पाककृती

मुग-बटाटा कटलेट्स

Primary tabs

लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी मुग (अर्धवट वाफवलेले)
१ते दिड बटाटा वाफवुन
आलं-लसुण - हिरवी मिरची पेस्ट आवडीप्रमाणे
अर्धा कप / आवडीनुसार कोथिंबीर बारीक चिरलेली
१ चमचा लाल तिखट
थोडीशी हळद
१ ते २ चमचे लिंबाचा रस
मीठ
बाईंडींगसाठी भाजलेले पोहे मिक्सरमध्ये बारीक करुन
तेल

क्रमवार पाककृती:
रेसिपी एकदम सोप्पी आहे.
मुग वाफवुन घेऊन थोडेसे क्रश करुन घ्यायचे. यात वाफवलेला बटाटा मॅश करुन मिक्स करा. आता यात वर दिलेले सगळे मसाले आवडीनुसार टाकुन एकत्र मिस्क करा तसेच बाईंडींग साठी भाजलेल्या पोह्यांची पुड टाकुन सगळे मिश्रण एकजीव करुन त्याचे लहाल लहान चपट्या आकाराचे कट्लेट्स तयार करुन घ्या. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करुन त्यात हे कटलेट्स गोल्डन ब्राऊन रंगात शॅलो फ्राय करुन घ्या. गरम गरम अस्तानाच चटणी किंवा सॉस बरोबर गट्ट्म करा.

1

2.

3

सूड

पाकृ विभागात तुमचा प्रतिसाद पहिला? नवल आहे.

नूतन सावंत

सूड,असं काय बरं.
त्यांना आवडेल त्याच पाककृतीवर ते प्रतिसाद देणार ना!ते प्रतिसाद देत नसले तरी पाककृती वाचत असतीलच.
आखिर पापी पेटका सवाल है.जेवत तर असतीलच ना!

कंजूस

पावाचा चुरा वापरण्याऐवजी पोह्यांचा चुरा वापरला ते आवडलं.

यात अजून थोडा हेल्दीनेस आणण्यासाठी आपण बटाट्याऐवजी रताळ्याचा किस किंवा कच्ची केळी उकडून वापरली तर ?आणि हो ब्रेडक्रम्स ऐवजी पोह्यांचा चुरा वापरण्याची आयडिया आवडली.टेक अ बो गौतमीतै :)

राका

खूप चविष्ट दिसताहेत... घरच्या छोट्यांसाठी मस्त टेस्टी हेल्दी नाश्ता...

पियुशा

@ आत्मुस मग घरची वाट धरून कारभारणीला सांगा व जरा बनवायला ;) न आमालाबी बोलवा चा पाण्याला :) बाकी कटलेट यम्मी हा :)

धनंजय माने

जरा जास्त लागली बुवांची वाट
पाहुनि मुग बटाटा कटलेटची प्लेट
-'ट'नात्कारी कवी

शेफ पाकृ मस्त बर्का

धनंजय माने
धनंजय माने

जरा जास्त लागली बुवांची वाट
पाहुनि मुग बटाटा कटलेटची प्लेट
-'ट'नात्कारी कवी

शेफ पाकृ मस्त बर्का

पगला गजोधर

भाजलेल्या पोह्याच्या पिठाचे प्रमाण काय ? (१ वाटी मुग व १ते दिड बटाटा साठी )
कृपया प्रमाण वाटी-प्रमाणे सांगणे.

गौतमी

अंदाजानेच घ्यायच आहे. १ ते ३ चमचे पण पुरे आहे.

गौतमी

प्रतिसादांबद्दल सगळ्यांना धन्यवाद.

पिंगू

वेगळेच कटलेट्स आहेत. चविष्ट दिसतात..

जागु

छानच
मी रवा ही वापरता येतो.

कधी नव्हे ती मिपावरील सोपी पाककृती पाहुन आमच्याकडे प्रयत्न केला गेला आहे.
अर्थात कोणाचा तरी फोर्स होताच करा म्हणून. मस्त लागलेत. कुरकुरीत झालेत. मंडळ, आभारी आहे. :)

-दिलीप बिरुटे

सखी

मस्त कटलेट. फोटोतुन उचलता आला असता तर....

रुपी

मस्त..

मागे एकदा अशीच पाकृ आली होती .. ती वाचून लगेच करुन पाहिले होते, खूपच छान झाले होते. आणि बरेच पटकन होतात म्हणून विशेष आवडले :)

गवि

करुन पाहिले.

उत्तम ब्रेकफास्ट झाला. अॅडिशन म्हणजे धनेजिरे पावडर आणि कोथिंबीर. उत्तम चव. धन्यवाद.
तव्यावर:

तयार:

मस्तच रेसेपी!!

माझ्याकडून पोहे जास्त झाले की हमखास होणारा पदार्थ! मी पोहे मायक्रोवेव्हमध्ये अजुन गरम करुन घेते म्हणजे ते मऊ होतात आणि मग त्यात बटाटा आणि इतर भाज्या घालुन कटलेट करते. पोहे उत्तम बाईंडिंग करतात, ब्रेडची गरज अजिबात पडत नाही हे महत्वाचं.