जन का म्हणतिल, 'हाय हाय !'????
जन का म्हणतिल, 'हाय हाय !'????
केलेच नाही तर राहिल कार्य काय ?
.
पोस्टा तळपतिल, फोटु झळकतिल;
फेसबुके अपुला क्रम आचरतिल,
असेच वाद संवाद पुढे चालतिल,
नसशी तु फरक पडेल का?
.
वाद वर्षतिल, डोके पिकतिल,
गेट टुगेदर हे जोरात चालतिल
कुणा काळजी की न तळतिल,
पुन्हा जिलब्यांचे हे घाणे?
.
सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा लेख कविता लिहितिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
तु सोडले फेसबुक त्यांचे काय जाय ?
.
अभासी जगास्तव काय कुढावे !
मोहिं लाईक्स च्या का गुंतावे ?
डोके पिकवुनी का विन्मुख व्हावे ?
ख-या जगतातील आनंदास???
💬 प्रतिसाद
(12)
स
संजय पाटिल
Sun, 07/17/2016 - 06:44
नवीन
मोहिं लाईक्स च्या का गुंतावे ?>>>
मोहिं प्रतिसादांच्या का गुंतावे?
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Sun, 07/17/2016 - 08:46
नवीन
अकुपकुही आले गेले,
त्यांविन मिपा ओस का पडले ?
कोणी वाचनमात्र का झाले,
मग काय अटकले अकुशिवाय ?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 07/17/2016 - 09:10
नवीन
@मग काय अटकले अकुशिवाय ? ››› =))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 07/17/2016 - 09:19
नवीन
अकु काका आज त्वांड गोड कराच तुम्मी
खाउन ह्यातली
जिल्बी निम्मी! ;)
.
.
आयला मला पण झाली.. =))
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 07/17/2016 - 13:19
नवीन
तुम्हाला नेहमीच होतात.
त्यात काय विशेष.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Sun, 07/17/2016 - 14:09
नवीन
किती तो पाठीचा पु रा वा....काय मिळवणार शेवटी? एक जिल्बी!!
=))
एक जिल्बी और दो...
अखिल्भार्तीय्मिपाजिल्बीपाड्संघटनेचेनाखुसकार्य्क्रत्यांवर्नजरठेऊनअस्लेला
Sandy
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sun, 07/17/2016 - 12:13
नवीन
आभासी जगात रमायच, कविता करायची, साद-प्रतिसादाची अपेक्षा ठेवायची, तुमच्यासाठीच...
आभासी जगात जीव रमतो
साद प्रतिसादात आनंद मिळतो
खर्या जगात न जिलीब्या लाडू
मग का करता हाय हाय राव.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sun, 07/17/2016 - 13:53
नवीन
ह्या गाण्याला गोपी किशन मधल्या "हाय हुकु हाय हुकु हाय हाय" या गाण्याची चाल एकदम फिट बसते.
लाभार्थींनी ह्या कवितेचे शब्द डोळ्यासमोर ठेउन वरीगीनल गाणे ऐकावे (स्वतःच्या जबाबदारीवर हा प्रयोग करावा कोणत्याही प्रकारच्या नुकसानाचे दायित्व प्रतिसादकर्ता घेत नाही याची पुर्ण जाणीव ठेवावी)
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 07/17/2016 - 14:19
नवीन
कधीपासून होतंय असं? चूर्ण घेऊन पहा गुण येतोय का!!
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 07/19/2016 - 12:57
नवीन
धागा वेटोळी येईल त्याचे काय?
मिपा रोच्क ते वचक एक मिपासाक्षर नववाचक चळवळ आणि "मिपा जलयुक्त शिवार " योजनेचा संयुक्त प्रकल्प
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sun, 07/17/2016 - 14:41
नवीन
छान
- Log in or register to post comments
र
रातराणी
Tue, 07/19/2016 - 18:20
नवीन
केलेच नाही तर राहिल कार्य काय ?
ही ओळ भिडली मनाला. कवितेपलीकडील कविता धाग्यात कोरुन ठेवली पाहिजे.
- Log in or register to post comments