Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लंडनवारीची तयारी

ट
टवाळ कार्टा
Mon, 07/11/2016 - 14:52
💬 109
जै लंडनातले मिपाकर :) आम्च्या क्लाएंटकृपेने मी ऑगस्टात लंडनात येत आहे...२ आठवडे (विकांत सोडून) रोज मरमर काम आणि त्यानंतर १ आठवडा सुट्टी :) असा बेत आहे. १) पहिल्या २ आठवड्याच्या वेळेत"च" आणि शक्य असेल तर विकांत सोडून :D एखादा कट्टा करायला जमेल का? जमल्यास साहेबाच्या नाकावर टिच्चून स्वातंत्र्यदिन कट्टा करू :) २) २ विकांत आणि त्यानंतर १ आठवड्याच्या सुट्टीत किती आणि कुठे कुठे भटकता येईल? ३) तिथे बाईक / कार भाड्याने मिळते का? जमल्यास १ आठवडा रोड ट्रीप करायला आवडेल :) ४) अगदी स्वस्तात राहायच्या सोयी काय? मला अगदी आन्हिके आटपायाला आणि झोपण्यापुरती सोय असेल तरी चालून जाते :) आणि सगळ्यात महत्वाचे, UK व्हिसावर कुठे कुठे भटकू शकतो? चुकवू नयेत अशी ठिकाणे कोणती? मी काही ठिकाणे ठरवली आहेत...त्यात लंडनातल्या मिपाकरांनी आणखी भर घालावी ही विनंती १) स्टोनहेंज २) डर्डल डोअर आणि लुल्वर्थ कोव ३) टॉवर ब्रीज, आर्सेनल स्टेडियम, राणीचा महाल, लंडन आय, बिग बेन आणि जमल्यास change of guards ची परेड...थोडक्यात सांगायचे तर जीवाचे लंडन ४) जमत असेल तर आयर्लंड मधले ज्वालामुखी ५) ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज मला चर्चेसपेक्षा निसर्ग सौंदर्य (त्यातही बीचेस जरा जास्तच) बघायला जास्त आवडते...पण एखादे बघितलेच पाहिजे असे म्युझियम असेल तरी सुचवा पण फक्त पेंटिंग्ज/स्कल्पचर असणारे म्यूजियम नको...इजिप्शिअन / प्री-हिस्टोरिक वगैरे टाईप चालेल याच बरोबर तिथे भटकताना उपयोगी पडतील अश्या टिप्स पण द्याव्या (उ.दा. प्रवासात तिकिटांवर खर्च कमी कसा करता येईल) भेटू लवकरच :)

प्रतिक्रिया द्या
32821 वाचन

💬 प्रतिसाद (109)
च
चौकटराजा Tue, 07/12/2016 - 04:57 नवीन
सध्या फार्म हाउस चा एक कोपरा सुताराच्या हाती दिला आहे. मस्त ,, झाला आहे,, ये दुनिया उसीकी जमाना उसीका हे गीत ही गाउ ... !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
आ
आदूबाळ Mon, 07/11/2016 - 18:39 नवीन
या बात!
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 07/11/2016 - 18:56 नवीन
हो आणि व्रुत्तांत पायजेलाय...
  • Log in or register to post comments
च
चिमी Mon, 07/11/2016 - 19:03 नवीन
लंड्न -> बेकवेल - > व्हिटबी अ‍ॅबी - > फ्लॅमबराह लाईट-हाऊस आणि फ्लॅमबराह हेड http://www.misalpav.com/node/32097
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 07/11/2016 - 19:16 नवीन
बघा जमलं तर एखादी जुड़ी पटवा आता तिकडेच =))
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक Mon, 07/11/2016 - 20:57 नवीन
नाही जमणार त्याला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
न
नमकिन Tue, 07/12/2016 - 04:37 नवीन
शून्य वेळ सुरु होणा-या बागेत जाऊन ये. पाण्यावर उगं लय पाऊंड उडवू नगंस, बीयर बरी त्यापरिस. जिथे प्रवेश शुल्क नसेल ते ते सर्व पहा ;-) नियमात रहावे, विनोदवीरता सगळेच खपवून घेतील असे नव्हे. पाऊंड इथल्या बँकेतनच घे, स्वस्त पडेल
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Tue, 07/12/2016 - 05:29 नवीन
चंदन तुझं अभिनंदन ! खुप खुप शुभेच्छा! नि नुकताच एक धागा आला होता मेघना मन्दार आणि अभिजीत अवलिया यांच्या लंडनवारीचा तो वाचुन जा. फक्त एकच कोणीही Image removed. असं केले तर लगेच पा-ग- घळू नकोस.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Tue, 07/12/2016 - 05:29 नवीन
चंदन तुझं अभिनंदन ! खुप खुप शुभेच्छा! नि नुकताच एक धागा आला होता मेघना मन्दार आणि अभिजीत अवलिया यांच्या लंडनवारीचा तो वाचुन जा. फक्त एकच कोणीही Image removed. असं केले तर लगेच पा-ग- घळू नकोस.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 07/12/2016 - 05:45 नवीन
आणायचे आहे लंडनवरून कोहिनूर आणि भवानी तलवार वगैरे त्याची यादी मलोजीरावांकडून घेणे इतर माहीती बॅट्याकडून लगेच घेणे (एकदा तो मिपावर आला की ,नाही तर थेट १५ दिवसांनी उगवतो नंतर तक्रार चालणार नाही) .तुला ललनांची नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची "विजय पुरोहित" जुन्या नावाने देतील. बुवांकडून तांब्या घे लंडनला त्याचे बदल्यात कोहिनूर मिळतोय का ते बघ, (ब्रिटिशांना जुन्या वस्तूंचा शौक आहे असे प्यारे मानेंना सांगत होते खखो दोघेच जाणे). आणि आल्याव्र तो बहुचर्चित धागा पुररुज्जीवेत करावा लागणार नाही याची बेगमी तिकडून्च करून ये (रडू देत इथल्या वाट पाहणार्या वधू पित्यांना) प्रवासाला शुभेच्छा... वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 07/12/2016 - 06:02 नवीन
या धाग्याचा 'तो' धागा रद्दबातल करण्यास उपयोग झाला का ते कळवणे.योग्य ठिकाणी झैरात झाली का;)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/12/2016 - 06:09 नवीन
तिकडेच स्थायिक होणाय्रा लोकांपेक्षा 'जाऊन येऊन असणारे मामा' भाच्यांना फार आवडतात.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 07/12/2016 - 06:15 नवीन
जायचा सूट त्या कोपऱ्यावरच्या फ्रान्सिस शिंप्याकडे शिवून घे आणि बूट चिनी चाम्भाराकडे. येताना शेक्सपियरच्या घरी जाऊन भेटून ये तो सारखं 'नावात काय ए' असं बोंबलत असतंय ते त्याला समजावून सांग . जाता जाता २२१ B वर ते वाह्यात कार्ट शेरलॉक भेटलं तर त्याला पूढचा सिजन कधी काढणारे ते इचार यमाई- ६ च्या हाफिसात तो बॉण्ड बाबा भेटला तर त्याला एवढ्या ललना आणि ती म्हातारी बॉस कश्या मॅनेज करतो ते सांग म्हणावं टेम्स च्या किनाऱ्यावर वर्डस्वर्थ ची कविता नक्की म्हण वाचून ...
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 07/12/2016 - 08:02 नवीन
स्कायफाॅल मध्येच चचली ना म्हातारी! आता मॅलोरी नावाचा इसम बसतो तिथे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
महासंग्राम Tue, 07/12/2016 - 08:05 नवीन
आयला खरंच की जाऊ द्या म्हातारी कॅन्सल ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ख
खडीसाखर Tue, 07/12/2016 - 14:14 नवीन
>>जाता जाता २२१ B वर ते वाह्यात कार्ट शेरलॉक भेटलं तर त्याला पूढचा सिजन कधी काढणारे ते इचार शेरलॉक च्या सिजन-४ चे चित्रीकरण एप्रिल पासुन सुरु झाले आहे. हे पहा - Sherlock-season 4
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
प
पिशी अबोली Tue, 07/12/2016 - 06:22 नवीन
टकादादा यांस, सानविवि. लंडनास सूखरुप जाऊन परत येणे. तूमचे लेख छोटे छोटे आस्तात. जरा नीट लीहिणे. तूमचे लक्षण हे आधीपासून आसेच असे आजी म्हणत होती. तीकडून येतानातरी एकदाची कुणी बायको करून आणणे, म्हणजे हे कारटं संसाराला लागेल आणि जरा छळवाद कमी होईल आसे मिपाबायकांचे म्हणणे आहे आसे पार्वतीकाकू मानेकाकांना सांगत होत्या ते आमच्या कामवाल्या मावशीने आजीला सांगताना मी चोरून आईकले. लंडनच्या बाजारात छान छान रिबिनी मिळतात त्या सगळ्या छोट्या बहिणींसाठी घेऊन येणे. तूमची नम्र पिशी
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 07/12/2016 - 08:00 नवीन
=)) कार्टं निघालं लंडनला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
न
नावातकायआहे Wed, 07/13/2016 - 04:24 नवीन
पारपत्र सांभाळा!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ध
धनंजय माने Tue, 07/12/2016 - 08:11 नवीन
हा शुद्ध हलकटपणा आहे पिशे. बाकी ते >>>एकदाची कुणी बायको करून आणणे 'एखाद्याची कुणाची बायको करुन'आणणे असं वाचल्या गेलं. म्हटलं असेल ब्वा काही चाल लंडनची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
प्रमोद देर्देकर Tue, 07/12/2016 - 06:35 नवीन
पिश्वे तुम्ही सगळ्यांनी ते गाणं म्हणा की "गोरी गोरी पान , फुलासारखी छान, टक्यादादा आम्हाला एक (एक पुरे ना की जास्त पाहिजेत) वहिनी आण" करा बघु विडंबन.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 07/12/2016 - 20:31 नवीन
नको नको...वहिनी म्हटली की पार सायीपर्यंत जातात लोकं. जुने धागे चाळून पहा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
इ
इशा१२३ Wed, 07/13/2016 - 19:53 नवीन
टक्यादादा? टकाला दादा,भाउ म्हटलेलं चालत नाहि हो.त्यामुळे वहिनीच राहुद्या. बाकी लंडनवारिला शुभेच्छा हं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
प
पियुशा Tue, 07/12/2016 - 08:22 नवीन
वा वा वा..... लंटन वारिच्या सुभेच्चा :)
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Tue, 07/12/2016 - 08:23 नवीन
28 -29 ऑगस्ट ला जरा लंडन ला असाल तर न चुकता Notting हिल कार्निव्हल ला जाच ,,, जाम मजा असते ... http://thenottinghillcarnival.com बाकी थोडे सांभाळून घ्याल,,, पोरी बिरी लय चेकाकल्या असत्यात परेडमधल्या.. :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Tue, 07/12/2016 - 09:22 नवीन
अरे एक जण तरी उपयोगाचे सल्ले लिहाल का?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 07/12/2016 - 11:28 नवीन
कसले उप्योगाचे सल्ले अन कसलं काय गोपाळराव? उगी हपिसात चिट्ठीवर लिहुन दिलेत "लोणंदवरुन पेन ड्राइव्ह घेउन ये. जायचा यायचा खर्च क्लायंटकडून घे" हे बिचारं लंडन लंडन करुन धागा काढुन मोकळं झालंय. ;) (टक्या आपलाच है म्हणून चेष्टा बरका. नाहीतर चिडायचं अन लंडनला जातच नाही म्हणून बसायचं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
च
चिनार Tue, 07/12/2016 - 09:32 नवीन
टक्या...अभिनंदन !! नीट जा हो...जाताना माईंकडून चार थालीपीठ आणि मुरलेलं लोणचं घेऊन जा विमान प्रवासात खायला. बाकी माझे एक विनोदी स्वप्न आहे . ते पूर्ण करता आले तर बघ दीडशे वर्ष गुलामी केली या साहेबाची. आता आपली वेळ. ज्या हॉटेल मध्ये राहशील तिथल्या वेटरला एकदा रूम सर्व्हिसला बोलव. साहेबी थाटात त्याला चहा बनवायला सांग. आणि चहात साखर कमी झाल्याचे कारण देऊन पेकाटात लाथ घाल त्याच्या. आणि सांग त्याला," तुम साला गुलाम लोग हमारी जुती के नीचे ही रहेगा !!"
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 07/12/2016 - 20:52 नवीन
चिनारभौस ह्या प्रतिसादासाठी एक लंडनवारी सप्रेम भेट.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
क
कवितानागेश Tue, 07/12/2016 - 11:01 नवीन
माझ्या २ बहिणी, २ काका आणि ५ मैत्रिणी राहतात तिकडे. पार्सले बांधून देतेय त्यांच्यासाठी. ती पोचवून दे फिरता फिरता. :)
  • Log in or register to post comments
व
विशाखा राऊत Tue, 07/12/2016 - 15:30 नवीन
मला सांडगा मिरची, पापड, लोणचे, मेतकुट, चटण्या देशील का ग माऊ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
आ
आदिजोशी Tue, 07/12/2016 - 12:03 नवीन
जिवाचं लंडन करून या टकोबा. ब्रिटिशही असेच फिरत फिरत भारतात घुसले होते आणि देश ताब्यात घेतला. स्वारीच्या शुभेच्छा. ह्या धाग्यावरून आमचे प.मि., मिपाचे जुने खंदे खंबे आणि बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समितीचे संस्थापक सभासद श्री श्री डान्राव हे लंडनला निघताना त्यांना समस्त मिपाकरांनी दिलेल्या शुभेच्छा आणि सल्ल्यांची आठवण झाली. धाग्याची लिंक मिळाली तर डकवा कुणी तरी.
  • Log in or register to post comments
ख
खडीसाखर Tue, 07/12/2016 - 16:33 नवीन
>>UK व्हिसावर कुठे कुठे भटकू शकतो? UK व्हिसावर england, scotland, wales, आणी northern ireland मध्ये फिरु शकतो.europe फिरायला schengen व्हिसा लागतो. >>२ विकांत आणि त्यानंतर १ आठवड्याच्या सुट्टीत किती आणि कुठे कुठे भटकता येईल? विकान्ताला लंडनात फिरणार असाल तर आधि https://tfl.gov.uk/status-updates/planned-works-calendar या लिन्क वर जाउन आपल्याला पाहिजेत त्या Underground lines उपलब्ध असतील की नाही ते तपासुन घ्या. १ आठवड्याच्या सुट्टीत Wales नाहीतर Lake District फिरता येईल. North Wales मधील Llandudno (http://www.visitllandudno.org.uk/outdoors/great-orme-country-park) आणी Snowdonia छान आहेत. South Wales मधील Pembrokshire चे बीचेस छान आहेत.http://www.visitpembrokeshire.com/explore-pembrokeshire/beaches/ >>तिथे बाईक / कार भाड्याने मिळते का? भारतीय Driving license वर कार भाड्याने मिळते. पण इथले वाहतुकीचे नियम बरेच असतात. आधि नियम वाचुन घ्या आणी मगच कार भाड्याने घ्यायची का ते ठरवा ;-). आपण जिला 'सायकल' म्हणतो, तिला लंडनात 'बाईक' म्हणतात. आपण जिला 'बाईक' म्हणतो, तिला लंडनात 'मोटरसायकल' म्हणतात. प्रवासाला आणी लंडन मधील वास्तव्या साठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
प
पीशिम्पी Tue, 07/12/2016 - 17:44 नवीन
१ आठवड्याच्या सुट्टीत जमत असेल तर कॉर्नवॉल किंवा / आणि डेव्हॉन ला जाउन या. अगदी स्वर्ग आहे. मनमोहक निसर्ग , उत्त्तमोत्तम समुद्र किनारा (बीचेस), फिश अ‍ॅण्ड चिप्स , विशेषकरून Titangel Castle & St Michael's Mount हे दोन ठिकाणे खुपच सुंदर आहेत. http://www.stmichaelsmount.co.uk/ http://www.english-heritage.org.uk/visit/places/tintagel-castle/ आणि गड किल्ल्यांना भेटी द्यायच्या असल्यात खालील दुव्याला भेट द्या, खुप स्वस्त पडते. http://www.english-heritage.org.uk/visit/overseas-visitors/ मला फार माहीती आहे असे नाही पन जेवढे सांगता येईल तेव्हढे नक्कीच सांगीन. व्यनि करा हवे तर. लंडन जेव्हढे ऑफीस वेळेव्यतीरिक्त पाहता येईल तेव्हढे पहा पण अख्खा विकांत वाया नका घालवू. स्कॉटलंड मध्ये कमीत कमी एडीनबरा आणि ईन्व्हर्नेस ला भेट देता येईल तर पहा. प्रवासाला आणी लंडन मधील वास्तव्या साठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Tue, 07/12/2016 - 18:00 नवीन
टका,अभिनंदन. यूथ हॉस्टेलची मेंबरशिप घे.बेड आणि ब्रेकफास्टची छान सोय असते.एकदा मेंबर झालं की जगभर सोय होते.
  • Log in or register to post comments
म
मनो Tue, 07/12/2016 - 20:26 नवीन
मी काही लंडनमध्ये राहत नाही तरी तिथे फिरायच्या अनेक संधी आल्या म्हणून हे अनुभवाचे बोल. खरं तर एक स्वतंत्र लेखच लिहायला हवा पण आत्ता इथे लिहितो. राहण्यासाठी आम्ही एकदा EasyHotel नामक प्रकार try केला होता. अगदी छोटी म्हणजे आपल्या घरातली बाथरूम पेक्षा थोडीशी जास्त जागा असते पण ती अगदी मोक्याच्या जागी आणि एकदम स्वस्त (compared to त्या area मधील इतर ऑपशन्स) online पाहून ठरवता येईल आवडेल की नाही ते. (http://www.easyhotel.com/) बाकी लंडन राहण्यासाठी महागडे आहे. दुसरा option म्हणजे अगदी दूर राहणे आणि tube ने रोज ये जा करणे पण त्यात खूप वेळ जातो लंडनच्या कोणत्याही मोठ्या रेल्वे स्टेशन वर (ट्यूब नाही) प्रॉपर रेल्वे जसे व्हिक्टोरिया स्टेशन - ट्यूबचा दिवसाचा अथवा 2-3 दिवसाचा पास बाहेरपेक्षा स्वस्तात मिळतो. तिथेच तो घ्या. तो बस मध्ये पण चालतो. जवळ गुगल मॅप्स आणि मॅट्रिक्स सिमकार्ड विथ data असू द्या, मग कुठेही जाणे अवघड नाही. या ट्यूब तिकिटावर काही ठिकाणी entry फीमध्ये सवलत मिळते (उदा. टॉवर ऑफ लंडन मध्ये) गाडी अथवा bike रेंट करणे सोपे असले तरी ते कटकटीचे आहे , लंडनमध्ये तरी. पार्किंग खूप महाग आहे, लंडनमध्ये कंजेशन surcharge टोल अश्या अनेक भानगडी आहेत त्यामुळे uber आणि tube हे सगळ्यात जलद आणि स्वस्त पडते. हौस म्हणून वीकेंड ला गाडी रेंट करता येईल. बहुदा इंडिअन लायसेन्स चालून जाईल पण सगळे नियम पाळून आणि मुख्य म्हणजे safely गाडी चालवणे हा अवघड प्रकार आहे. पाश्चात्य देशात अगोदर चालवली नसेल तर हे साहस एकट्याने करू नका. कोणी स्थानिक मदत असेल तर करा. कारण fines खूप जबर आहेत. एक तर इतकी roundabouts आहेत वर स्पीड लिमिट्स आणि लहान रस्ते. त्यामुळे थोड्या काळासाठी गाडी रेंट न करणे हे जास्ती शहाणपणाचे होते. लंडनमध्ये संबंध महिना पाहता येतील अश्या अनेक जागा आहेत, त्यातल्या माझ्या आवडीच्या खालील जागा Tower ऑफ लंडन - इथे फक्त कोहिनुरचा नव्हे तर राजघराण्याचा पूर्ण खजिनाच आहे त्यामुळे मस्ट गो जवळच लंडन ब्रिज आहे, पलीकडे सिटी. त्यामुळे या दोन जागा पहिल्या तर अक्खा दिवस जातो Saint Paul कॅथेड्रल - भव्य आणि उत्कृष्ट architecture तळघरात न्यूटन वगरे प्रख्यात लोकांची थडगी आहेत ट्रॅफल्गार sqaure इथे architecture नॅशनल गॅलरी असे अनेक पाहण्यासारख्या जागा आहेत ब्रिटिश लायब्ररी मध्ये इंडियासंबंधी काही ना काही प्रदर्शन चाले असते ते पहा ब्रिटिश Museum हे मात्र नक्की पहा - एक पूर्ण दिवसही पुरत नाही सगळे पाहायला. हे पाहून कंटाळा आला तर Hyde पार्क सतत दिसत राहते, तिथे चक्कर मारा Greenwitch केम्ब्रिज ऑक्सफोर्ड ही जवळची गावे. ती पहा. Henry the 8th याचा राजवाडा आणि केसिंग्टन राजवाडा हा पाहण्यासारखा आहे. राजघराण्याला पुरवठा करणारे Harrods नक्की पहा - एक एक महाग आणि आकर्षक वस्तू आहेत वरच्या मजल्यावर. संध्याकाळच्या वेळी लंडन आय ची सफर थेम्स नदीवरची बोटीची सफर Buckingham Palace मध्ये काही ठराविक दिवशी आत जाऊ देतात. मी आगाऊ online बुकिंग करून ठेवले होते. आतले फोटोस online आहेत. ते पाहून ठरवा आत जायचे का ते. मला तरी नक्कीच जावेसे वाटेल अजून एकदा. अजून एक स्मरणीय ट्रीप म्हणजे वेस्टमिन्स्टर पार्लमेंटच्या आतली टूर. यालाही आगाऊ बुकिंग करावे लागते. पण तो राजवाडा आणि विशेषतः त्या guide ची खास इंग्लिश विनोदी फटकेबाजी या मुले ही ट्रीप अजूनही आठवणीत आहे. माझी (आणि बायकोची) एक आवडती सफर - लंडनच्या व्हिक्टोरिया अथवा जवळच्या स्थानकावर डबलडेकर बस पकडायची, जमले तर सकाळी 8-9 च्या सुमाराला - स्ट्रॅन्ड किंवा ट्रॅफल्गार sqaure कडे जाणारी. जागा पकडायची ती ड्राइव्हर च्या एकदम वरची front सीट. तिथून स्ट्रॅन्ड इत्यादींच्या जुन्या इमारती आणि रस्ते काय खास दिसतात. जुन्या मुंबईची आठवण येते - खूपच साम्य आहे शैली मध्ये. दुपारचा चहा (आफ्टरनून टी) हा एक special ब्रिटिश प्रकार आहे , जमलं तर करून पहा. आणि खाण्याबद्दल तर सांगायलाच नको. जगभरचे सगळे options मिळतात. भारतीय जेवण लंडनमध्ये माझ्या उपहारगृहात भारतापेक्षा चांगले मिळते असा लंडनच्या शेफचा दावा आहे ! अजून काही सांगतो आठवलं तर.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 07/12/2016 - 20:35 नवीन
टकाशेठ, स्वारीच्या शुभेच्छा. तिथे जाऊन तुम्हीही झेंडा लावा. अटकेपार तसे खाडीपार जाऊन अवश्य सगळं हिंडून या. लंडन प्यारीस सगळं बघून या. तो टोपीकर माकडांनी हडपलेला कोहिनूरही बघून या आणि एकूणच मज्जा करा. गेम ऑफ थ्रोन्समधील कुणी क्यारेक्टर्स दिसले फिरताना तर पापाराझ्झींचे बाप बनून गनिमी काव्याने त्यांच्याबरोबर फटू काढावयास विसरू नका. रच्याकने: सातारच्या राजाचे प्रतिनिधी रंगो बापूजी हे १८४० पासून पुढे बारातेरा वर्षे इंग्लंडात राहिलेले. तिथे जाणारा तो पहिला मराठी माणूस.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 07/13/2016 - 20:53 नवीन
सातारच्या राजाचे प्रतिनिधी रंगो बापूजी हे १८४० पासून पुढे बारातेरा वर्षे इंग्लंडात राहिलेले. तिथे जाणारा तो पहिला मराठी माणूस.
मस्तं. रोचक माहिती, बॅटमॅन. त्या काळात परदेश आणि तेही इतके वर्षं. त्यांच्या या वास्तव्या विषयी काही माहिती, पुस्तक उपलब्ध आहे का? एका भारतीयाच्या दृष्टीने त्या काळाच्या लंडन चे वर्णन असेल तर वाचायला इण्टरेस्टिंग वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
आ
आदूबाळ गुरुवार, 07/14/2016 - 00:27 नवीन
रंगो बापूजी गुप्ते यांनी स्वतः काही लिहिलं असेल असं वाटत नाही. त्यांचं आयुष्यच एवढं नाट्यपूर्ण आणि धकाधकीचं गेलं की लेखन वगैरे गोष्टींना सवड मिळाली असेलसं वाटत नाही. पण रंगो बापूजींच्या आयुष्यावर प्रबोधनकार ठाकऱ्यांनी संशोधन केलं आहे. ते ऑनलाइनही उपलब्ध असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
प
पद्मावति गुरुवार, 07/14/2016 - 06:01 नवीन
धन्यवाद आदूबाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अभ्या.. गुरुवार, 07/14/2016 - 06:57 नवीन
Rango Bapooji Yanchyawar lihileli lekhamala saptahik Marmik madhye 4-5 varshapurvi vachalyache mala smarate.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
ए
एस गुरुवार, 07/14/2016 - 21:30 नवीन
https://mr.m.wikipedia.org/wiki/रंगो_बापूजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/14/2016 - 22:25 नवीन
आयमाय स्वारी, स्पेसिफिक पुस्तक मला माहिती नाही. वाचून सांगतो. बायदवे इंग्लंडात स्थायिक झालेल्या अजून एका भारतीयाबद्दल इथे वाचता येईल. या प्राण्याने इंग्लंडातले पहिले इंड्यन हाटेल काढले तेही दोनशे वर्षांपूर्वी, एवढेच नव्हे तर शांपूचा शोधही त्यानेच लावला. इनफॅक्ट शांपू हा शब्दच चंपी या शब्दावरून आलेला आहे. https://en.wikipedia.org/wiki/Sake_Dean_Mahomed अजूनही काही लोक त्या काळाच्या आसपास इंग्लंडात जाऊन आले होते. त्यांच्या प्रवासवर्णनात "पायांनी तुडवलेल्या पिठाचे पाव खाणारे", "जाऊन आल्यावर न धुणारे", "धड आंघोळ न करणारे", "कुठल्याही फालतू विषयाची नोंद करणारे", अशी इंग्रजांची निरीक्षणे दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
प
पद्मावति Fri, 07/15/2016 - 06:18 नवीन
धन्यवाद अभ्या.., एस आणि बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
आ
आदूबाळ Wed, 07/20/2016 - 11:25 नवीन
अजून एकः वेणू चितळे या दुसर्‍या महायुद्धाच्या काळात बीबीसीमध्ये निवेदिका होत्या. त्यांनी जॉर्ज ऑरवेलबरोबर काम केलं होतं. http://www.open.ac.uk/researchprojects/makingbritain/content/venu-chitale त्यांची "इन ट्रान्झिट" आणि "इन्कॉग्निटो" अशी दोन पुस्तकं आहेत. फारा वर्षांपासून शोधतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 07/12/2016 - 20:36 नवीन
अजूनेक रिक्वेष्टः तिकडून जाऊन आल्यावर एक फर्मास मुक्तपीठीय शैलीत प्रवासवर्णन होऊन जाऊंदे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 07/15/2016 - 06:29 नवीन
"मी लंडनला होतो तेंव्हा" अशी सुरुवात अज्जिबात करु नये असे नाही असे नक्की नाही. धुराळी वाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अजया Wed, 07/13/2016 - 05:04 नवीन
=))) हो हो मुपि प्रवासवर्णन हवेच!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 07/13/2016 - 07:00 नवीन
टक्कूमक्कू लंडनला ? आकाशातला बाप लंडनवासियांचे भले करो !! आमेन !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 07/13/2016 - 07:11 नवीन
टक्या नीट जा हो... राणी भेटली तर मी राम राम म्हंटल आहे, हे आठवणीने सांग. हल्लीच प्रिन्स इकडे गेंडे पाहुन गेला म्हणे... त्यामुळे तू तिकडे काय पाहिलेस ते सचित्र लिहुन प्रसिद्ध कर. चांगली गोरी गुबगुबीत फिंरगीण दिसली तर कटवुन "मोकळा" हो... आपण फॉरिनची टकीण असा पिच्चर काढु ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-ये जवानी हद कर दे, बूढ़े जवां को मस्त कर दे, कोई न जाने कल क्या हो, आने वाला पल क्या हो, ले मज़ा ले ज़िंदगी का ज़िंदगी का ज़िंदगी का... ;) :- Sarfarosh
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा