Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

॥सांगा तुकारामा : अभंग-१॥

ग — गंगाधर मुटे, Fri, 07/15/2016 - 19:20
॥सांगा तुकारामा : अभंग-१॥

ठेविले अनंते । तैसे कैसे राहू ।
तूच सांग पाहू । तुकोराया ॥१॥

इथे मंबाजीचे । सत्तांध वारस ।
माझे गळी फास । टाकताहे ॥२॥

आयातुनी माल । शत्रू देशातला ।
माझ्या सृजनाला । बुडविती  ॥३॥

माझ्या निर्यातीची । वाट अडविती ।
जागोजागी भिंती । उभारुनी ॥४॥

गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? ।
त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥

लबाडीला चांदी । ऐद्यांना अभय ।
आणि हयगय । श्रमिकांची ॥६॥

                        - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१५/०७/२०१६

प्रतिक्रिया द्या
2173 वाचन

💬 प्रतिसाद (6)
म
मितभाषी Fri, 07/15/2016 - 19:26 नवीन
इथे मंबाजीचे । सत्तांध वारस । माझे गळी फास । टाकताहे ॥२॥
व्वा सुंदर.
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 07/15/2016 - 19:37 नवीन
या आयडीने याशिवाय वेगळं लेखन केलेलं मला अजिबात दिसलेलं नाही.
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर Fri, 07/15/2016 - 20:52 नवीन
तुमचं बरूबराय पन अमुक इका प्रकारचं लिवू नका आशी बळजोरी करता यित नस्ती सुड्राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
च
चांदणे संदीप Sat, 07/16/2016 - 04:16 नवीन
अभंग आवडले! मुटे सर वेल डन, कीप इट अप! :) Sandy
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 07/16/2016 - 09:24 नवीन
गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? । त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥
वंशद्वेष ?
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sat, 07/16/2016 - 16:20 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा