Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बळीराजा कर देणार का ?

म
मारवा
Mon, 07/18/2016 - 08:06
🗣 93 प्रतिसाद
भुमिका भारत स्वतंत्र झाल्यापासुन ते आजपर्यंत देशात काही मोजके अपवाद ( काही राज्ये वगळता व त्यातही मोजक्या उदा.चहा कॉफ़ी प्लॅन्टेशन इ.) सोडुन कुठल्याही प्रकारच्या कृषी उत्पन्नावर ( पुन्हा मोजकेच अपवाद व संबंधित तरतुदी वगळता ) सर्वसाधारणपणे कृषी उत्पन्नावर (अ‍ॅग्रीकल्चरल इनकम) कुठल्याही प्रकारचा कर लावण्यात आलेला नाही. एक विशाल जनसमुदाय कर देण्याच्या, लोकशाहीतल्या नागरीकाच्या महत्वपुर्ण कर्तव्यापासुन कायदेशीररीत्या वंचित ठेवण्यात आलेला आहे. या लेखाची मध्यवर्ती भुमिका अ‍ॅग्रीकल्चरल इनकम वर कर आकारणी करण्यात यावी, शेतकरी इतर नागरीकांप्रमाणे करदाता व्हावा त्याने समाजोन्नतीस योगदान करावे, हे कसे आवश्यक आहे याचे काय फ़ायदे आहेत व हे न केल्याने काय नुकसान आहे इ.ची मांडणी माझ्या मर्यादीत अनुभव आणि वकुबाप्रमाणे केलेली आहे. या संदर्भातील नविन/ विरोधी बाजु दृष्टीकोणांना समजुन घेणे व त्यायोगे मुळ विषयाचे अधिक अचुक व्यापक आकलन करुन घेणे हा सुद्धा या लेखाचा एक हेतु आहे. व्याख्या -टॅक्स स्लॅब -अपवाद' इनकमटॅक्स अ‍ॅक्ट १९६१ च्या सेक्शन 2(1A) नुसार अ‍ॅग्रीकल्चर इनकम ची व्याख्या अशी आहे. Agricultural income generally means (a) Any rent or revenue derived from land which is situated in India and is used for agricultural purposes. (b) Any income derived from such land by agriculture operations including processing of agricultural produce so as to render it fit for the market or sale of such produce. (c) Any income attributable to a farm house subject to satisfaction of certain conditions specified in this regard in section 2(1A). Any income derived from saplings or seedlings grown in a nursery shall be deemed to be agricultural income. यात एक समजुन घेण्याची बाब अशी की एका विशीष्ट वर्षात अ‍ॅग्री.इनकम हे कुठल्याही इतर बिझनेस इनकम प्रमाणेच कीती प्राप्त झाले हे अगोदर निश्चीत केले जाते, व त्यानंतर इतर टॅक्सेबल इनकममध्ये अ‍ॅड केले जाते. याचा उपयोग केवळ स्लॅबवाइज टॅक्सरेट च्या निश्चीतीसाठी केला जातो. उदा. एका माणसाचे इतर व्यवसाय वा नोकरी इ. मार्गे मिळवलेले निव्वळ उत्पन्न (बेसीक एक्झम्पशन सोडुन ) समजा ४ लाख आहे व अ‍ॅग्री इनकम ३ लाख आहे तर एकुण उत्पन्न ७ लाख झाले. तर हे वरच्या २० % टॅक्स रेटच्या स्लॅब मध्ये जाईल. ही तरतुद नसती तर केवळ ४ लाखाच्या उत्पन्नावर १० % च टॅक्स रेट लागला असता. (२.५ ते ५ लाखाच्या स्लॅबमध्ये असलेल्या वार्षीक उत्पन्नावर टॅक्सरेट १० % आहे त्यांनंतर ५ ते १० लाखाच्या दरम्यान उत्पन्न असेल तर २० % आहे शेवटी १० लाखाच्या वर उत्पन्न असेल तर ३० % तसेच २.५ लाखाच्या खालील उत्पन्न करमुक्त आहे यावर करच नाही. ) तर या अ‍ॅग्री.इनकम चा वापर इतकाच. म्हणजे स्लॅबरेट वाढेल मात्र कर केवळ ४ लाखावरच आकारण्यात येइल ३ लाखाचे अ‍ॅग्री.इनकमवर नाही हे पुर्णपणे करमुक्तच असेल. आसाम, तामिळनाडु सारखी राज्ये चहा, कॉफ़ी इ. प्लॅन्टेशन्स वर टॅक्स लावतात हे काही अपवाद. घटनेनुसार कृषीउत्पन्नावरील कर हा राज्यसरकारांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे दोन राज्यांच्या अ‍ॅग्री.टॅक्सच्या दरां मध्ये धोरणांमध्ये तफ़ावत असु शकते. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला उत्तरप्रदेश, राजस्थान इ. नी अ‍ॅग्री.इनकमवर कर लावला होता मात्र नंतर लगेचच तो १९५७ व १९६० मध्ये पुन्हा काढुन घेतला तो आजपर्यंत परत लावला नाही. आसाम इ. मध्येही केवळ चहा सारख्या मोजक्या कमर्शियल क्रॉपवरच हा लावण्यात आलेला आहे. ही पिके शेतीपेक्षा जवळ जवळ एखाद्या मॅन्युफ़ॅक्चरींग सारखी आहेत व उलाढाल प्रचंड मोठी म्हणून कदाचित सरकारला या कमाईकडे दुर्लक्ष करणे परवडत नसावे. अजुनही चिल्लर अपवाद असु शकतात. नेते/ टॅक्स रीफॉर्म कमिशन इ. ची कृषी उत्पन्नावरील कर विषयक भुमिका भारतात स्वातंत्र्यानंतर कृषीउत्पन्ना वर टॅक्स लावावा ही भुमिका थेट डॉ.बाबासाहेब आंबेडकरां पासुन वारंवार मांडण्यात आलेली आहे.. (डॉ.के.एस.इंगळे आपल्या Dr.Ambedkar,s views on agriculture income tax या पेपरमध्ये याचे सविस्तर विवेचन करतात ) विशेष म्हणजे आंबेडकर हे ब्रिटीशांच्या अन्यायकारक लॅन्ड रेव्हेन्यु सिस्टीमचे कडवे विरोधक होते तरीही स्वतंत्र भारतात योग्य रीतीने / दराने पात्र शेतकर्‍याने अ‍ॅग्री.इनकम वर टॅक्स भरण्याचा त्यांचा आग्रह होता. अ‍ॅग्री.इनकम हे पुर्णपणे करमुक्त असण्याला त्यांचा विरोध होता. १९५३-५४ च्या The Taxation Enquiry Commission ने देखील अ‍ॅग्री.इनकम वरील कर संदर्भातील तरतुदींमध्ये फ़ेरबदल करण्याची/ रीव्हीजन करण्याची शिफ़ारस केली होती. मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. अ‍ॅग्रीकल्चरल टॅक्सेशन चा देशातील आजपर्यंतचा कदाचित सर्वात मोठा व्यापक अभ्यास केलेल्या डॉ.के.एन.राज यांच्या १९७२ मधील कमिटीनेही श्रीमंत शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर कर आकारण्याची स्पष्ट शिफ़ारस केलेली होती.त्याकडेही राजकरणी लॉबींकडुन दुर्लक्ष केले गेले. व या शिफ़ारसी कधीच अंमलात आल्या नाहीत कायदा बनलाच नाही. हे जुने सोडुन द्या अगदी ताज्या डॉ.पार्थसारथी शोम हे अध्यक्ष असलेल्या Tax Administration Reform Commssion ने आपल्या नोव्हेंबर २०१४ मधील Third Report मध्ये नोंदवलेले अत्यंत परखड मार्मिक शंब्दात मांडलेले मत असे.( जाड ठसा माझा) Vigorous efforts are required both in terms of policy and enforcement in widening the tax base, which as seen above is not commensurate with the growth in income over the years. The reasons for this include India’s huge rural and underground economies, which present severe logistical constraints with respect to collecting tax.................. Even a large number of rich farmers, who earn more than salaried employees in the cities, get away with paying no tax at all in view of the government’s lack of will to consider an agricultural income tax. Widening the taxpayer base is necessary to ensure growth of revenue for any government. As a proportion of the total population, India has a low taxpayer base of 3.3 per cent. Agricultural income is exempt from taxation in spite of large agricultural holdings; there are large scale exemptions and deductions in the form of tax preferences; and slackness in enforcement and lack of proper tax payer education are endemic. Agricultural income of non-agriculturists is being increasingly used as a conduit to avoid tax and for laundering funds, resulting in leakage to the tune of crores in revenues annually. A solution could be to tax large farmers. Against a tax free limit of Rs.5 lakh on agricultural income, farmers having a high agricultural income threshold, such as Rs.50 lakhs, could be taxed. This will keep small farmers out of the purview of taxation and yet close one escape route for black money. States could pass a resolution under Article 252 of the Constitution, authorising the Centre to impose tax on agricultural income. All taxes collected by the Centre, net of collection costs, could be assigned to the states. This will broaden the taxpayer base and help mobilise additional revenue without affecting any but a very miniscule proportion of the very large farmers whose annual income exceeds the threshold limit. Obviously, the TARC realises that this is a fundamental structural reform proposition. Yet, successive governments have shown a lack of political will to tax agricultural income because of the politically strong hold that the agricultural lobby has over governments. टॅक्स बेस च्या विस्तारीकरणाची आवश्यकता व अ‍ॅग्रीकल्चर इनकम वरील मांडणी सुस्पष्ट आहे. एक एक मुद्दा बघु या. एक म्हणजे टॅक्स बेसची व्याप्ती वाढविण्य़ाची गरज फ़ार मोठी आहे ताज्या फ़ेब्रुवारी-२०१६ त प्रकाशित झालेल्या भारताच्या इकॉनॉमिक सर्व्हे त चॅप्टर नं ७ "फ़िस्कल कॅपॅसीटी फ़ॉर ट्वेन्टी फ़र्स्ट सेंच्युरी" मध्ये या संदर्भातील विस्तृत विवेचन येते. थोडक्यात सर्व्हे म्हणतो भारतात एकुण कमावत्या करदात्यांपैकी केवळ ५.५ ट्क्केच व्यक्ती या टॅक्स नेट मध्ये येतात. इतकेच टॅक्स भरण्यास पात्र होतात/भरतात. एकुण राष्ट्रीय उत्पन्नाच्या (नेट नॅशनल इन्कम) केवळ १५.५ % उत्पन्नच टॅक्स अ‍ॅथॉरीटीज समोर सादर करण्यात येते. जवळ जवळ ८५ % इकॉनॉमी टॅक्सच्या जाळ्याबाहेर आहे. सर्व्हे पुढे म्हणतो की एकुण मतदात्यांच्या संख्येत करदात्यांचे प्रमाण ४ टक्के्च आहे. म्हणजे उलट बाजुने इतर ९६ % मतदार मत देतात पण कर देत नाहीत. जो कर देतो त्याचा राजकीय धोरणे, बजेट धोरण प्रभावीत करण्यात नगण्य वाटा. उलट फ़ुकटे कर न देणारे ९६ % मतदार आणि त्यांची व्होट बॅंक मिळुन राजकीय सबसीडी इ संबंधित.राजकीय धोरणे आक्रमकतेने प्रभावित करणार. शासनाचे टारगेट करदात्यांचे हे प्रमाण ४ वरुन २३ टक्के पर्यंत पोहोचवणे असे आहे मात्र हे साध्य होणे नजीकच्या काळात तरी अवघडच दिसते. थोडक्यात फ़ारच कमी लोकसंख्या करजाळ्यात व कर भरणारी आहे. भारताचा टॅक्स टु जी.डी.पी रेशो हा अत्यंत कमी आहे १७.७ % आहे.अमेरीकेचा-२६.९ % इंग्लंड चा ३९ % इतका जास्त आहे. (Source:- Pwc Paying Taxes 2016) हा टॅक्स बेस वाढवणे अत्यावश्यक आहे असे सर्व्हे सांगतो. टॅक्स बेस वाढणे का अतीआवश्यक हे समजणे फ़ारसे किचकट नाही. सरकारी योजनांचा खर्च, पायाभुत सुविधांत गुंतवणुक करण्यासाठी, वित्तीय तुट भरुन काढण्यासाठी इ.इ. एक ना दोन हजार चांगल्या महत्वाच्या कारणांसाठी सरकारला पैसा हवा आहे. आता या वाढत्या गरजांचा भार एकाच एका मर्यादीत छोट्या वर्गावर किती काळ टाकणार ? व का मुळात टाकावा ? यात अन्न्याय आहे, असमानता आहे सगळ काही नकारात्मक जे आहे ते आहे. यासाठी सर्व्हेने वेगवेगळे उपायही सुचवले आहेत त्यातले दोन विचारणीय आहेत. पहीला म्हणजे जवळपास १ लाख करोड पर्यंतच्या सबसीडीजना (इकॉनॉमिक सर्व्हेच्या चॅप्टर ६ मध्ये यासंदर्भात सखोल विश्लेषण आहे ) नियंत्रणात आणणे, कमी करणे, तसेच टॅक्स एक्झम्पशन राज संपविणे. व सर्वात महत्वाच म्हणजे सधन सक्षम कमावत्या वर्गाला करजाळ्यात ओढणे. त्याचे उत्पन्न्न मग ते कुठल्याही क्षेत्रातुन आलेले असो. त्याला एक्झम्पशन म्हणजेच करमुक्त न करणे हा आहे. यातील सर्व्हेचे शब्द जसेच्या तसे "And, reasonable taxation of the better-off, regardless of where they get their income from—industry, services, real estate, or agriculture--will also help build legitimacy.: लहान/ गरीब शेतकरी अ‍ॅग्रीटॅक्स पासुन सुरक्षितच कृषी उत्पन्नावर जरी कर आकारणी केली तरी यात गरीब शेतकरी कधीच भरडला जाणार नाही याची अनेक कारणे आहेत. एक २,५०,०००/- ही बेसीक एक्झम्पशन लिमीट आहेच. म्हणजे ज्या शेतकर्‍याचे वार्षीक उत्पन्न या पेक्षा कमी आहे तो इतर गरीबांप्रमाणे असाही करमुक्तच आहे. शहरातला एक नोकरदार/ दुकानदार जो अडीच लाखा पेक्षा कमी उत्पन्न मिळवतो त्याचेही उत्पन्न करमुक्तच असते. एक उदाहरण बघु या एक रमेश/सुरेश शहरी नोकरदार/दुकानदार आहे. त्याचे उत्पन्न बेसीक एक्झम्पशन च्या वर २.५ ते ५ लाख दरम्यान वाढले तर त्याला १० % कर भरावा लागतो. मात्र शेतकर्‍याचे जरी रमेश इतकेच उत्पन्न झाले तरी तो शुन्य कर भरतो. यापुढे रमेश ५ ते १० लाख उत्पन्न मिळवु लागला तर वरच्या स्लॅबचा २० % कर भरणार- पुन्हा शेतकर्‍याने इतकेच जरी कमावले तरी शुन्य कर भरणार. शेवटी रमेश १० लाखाच्या वर उत्पन्न तर ३० % टक्के कर भरणार शेतकरी पुन्हा एक रुपयाही कर भरणार नाही.. रमेश नोकरदार असेल तर त्याचा डायरेक्ट TDS (Tax deducted at source) कापुनच हातात पगार येणार. दोन्ही भारताचेच नागरीक आहेत दोन्ही कष्ट करुनच उत्पन्न मिळवतात. एक कर भरणार दुसरा नाही हा कुठला न्याय आहे. इथे अजुन एक बाब जर शेतीत कधी नुकसान झाले जसे व्यवसायात होते तेव्हा नील रीटर्न भरण्याची लॉस दाखवण्याची तो पुढे ८ वर्षांपर्यंत कॅरी फ़ॉरवर्ड करण्याची सुविधा आहेच. त्यामुळे एखाद्या गरीब शेतकर्‍याला ( करमुक्त मर्यादेतला २.५ लाखाच्या आतील ) किंवा शेतीत एखाद्या वर्षी नुकसान झालेल्याला असाही कर भरायचा नाहीच आहे. आपण केवळ ज्याने नफ़ा कमावलेला आहे व तो ही एका प्रमाणापेक्षा जास्त ( बेसीक एक्झम्पशन लिमीट २.५० लाखाच्यावर ) त्याच शेतक‌‍र्‍याच्या कर भरण्याविषयी बोलत आहोत. मात्र आज कृषी उत्पन्न पुर्णपणे करमुक्त आहे. म्हणजे एखादा शेतकरी जरी हायएस्ट स्लॅब १० लाखाच्या वरती उत्पन्न मिळवतोय तरी तो एक नया पैसा कर भरत नाही त्याला असे करण्याची कायदेशीर राजरोस सुट आहे. यात अजुन एक बाब भारतातली शेतजमीन ही बहुतांश कुटुंबातील जॉइन्ट होल्डींग ३-४ वा जास्त लोकांच्या नावावर सहसा असते ( तुलनेसाठी शहरातल्या फ़्लॅट्स ची ओनरशीप बघावी जनरली म्हणतोय विदा नाही एक/दोन जणांच्या नावावर असते) तर जरी समजा कृषी उत्पन्नावर कर लावला व एका शेतजमीनीतुन १० लाख निव्वळ नफ़ा झाला व ती ४ जणांच्या नावे असेल तर पुन्हा त्यात चार तुकडे पडुन एकेकाचे उत्पन्न २.५ लाख इतकेच धरले जाईल पुन्हा सुट मिळण्याची किंवा खालच्या स्लॅब मध्ये कमी दराने टॅक्स भरण्याची संधी मिळेलच. आणि हा संभाव्य भार कमी होइल. म्हणजे इथेही पुन्हा डिस्काउंट ला स्कोप आहेच. दुसर अस करता येइल की ठीक आहे एक शेतकरी हा दुर्बल घटक वगैरे वगैरे मानुन घेउ. तर याला टॅक्स एक्झम्पशन लिमीट रमेश सुरेश पेक्षा जास्त ठेवता येईल. २.५ लाखा ऐवजी ५ लाख ठेवता येइल. (हे ही चुकच आहे असमानता आहे पण ठीक आहे समजा आणी तज्ञांकडुन असे सजेशन्स देण्यात आलेले आहेतच ) तरी आज परीस्थीती अशी आहे की १० लाखाच्या वर जरी कृषी उत्पन्न गेले तरी शेतकर्‍याला कर शुन्यच. हा धडधडीत अन्याय आहे. अजुन एक तज्ञांनी सुचवलेले आहे की यात कराचा दर कमी ठेवता येइल शेतकर्‍यासाठी समजा १० लाखाच्या वर उत्पन्नावर एरवी जो इतरांना ३० टक्के टॅक्सरेट आहे शेतकर्‍याला तो १५% च लावा वाटल्यास. पण १० लाखावर निव्वळ नफ़ा झालेल्यालाही कमीत कमी शुन्य कर भरण्याची सवलत दिली जाऊ नये त्याजकडुन काहीतरी तरी रक्कम किमान कर वसुल करण्यात यावा जसे इतर नागरींकांकडुन घेतला जातो तसा. कर भरणे हे लोकशाहीतील नागरीकाचे अग्रिम कर्तव्य आहे. शेती क्षेत्राचे जीडीपीला योगदान, सबसीडीज परफॉर्मन्स इ. आता कर कर्तव्य बाजुला ठेउ जरा म्हणजे शेतकरी कर भरतो शुन्य. राष्ट्रनिर्माणासाठी आवश्यक पायाभुत सुविधा वगैरेत.शेतकर्‍याचे योगदान शुन्य. आता हक्काच्या बाबतीत बघा. सर्वाधिक सबसीडीज एकाहुन एक व्हरायटी कर्जमाफ़ी ते खत ते वीज ते किसान कार्ड, हमी भाव ते फ़्री सॉइल टेस्टींग सतराशे साठ सबसीडीज फ़ुकट सुविधा सेवा या व्यवसायासाठी सरकारकडुन दिल्या जातात. म्हणजे हा वर्गातला तो विद्यार्थी आहे ज्याला सर्व पुस्तके पेन्सील दफ़्तर मोफ़त वा कन्सेशनमध्ये आहे. फ़ी माफ़ आहे. गणवेश माफ़. आणि इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत याचे कीती गुण आहेत ? सर्वात ढोबळ जरी उदा. जीडीपी (ग्रॉस डोमेस्टीक प्रोडक्ट) मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १७ % व देशाची जवळ जवळ ५०% लोकसंख्या कृषी क्षेत्रातच गुंतलेली आहे. ताजा २०१६ चाच इकॉनॉमिक सर्व्हे ४ थे प्रकरण " अ‍ॅग्रीकल्चर मोअर फ़्रॉम लेस " काय दाखवतो बघा. In wheat , India’s average yield in 2013 of 3075 kg/ha is lower than the world average of 3257 kg/ha. Although both Punjab and Haryana have much higher yields of 4500 kg/ha, most other Indian states have yields lower than that of Bangladesh............. India happens to be the major producer and consumer of pulses, which is one of the major sources of protein for the population. India has low yields comparable to most countries. On an average, countries like Brazil, Nigeria, and Myanmar have higher yields इतक्या प्रचंड सुविधा मिळुनही परफ़ॉर्मन्स इतका पुअर हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हे एक सॅम्पल आहे अनेक बाजुने याच्या खोलात जाता येइल हे ठाम विधान नाही. याची अनेक कारणे असतील प्रश्न एकच आहे साधा इतका पुअर परफ़ॉर्मन्स असलेल्या क्षेत्राला कीती काळ कीती सुविधा देणार.कधीतरी या क्षेत्राला दिल्या गेलेल्या सुविधांचे कठोर मुल्यमापन व्हायला हवे. सुविधांचा सबसीडींचा गैरवापर हा एक अती महत्वाचा मुद्दा उदा.सबसीडीने मिळत असलेल्या फ़ुकट वीजेने शेतकर्‍यांकडुन होत असलेल्या पाण्याच्या बेजबाबदार गैरवापरा विषयी इकॉनॉमिक सर्व्हे म्हणतो. Although water is one of India’s most scarce natural resources, India uses 2 to 4 times more water to produce a unit of major food crop than does China and Brazil (Hoekstra and Chapagain [2008]). Hence, it is imperative that the country focus on improving the efficiency of water use in agriculture. It has long been recognized that a key factor undermining the efficient use of water is subsidies on power for agriculture that, apart from its benefits towards farmers, incentivises wasteful use of water and hasten the decline of water tables. According to an analysis by National Aeronautics and Space Administration (NASA)5 , India’s water tables are declining at a rate of 0.3 meters per year. Between 2002 and 2008, the country consumed more than 109 cubic kilometers of groundwater, double the capacity of India's largest surface water reservoir, the Upper Wainganga भारतातुन पाणी ( इतर देशांना वॉटर इन्टेसीव्ह क्रॉप च्या निर्यातीच्या माध्यमातुन (पिकात असलेलं व त्यासाठी वापरण्यात आलेल पाणी पिकासोबत निर्यात होत ) व किती आयात होत याचा एक अत्यंत रोचक व धक्कादायक डेटा इकॉनॉमिक सर्व्हे मांडतो तो मुळातुनच वाचण्यासारखा आहे त्यावरुन हा पाणी विषय किती गंभीर आहे ते लक्षात येत..दुर कशाला नुकत्याच ताज्या बातमीनुसार दिव्य मराठी-१६-०७-१६ त लखनउ येथील भारतीय उस संशोधन संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्र जे देशात साखर उत्पादनात क्र,१ चे राज्य आहे.उस पिकासाठीच्या पाणी वापरात महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडुन मोठी उधळपट्टी केली जाते. १ किलो उस पिकवण्यासाठी तब्बल २९२ लीटर पाण्याची नासाडी केली जाते. हे देशात सर्वात जास्त प्रमाण आहे. पंजाब-१३५ तामिळनाडु-१८१ असे प्रमाण आहे. खतांच्या सबसीडीवर तर एक आख्ख स्वतंत्र प्रकरण चॅप्टर ९- रीफ़ॉर्मींग द फ़र्टीलाइजर सेक्टर ) सर्व्हेला द्यावे लागले त्यात. म्हटलेय.. Fertiliser accounts for large fiscal subsidies (about 0.73 lakh crore or 0.5 percent of GDP), the second-highest after food. We estimate that of this only 17,500 crores or 35 per cent of total fertiliser subsides reaches small farmers. The urea sector is highly regulated which: creates a black market that burdens small farmers disproportionately; incentivises production inefficiency; and leads to over-use, depleting soil quality and damaging human health. या खताच्या सबसीडीजचे भरमसाठ बेजबाबदार वाटप ( जरी भ्रष्टाचार गृहीत धरुन शेवटी कमी हातात पोहोचला तरी व शेवटी श्रीमंत शेतकर्‍यांनीच समजा सबसीडीजचा लाभ उठवला असे गृहीत धरले तरी मग ते तर कर भरण्यासाठी अधिकच जबाबदार धरले पाहीजेत ) तर शेवटी शेतकर्‍यालाही नुकसानदायक ठरते. अशा सबसीडीज वर विचार झाला पाहीजे. कारण या सबसीडीज ४ टक्के मतदारांच्या जे कर भरतात त्यांच्याच खिशातुन जातात. ताज्या बजेटमध्ये १५००० करोड ची तरतुद शेतकी कर्जावरील व्याजाच्या सबसीडीसाठी केलेली आहे. एकट्या महाराष्ट्रात २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षात पीक कर्ज घेतलेल्या एकुण ६७१००० शेतकर्‍यांकडे ३८९९ पीक कर्ज थकलेले आहे. याच थकबाकीदार शेतकर्‍यांना दोन पाकीट कपाशी बियाणे मोफ़त देण्याचे शासनाने ५ जुलै रोजी आदेश दिलेले आहेत. हे बियाणे पेरण्या उरकत आल्या तरी अजुन मिळत नाहीये अशी तक्रार शेतकर्‍यांकडुन केली जात आहे. सबसीडीज व परफ़ॉर्मन्स हा या लेखाचा मुख्य विषय नाही. सांगायचे इतकेच की जे शुन्य कर भरतात ते इतक्या मोठ्या प्रमाणात सुविधा घेतात त्याचा गैरवापर करतात बर त्या क्षेत्राचा इतक्या सुविधा इतकी वर्षे घेऊनही हवा तसा विकास होत नाहीच. उलट सुविधांचा गैरवापरच होतो. या क्षेत्रात ना-लायकांचा अकार्यक्षमांचा भरणा जास्त आहे. इथे गर्दी झालेली आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ आपण अजुन विकसीत देश नाही म्हणुन आपली इतकी मोठी लोकसंख्या एका प्रायमरी सेक्टर मध्येच काम करते इतकाच अर्थ..जितक्या फ़ुकट सबसीडीज सुविधा कमी होतील व जसा इनकम टॅक्स भरावा लागेल जशी व्यावसायिकता वाढेल तसतसे तितके केवळ कार्यक्षम लोकच कृषी क्षेत्रात मग इनोव्हेशन करुन प्रॉडक्टीव्हीटी वाढवुन टिकुन राहतील. उरलेली अकार्यक्षम अपात्रांची लोकसंख्या आपापल्या लायकी वकुबाप्रमाणे इतर सेक्टर मध्ये काम मिळवेल व यातुन बाहेर पडेल. शेवटी मोजके मर्यादीत एफ़िशीयंट लायक या क्षेत्राला सांभाळुन चालवतील तो सुदीन.जे आज नाहीतरी प्रगत देशात बघावयास मिळतेच. देशाची मोठी लोकसंख्या तिथे शेतीत फ़क्त गुंतलेली नसते. एक मर्यादीत टक्के लोकच एफ़िशीएंटली आधुनिकतेने शेती करतात सर्व देशाची गरजही पुर्ण करतात. मोठी अकार्यक्षम लोकसंख्या गुंतण्याऐवजी छोटी कार्यक्षम लोकं या क्षेत्रात टिकली तरी पुरे. शेतकरी विषयक परस्पर विसंगत दांभिक भुमिका एकीकडे शेतकरी संघटना व सरकार शेतकरी हा व्यापारी कसा झाला पाहीजे याचे आग्रही समर्थन करतांना दिसतात. अत्यंत आनंदाचीच गोष्ट आहे. म्हणजे त्याला सर्व काही सुविधा देतात. त्याला बंधन नको, त्याला त्याचा भाव ठरवु द्या, त्याला नफ़ा मिळाला पाहीजे छानच आहे मात्र जशी सर्व कमाई झाल्यावर व्यापार्‍याने कर भरणे अपेक्षीत असते तसे शेतकर्‍याने कमाईतुन कर द्याव्या या कर्तव्याविषयी चिडीचुप या मुद्यावरील मौन असामान्य. एकही शेतकरी संघटना सभासदांना सांगत नाहीत किमान श्रीमंत सभासदांना तरी की तुम्ही राष्ट्रीय कर्त्यव्य म्हणुन स्वत:हुन किमान ५ लाखाच्यावर उत्पन्न झाल्यावर तरी कर भरा (इतर नागरीक २.५ लाखाच्या वर भरताहेत तुम्ही दुप्पट कमाई झाल्यावर तरी भरा ). शेतकर्‍यांच्या संदर्भात कमालीच्या दांभिक आणि मजेदार परस्पर विसंगत भुमिका समाजात घेतल्या जातात. उदा. एकीकडे शेतकरी व्यापारी झालाच पाहीजे मुक्त अर्थव्यवस्थेचे लाभ त्याला मिळाले पाहीजेत. मात्र दुसरीकडे कर भरण्याची जबाबदारी नको. आम्ही म्हणू तोच भाव मात्र खतात सबसीडी द्या, औषधात द्या, पीक विमा द्या, कर्जमाफ़ी द्या. बाजारव्यवस्थेचे सर्व फ़ायदे द्या भाव आम्ही ठरवु तोच मात्र तेवढे माल मोजण्यासाठी मोफ़त काटे पुरवा ना गडे. तिसरीकडे अजुन एक भारी शेतकरी हा अन्नदाता आहे पोशिंदा आहे. हे भलतच इंट्रेंस्टींग आहे. अन्नदाता म्हणजे जणु त्याने पिक कष्टाने पिकवुन इतरांना दान स्वरुप मोफ़त दिले व इतर याचक ( स्वकष्टाच्या कमाईवर प्रामाणिकपणे कर भरणारे याचक व त्यांच्या करनिधीतुन सबसीडी लाटणारा शेतकरी अन्नदाता ) हा पोशींदा म्हणजे तो इतरांना पोसतो. शेतकरी सायकल, मोटरसायकल, कपडे औषध इ. स्वत: निर्माण करतो ? तो यासाठी इतर कोणावरच अवलंबुन नसतो ? आपण एका लोकशाहीत/ मुक्त समाजात राहतो वेगवेगळे घटक वेगवेगळी उत्पादने सेवा देतात त्या मोबदल्यात पैसे घेतात अर्थव्यवहार चालतो हा सरळ रोकडा व्यवहार आहे शेतकरीही हेच करतो /करावे यात कोणीही कोणावर उपकार करत नाही कोणी कोणाचा पोशींदा अन्नदाता नाही. एखादा दुकानदार व्यापारी असे म्हणतो का ? हे म्हणजे शेतकरी अन्न उदा. मुग विकतो म्हणून अन्नदाता तर मुगदाळ विकणारा हल्दीराम भुजियावाल्याला अन्नदाता म्हणावे का ? इथे तर हमीभाव मिळाला नाहीत तर अन्नदाता तोडफ़ोड करतो, रस्त्यावर अन्न टाकतो. अजुन एक शेती करतो म्हणजे तेच जणु खरे कष्ट तेच खरे घाम गाळणे ( जमीनसे जुडा इन्सान तुम एसी मे बैठ कर वगैरे क्या जानोगे हा फ़ारच जुनाट अत्यंत इममॅच्युअर्ड पवित्रा नेहमीचाच यशस्वी "तुम्ही फ़ाइव्हस्टार मध्ये एसीत बसुन काय बोलता " हे ऐकले की पुढे काय येणार हे सुनिश्चीत असते ) एखादा सीए टॅक्स ऑडीट, एखादा सर्जन गुंतागुंतीची शस्त्रक्रीया, एखादा आर्कीटेक्ट ड्रॉइंग बनवतो ती कामे जणु एसीत केलेली मौजमजा आहे आणि हो त्यात घाम कुठे गळतो ?. शेतकरीच काय तो "खरे" कष्ट काम करतोय. कम्युनिस्टांच्या राजवटीत रशियात सुंदर स्वच्छ कोमल गोरे (न रापलेले ) हात Evil (हे ही एक मजाच एव्हील) मानण्यासारखा आचरट प्रकार असो. कृषीउत्पन करमुक्त असण्याने वाढलेला भ्रष्टाचार व करचोरीला मिळालेले प्रोत्साहन कृषीउत्पन्न करमुक्त आहे याचा मोठा गैरफ़ायदा करचोरांकडुन व सक्षम घटकांकडुन घेतला जातो. सर्व्हे तेच म्हणतो की "Agricultural income of non-agriculturists is being increasingly used as a conduit to avoid tax and for laundering funds, resulting in leakage to the tune of crores in revenues annually." हिंदु ची १९-०३-२०१६ ची बातमी पहा. विजय शर्मा या इनकमटॅक्स कमिशनरने निवृत्ती नंतर ( बहुतांश सरकारी अधिका‍र्‍यांचा विवेक निवृत्तीनंतरच हजला जातो ) माहीतीच्या अधिकारा अंतर्गत एक अ‍ॅग्रीकल्चरल इनकम संदर्भात माहीती मागितली होती त्याच्या उत्तरात २०११ या वर्षात एकुण ६.५७ लाख करदात्यांनी तब्बल २००० लाख करोड (दोनवर किती शुन्ये ?) हे आपले अ‍ॅग्रीकल्चरल इनकम आयकर विवरण पत्रांत दाखवलेले जाहीर केलेले होते (तो काही वर्षांचा एकत्रित हिशोबही यात आहे चुकभुल देणे घेणे ). जे त्यावर्षीच्या भारताच्या जीडीपीच्या ८४ लाख करोड च्या २० पट इतके होते. अर्थातच ही उघड उघड चोरी दिसतेय. म्हणजे जे अ‍ॅग्रीकल्चर इनकम दाखवलेले आहे ते तितके नाहीच. पण पुर्ण करमुक्त असल्याने असा गैरफ़ायदा घेण्यास मोकळे रान मिळते. अनडिस्क्लोल्ज्ड सोर्सेस मधुन आलेले इनकम अ‍ॅग्रीइनकम म्हणून दाखवलेले आहे. तर शर्माजींनी त्यानंतर पाटणा हायकोर्ट मध्ये जनहीत याचीका या आधारावर दाखल केली. की याची चौकशी केली पाहीजे. त्यानंतर इनकम टॅक्स डिपार्टमेंटने ज्यांनी १ करोड च्या वर अ‍ॅग्री.इनकम दाखवलेले आहे त्याचा विशेष तपास करण्याची मोहीम हाती घेतली. हाच मुद्दा न्युज नेशन या चॅनेल ने लावुन धरला होता. अरुण जेटलींना यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते त्यात त्यांनी विरोधकांना तुमच्यातल्या मोठ्यांची नावे उघडकीस आल्यास तक्रार करु नका असेही म्हटलेले होते. एक गंमत वाटते उद्या हेच अ‍ॅग्री इनकम टॅक्सेबल केल्यानंतरच्या वर्षात कीती लाख करोड इनकम हे अ‍ॅग्रीइनकम दाखवण्यात येइल? जो पर्यंत अशा रीतीने एक पुर्ण मोठा इनकम सोर्स पुर्णपणे करमुक्त ठेवला जाईल तो पर्यंत हे प्रकार होतच राहणार. आठवा आपले बिग बच्चन पण मागे एकदा शेतीत रस घेऊ लागले होते शेतकरी वगैरे होते. खर म्हणजे रीट्रोस्पेक्टीव्ह इफ़ेक्ट ने १ करोड च्या वर अ‍ॅग्रीकल्चर इनकम ज्यांनी स्वत:च दाखवलेले आहे त्यांना कर लावला पाहीजे. मान्य तर त्यांना आहेच की इतके उत्पन्न झाले. आता दुसरा खेळ बघा अ‍ॅसेसमेंट इयर २०१४-१५ मध्ये ४ लाखाच्यावर करदात्यांनी कृषी उत्पन्न दाखवुन एक्झम्पशन ची मागणी केली. यात अ‍ॅग्रीकल्चर इनकम हे करमुक्त आहे या तरतुदीचा फ़ायदा मोठ्या कंपन्यांनीही छान उचलला. सर्वात मोठे अ‍ॅग्रीकल्चर इनकम कमावणारे व त्यावर एक्झम्पशन क्लेम करणारे जे दावेदार होते त्यात कावेरी सीड्स कंपनीचा पहीला क्रमांक होता त्यांनी १८६.६३ करोड इतके एक्झम्पशन क्लेम केले. त्यांचा बिफ़ोर टॅक्स प्रॉफ़ीट होता २१५.३६ करोड रुपये. दुसरी कंपनी होती मल्टीनॅशनल कंपनी " मॉन्स्न्टो इंडिया ज्यांनी ९४.४० करोड क्लेम केला त्यांचा बिफ़ोर टॅक्स प्रॉफ़ीट होता ९४.४० करोड. अ‍ॅग्रो कंपन्या जे कृषी उत्पन्न घेतात त्यांना इंडिव्हीज्युअल प्रमाणेच ते करमुक्त आहे. अनेक इंडिव्हीज्युअल शेतकरी फ़ार श्रीमंत असतात. पंजाब मध्ये गाड्यातुन फ़िरणारे शेतकरी असतात. महाराष्ट्रातही अनेक गडगंज श्रीमंत बागायतदार शेतकरी आढळतात. त्या सर्वांचे बंपर ५ काय १० लाखाच्यावरील इतरांसाठी ३० % कर दर असलेले कृषी उत्पन्न टॅक्स फ़्री च असते. कृषीउत्पन्नावरील कर शेतकर्‍यांसाठीही लाभदायी असण्याची कारणे कृषीउत्पन्नावर कर लावणे हे शेतकर्‍यांसाठीही अनेक दृष्टींनी लाभदायकच असेल हे विख्यात करतज्ञ सुभाष लखोटिया दाखवुन देतात. एक शेतकर्‍यांवर जेव्हा कर भरणे सक्तीचे होइल तेव्हा करात सुट/ डीडक्शन्स मिळवण्याच्या प्रेरणेतुन सेक्शन ८०-सी सारख्या सेक्शन्स. अंतर्गत बचत योजनांमध्ये, विमा योजनांमध्ये व इतर इन्फ़्रास्ट्रक्चर बॉन्ड्स इ. त गुंतवणुक व बचत करण्याची सकारात्मक सवय शेतकर्‍याला लागेल. या बचतीच्या सवयीने शेतकर्‍याचेच भविष्य सुरक्षित होइल शिवाय शासकीय कल्याणकारी योजनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग वाढेल. आपण फ़क्त फ़ुकट सुविधा उकळत नाही तर लोकशाहीला शासनाला योगदानही देतो याने विवेकवृद्धी होइल. दुसरे कर भरावयाचा तर अकाउंट्स हिशोब व्यवस्थित मेंटेन करण्याची सवय लागेल आर्थिक शिस्त लागेल. आवश्यक कागदपत्रांचे नीट जतन होइल. आर्थिक निर्णय घेतांना तो अधिक सजग व प्रौढ होइल. या व्यवस्थितपणाचा फ़ायदा त्याच्या व्यवसायासाठीच होइल. सध्याचे अनेक शेतकरी किमान सुशिक्षीत असतात जे नाहीत पण ५ लाखा १० लाखावर इतके मोठे उत्पन्न मिळवतात त्यांना हिशेबनीसाची मदत घेणे अशक्य नाही. शिवाय सीए कडुन टॅक्स ऑडीट करणे जिथे लागु नसते ( १ की दीड करोड ची इनकम मर्यादा आहे त्यानंतर करावे लागते) त्यांना सीए ऑडीट आवश्यक नसते. अजुन महत्वाचा लाभ म्हणजे जेव्हा शेतकरी रीटर्न भरेल तेव्हा त्याचा एक भक्कम आर्थिक रेकॉर्ड तयार होइल. त्याचा CIBIL चा स्कोअर वाढेल त्याने त्याला भविष्यात जेव्हा बॅंकेकडुन कर्ज घ्यायचे असेल तेव्हा एक हक्काचे चांगले इनकम रेकॉर्ड उपयुक्त होइल. तो स्वत:ची भरवशाचा कर्जदार म्हणून पात्रता या टॅक्स रीटर्न्स च्या आधारे सिद्ध करु शकेल. याने बॅकींग व्यवस्थेलाही लायक कर्जदार ना-लायकांपासुन वेगळा करणे सोपे व पर्यायाने बॅंकांना त्यांच्या नॉन परफ़ॉर्मींग अ‍ॅसेट्स वर अंकुश आणणे शक्य होइल. आज सार्वजनिक बॅंकाचा एनपीए चा प्रश्न फ़ार गंभीर झालेला आहे त्या पार्श्वभुमीवर हे महत्वाचे आहे. शासनालाही सबसीडी देतांना या निकषांचा वापर करता येईल कुठे तरी या लायक शेतक‍र्‍यांना अधिक प्रोत्साहन देता येइल सबसीडी वेस्टेज वाचेल. केवायसी रेकॉर्ड मेंटेन होण्यास प्रोत्साहन मिळेल त्याने शेती संदर्भातील सर्व्हेज मध्ये अचुकता येइल. कोण कीती कसा परफ़ॉर्म करतोय ते जोखता येइल. जेव्हा मेरीट बेसीस वर प्रॉपर बॅंकींग चॅनेल ने कर्ज घेण्याचे प्रमाण वाढेल तेव्हा अन्यायकारक खासगी सावकारीचा टक्का कमी होइल त्या सावकारी अव्वाच्या सव्वा व्याजाच्या जोखडातुन मुक्ती होइल. CIBIL स्कोअर मेंटेन करण्याच्या प्रेरणेने कर्जाचा पैसा कर्जबाह्य हेतुसाठी वापरण्यासही आळा बसेल. ( बॉलिवुडला बघा अगोदरचे गॅंगस्टर डी कंपनी इ. चे काळ्या पैशाचे फ़ंडिंग सध्या कमी होउन रीलायन्स फ़ॉक्स इ.कंपन्या यात उतरल्याने प्रॉपर चॅनेल मधुन फ़ायनान्स मिळाल्याने एकुण इंडस्ट्रीचा फ़ायदाच होतो व्यावसायिकता वाढते कर्जदार अधिक जबाबदार व आन्सरेबल होतो. ) या क्षेत्रातली ना-लायकांची गर्दी कमी होइल त्यामुळे शिल्लक लायकांना सरकारी योजनांचे लाभ मिळावयास मदत होइल. लायकांचे कॉन्सन्ट्रेशन होऊन कृषी क्षेत्र प्रगत होइल. कुठल्याही प्रगत अर्थव्यवस्थेत केवळ शेतीवर अवलंबुन राहणारी लोकसंख्या घटत जाते. मर्यादीत वर्ग उच्च क्षमतेत काम करुन त्या सेक्टर ची गरज भागवतो. मारवाडी लोक मुल मोठी झाली की त्यांना एकाच दुकानात बसु देत नाहीत दुसर दुकान काढुन देतात "सब छोरा आठ ही एक ही दुकानम बेठ क काइ करी ? " इतके तरुण आपली उर्जा अनेक उत्तम सेवा उत्पादन क्षेत्रात जिथे गरज आहे विस्ताराला संधी आहे तिथे बेटर वापरु शकतात.इतकी मोठी ५० % लोकसंख्या शेतीत काय करायची ? आणि रीझल्ट काय तर १७ % एकुण जीडीपीत म्हणजेच नालायकांची गर्दी इथे फ़ार आहे. याच्या इतर अनेक कारणांसोबत प्रमुख कारण बहुतांश शेतजमीन वंशपरंपरेने आलेली आहे त्यामागे एका अन्न्याय्य फ़्युडल सिस्टीमचा इतिहास आहे शेतीचे सर्वात मोठे भांडवल फ़ुकट उपलब्ध.व त्यातही स्वत:पुरते पिकवण्याची शक्यता. म्हणजे जगणे कसेबसे जमवता येते. ही सिक्युरीटीच घातक ठरते, त्याने एक उदासीनता अनिच्छा काही नविन करण्याची प्रगती करण्याची आस कमी होत जाते. एक सुरक्षाच आहे एक प्रकारची जी प्रगतीची प्रेरणा कमी करते. शेतकर्‍याचा मुलगा थोडेफ़ार हात पाय शहरात मारतो, पुन्हा त्याला मनात माहीत आहे की शेती आहेच कसेबसे तर जगुनच जाऊ. अर्थात हे ब्रॉड मॅक्रो पातळीवरच आहे अपवाद असणारच मुद्दा समजुन घ्या. आपली तथाकथित बलुतेदारी स्वयंपुर्ण खेडी शेकडो वर्षे जगतच राहीली अनेक राज्यकर्ते आले गेले तगुन राहीलीत. साहेब जेव्हा आला तेव्हाच त्यानेच काय ती शेकडो वर्षांची झोप एकदाची कायमची मोडली आणि हालचाल करावयास भाग पाडले. इस्ट इंडिया कंपनीने लॅन्ड रेव्हेन्यु ज्या आक्रमकतेने ( पुर्वीच्या मोगल राजवटीच्या तुलनेत काही वर्षातच अ-भुतपुर्व वसुल केला, पहील्यांदाच भारताच्या इतिहासात जमीनदारी ऑक्शन करुन विकली व नवजमीनदारांना जे रेव्हेन्यु टारगेट्स दिले त्यातुन जो जमिनीच्या मालकीचा पॅटर्न बदलत गेला तो एक महत्वाचा ऐतिहासीक विषय पण असो तो पुर्णपणे वेगळा विषय. तर गृह कर्जालाही प्रोत्साहन मिळेल. सर्वात महत्वाच प्रॉडक्टीव्हीटीला चालना मिळेल. शेतकरी पर एकर अधिक उत्पन्न घेण्यास प्रोत्साहीत होइल त्याकडे अधिक व्यावसायिक दृष्टीने बघेल केवळ जगण्याचा नसुन विकासाचा व्यवसायाचा पर्याय म्हणून शेतीकडे बघेल. स्वबळावर कर्जाच्या सपोर्ट ची व अधिक उत्पनाची आशा श्रीमंतीची आस त्याला अधिक प्रयोगशील कार्यक्षम बनवेल. शिवाय या कृषीकरातुन उभा केलेला पैसा सरकार पुर्णपणे कृषी क्षेत्राकडे वळवु शकते कृषी विकासासाठी पायाभुत सुविधा रस्ते, कोल्ड स्टोरेज चेन्स, इ. कडे हाच शेतकर्‍यांच्या करातुन उभारलेला पैसा वापरता येइल. यामुळे सध्या जो एकाच मर्यादीत वर्गावर सर्वाचा बोजा येतो तो कमी होइल. टॅक्स बेस वाढेल त्याने एकुण टॅक्स रेट नियंत्रणात राहील. कराला राजकीय विरोध पुर्वीच्या काळात राजा असायचा जो स्वत: कधीच कर द्यायचा नाही जो केवळ इतरांकडुन प्रजेकडुन कर घ्यायचा. त्याचा खर्च, राजमहालाचा खर्च इ. करातुन घेतलेल्या पैशातुनच व्हायचा. आताही शेतकरी "राजा" कडुन कर वसुल करणे तुर्तास तरी अवघडच दिसतेय. याला सर्वात महत्वाचे कारण राजकारणात असलेल्या श्रीमंत शेतकरी लॉबीचा दबाव टॅक्स कमिशन म्हणतो Yet, successive governments have shown a lack of political will to tax agricultural income because of the politically strong hold that the agricultural lobby has over governments. आपल्याकडेच बघा राष्ट्रवादी सारखे सरंजामदारी मानसिकतेचा प्रामुख्याने समावेश असलेल्या नेत्यांचा पक्ष. यांच्या सारख्यांकडुन अशा क्रांतिकारी कायद्यांची अपेक्षा करणे म्हणजे अंमळ जास्त च झाले. इतरही कारणे आहेत पण लांबी अगोदरच वाढलीय. कृषी क्षेत्राला युवा एनर्जी ची गरज फ़क्त शेवटी कृषीक्षेत्रात कुठल्या प्रकारची युवा एनर्जी अपेक्षीत आहे त्याचे एकच उदाहरण देऊन थांबतो , संदेश पाटील या रावेर (जळगाव) च्या तरुणाने वैद्यकीय शिक्षणात मन रमत नसल्याने शिक्षण अर्धवट सोडले व तो शेतीकडे वळला. अमेरीकन विषुववृत्तीय प्रदेश व काश्मीर खोर्‍यातच प्रामुख्याने घेतले जाणार्‍या "केसर" च्या पिकाचा त्याने सखोल अभ्यास सुरु केला. इंटरनेट वरुन माहीती मिळवली. (हो हो नेटवरुनच हं) राजस्थानच्या पाली शहरात जाऊन केसर ची ४० रुपये प्रमाणे ३००० रोपे विकत घेतली. डिसेंबर २०१५ मध्ये केवळ अर्ध्या एकरात लागवड केली. तीन ते पाच महीन्यात केसरचे उत्पन्न घेतले. त्या केसरचा भाव होता ४०००० रुपये किलो.खर्च वजा जाऊन ६ महीन्यात निव्वळ नफ़ा मिळवला ५,४०,०००/-. जळगाव मध्ये केळी कापुस हीच पारंपारीक पिके घेतली जातात त्या क्षेत्रात या तरुणाने " केसर" सारखे पिक यशस्वीरीत्या घेऊन दाखवले .याच जळगाव मध्ये एक कंपनी आहे जैन इरीगेशन म्हणुन या कंपनीत शेतीवर अदभुत आणि विलक्षण प्रयोग होत असतात पपेन संबधी एका उत्पादनात ही कंपनी जगात पहील्या क्रमांकावर आहे., या कंपनीने इसराएल च्या दोन कंपन्या अधिग्रहीत केलेल्या आहेत. टिश्यु कल्चरचे , पाण्यावर नुसत्या पाण्यावर पिके घेण्याचे अत्यंत क्रांतिकारी व बरेच काही प्रयोग इथे चालत असतात, एक कांदा निर्जलीकरण करुन त्याची पावडर एक्स्पोर्ट होते बरेच काही मला आता नीट आठवत नाही व संदर्भ तुर्तास उपलब्ध नाही. तर अशा प्रयोगशीलतेची अशा वातावरणाची गरज या क्षेत्राला आहे. यातुन शेती क्षेत्राला संदेश पाटील सारख्या एफ़िशीयंट लायक मोजक्या तरुणांची गरज आहे असा संदेश मिळतो. संदर्भ १-http://www.thehindu.com/news/national/fincome-tax-departments-reveals-agriculture-sector-figures article8371424.ece २-http://www.moneycontrol.com/news/tax/should-agricultural-income-be-taxedindia_828150.html ३-http://www.indiaspend.com/cover-story/farmers-tax-exempt-so-is-company-with-rs-215-cr-profit-85376 ४-http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:fBnjgHzL2kEJ:www1.worldbank.org/publicsector/LearningProgram/PracticalIssues/papers/Taxation%20of%20agriculture/Rajaraman_feb04.doc+&cd=1&hl=en&ct=clnk&gl=in
वर्गीकरण
आर्थिक कृषी

प्रतिक्रिया द्या
37508 वाचन

💬 प्रतिसाद (93)
म
मार्मिक गोडसे Wed, 07/20/2016 - 14:08 नवीन
शेतकर्‍याला त्याच्या शेतमालाला बाजार समिती व खुल्या बाजारात थेट विक्री हे दोन्ही पर्याय असल्यामुळे त्याला आपला शेतमाल उत्पादन खर्चापेक्षा जास्त दराने विकण्याची संधी प्राप्त झाली आहे. आता त्याने हमीभाव मागितला तर ते चुकीचे ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
आ
आदूबाळ Wed, 07/20/2016 - 09:11 नवीन
कुठल्या खासगी व्यावसायिक उत्पादकाच्या उत्पादनाचे कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन सरकार ठरवते?
काही फार्मा कंपन्यांच्या बाबत हे होतं. (भारतातच नव्हे, जगभरात.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 07/20/2016 - 09:37 नवीन
प्राइस कंट्रोल ड्रग बद्दल बोलत आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Wed, 07/20/2016 - 10:08 नवीन
प्राईस आणि प्रॉफिट मार्जिन कंट्रोल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 07/20/2016 - 12:15 नवीन
अशा एखाद्या औषधाचे कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन कोण ठरवतं ? व कसे? असे एकाच प्रकारचे औषध बनवणार्‍या वेगवेगळ्या कंपन्यांचे कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन सारखेच असते का? माहीत नाही म्हणून विचारतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Wed, 07/20/2016 - 12:35 नवीन
फार्मा क्षेत्रात किंमतीमध्ये जास्त चढऊतार सहसा नसतात. लो प्राईस इलॅस्टिसिटी. (अपवादः ड्रग ऑफपेटंट व्हायच्या काही काळ आधी.) त्यामुळे एकदा मार्जिन ठरवलं की कॉस्ट ऑफ प्रॉडक्शनची वरची मर्यादा आपोआपच ठरली जाते. समजा, प्रत्यक्ष कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन वाढली तर तो तोटा ग्राहकाकडे सरकवण्याची सोय उपलब्ध नाही (कारण किंमत वाढवली तर मार्केट शेअर जातो.) उलट, कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन कमी झाली तरी ठरल्यापेक्षा जास्त मार्जिन मिळवण्याला बंदी - त्यामुळे झक मारत तो फायदा ग्राहकाकडे कमी किमतीच्या स्वरूपात पास ऑन करावा लागतो. अशी ही सुळावरची पोळी असते. (कधीकधी ते ड्रग बनवायला काही कच्चा माल आयात करायला लागतो. त्यावर भरलेली कस्टम ड्यूटी तयार मालाच्या किमतीतून वसूल करता येतेच असं नाही. या इन्व्हर्टेड पिरॅमिड ड्यूटी स्ट्रक्चरबद्दल फार्मा कंपन्या अनेक वर्षं कोकलत आहेत.) अर्थात हे सरसकट फार्मा क्षेत्राबद्दल बोलत नाहीये. फक्त प्राईस/मार्जिन कंट्रोल्ड ड्रग्जबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 07/20/2016 - 13:06 नवीन
म्हणजे असे एकाच प्रकारचे औषध बनवणार्‍या वेगवेगळ्या कंपन्यांचे कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन वेगवेगळे असू शकते. फक्त मार्जिनवर नियंत्रण असते. बरोबर ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Wed, 07/20/2016 - 13:17 नवीन
तत्त्वतः असू शकतं, पण विक्रीच्या किमतीत जास्त फरक ठेवता येत नाही. म्हणजे विक्री किंमत ठरलेली, मार्जिन फिक्स्ड. विक्री किंमत (-) कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन (-) ऑपरेटिंग कॉस्ट (=) प्रॉफिट यातल्या पिवळ्या भागांत दोन कंपन्यांमध्ये जास्त फरक नाही. म्हणजे पांढरे भाग आपोआप सारखेच दिसणार ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 07/20/2016 - 13:54 नवीन
अगदी बरोबर. ह्याचा अर्थ नियंत्रण फक्त मार्जिनवर आहे कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन ठरवून दिलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Wed, 07/20/2016 - 14:13 नवीन
हो, पण ते ठरल्यासारखंच आहे ना. हलायला जागा कुठे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
संदीप डांगे Wed, 07/20/2016 - 19:02 नवीन
फार्मा प्रोडक्शनचे नियम शेतीला लागू होणार नाहीत. अमूक एवढे रिसोर्सेस वापरले तर अमूक इतके प्रॉडक्शन होते हे सरळ गणिती प्रमेय शेतीत वापरता येत नाहीत. जास्त रिसोर्सेस वापरुन निकृष्ट दर्जाचे पिक हाती येऊ शकते, तसेच कमीत कमी खर्च करुन दर्जेदार पिकही हाती येते. पण नक्की काय केल्याने नुकसान वा फायदा होईल ह्याची वैज्ञानिक पद्धती उपलब्ध नाही. असली तरी तिचे पर्मुटेशन कॉम्बीनेशन्स खूप आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अर्जुन Tue, 07/19/2016 - 21:44 नवीन
माणसाच्या मुलभुत गरजा अन्न वस्त्र निवारा यातील अन्न वस्त्र या मुलभुत गरजेस शेतकरी झगडतो. अशा शेतकर्याबद्दल कोणालाच आक्षेप नाही आहे,पण दहा लाखाचे पुढे उत्पन्न असलेला शेतकर्यानी आयकर भरायला काय हरकत आहे. निदान तो सबसीडी तरी नाकारु शकतो.आज किती सधन शेतकरी सबसीडी नाकारतात? मुंबईत तीन लाख उत्पन्न घेणारा पगारदारही मुलभुत गरजा अन्न वस्त्र निवारासाठी झगडतो. पण त्याला तरीही आयकर भरावा लागतो. शेतकरीच नेहमी दिन,दुबळाच असतो का? जसा त्याला दुष्काळाचा सामना करावा लागतो तसाच व्याप्यारालाही चढ/उतार असतातच ना? स्वाभिमानी व सधन शेतकर्यानी तरी निदान बियाणे, खते ईत्यादीवरील सबसीडी नाकारावी.
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 07/20/2016 - 16:28 नवीन
स्वाभिमानी व सधन शेतकर्यानी तरी निदान बियाणे, खते ईत्यादीवरील सबसीडी नाकारावी. सध्या जे एल पी जी गॅस ची सबसिडी सोडण्याचे आवाहन मोदीजी करत आहे तसे एखादे " मेरे अमीर किसान भाईयो कमसे कम अपने गरीब किसान भाईयो के लीए सबसिडी छोडो. " स्वाभिमानी सबसिडी संघटना यावर काय भुमिका घेईल बघणे रोचक आहे. मग पुढील वर्षात घोषणा मोदीजी के आवाहन पर जितनो ने १ करोड के उपर अ‍ॅग्रीकल्चरल इनकम बताया था उनमेसे ८० % किसानो ने सबसिडी छोडी. स्वाभिमानी सबसिडी संघटना अशा शेतकर्‍यांचा जाहीर सत्कार करेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्जुन
आ
आनन्दा Wed, 07/20/2016 - 16:31 नवीन
आजपर्यंत १ करोडच्या वर निव्वळ नफा असलेला शेतकरी माझ्या पाहण्यात नाही. टर्नओव्हरवाले आहेत. घाटावर असतील तर माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 07/20/2016 - 08:28 नवीन
रोचक चर्चा, अशा प्रकारचा कर भारत सोडुन इतर देशात आहे का? असेल तर त्याचे स्वरुप कसे आहे? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 07/20/2016 - 14:27 नवीन
माझे २ पैसे. मी तसे म्हटले तर एकाच वेळेस नोकरदार(माजी) आहे, व्यावसायिक आहे आणि शेतकरी पण आहे. तीनही भूमिकांमध्ये मला जेव्हढा कमी टॅक्स भरावा लागेल ते बरेच, असे माझे मत. त्यासाठी जेव्हढा टॅक्स चुकवता येईल (काही लोक त्याला वाचवणे म्हणतात) ते मी करतो. म्हणजेच कमीत कमी टॅक्स सरकारला माझ्या खिश्यातून जावा असे माझे मत आहे. आता एक एक केस बघूया. १. नोकरदार म्हणून जेव्हा मी वागत होतो तेव्हा मला टॅक्स वाचवण्याचे काहीच मार्ग नव्हते. सरकारी सोयी सुविधा जसे की गृहकर्ज, ८०सी वगैरे काय असतील त्याच. म्हणजेच नोकरदार म्हणून मी सर्वाधिक व्हल्नरेबल होतो. २. व्यावसायिक म्हणून जेव्हा मी वावरतोम तेव्हा मला टेक्स वाचवण्याचे अगणित नाही, पण काही खात्रीशीर मार्ग उपलब्ध असतात. ३. शेतकरी म्हणून मी जेव्हा वारवतो, तेव्हा टॅक्सचा प्रश्नच येत नाही. आता एक शेतकरी म्हणून आम्ही काय काय करतो? ==== १. शेती हा एक व्यवसाय म्हणून केला तरच त्यात अर्थ आहे. जेव्हा माझ्या वडिलांनी पाहिले की भातशेतीमधून पुरेसे उत्पन्न निघत नाही तेव्हा त्याअंनी भातशेती सरळ सोडून दिले. फक्त घरात आणि गुरांना लागते म्हणून गरजेपुरती भातशेती कली जाते. आता गावात सगळेच लोक हे करतात का? तर नाहे. याची कारणे काय? १. शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे. आणि सर्वसामान्यपणे अल्पभूधारक शेतकर्‍याची फक्त खाण्याची गरज शेतीमधून भागते, बाकी सर्व गरजा मोलमजुरीतून भागतात. कोकणात फक्त शेतीपुरते गावात येणारे आणि इतर काळ मुंबईमध्ये गवंडी इत्यादी काम करणारे बरेच लोक आहेत. मग हे लोक शेती का सोडू शकत नाहीत? याचे एक कारण म्हणजे कायमस्वरूपी रोजगाराचा अभाव. २. मजुरीचे दर आजकाल खूप वाढले आहेत. सरकारे दर बहुधा २००च्या घरात आहे, आणि माझ्या माहितीनुसार पुरुष कामगार ३००ला पडतो, तो देखील ८ तास काम करेलच असे नाही. म्हणजे एका घरातील नवरा बायको देघेही मजुरीवर जात असतील तर घराचे मासिक उत्पन्न सामान्यपणे १३००० च्या घरात जाते. गावात जगण्यासाठी असा विशेष खर्च नसतो. मग तरीदेखील हे लोक सधन का होऊ शकत नाहीत? याचे प्रमुख कारण आहे व्यसनाधीनता. ३. सामान्य शेकर्‍यांमध्ये प्रयोगशीलता जवळपास नसतेच असे म्हणायला हरकत नाही. तो त्याचा दोष नाहे, तर व्यवस्थेचा दोष आहे. वर्षानुवर्षे गावजीवन दिवसभर काम करणे, आणि संध्याकाळी भजन/ तमाशा (आवडीप्रमाणे) असे राहिले आहे. त्यामध्ये पुढे जाण्याची ईर्ष्या दिसतच नाही. यामधून बाहेर पडण्यासाठी शेतकर्‍यांची एक पिढी लागेल. थोडक्यात हा वर्ग कधी टॅक्स च्या स्लॅब मध्ये येऊ शकत नाही, या वर्गाच्या विशेष मागण्या देखील नसतात, पण सगळे जण यांच्याच नावाने गळे काढतात. निवडणूका आल्या की हे लोक त्यांचा नेता सांगेल त्याला शिक्का मारून मोकळे होतात, त्यामुळे तो देखील प्रश्न नाही. =================== आता दुसरा विषय येतो प्रगतीशील शेतकर्‍यांचा. माझ्या वडिलांनी स्वतः आमची शिक्षणे सुरू असताना फार वाईट दिवस पाहिले आहेत. स्वतः डॉक्टर असून. १. मारवा सर म्हणतात की टॅक्स भरायला लागले की लोक आपोआप अकाउंटंट ठेवायला लागतील. तसे नसते. शेती करणारे, जे शेतीमाल विकतात, मग तो कोणालाही असो, आडता किंवा किरकोळ ग्राहक, ते सर्वसामान्यपणे हिशोब ठेवतातच. त्यामुळे याला काही अर्थ नाही २. शेतीवर टॅक्स कठीण का आहे? आता मी काही उदाहरणे देतो १९९९ साली आमचे आंब्याचे तोपर्यंतचे विक्रमी उत्पादन झाले. २००० साली कमी. २००१ साली आम्ही पूर्ण नुकसानीत गेलो. कारणे काही असोत. त्यानंतर किमान ५ वर्षे आम्हाला त्यामधून उठायला लागली. सरकारने आम्हाला काय मदत केली? एकदा आम्हाला बहुधा ५००० रु. मिळाले, पण ते नुकसानाच्या प्रमाणात काहीच नव्हते. २००२ साली कोरफड लागवडीचा प्रयोग केला, तो फसला, पुन्हा एकदा नुकसानीत. २००४ साली पहिल्या वेळेस मोठ्या प्रमाणावर रिटेल विक्रीचा प्रयोग केला, त्यावर्षी पहिल्यांदा साधारणपणे १००००० पर्यंत नफा झाला. त्यानंतर आम्ही ती गिर्‍हाईके टिकवून हळूहळू व्यवसाय वाढवत नेला. म्हणजेच शेती हा नुकसानीचा व्यवसाय नसून फायद्याचा व्यवसाय आहे याचा अनुभव घेण्यासाठी आम्हाला तब्बल ६ वर्षे लागली. आम्ही कराच्या कक्षेत आता कुठे हळूहळू येउ लागलो, पण तरीही अजूनही मोठे झालेलो नाही. हे झाले मध्यमभूधारक लोकांचे. मोठ्या लोकांना हे प्रश्न येत नाहीत. कारण त्यांच्याकडे एखाद्याचा धंदा बसवण्याची क्षमता असते. असे समजा की तुम्ही वाशी मार्केटमधल्या एखाद्याला वर्षाला १०००० पेट्या पाठवता. तुमच्या १०००० पेट्यांवर तो सामान्यपणे २-३ लाख कमवतो (हा कमीत कमी आकडा आहे. आडते यापेक्षा जास्त कमवतात). असे जर का असेल, तर तुमच्यासारखा सप्लायर हातून निसटू देण्याइतका तो मूर्ख नसतो. म्हणजेच पैश्याकडे पैसा जातो. आता कराबद्दल - माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. १. जर मी माझा माल थेट ग्राहकाला विकत असेन, तर मी नेमके उत्पन्न किती मिळवले हे कसे ठरवणार? कारखानदारीमध्ये तुम्ही अमुक इतका कच्चा माल विकत घेतला, जो तुमच्या स्टोअर मध्ये नाहीये, म्हणजे तुम्ही तमुक एव्हढे उत्पादन घेतले असले पाहिजे, असे सांगता येते. इथे असा थंब रूल नाही. माझी विक्री ठरवण्याअचाअ एकच मार्ग आहे - तो म्हणजे मी स्वतः मान्य करणे. २. शेतमालाची विक्री करून बनणारा बराचसा पैसा तात्विक दृष्ट्या काळा पैसा असतो. मी दाखवला तर तो पांढरा होणार. नाहीतर मी त्या पैशाने बरेच व्यवहार करू शकतो. याला आळा घालायचा झाला तर तर सार्‍या शेतमालाच्या किरकोळ विक्रीवर पावती देण्याचे बंधन घालावे लागेल. जे होणे अत्यंत कठीण आहे. मला यामध्ये एक आशा दिसते की जेव्हढे शेतकरी क्रेडिटकार्डाच्या माधमातून व्यवहार करायला लागतील तेव्हढा हा हिशोब ठेवणे सोपे जाईल. ३. माझे नुकसान नेमके कसे मोजणार? माझे उत्पन्न - मी केलेला खर्च? (कदाचित शेती हा उद्योग म्हणून केला तर मग स्वतःला पण पगार काढून घ्यायची सवय लावून घ्यावी लागेल) ४. विम्याचे काय? समजा मी सेंद्रीय शेती करतो, त्यामूळे काही रासायनिक कीटकनाशिके मला वापरता येत नाहीत. काही कारणाने एक कीड अशी आली जिने माझ्या कीटकनाशकाला दाद दिली नाही. पण रासायनिक औषधांनी मात्र ती मरते. आता अश्या परिस्थितीत झालेल्या नुकसानाची जबाबदारी कोणाची? विमा कंपन्या आयुर्वेदिक औषधांचा खर्च देत नाहीत, किंवा गावठी उपचारांनी एखादा रुग्ण दगावला तर त्याचा विमा क्लेम देत नाहीत. याचे प्रमाणीकरण कोण करणार? ५. किरकोळ विक्रेते, किंवा आडत्यांवर कर लावून त्याला आयकर म्हणणे यासारखा भाबडेपणा दुसरा नाही. ६. समजा मी शेतीसाठी बैल वापरत असेन तर त्याचा घसारा कसा धरणार? त्याला कोणत्या कॅटेगरीत टाकणार? ६. शेतीचे १० लाख उत्पन्न म्हणजे १० लाखाचा माल खपला असे बर्‍याच वेळेस गृहीत धरले जाते. प्रत्यक्षात जेव्हा शेतकर्‍याच्या हातात १०लाख येतात तेव्हा त्यातले ५०% अगोदरच उधारीवर गेलेले असतात. उरलेल्या पैशातील काही तो स्वतःसाठी वापरतो, आणि काही तो पुन्हा शेतीमध्ये गुंतवतो. ही गुंतवणूक कशी मोजली जाईल? बाकी - जे लोक शेतीचे भरमसाठ उत्पन्न दाखवतात त्यांना कर लावावयास काहीच हरकत नाही. पण त्यांच्याच लॉबीमुळे सध्या हे होत नाहीये.
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 07/20/2016 - 15:23 नवीन
आपला विस्तृत विचारपुर्वक दिलेला प्रतिसाद मनापासुन आवडला. थोडक्यात हा वर्ग कधी टॅक्स च्या स्लॅब मध्ये येऊ शकत नाही, या वर्गाच्या विशेष मागण्या देखील नसतात, पण सगळे जण यांच्याच नावाने गळे काढतात. निवडणूका आल्या की हे लोक त्यांचा नेता सांगेल त्याला शिक्का मारून मोकळे होतात, त्यामुळे तो देखील प्रश्न नाही. इथे जो आपण पॅराग्राफ संपवलेला आहे. इथपर्यंत मॅटर क्लीअर आहे. बाकी संदर्भातील सविस्तर प्रतिसाद नंतर देतो. मात्र आपली भुमिका आपण थोडी स्पष्ट केलेली नाही असे वाटते. त्यासाठी १- जर उत्पन्न सिद्ध झाले तर शेतकरीने कर भरावा की नाही ? २- आपली अडचण उत्पन्न कसे मोजावे इथपर्यंतच मर्यादीत आहे की टॅक्स भरु नये अशी भुमिका आहे. थोड त्या संदर्भात मुद्दा भुमिका सुस्पष्ट मांडावी हि विनंती बाकी लाइव्ह स्टॉक संदर्भातील तरतुद मजजवळील व्ही के सिंघानीयाच्या पुस्तकात चेक करतो अडचण इतकीच आहे की ते ४ वर्षे जुन आहे तर अ‍ॅमेन्डमेंट झाली असेल तर कळणार नाही. मात्र मला आठवत त्यानुसार प्राण्याच्या पुर्ण किमंतीवर तो मेल्यानंतरच्या सांगाड्याची विकुन आलेली किंमत वजा करुन डिडक्शन नक्कीच अलाउड आहे तरी एकदा तरतुद बघावी लागेल. दुसरा भाग टी कॉफी रबर सारख्या केसेस मध्ये एक तरतुद आहे. टी डेव्हलपमेंट अकाउंट नावाने एक स्पेशल अकाउंट उघडता येतो इनकम टॅक्स अंतर्गत मग त्यावरील व्यवहारांवरुन काही वर्षांसाठी डिडक्शन ची तरतुद मिळते. वरील डांगे यांच्या डाळिंब संदर्भातही हा डेव्हलपमेंट अकाउंट चा पर्याय इतर कमॉडीटीज साठी वापरता येऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Wed, 07/20/2016 - 15:37 नवीन
एक व्यक्ती म्हणून मला कमीत कमी टॅक्स बसावा ही इच्छा आहे, पण एक नागरिक म्हणून शेतकर्‍यांना देखील टॅक्स बसला पाहिजे अशी भूमिका आहे. पण शेतकर्‍यांना टॅक्स लावणे हे व्यापारी-नोकरदारांना तॅक्स लावण्याईतके सोपे नाही हे देखील नमूद करावेसे वाटते. टॅक्सच्या नावाखाली गरीब्/मध्यम शेतकरी उगीचच नाडले जाऊ नयेत अशी भूमिका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
न
नाखु गुरुवार, 07/21/2016 - 07:47 नवीन
संतुलीत आणि मध्यम आणि अल्प भू धारक शेतकर्याम्चे नेमके वास्तव उलगडून सांगणारा प्रतिसाद आवडला.आणि तो थेट शेतकरी+व्यावसायीक अश्या दोन्ही भुमीकांमधून आलेला असल्याने त्याचे अस्सलप्ण जास्त खात्रीशीर आहे. याच प्रतिसादात व्यसनाधीतेबाबत उल्लेख आला आहे तोच मुद्दा सन २०१२-१३ च्या एका धाग्यात अल्यावर कसला गह्जब केला गेला होता ते आठवले. मुळात शेतकर्याला विशेषतः मध्य्मम आणि निम्न "व्यवसाय निपुण-व्य्वहारचतुर-नवीन शिकण्याची आस असलेला" बनविणे जास्त गरजेचे आहे. विविध खत कंपन्या आणि कृषी कीटक्नाशक कंपन्या त्यांना कायम ग्राहकच बनवतात (येथे बनवतात हे दोन्ही अर्थाने आहे ) हे डांगे सरांनी सोदाहरण दिले आहे. त्यांचे अनावश्यक अनुत्पादीत खरच कमी झाल्यास बचत होईल आणि त्याचा विनियोग अवजार सुधारणा,नवीन तंत्रज्ञान शिकण्यात वापरण्यात होऊ शकतो. सरसकट कराच्या वरवंट्यात घेऊ नये पण चार-चार गाड्या अंगभर सोने असलेल्या शेतकर्यालाही निव्वळ शेतकरी असल्याने तो कर भरत नाही (कर भरण्यास उत्तर्दायी नाही) असे होऊ नये. शहरी फक्त ग्राहक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
भ
भीमराव Wed, 07/20/2016 - 15:59 नवीन
शेतकरी हे एक व्यक्ती म्हणुन धरायच का कुटुंब म्हणुन? एकट्याने करु म्हणुन शेती होत नसती, तिथ सगळे कुटुंब राबावे लागते. त्यामुळे मिळालेले उत्पन्न वजा खर्च यांमधे सहभागधारकांची संख्या यांचा ही विचार करणे गरजेचे असेल.
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 07/20/2016 - 16:33 नवीन
जमीन जर ४ जणांच्या मालकीची आहे. तर त्यापासुन काढलेले एकुण उत्पन्न त्या ४ जणांच्यात विभागले जाते. आदुबाळ सर बरोबर का ? १० लाखाचे उत्पन्न निघाले तर प्रत्येकाचे २.५० लाख. आता एरीया होल्डींग समान गृहीत धरलेली आहे. एरीया असमान असेल तर मला माहीत नाही. इथे कन्फ्युजन आहे. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 07/20/2016 - 16:43 नवीन
नक्की माहीत नाही, पण लॉजिकल वाटतं आहे. माझ्या मते बाबुदादांचा प्रश्न थोडा वेगळा आहे. समजा, एका शेताचा कागदोपत्री मालक श्री. बबन विजू चोंधे आहे. शेतीच्या प्रत्यक्ष कामात सौ. आरती बबन चोंधे, त्यांचा मुलगा कु. किशोर बबन चोंधे, विधवा आई गं. भा. सत्यभामा विजू चोंधे आणि निराधार मामा श्री. मोहन केरबा हल्याळ एवढे सगळे राबतात. तर खर्चामध्ये फक्त श्री. बबन यांची 'नोशनल लेबर कॉस्ट' पकडून चालणार नाही. आरती, किशोर, सत्यभामा आणि मोहन या सगळ्यांची कॉस्ट धरायला लागेल. ________ अवांतरः मला 'सर' म्हणू नका. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
अ
अभ्या.. Wed, 07/20/2016 - 20:13 नवीन
आणि नुसती वन पर्सन 8 अवर्स अशीही रोहयो स्टाइल धरून उपयोग नाही. बबनराव छाट कलमात आणि फवारणीत एक्स्पर्ट असतील. मिसेस चोंधे स्वतः निंदणी करत इतर बायावर सुपरव्हीजन करत असतील. बारके चोंधे शेतात राबत नसतील जास्त पण मोटर अन ट्रॅक्टर रिपेअर तेच पाहत असतील. मामा कष्ट करत असेल पण त्याचा इकॉनॉमिक वाटा आश्रयापोटी घेतच नसेल. अशा सर्व क्रिटिकल हिशोबाना एका साचत, निदान कुशल अर्धकुशल अकुशल अशा साचात बसवणे सोपे नाही. निदान हापिसात पदे आणि वेतनप्रणाली असते त्याप्रमाणे तर नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मारवा Wed, 07/20/2016 - 16:52 नवीन
मांडणीतुन दिसणारा तुमचा सेन्स ऑफ ह्युमर भारीच आहे. तुमचा मुड लागलाय म्हणून अजुन एक प्रश्न विचारुनच घेतो आता शेतकरी कर भरणार का विचारणा केल्यावर सर्वात जास्त प्रश्न कसे कॅलक्युलेट करायचे कसे व्हॅल्युएशन करायचे हा प्रश्न सातत्य्याने येतो. आश्चर्य म्हणजे आजपर्यंत आयकर विवरणपत्रांमध्ये जे इतक रेकॉर्ड अ‍ॅग्रीकल्चरल इनकम दाखवण्यात आलेल आहे. जे जीडीपीच्या ही कित्येक पटीने जास्त आहे. तर ते जे हे आजवर आयकर विवरण पत्रांमध्ये अ‍ॅग्रीकल्चरल इनकम स्वतःहुन दाखवण्यात आलेल आहे. ते नेमक कस दाखवण्यात आल मग. अनेकांनी यात चोरी केलेली आहे हे गृहीत धरल तरी. एक फॉर्मली ते प्रेझेंट करण्यात आलेलच आहे ना. यात कुठला मार्ग वापरण्यात आला कुठल्या रीतीने रीसीट्स दाखवण्यात आल्या कुठले ख्रर्च डिड्कश्न क्लेम करण्यात व मंजुर करण्यात आलेत ? याचा तर विदा नक्कीच उपलब्ध असणार ना ? मग आपण आजच नविन सुरुवात केल्यासारखे सर्व जण का बोलतात ? आजवर जे कोट्यवधीचे अ‍ॅग्रीकल्चर इनकम दाखवण्यात आले ते नेमके कसे दाखवण्यात आले याचा आश्चर्य म्हणजे कधीच विचार बहुधा केला गेलेला दिसत नाही. सर्वात महत्वाच आता सुरु आहे पण अगोदर बहुधा कधीच अ‍ॅग्रीकल्चर इनकम जरी १ करोड च्या वर दाखवल गेल तरी डिपार्ट्मेंटने मग भलतीच ढिलाइ बरतलेली दिसतेय या संदर्भात. नसता मग केसेस झाल्या असत्या डिड्क्शन चॅलेंज केली गेली असती, बैलाच्या घसार्‍याचा प्रश्न मार्गी लागला असता. म्हणजे या बाबी सेट झालेल्या असत्या. व कोणाला फारशा शंका आल्या नसत्या. म्हणजे असे काही झालेले दिसत नाही. म्हणजेच आजपर्यतंचे अ‍ॅग्रीकल्चरल इनकम जे दाखवण्यात आलेले आहे ते कीती संशयास्पद पोकळ फ्रॉड गडबड आहे याचा एक अंदाज बांधता येतो.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 07/20/2016 - 17:41 नवीन
मारवा'जी, फार सोप्या गोष्टींना उगाच किचकट करुन उपयोग नसतो हो. १. १ करोड इन्कम म्हणजे 'निव्वळ नफा की रेव्हेन्यू कि टर्नओवर' हे कसं डिफाईन होईल? किंबहुना आजवर ज्याही शेतकर्‍याने हे दाखवलं त्याने त्याच्या अगेन्स्ट खर्च दाखवलेत का? डाळींबाचंच उदाहरण परत घेतो. एका झाडाला दिडशे फळं लागतात. एका फळाचे वजन सुमारे चारशे ग्राम. ऐंशी रुपये किलो भावाने सुमारे हजार झाडांची फळे विकली तर शेतकर्‍याला व्यापारी रोख देईल वा चेक देईल. व्यापारी जर एक्स्पोर्ट वाला असेल तर तो चेकच देईल कारण ह्या आंतरराष्ट्रीय उलाढालीवर (जी काळापैशावर सहसा चालत नाही) त्याला कर भरायला लागेल तो इनवर्ड व आउटवर्ड मधला फरक 'आपला नफा' म्हणजे उत्पन्न दाखवण्यासाठी करेन. आता माझ्या हजार झाडांपासून मिळालेल्या फळांचे व्यापार्‍याने मला ४८ लाख चेकद्वारे पेमेंट केले. ते फटकन माझ्या बॅन्कस्टेटमेंट मधे दिसतंय. पण ते ४८ लाख मिळवतांना मला जो खर्च समजा ३० लाख आलाय ज्याच्या पावत्या मिळू शकतात. पण मजुरी, घरच्यांचे श्रम, लहान-सहान बाबी, नुकसान-दगा-फटका, इत्यादी ह्यांचे हिशोब राहत नाहीत. त्यामुळे नक्की माझे स्वतःचे एकट्याचे निव्वळ उत्पन्न किती हे समजून येणारच नाही. ह्यावर काटेकोरपणे हिशोब ठेवणे, ताळेबंद मांडणे, आयकर विवरण भरणे हाच उपाय आहे. सोबत शेतीसंबंधी करविवरण भरतांना शेतीवर प्रत्यक्ष आधारित अभ्यास हवा. अर्थशास्त्राचे आर्मचेअर तज्ञ नकोत किंवा निव्वळ बॅलन्सशीट टॅली करणारे सीए नकोत. उद्योग वा नोकरी ह्यापेक्षा वेगळी व्याख्या व कॅटेगीरी स्वतंत्रपणे शेतीच्या व्यवहारांना असावी असे माझे मत आहे. ह्या संबंधी अजून चर्चेत तसे मुद्दे आलेले दिसले नाही. आदूबाळ, अनुप ढेरे यांच्याकडून ह्याविषयावर यथाशक्ती प्रतिसाद अपेक्षित आहे. २. तुमच्या लेखातून व प्रतिसादांतून वारंवार दोलायमान भूमिका दिसते आहे. एकिकडे तुम्ही शेतकर्‍यांना कराच्या कचाट्यात आणा ह्यावर ठाम आहात, त्याबद्दल विरोधी मत मांडले की श्रीमंत शेतकर्‍यांनी आयकर भरायला हरकत आहे का असा दुसराच प्रश्न विचारत आहात. मार्मिक गोडसेंनी दुसर्‍या धागा काढण्याबद्दल जे म्हटलंय ते योग्यच आहे. एकतर तुम्ही आयकरावर चर्चा करा अथवा शेतकर्‍यांच्या उत्पन्न-खर्च व्यवस्थापन व सादरीकरणावर चर्चा करा. एकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसर्‍याला निशाणा बनवणे माझे मते योग्य नाही. संतुलित व गंभीर चर्चेच्या अनुषंगाने असे अंडरकरंट (तेही किमान प्रत्यक्ष अभ्यासाशिवायचे - संदर्भही ह्याने हे म्हटले त्याने ते म्हटले छाप) चर्चाप्रस्ताव आणणार्‍याच्या मूळ उद्देशाला संशयाच्या परिघात उभं करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
अ
अनुप ढेरे Wed, 07/20/2016 - 17:48 नवीन
आदूबाळ, अनुप ढेरे
अंकल, मी अर्थशास्त्री नाही. किंबहुना वाणिज्य पदवीधरपण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 07/20/2016 - 19:29 नवीन
अहो विचारांवरुन कळतंय... अर्थशास्त्री वा वाणिज्यपदवीधर असायची गरज नाही. तार्कीक मांडणी उत्तम असते तुमची. आणि रच्याकने, मी ही अंकल नाही. =)) (स्वगतः वजन कमी करायचं मनावर घ्या, डांगेसाहेब, लोक तुम्हाला अंकल क्याटेगिरीत टाकायलेत ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
आ
आदूबाळ Wed, 07/20/2016 - 17:51 नवीन
उद्योग वा नोकरी ह्यापेक्षा वेगळी व्याख्या व कॅटेगीरी स्वतंत्रपणे शेतीच्या व्यवहारांना असावी असे माझे मत आहे. ह्या संबंधी अजून चर्चेत तसे मुद्दे आलेले दिसले नाही.
सहमत आहे. इथे का ऐसीवर ते आठवत नाही, पण एका प्रतिसादात मी म्हणालो होतो की शेतीला आयकराच्या आहे त्या चड्डीत बसवून भागणार नाही. नवी चड्डी शिवावी लागेल. आणि ती नवी चड्डी शिवताना "लेव्ही डिझाईन"चा विचार करावा लागेल (म्हणजे कमीत कमी त्रासात योग्य टॅक्स कसा कलेक्ट करावा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 07/20/2016 - 19:32 नवीन
नवी चड्डी >> हेच अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मोदक Wed, 07/20/2016 - 19:53 नवीन
मी जर चुकून कधी एखाद्या सरकारी खात्यात महत्वाच्या पदाला गेलो तर तुम्हा दोघांना पळवून नेईन, एखाद्या रिसॉर्टमध्ये आठवडाभर कोंडून ठेवेन आणि अशा अनेक विषयांवर फुल प्रूफ प्लॅन बनवून घेईन. ते सोन्याबापुंना पळवायचे अवघड आहे, तो पण प्रयत्न करेनच. एक नंबर चर्चा सुरू आहे राव, दंडवत स्वीकारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मारवा गुरुवार, 07/21/2016 - 07:19 नवीन
संदीपजी माझा प्रस्ताव ऐकुन घ्या जरा. हे बघा मी एक काम करतो मी खाली बसतो शांतपणे शहाण्या विद्यार्थ्यासारखा गुपचुप. मी एकही प्रतिसाद न देता केवळ वाचन करतो. म्हणजे माझ्या वेड्यावाकड्या प्रतिसादांनी तुम्ही इरीटेट होऊन तुमचा मुड जाणार नाही तुमची लिंक लागेल. बैठक जमेल. तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे सर्व मिसळपावतर्फे तुम्ही आता मला बाजुला टाका. चर्चा महत्वाची आहे प्रस्तावक अजिबात नाही. तुम्हाला डाळींब च्या शेतीविषयक जवळून सखोल अनुभव आहे. त्याचा आम्हास फायदा द्या. तर एक करा डाळींब शेती ची एक रीअल तुमच्या माहीतीत असलेली किंवा इमॅजीनरी केस स्टडी द्या. उदा. रमेश नावाचा नाशकातील एक शेतकरी १० एकर शेतजमीनीवर अमुक अमुक इतकी रोपे २०११ च्या जुन मध्ये लावतो. पहीली तीन वर्षे अशी अशी वाढ होते असा असा खर्च येतो. दर वर्षाअखेर तो हिशेबाला बसतो तेव्हा त्याला इतका इतका खर्च या या बाबींवर झालेला दिसतो. मग अमुक अमुक वर्षी त्याचा पहीला लॉट मार्केट ला विक्रीस येतो तिथे तो इतके इतके कमिशन गाडी भाडे मोजतो. मग तो वर्षअखेर हिशेबाला बसतो असा असा त्याचा प्रॉफिट अ‍ॅन्ड लॉस अकाउंट दिसतो. आता या व्यवसायात तरी किमान सर्व घटक अनुकुल असले तर ५ लाख वार्षिक निव्वळ नफा होऊ शकतो की नाही वा जास्त होतो की कमी होतो काय होतो जे असेल तुमचे मत ते सांगा, व सर्वात महत्वाच अ‍ॅसेसींग ऑफीसर कुठले खर्च मान्य करेल कुठले नाही कुठल्या खर्चांचा हिशेब डाक्युमेंटरी प्रुफ ठेवणे रमेश ला शक्य आहे. कुठला त्याचा खरा खर्च रीजेक्ट केला जाऊ शकतो. रमेश सर्वसाधारण १२ वी पास कमी शिक्षीत ग्रॅज्युएट आहे असे धरुन चला. तर रमेश ची डाळींबशेती लागवडीपासुन स्टार्ट टु एन्ड ग्रो करुन ते बागेचे जे काही वर्षांची आयुष्य असते ते दाखवुन थोड विष्लेषण करुन दाखवा. तुम्हालाही मान्य आहे की मोठा शेतकरीने कर भरला पाहीजे. त्यात व्हॅल्युएशन च्या कॉम्प्युटेशन च्या अडचणी आहेत असे तुम्ही म्हणता. शेती व्यवसायाचे स्वरुप इतर पेक्षा अत्यंत भिन्न आहे असे तुमचे म्हणणे आहे. तर ते कसे भिन्न आहे कसे त्यावर टॅक्स लावण्यात अडचणी आहेत ते रमेश च्या केस स्ट्डीने उलगडा करुन विश्लेषण करुन दाखवा व शेवटी दोन महत्वाच्या गोष्टी १- त्यावर जमेल तसा उपायही सुचवावा ही विनंती की जर टॅक्स लावायचा आहे तर कसा लावणे योग्य ठरेल काय उपाय्योजना करता येतील. २- तुमच्या अनुभवाने आलेले विश्लेषण महत्वाचे आहे चर्चा पुढे जाणे महत्वाचे आहे. मी माझ्या बाजुने इमानदारीने गप खाली बसतो. मी एकही प्रतिसाद देत नाही, मला तुमचे विश्लेषण समजुन घेण्यात प्रामाणिक रस आहे. आता तुम्ही अजुन भाव न खाता, मला बाजुला टाका व चर्चेवर लक्ष केंद्रीत करुन विश्लेषण तुम्हाला जसे आवडेल तसे करुन दाखवावे. आपला अ‍ॅन इटर्नल स्टुडंट सिंड्रोम ग्रस्त मारवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 07/21/2016 - 07:44 नवीन
Please do not take my comments personally, I neither like bullying nor I do it. I Will provide detail account and analysis of pomo-grape farming in new article soon. We all can discuss there casewise.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
संदीप डांगे गुरुवार, 07/21/2016 - 07:46 नवीन
One more thing, I am not good at taxation. So forgive for any of my ignorance
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
आ
आदूबाळ Wed, 07/20/2016 - 17:47 नवीन
हम्म. विवरणपत्रांमध्ये दाखवलेलं अ‍ॅग्री इन्कम ही निव्वळ धूळफेक आहे असं माझं मत आहे. हे सिनारियो बघा: सिना० १: अ‍ॅग्री इन्कम (>) नॉन-अ‍ॅग्री इन्कम सिना० २: अ‍ॅग्री इन्कम (≈) नॉन-अ‍ॅग्री इन्कम सिना० ३: अ‍ॅग्री इन्कम (<) नॉन-अ‍ॅग्री इन्कम या तिन्ही सिनारियोमध्ये करदात्याने अ‍ॅग्री इन्कम दाखवल्यास त्याचा टॅक्सरेट वाढेल**. मग कोणता शहाणा स्वतःहून हे विवरणपत्रात दाखवेल? त्यामुळे भरपूर अ‍ॅग्री इन्कम दाखवणारे लोक हा ऑटोमॅटिक रेड फ्लॅग असला पाहिजे. पण ती धेंडं बडी असल्याने ऑफिसरवरही दबाव येत असावा. _______________ **हां - काही सिचुएशनमध्ये अ‍ॅग्री इन्कम दाखवून न दाखवून रेटमध्ये काहीच फरक पडणार नाही (उदा. इतर इन्कममुळे ऑलरेडी सर्वात वरची ब्रॅकेट पडली आहे, किंवा इतर हेड्सखालचा लॉस / ब्रॉट फॉर्वर्ड लॉस भरपूर आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
क
कपिलमुनी Wed, 07/20/2016 - 17:20 नवीन
शेती या विशयावर वाचलेला सर्वात चांगला धागा आणि चांगली चर्चा
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 07/20/2016 - 19:09 नवीन
धागा आवडला आणि चर्चाही.
  • Log in or register to post comments
ल
लिओ Wed, 07/20/2016 - 19:29 नवीन
मारवा जी विजय माल्ल्या सम्बधित प्रश्नाची उत्तरे दिलीत आभारी आहे. कालच्या प्रतिसादात माझे काहि मुद्दे मी नीट लिहिले नव्हते. आज लिहित आहे. मुद्दा १

माणसाच्या मुलभुत गरजा अन्न वस्त्र निवारा यातील अन्न वस्त्र या मुलभुत गरजेस शेतकरी झगडतो

अन्न वस्त्र या गरजेस शेतकरी झगडतो तो फ॑क्त स्वत:साठी ????? बाकि भारतीय जे अन्न खातात, कपडे घालतात यात शेतकरी त्याचे योगदान देतो ना. मुलभुत गरजेतील शेतकर्याचे योगदान विसरायचे का ?? मुद्दा २

आजकल लोक भरलेल्या कराचा हिशोब मागत आहे.

माझे हे वाक्य वेगळ्या प्रकारे लिहितो. आजकल लोक भरलेल्या कराचा जाब/हिशोब विचारत आहेत. एक मतप्रवाह असा आहे कि ( खासकरुन अनिवासी भारतीय ) आम्हि अमुक तमुक टक्के जास्त कर परदेशात भरतो. ज्याचा परतावा चान्गल्या "पायाभुत सुविधा" जसे रस्ते ,मस्त सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, सामाजिक सुरक्षा, दुरसन्चार या रुपाने परतावा म्हणुन मिळते. जर शेतकरी कर कक्षेत आणले तर महसुल जास्त मिळेल यात शन्का नाहि.
जर तर च्या भाषेत एका काल्पनिक परिस्थिती लिहितो त्यावर तुम्हि भाष्य करा.
शेतकरी कर भरत आहे, अगदी चुपचाप काही चकार न बोलता. दोन वर्षे सलग दुष्काळ आहे. सलग दोन वर्षानन्तर अन्नधान्य उत्पाद्न ३०% ते ४०% घसरले आहे. तिसर्या वर्षाच्या सुरवातीला फक्त गोळा केलेला कर रुपी / महसुल रुपी पैसा सर्व भारतीय जनतेस (१००% जनतेस अगदी शेतकर्यासहित ) अन्न धान्य उपलब्ध करुन देईल का ( ईथे तुमचे डिमांड सप्लाय फोर्सेस लागु करण्याची हिम्मत दाखवा.) ????? या परिस्थितीत माणसाच्या मुलभुत गरजा अन्न वस्त्र निवारा यातील अन्न वस्त्र या मुलभुत गरजेस शेतकरी झगडतो म्हणुन त्याला बाजुला सारुन नियोजन केले जाइल व शेतकरी कर भरतो त्याच्याकडे शेती आहे, फुकटचे बियाणे आहे म्हणुन त्याने भरलेल्या कराचा जाब/हिशोब विचारु नये अशी तुमची अपेक्षा ?????
तात्पर्य असे कि बदलते जागतिक राजकारण , बदलते हवामान , वाढणारी लोकसंख्या यात शेतीतुन अन्नधान्य उत्पाद्नात स्वयपुर्णता करणे हे मोठे आव्हान आहे, कर गोळा करुन महसुल वाढवणे हे आव्हान नाही.
या तात्पर्यावर आणखी थोडे लिहितो तुमचा प्रतिसाद वाचायला आवडेल. यावर तुम्ही काहिच लिहिले नाही. वाढणारी लोकसंख्या खाणारी तोन्डे वाढवणार त्याचे नियोजन महसुल कसे करेल ? बदलते हवामान हाताशी आलेली पिके / उत्पन्न घालवत आहेत त्याची भरपाई महसुल कसा करेल त्याचे परिणाम काय तुम्हीच विश्लेशण करा ( बेल आउट पेकेज )? बदलते जागतिक राजकारण अमेरीकेत अन्नधान्य महागले म्हणुन अमेरिकन अध्यक्ष महोदय भारतीय जनतेची वाढलेली भुक व भारतीय जनतेची अन्न धान्याची नासाडी करण्याची सवयीकडे बोट करुन रिकामे झाले. "अन्नधान्य उत्पाद्नात स्वयपुर्णता करणे" व "कर गोळा करुन महसुल वाढवणे" याच्या गरजेवर तुम्हि लिहा वाचायला आवडेल. लोभ असावा
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 07/20/2016 - 21:39 नवीन
शेतकरी असण्याची अट काढून देशातील कोणत्याही नागरिकाला शेती करण्याची परवानगी दिली व आता आहे त्याच सवलती कायम ठेवल्यास शेती उत्पन्नावर आयकर लावण्याच्या बाबतीत मारवाजी तुम्ही एव्हडेच आग्रही रहाल का?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 07/20/2016 - 21:42 नवीन
मला प्रश्न नीट समजला नाही. कृपया मुद्दा अधीक स्पष्ट कराल काय? म्हणजे असे केल्याने तुमच्यामते नक्की काय काय होऊ शकतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मारवा Sun, 04/30/2017 - 11:26 नवीन
नुकतेच निती आयोगा चे सदस्य विवेक ओबेरॅाय आणि चीफ इकॅानाॅमीक ॲडव्हायजर अरविंद सुब्रमणीयन यांनी ॲग्री. टॅक्स संदर्भात सकारात्मक व धाडसी भुमिका घेतलेली आहे. श्रीमंत शेतकरी तरी कीमान जबाबदार होणार कर भरणार अंधुक का होइना न्याया ची आशा तर निर्माण झाली. संबंधित. बातमीच्या लिंक्स http://timesofindia.indiatimes.com/india/states-need-to-distinguish-between-rich-and-poor-farmers-cea/articleshow/58419090.cms http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/niti-aayog-backs-tax-on-agriculture-income/articleshow/58370585.cms
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 09/08/2025 - 03:53 नवीन
स्व धागा जाहिरात म्हणा पण ट्रम्प tarriff संदर्भात मोदी सरकारने जी नांगी टाकलेली आहे. त्या.संदर्भात हा धागा relevant आहे म्हणून वर काढला. अगोदर दिल्लीत शेतकरी आंदोलनं झाल्यावर मोदी सरकारने शेतकरी कायदे संदर्भात माघार घेतली. आता तर अमेरिकेला शेती आणि डेअरी ओपन करण्यास विरोध करून शेतकऱ्यांचे चक्क "लांगुलचालन" केले. कशासाठी अर्थातच सत्तेसाठी पण कौतुक काही झाले नाही.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 09/08/2025 - 08:48 नवीन
शेत उत्पन्नावर कर लागणे मुश्किल ही नही नामुमकिन है. असे माझे ठाम मत आहे. मोठा शेतकर्याला कर माफी व गरिब छोट्या शेतकर्याला उत्पन्न नाही. यावर वेगळा लेख पाडल्यास शतायुषी नक्कीच होणार.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 09/08/2025 - 08:54 नवीन
सबसिडी कर्जमाफी बंद करा. शेती उत्पन्नावर कर म्हणजे,आवघड जागी दुखणं आणी जावई बापू वैद्य.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा