गौरव तिवारी मृत्यु प्रकरण
गौरव तिवारी या तरुण व तडफदार पॅरॅनॉर्मल संशोधकाचा दिनांक 7 जुलै 2016 रोजी अगदी धक्कादायक मृत्यु झाला. गौरव तिवारी हे नाव जगभरातील पॅरॅनॉर्मल संशोधकामध्ये अतिशय प्रसिद्ध होतं. तसेच भानगढ़ किल्ल्यात केलेल्या investigation मुळे हे नाव भारतभर लोकप्रिय झालं. त्यांच्या संस्थेने अनेक ठिकाणी investigation केलेले होते. अमेरिकेत असताना कमर्शियल पायलट चे प्रशिक्षण घेतलेला गौरव तिथल्या एका घरातील वास्तव्यात आलेल्या haunting च्या अनुभवाने नास्तिकापासून पक्का आस्तिक बनला. यानंतर समविचारी मित्र जमवुन त्यांनी Indian Paranormal Society स्थापन केली. या संस्थेने जवळजवळ 6,000 ठिकाणी संशोधन केले होते.
अशा या रोचक व्यक्तिमत्वाचा दिनांक 7 जुलै 2016 रोजी धक्कादायक मृत्यु झाला. घरातील बाथरूममध्ये अचानक खूप मोठा आवाज व पडझड झाल्याने घरच्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हां तो फरशीवर मृतावस्थेत होता. उत्तरीय तपासात त्याच्या गळ्याभोवती काळी अस्पष्ट खूण आढळून आली.
पत्नीने सांगितल्यानुसार त्याला गेले काही महिने कोणतीतरी Negative Entity आपल्याकडे खेचून घेत आहे व आपल्यावर नियंत्रण करीत आहे असे जाणवू लागलेले होते. त्या negative entityला विरोध करण्याचा खूप प्रयत्न करुन देखील त्याला ते शक्य होत नव्हते.
दरम्यान पोलिसांनी marital discord व आर्थिक अडचणी या देखील शक्यता असल्याचे म्हटले आहे.
पण मानसिक दृष्ट्या इतकी खंबीर व धाडसी व्यक्ति खरेच इतक्या छोट्या कारणांनी आत्महत्या करु शकते?
नक्की काय घडलं असेल?
💬 प्रतिसाद
(35)
क
कविता१९७८
Sat, 07/16/2016 - 09:48
नवीन
हम्म्म् , काय झाले असावे कुणास ठाउक
- Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Sat, 07/16/2016 - 09:53
नवीन
त्याने आत्महत्या केली असावी,गळ्याभोवती खुण आढळली म्हणजे गळफास घेतला असावा.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Sat, 07/16/2016 - 10:08
नवीन
पण बाथरुम मधे फास घेण्याचे कुठलेही साधन सापडले नाहीये
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Sat, 07/16/2016 - 10:15
नवीन
हत्येची सम्भावना जास्तय
http://aajtak.intoday.in/crime/story/death-mystery-of-paranormal-investigators-gaurav-tiwari-become-complicated-1-878151.html
- Log in or register to post comments
स
स्पा
Sat, 07/16/2016 - 10:24
नवीन
ते आम्हाला कसे कळणार ?
काहीही ह भा.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 07/16/2016 - 10:28
नवीन
पॅरानॉर्मल संशोधक होता म्हणून आपण जास्त गुढत्वाने अर्थ शोधत असू का??
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sat, 07/16/2016 - 13:31
नवीन
:))
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 07/16/2016 - 14:21
नवीन
थोडेसे वेगळे पण एक उदाहरण आठवले. कृपया वेगळा अर्थ काढू नये.
संत महात्मे यांचे निधन अथवा मृत्यु नाही होत. महानिर्वाण, समाधी अशा टाइपमध्येच काहीतरी होते. जीवनाची लेबले मृत्युला राहतात म्हणायचे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 07/16/2016 - 15:52
नवीन
@जीवनाची लेबले मृत्युला राहतात म्हणायचे.››› +++१११. या एका वाक्यातच सगळा पंचनामा आलाय.
- Log in or register to post comments
भ
भालचंद्र_पराडकर
Sat, 07/16/2016 - 19:21
नवीन
@ आत्मबंधः
सदर प्रतिसादकर्त्याला काय म्हणायचेय नक्की हे कळले का तुम्हाला? कळले असेल तर सांगा...
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Sun, 07/17/2016 - 03:41
नवीन
म्हणजे थोर माणसाचा मृत्यूही थोरच असावा आणि खलनायक कुत्र्याच्या मौतीने मरावा अशी लोकांची अपेक्षा असते. पण असं घडतंच असं नाही.
(एकदम पॉईंट आहे...)
- Log in or register to post comments
V
viraj thale
Sat, 07/16/2016 - 19:44
नवीन
हो पण योग सामर्थ्याने स्वतःच्या इच्छेनुसार जीवन संपवणे हा एक वेगळा मुद्दा आहे .
- Log in or register to post comments
र
राजाभाउ
Sun, 07/17/2016 - 07:25
नवीन
"जीवनाची लेबले मृत्युला राहतात म्हणायचे." अनेकार्थानी सुंदर वाक्य !!!
__/\__ __/\__
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 07/16/2016 - 14:54
नवीन
गौरव तिवारी यांचा मृत्यू दुःखद आहेच पण Paranormalcy सारख्या शास्त्रीय दृष्टीने संशयास्पद गोष्टीवर त्यांनी आपलं उमेदीचं आयुष्य खर्च केलं हे जास्त दु:खद आहे. हे सगळं व्यर्थ आहे असं वैफल्य येऊन त्यांनी आपलं आयुष्य संपवलं असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
- Log in or register to post comments
भ
भालचंद्र_पराडकर
Sat, 07/16/2016 - 19:22
नवीन
अगदी चूक प्रतिसाद...
- Log in or register to post comments
भ
भालचंद्र_पराडकर
Sat, 07/16/2016 - 19:25
नवीन
ज्या गोष्टींचा त्यांना अनुभव स्पष्टपणे आला होता त्या गोष्टी त्यांना खोट्या व आत्महत्या करण्यासारख्या का वाटतील?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 07/17/2016 - 05:01
नवीन
असं ते म्हणायचे. उद्या एखाद्याला तसे अनुभव येणारही नाहीत. आणि तुम्ही जर माझा प्रतिसाद लक्षपूर्वक वाचलात तर त्यात मी एक शक्यता दाखवलेली आहे आणि आपण उराशी बाळगलेला विश्वास फोल ठरल्यावर अनेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत हा इतिहास आहे - मग तो विश्वास राजकीय असो किंवा वैज्ञानिक असो, अतींद्रिय शक्तींबद्दल असो किंवा अगदी स्वतःच्या नातेवाईकांबद्दल असो. बाकी चालू द्या.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 07/16/2016 - 19:31
नवीन
इतके दिवस सरांना मिसत होते मिपाकर. आपण आलात. बरे वाटले.
वर्ग तर ढ पोरानीच भरलाय, आता सांगून टाका बरे काय बरोबर ते.
- Log in or register to post comments
भ
भालचंद्र_पराडकर
Sat, 07/16/2016 - 19:33
नवीन
वर म्हटलेय काय ते!!!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 07/16/2016 - 19:38
नवीन
अहो पोलीस सांगितले, तयांची बायको सांगितली
तुम्ही सांगा कि तुमचे मत.
- Log in or register to post comments
भ
भालचंद्र_पराडकर
Sat, 07/16/2016 - 19:39
नवीन
???
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 07/16/2016 - 19:44
नवीन
कै नै. मस्त मजेत चालुय. पाऊस काही नाही यंदा गेल्यासालीसारखा. सवय झालीय आता.
असो, ते आम्हाला वर्गावर बीएड ची पोरं पोरी तास घ्यायला यायची त्याची आठवण झाली बघा.
फार खराब हालत डीएड बीएड वाल्यांची सध्या.
- Log in or register to post comments
भ
भालचंद्र_पराडकर
Sat, 07/16/2016 - 19:46
नवीन
या आता... ;)
- Log in or register to post comments
भ
भालचंद्र_पराडकर
Sat, 07/16/2016 - 19:43
नवीन
लोकमताचा अंदाज घ्यावा हाच उद्देश आहे. जर तुमचे काहि ठाम मत नसेल तर नसो. हरकत नाही.... ;)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 07/16/2016 - 19:47
नवीन
आहो तुम्ही पण लोकच आहात ना? तुमचे नाही का काही मत? का ऐकावे जनाचे वगैरे जीवनपद्धती आहे?
- Log in or register to post comments
भ
भालचंद्र_पराडकर
Sat, 07/16/2016 - 19:50
नवीन
यातून काहीच मत व्यक्त होत नाही विषयावर... :(
- Log in or register to post comments
भ
भालचंद्र_पराडकर
Sat, 07/16/2016 - 19:53
नवीन
वैयक्तिक कलगीतुरा नको असून फक्त काय झाले असेल याविषयी अंदाज पाहिजेत... तरी क्षमस्व...
- Log in or register to post comments
म
मितभाषी
Sat, 07/16/2016 - 19:28
नवीन
बोक्याला,
- Log in or register to post comments
भ
भालचंद्र_पराडकर
Sat, 07/16/2016 - 19:38
नवीन
विषयांतर होण्यापेक्षा कुणाला काही वेगळे ठाम मत मांडू वाटत असेल तर ते जास्त आवडेल...
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 07/16/2016 - 20:07
नवीन
"जन्माला आलेल्या प्रत्येकाला निश्चित मृत्यू आहे" एव्हढी एकमेव गोष्ट सोडली तर विश्वातील कोणत्याच गोष्टीबद्दल ठामपणे बोलता येत नाही. माणसाला आजवर मिळालेल्या विशेष ज्ञानाने (ज्याला विज्ञान म्हणतात) "कसे" या प्रश्नाचे उत्तर मिळते. "का" हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. "का" या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जी वाट पकडतो ती वाट तत्वज्ञानाची असते आणि या वाटेला पुढे अनेक फाटे फुटतात. गंमतीचा भाग असा की या फाट्यांनी जाणारा प्रत्येकजण असे समजतो की फक्त आपण ज्या वाटेने चाललोय तीच वाट फक्त "का" या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत घेऊन जाते. ही त्या माणसाने आपली आपणच केलेली फसवणुक असते.
काल परवा पर्यंत माणसाचे ज्ञान मर्यादीत होते. माणूस कल्पनेने गाळलेल्या जागा भरत होता आणि गाळलेल्या जागी भरलेल्या शब्दानाच सत्य समजत होता. आज "का" चे उत्तर मिळाले नसले तरी काल परवा पर्यंत ज्याला आपण "का"चे उत्तर समजत होतो ते उत्तर चुकीचं होतं एव्हढं आकलन नक्कीच झालं आहे.
आता या "का" चे उत्तर जेव्हा कधी मिळेल तेव्हा मिळेल तोपर्यंत काल परवाचे चुकीचे उत्तर उराशी कवटालून स्वत:ला फसवायचे की त्या प्रश्नाच सध्या तरी आपल्याकडे उत्तर नाही या वास्तवाला सामोरे जायचे हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे.
- Log in or register to post comments
भ
भालचंद्र_पराडकर
Sat, 07/16/2016 - 20:22
नवीन
सतीशजी ग्रेट बोललात...
पण तरीही या प्रकरणात नक्की काय घडलं असेल हा प्रश्न शिल्लक राहतोच...
जानेवारी 2016 मध्ये त्याचं लग्न झालं होतं... लगेच काही marital discord सुरु होतील ही शक्यता कमी आहे..
बरे तो त्याच्या आईवडिलांसोबत रहात असे... कुठलेही आईवडील आपल्या मुलाच्या अडचणीत त्याला एकटे सोडतील ही शक्यता फार कमी वाटते...
पोलीस म्हणतात तसे खून ही शक्यता खूप कमी वाटते कारण तो त्याच्या घरातच रहात होता... आईवडिलांसोबतच होता त्या रात्री...
तेव्हा ही शक्यता फार कमी वाटते...
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 07/18/2016 - 09:59
नवीन
( जागा पकडुन बसलोय , तुर्तास जरा काम आहे , मोकळा वेळ मिळाला की ह्या प्रतिसादावर सविस्तर चर्चा करण्यात येईल)
- Log in or register to post comments
म
मितभाषी
Sat, 07/16/2016 - 20:23
नवीन
=)))))
=))))) =)))) =))))
=)))) ===))))))
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 07/16/2016 - 20:39
नवीन
मितभाषी, खरं खरं सांगायचं,
इतकं हसू का आले?
- Log in or register to post comments
स
सनईचौघडा
Mon, 07/18/2016 - 11:17
नवीन
हम्म म्हण्जे भुत्ये असतात म्हणायची तर? आज्ये ए अज्ये तु म्हणत व्हती नव्ह...
- Log in or register to post comments