लंडनवारीची तयारी
जै लंडनातले मिपाकर :)
आम्च्या क्लाएंटकृपेने मी ऑगस्टात लंडनात येत आहे...२ आठवडे (विकांत सोडून) रोज मरमर काम आणि त्यानंतर १ आठवडा सुट्टी :) असा बेत आहे.
१) पहिल्या २ आठवड्याच्या वेळेत"च" आणि शक्य असेल तर विकांत सोडून :D एखादा कट्टा करायला जमेल का? जमल्यास साहेबाच्या नाकावर टिच्चून स्वातंत्र्यदिन कट्टा करू :)
२) २ विकांत आणि त्यानंतर १ आठवड्याच्या सुट्टीत किती आणि कुठे कुठे भटकता येईल?
३) तिथे बाईक / कार भाड्याने मिळते का? जमल्यास १ आठवडा रोड ट्रीप करायला आवडेल :)
४) अगदी स्वस्तात राहायच्या सोयी काय? मला अगदी आन्हिके आटपायाला आणि झोपण्यापुरती सोय असेल तरी चालून जाते :)
आणि सगळ्यात महत्वाचे, UK व्हिसावर कुठे कुठे भटकू शकतो? चुकवू नयेत अशी ठिकाणे कोणती? मी काही ठिकाणे ठरवली आहेत...त्यात लंडनातल्या मिपाकरांनी आणखी भर घालावी ही विनंती
१) स्टोनहेंज
२) डर्डल डोअर आणि लुल्वर्थ कोव
३) टॉवर ब्रीज, आर्सेनल स्टेडियम, राणीचा महाल, लंडन आय, बिग बेन आणि जमल्यास change of guards ची परेड...थोडक्यात सांगायचे तर जीवाचे लंडन
४) जमत असेल तर आयर्लंड मधले ज्वालामुखी
५) ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज
मला चर्चेसपेक्षा निसर्ग सौंदर्य (त्यातही बीचेस जरा जास्तच) बघायला जास्त आवडते...पण एखादे बघितलेच पाहिजे असे म्युझियम असेल तरी सुचवा पण फक्त पेंटिंग्ज/स्कल्पचर असणारे म्यूजियम नको...इजिप्शिअन / प्री-हिस्टोरिक वगैरे टाईप चालेल
याच बरोबर तिथे भटकताना उपयोगी पडतील अश्या टिप्स पण द्याव्या (उ.दा. प्रवासात तिकिटांवर खर्च कमी कसा करता येईल)
भेटू लवकरच :)
💬 प्रतिसाद
(109)
व
विशाखा राऊत
Mon, 07/11/2016 - 14:56
नवीन
वेलकम..
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 07/11/2016 - 14:56
नवीन
इनो द्या आता मला.
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Mon, 07/11/2016 - 15:23
नवीन
मेक इट टु
- Log in or register to post comments
स
स्पा
Mon, 07/11/2016 - 15:27
नवीन
मेक इठ थ्री विथ सुतशेखर
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 07/11/2016 - 15:09
नवीन
टक्या लेका लंडनला चालला?
कशाला???
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Mon, 07/11/2016 - 15:20
नवीन
टकया निघालंय लंटनला...
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Mon, 07/11/2016 - 15:25
नवीन
टक्या भावा, ये तू, वला कट्टा करु.. आपल्यातर्फे सिंगल माल्ट कट्ट्यासाठी नक्की. ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 07/11/2016 - 15:27
नवीन
फोन नंबर व्यनी करा...प्लान करु ;)
- Log in or register to post comments
ध
धनंजय माने
Mon, 07/11/2016 - 16:00
नवीन
या प्रतिसादासाठी तुला एक सरदारोंवाली पगड़ी (टाचण्या सह), एक मिस्टर बीन ची सीडी आणि न्यूटन यांचा दोन भोकं वाला दरवाजा सप्रेम भेट.
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Mon, 07/11/2016 - 17:52
नवीन
:)))
मि. बीन भेटेल बघ तुला लंडंन मध्ये पायजे तर.. ;)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 07/11/2016 - 15:30
नवीन
ह्येला म्हणतेत आ बैल मुझे मार.
अस्वस्थाम्या काय अवदसा आठवली रे तुला. ;)
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Mon, 07/11/2016 - 17:55
नवीन
येऊ दे तर (बैलाला), मग बघू की.. ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 07/11/2016 - 15:25
नवीन
The मामी भेटेल का रे तिकडे?
टक्कूमक्कूशोनू Ssssssssssss! 
- Log in or register to post comments
ध
धनंजय माने
Mon, 07/11/2016 - 15:25
नवीन
झैरात झैरात....
(आता तरी बाळाचं लगीन जमू दे रे रवळनाथा ;) )
- Log in or register to post comments
अ
अजया
Mon, 07/11/2016 - 15:37
नवीन
टक्कुबाळाला नाक पुसता येईना लंडनला चाललं का ;) या घे टिप्स..
विमानातून हात बाहेर काढु नको
विमानाच्या सिटवर उड्या मारु नको
सारखी चाॅकलेट मागु नको
कपड्यांवर खायचं सांडायचं नाही अजिबात.
राहायला राणीकडे चौकशी करणे.तिची कोणी पतवंडी लग्नाची असेल तर ते पण काम होईल एकात एक. रोझ तयार ठेवावे लागेल रोज.रोझ फाॅर रोज!
- Log in or register to post comments
स
स्पा
Mon, 07/11/2016 - 15:44
नवीन
अॅवामाइन घे, विमान लागणार नाही
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
Mon, 07/11/2016 - 15:51
नवीन
हे घे रे काही टिप्स
1) विमानात फुकट मिळते म्हणून जास्त पिवू नको
2) गोरी मुलगी दिसली म्हणून एकटक बघू नकोस
अजुन मिपकर्स तुझा बाजार उठवायला समर्थ आहे हे नक्की म्हणून टंकनश्रम वाचावतो .. पळा
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 07/11/2016 - 15:59
नवीन
एखादी गोरी, हिरव्या डोळ्यांची पुणे तीस मधली असेल तर पंचाईत व्हायची. =))
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
Sat, 07/16/2016 - 16:09
नवीन
अगदी खरं आहे त्यातून ती जर मिपा वाचणारी असेल तर बाजार उठला म्हणायचा :)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 07/11/2016 - 16:06
नवीन
राणीची चेंज ऑफ गार्डस परेड बघताना पण जवळ ठेव हो अवामाईन.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 07/11/2016 - 16:07
नवीन
. =))
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 07/11/2016 - 16:15
नवीन
इथे नक्की जाऊन या. फार सुंदर आहे.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 07/11/2016 - 16:17
नवीन
३) तिथे बाईक / कार भाड्याने मिळते का?
ह्याच्यासोबत कंसात (कृपया एनफिल्डच्या बाईक्स सुचवू नये ही नम्र विनंती) असे लिहिले असते तर बरे पडले असते न टका भाऊ
(तुम्हाला सांगायची गरज नाही तरीही हलके घ्या ही विनंती)
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Tue, 07/12/2016 - 09:44
नवीन
बाप्पु: लै भारी...
पार शाल जोडी...
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 07/12/2016 - 11:10
नवीन
असंच काही नाही हो! टक्या आहे म्हणून टवाळपणा चाललाय, *विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते, असा टवाळपणा आमच्याबर करायची सुद्धा टकोजी राजे ह्यांसी परवानगी अध्याहृत आहेच सौरभ भाऊ!
*डायलॉग सौजन्य धनंजय माने साहेब, अजिबात माफी न मागता त्यांची!
- Log in or register to post comments
ध
धनंजय माने
Mon, 07/11/2016 - 16:18
नवीन
बाकी ऑन सीरियस मोड़, टका स्वत:च्या मेहनतीवर आणि स्वबळावर (स्वकष्टार्जित) लंडन ला जाऊन येत आहे याबद्दल त्याचे मन:पूर्वक अभिनंदन!
अशाच संधी वारंवार येत राहोत आणि टका सहकुटुंब फिरत राहो.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 07/11/2016 - 16:20
नवीन
अर्थात,
ह्याबद्दल त्याचे अभिनंदन आहेच...
जरा काळजी वाटती, बाकी कै नै.
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Mon, 07/11/2016 - 16:23
नवीन
स्वकष्टार्जित?
अहो कलाईन्ट पाठवतोय
- Log in or register to post comments
ध
धनंजय माने
Mon, 07/11/2016 - 16:47
नवीन
कंपनी कुनाला बी न्हाय पाठवत!
त्येच्यासाटी ह्याच्यात त्ये असावं लागतंय. डोक्यात मेंदू.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 07/11/2016 - 18:33
नवीन
+ १
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Tue, 07/12/2016 - 09:02
नवीन
नशीब पण असते
- Log in or register to post comments
ध
धनंजय माने
Tue, 07/12/2016 - 09:06
नवीन
हो. तुझं देखील उजळेल. कल्जी क्रू न्ये.
पोरं होतील,लग्न होईल, नोकरी लागेल, फिरुन येशील वगैरे.
नशीब नसलं तर गोष्टी होतात फ़क्त क्रमाने होत नाहीत.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 07/12/2016 - 09:26
नवीन
त्यांच्यात रांजणे असतात.
भरलेत म्हणे.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 07/11/2016 - 16:24
नवीन
+१ , सहमती आमची तह-ए-दिल से :)
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Mon, 07/11/2016 - 16:26
नवीन
मस्त जीवाचे लंडन करून या,
जमल्यास तिकडेच दोनाचे चार हातही करून या,
काय सांगावं, फोटोशॉप केलेला फोटो प्रत्यक्षातही यायचा तिकडे (तरी :)
शुभेच्छा !!
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
Mon, 07/11/2016 - 16:47
नवीन
अनावश्यक धाग्यावर प्रतिसादांचा रतीब!!
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Mon, 07/11/2016 - 16:58
नवीन
तुम्ही इनो घ्या...
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 07/11/2016 - 19:22
नवीन
चालते व्हा.
- Log in or register to post comments
म
मितभाषी
Mon, 07/11/2016 - 20:43
नवीन
कुठे पाकिस्तान का
हे हॅ हॅहॅ हम्म्म्मन
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 07/11/2016 - 20:47
नवीन
तसेही ते पाताळ धुंडत असतात ना!
- Log in or register to post comments
म
मितभाषी
Mon, 07/11/2016 - 20:51
नवीन
म्हणजे लूगड्यात का?
- Log in or register to post comments
स
सुनील
Mon, 07/11/2016 - 16:49
नवीन
असे असेल तर, मी ब्रायटन हे गाव सुचवेन. लंडनहून तासाभरात पोचता येते (रेल्वे वा बस). अतिशय सुरेख बीच.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Mon, 07/11/2016 - 16:59
नवीन
तिकडेच लग्न जमल्यास बघावे. म्हंजे आम्ही कधी आलो तर रहायची सोय होइल.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 07/11/2016 - 17:03
नवीन
लाॅर्डस् आणि ओव्हल आणि फुटबाॅल फॅन असलात तर वेम्बली सोडू नका. शिवाय मिलेनियम आय, मादाम तुसाँ, राॅयल आल्बर्ट हाॅल, बिग बेन, टाॅवर आॅफ लंडन वगैरे पाहाच. चेंजिंग आॅफ गार्ड्स ही उगाचच केलेली हवा आहे असं मत आहे. त्यापेक्षा आपला वाघा बाॅर्डरवरचा समारंभ जोशपूर्ण आणि दणदणीत असतो. बाकी ट्यूबमधून भटकणे आणि एखाद्या जर्मन kiosk मध्ये mustard sauce लावलेला pretzel खाणे अाणि हो, Fish n chips - हे विसरू नका.
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Mon, 07/11/2016 - 17:07
नवीन
दोन चार ब्रिटिश लोकांना १५ ऑगस्टला चोपून काढ आणि तो कोहिनूर परत आण ब्यागेत घालून गपचूप !
- Log in or register to post comments
प
पक्षी
Tue, 07/12/2016 - 12:10
नवीन
महालोल... जाम हसलो
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Mon, 07/11/2016 - 17:08
नवीन
दोन चार ब्रिटिश लोकांना १५ ऑगस्टला चोपून काढ आणि तो कोहिनूर परत आण ब्यागेत घालून गपचूप !
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Mon, 07/11/2016 - 17:09
नवीन
दोन चार ब्रिटिश लोकांना १५ ऑगस्टला चोपून काढ आणि तो कोहिनूर परत आण ब्यागेत घालून गपचूप !
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Tue, 07/12/2016 - 04:54
नवीन
तो कोहिनूर पळवताना तो हिराच आहे ना .... हे पाहून घ्यावे. हल्ली कोहिनूर कशाचेही नाव असते.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 07/11/2016 - 18:27
नवीन
कुठेही भटक
पण...
पण...
पण....
येतांना २ कार्ढू ( https://www.thewhiskyexchange.com/p/1461/cardhu-12-year-old) मात्र नक्की आण. फार महागाची आणू नकोस. १२ वर्षे जूनी पण उत्तम लागते.
कार्ढूची चटक एकदा लागली की, ब्लॅक लेबल, शिवास रीगल पण फिक्या वाटतात.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »