post comments
व
वन्दना सपकाल Sun, 07/10/2016 - 19:18 नवीन
Apratim
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 07/11/2016 - 01:40 नवीन
सुंदर फोटो!
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 07/11/2016 - 07:38 नवीन
स्पांडुरंगा _/\_
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 07/11/2016 - 07:38 नवीन
काका तुम्ही म्हणताय ते भोज धारण नाही, तो कोंडेश्वरचाच प्रवाह खाली येतोय, भोज धरण तिकडे जवळच आहे पण वेगळीकडे
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Mon, 07/11/2016 - 07:50 नवीन
सुंदर फोटो आहेत सगळेच.
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Mon, 07/11/2016 - 09:00 नवीन
वा . खू . साठवली आहे . मुंबईत थोडे दिवसांचा मुक्काम आहे जमले तर जाऊन येईल. इकॉनॉमिकल ट्रेक कसे करावे यासाठी तुम्ही माझे आदर्श आहात. कल्याण , डोंबिवली, पनवेल अगदी पुण्यापर्यंतचे ट्रेक यष्टी , रेल्वे ,टमटम ने करण्यात वेगळी मजा आहे.माझे नोकरीला लागल्यापासून हात थोडे जास्तीच ढिले सुटतात ;)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 07/11/2016 - 09:11 नवीन
"इकॉनॉमिकल ट्रेक कसे करावे ---- " ट्रेकचा फंडा असा असतो की दहा रुपयांचं तिकिट आणि सवाशे रुपयांची पायपीट.डोंगरात, रानावनात भटकायचं. लवकरात लवकर भोज्ज्याला हात लावून परत नव्हे.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 07/11/2016 - 11:53 नवीन
पिकतं तिथे विकत नाही म्हणतात ते आमच्याकडे बघून खरं व्हावं. आम्हाला जायला आता कधी सवड मिळते बघू!!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 07/11/2016 - 12:51 नवीन
फोटो मस्त आलेत कंजुष काकांच्या मोबाईलमधले, स्पावड्याचे फोटो पूर्वी पाह्यले आहेत आणि भारी आहेत.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 07/23/2016 - 14:24 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/24/2016 - 07:52 नवीन
सुंदर फोटो ! पाण्याच्या प्रवाहात बसून रहावेसे वाटते ! :)
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 01/16/2017 - 15:50 नवीन
थोडीशी दुरुस्ती... परंतू कर्जत - खोपोलीकडे जाताना असे होत नाही. कल्याणनंतर गाडी पूर्णपणे उलट दक्षिण दिशेला वळते त्यामुळे बदलापूर स्टेशनला डावीकडे पूर्व आणि उजवीकडे पश्चिम येते.कोंडेश्वर हे हाजीमलंग गडाच्या पायथ्याशी पण बदलापूर पश्चिमेला आहे हि माहिती थोडी चुकीची आहे...कल्याण हुन कर्जत - खोपोलीकडे जाताना सुद्धा बदलापूर स्टेशनला डावीकडे पश्चिम आणि उजवीकडेच पूर्व आहे. तसेच कोंडेश्वर हे बदलापूर पश्चिमेला नसून बदलापूर पूर्वेला आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा