रे गझलाकारा, आवर तुझे दुकान...
गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे... गोड मानून घ्यावी.
***********************
तुमचे शेतकरी नेते, तुमच्याच तोंडास पुसती पाने | दोष सगळे मात्र, असंवेदनशील शहरी लोकांचे |
शेतीतून मंत्र्यास होती, कोटींचा फायदा | तुला नाही वावडे, अशा दांभिकपणाचे |
रे गझलाकारा, आवर तुझे दुकान | गेले ते दिवस, फुकट सहानुभुती मिळवण्याचे ||
खोटी माहिती, खोट्या समजुती | खोट्या आकडेवारीची पिकेही खोटी |
कितीक सल्ले मिळाले, कान कितीकदा टोचले | एकसुरी अभंग गझला गातोस, अरण्यरूदनाचे |
रे गझलाकारा, आवर तुझे दुकान | गेले ते दिवस, दुसर्याच्या कानांना बिडी लावण्याचे ||
मिपाकर शेतकरी, कितीकदा रोखठोक लिहिती | काय उपयोग तुझ्या, बंद झापडांचे |
अनेक शंका अनेक सल्ले, नाकारूनी सगळे | एकच भजन गातोस, अन्याय-रडगाण्याचे |
रे गझलाकारा, आवर तुझे दुकान | गेले ते दिवस, नक्राश्रू ढाळण्याचे ||
शब्द फिरवलेस कितीकदा, कितीकदा टाळलीस उत्तरे | सांग लुटारू कशी काय, सगळीच सरकारे |
चर्चा कर थोडी, वाच मते इतरांची | मीच मसीहा शेतकर्यांचा, फुका अहंभाव कशासाठी? |
रे गझलाकारा, आवर तुझे दुकान | गेले ते दिवस, हवेत तडका मारण्याचे ||
हिवरे बाजार , सुभाष पाळेकर आणि आनंद कर्वे | ध्येयवेढे शेतकरी मंगळवेढ्याचे |
क्रांतीकारक प्रकल्पांची, घे मनापासून दखल | सोड काम आता काळे चित्र रंगवण्याचे |
रे गझलाकारा उघड तुझे दुकान | कौतुक तरी कर अशा अनेक महामानवांचे ||
शिवार होतेय जलयुक्त, अडते चालले उंबर्याबाहेर | धडक विहीरी आणि वेळेवर सबसिडी |
बदल घडत आहेत, ठेव यावर विश्वास | मिळेल शेतकर्याला, खरेखुरे 'अभय' |
रे गझलाकारा उघड तुझे दुकान | खर्याखुर्या बदलांच्या कवितेचे ||
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में हुं शुरली, बच जरा...ठा ठा ठा... ;) :- Fiker Not