Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इंग्लंड भटकंती - भाग ३ - गर्नसे आयलंड

अ
अभिजीत अवलिया
Tue, 07/12/2016 - 05:20
💬 7
गेल्या भागाची लिंक इंग्लंड भटकंती - भाग 2 - स्टोनहेंज, ओल्ड सेरम आणि सॅलिसबरी खरे तर ह्या जागेबद्दल सर्वात शेवटी लिहिणार होतो. पण मिपावरच्या ताज्या खबरी नुसार आपले टवाळ कार्टा साहेब लंडनला निघाले आहेत आणि त्यांनी 'UK व्हिसावर कुठे कुठे भटकू शकतो?' असे विचारले आहे. तेव्हा लगेच हा भाग अगोदर लिहायला घेतला. तर आम्ही पूल बंदराजवळच राहत होतो. त्यामुळे बंदरावर रोज एक तरी फेरी व्हायची. तेव्हा एकदा सहज पत्नी बंदरावर गेली असता तिथे पूल ते गर्नसे आयलंड जहाज फेरी असल्याचे कळले (Condor Ferries नाव होते फेरी चालवणार्या कंपनीचे). जहाज शनिवारी सकाळी 9 ला निघणार, 12 वाजता गर्नसे आयलंडला पोचणार आणि दुपारी 3 ला परत निघून 6 ला पूलला पोचणार असे वेळापत्रक होते. फ्रान्सच्या अगदी जवळ असलेले गर्नसे आयलंड ही यु.के.ची 'Crown Dependency' आहे. म्हणजे जरी ते स्वतंत्र राष्ट असले तरी त्यांचे परकीय व्यवहार आणि सुरक्षा ह्याची जबाबदारी यु.के.ची आहे. गर्नसे आयलंडला जायला व्हिसा लागतो पण मी ICT (इंट्रा कंपनी ट्रान्स्फर) व्हिसा वर आलो असल्याने आम्हाला तिथे जायला वेगळ्या व्हिसाची गरज देखील न्हवती. आम्ही कधीही जहाजातून प्रवास केला नसल्याने त्याचा अनुभव घेण्यासाठी आम्ही जायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी पूलच्या हॅमवर्दी बंदरावर पोचलो. लगेच चेक इन करून जहाजावर गेलो. जहाजावरुन दिसणारे पूल शहराचे आणी हॅमवर्दी बंदराचे दृश्य.  जी लोक गर्नसेला राहण्यासाठी जात होती ती कार वगैरे घेऊन आली होती आणी त्या गाड्या जहाजात लोड केल्या होत्या. थोड्याच वेळात जहाज समुद्रात दूरवर गेले आणि आम्ही वरती डेक वर येऊन बसलो. दूर दूर फक्त समुद्र आणि जहाजाच्या स्पीड मुळे लागणारा वारा. जवळपास 3 तासाने जहाज गर्नसे आयलंडची राजधानी 'Saint Peter Port' ला पोचले . जहाजातून बाहेर आलो आणी समोर हे दिसले. बहुतेक लाईट हाऊस (?)  बंदावरून दिसणारे Saint Peter Port शहर.  2 मिनिटात शहरात प्रवेश केला. सुरवातीलाच एक सुंदर क्लॉक टॉवर होता.  तो पाहून आम्ही पुढे गेलो आणी फक्त आश्चर्यचकित होऊन प्रत्येक रस्त्याने फिरत राहिलो. संपूर्ण शहराला, शहरातील एकूण एक दुकानाला सुंदर फुलांनी सजवलेले होते. खरे सांगतो इतके सुंदर शहर आम्ही आयुष्यात दुसरे बघितले न्हवते. हा एक अतिसुखद धक्का होता. मग आम्ही तिथल्या शक्य होईल तितक्या रस्त्यांवरून फुलांची सजावट बघत वेळ घालवला. खाली काही फोटो.    फुलांनी सजवलेली दुकाने     चर्च   तिथे एक छोटी बाग देखील आहे. (कॅन्डी गार्डन). तिथे देखील थोडा वेळ गेलो. बागेतून दिसणारे दृश्य  परत येताना दिसलेला एक सुंदर चौक  अवघे 3 तास मिळाल्याने आम्ही जास्त काही बघू शकलो नाही. आमचा मूळ उद्देश फक्त जहाजाचा प्रवास करण्याचा अनुभव घेणे हा होता. पण ह्या ठिकाणी किमान दोन दिवस राहण्यासाठी यायला हवे होते असे वाटायला लागले. ती हुरहूर आजही आमच्या मनात आहे. तरी यु.के. ला जाणाऱ्यांनी ह्या ठिकाणाला नक्की भेट द्यावी. आणि किमान एक दिवस तरी मुक्काम करावा असे सुचवेन. गर्नसे वरून पुढे जर्सी आयलंडला जायला देखील बोट मिळते. ते देखील असेच सुंदर असावे असा माझा कयास. अजून एक ह्या बेटाचे स्वतःचे चलन आहे. त्याची किंमत ब्रिटीश पौंड एवढी गणली जाते. इथल्या दुकानात ब्रिटीश पौंड स्वीकारला जातो पण यु.के. मध्ये गर्नसे पौंड स्वीकारला जात नाही. गर्नसे पौंडची नोट

Book traversal links for इंग्लंड भटकंती - भाग ३ - गर्नसे आयलंड

  • ‹ माझ्या मना....
  • Up
  • इंग्लंड भटकंती भाग ४ - लंडन ›

प्रतिक्रिया द्या
5241 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्रमोद देर्देकर Tue, 07/12/2016 - 05:39 नवीन
तीनही भाग वाचले , खुप छान चालली आहे सफर.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 07/12/2016 - 07:06 नवीन
आयाया...लैच आवडली ही जागा पण मला अर्ध्यातासाचा बोटीचा प्रवास पण झेपत नाही...लगेच माझा वकार युनुस होउन जातो :(
  • Log in or register to post comments
स
सुहास बांदल Fri, 08/19/2016 - 10:05 नवीन
अतिशय सुंदर जागा आहे. इतकी वर्षे आम्ही इंग्लंड ला आहोत पण अजून तिकडे जायचा योग नाही आला पण लवकर च येईल असे वाटत आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Fri, 08/19/2016 - 10:28 नवीन
छान सफर..पहिला भाग जास्त आवडला..
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 08/19/2016 - 10:53 नवीन
वाह, काय सुंदर ठिकाण आहे. मस्तं सुरू आहे तुमची भटकंती.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 08/19/2016 - 12:26 नवीन
इकडे कायला युके चा विसा चालतो का? की वेगळा शेंजेन विसा लागतो
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Fri, 08/19/2016 - 19:13 नवीन
@विजूभाऊ - यू.के.चा व्हिसा चालतो. पण त्यातला कुठला कुठला असेल तर इथे प्रवेश मिळेल हे मला माहीत नाही. माझ्याकडे इंट्रा कंपनी ट्रान्स्फरी व्हिसा होता.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा