Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी बी बियर बार काढीन म्हणतो : सामान्य मानव

म — मुक्त विहारि, Wed, 07/20/2016 - 08:21
हजारांच्या नोटेची चमक पाहीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! बियरला रास्त भाव भेटला काय, न भेटला काय पिणार्‍यांच्या मनांत असल्या भूक्कड गोष्टी येतच नाय मी पण थोडे फार कमवीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! पिणार्‍यांना नशा चढली काय, न चढली काय पिणार्‍यांना भरपुर रिचवायची सवयच हाय मी पण थोडे फार कमवीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! अन्नाचे भाव आणि दूधाचे भाव वाढले काय, अन चकण्याचे भाव पण वाढले काय या पिणार्‍यांना उपजत अक्कलच नाय बियरच्या साथीने वाईन पण विकीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! बियर विकून सत्तेत येता येते बियर पिणार्‍यांना उधार देणारा खड्ड्यामधी जाते बियर पिणार्‍याचे नाव फक्त कागदोपत्री घ्यावे बियर शॉपीचे, वाईन शॉप झाले की भाव अजुन वाढवावे सतत भाव वाढ करतच रहावे तरच मिळतो भरपूर मलिदा "चियर्स" करून बियर वर बियर पिऊ! आणि म्हणू... मदिराक्षीचा विजय असो....!!!

प्रतिक्रिया द्या
17607 वाचन

💬 प्रतिसाद (64)
म
माझीही शॅम्पेन Wed, 07/20/2016 - 08:23 नवीन
मी पहिला , भन्नाट विडंबन :) मुवि रॉक्स
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 08:41 नवीन
कधी बियर बार काढलाच तर... तुम्हाला आमच्या तर्फे किंगफिशरचे कॅलेंडर फ्री (पण त्याच बरोबर एक क्रेट बियर मात्र विकत घेणे कंप्लसरी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
म
माझीही शॅम्पेन Wed, 07/20/2016 - 08:25 नवीन
तुम्ही बियर बार काढाच आम्ही आमची शॅम्पेन बाजूला ठेवून नक्की येऊ :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 08:43 नवीन
बियर में जो मज्जा है जो शँपेन में कहां है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
ट
टवाळ कार्टा Wed, 07/20/2016 - 08:28 नवीन
आयला =))
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 07/20/2016 - 08:34 नवीन
लोकं ""फ्रेश"" झाली बगा भारी जमलंय
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 08:48 नवीन
तुमचा पत्ता द्या. घरी येवून बियर देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ब
बेकार तरुण Wed, 07/20/2016 - 08:54 नवीन
तुमच्याच बार मधे बीयर पीत पत्ते खेळु :) बेस्ट जमलं आहे हे काव्य (प्रतिसादात काव्याविषयी एक ओळ तरि लिहिली आहे, सो मला झब्बु देउ नका पत्ते खेळताना)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 09:03 नवीन
मदिरेच्या संगे "रमी"च खुलते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेकार तरुण
ब
बेकार तरुण Wed, 07/20/2016 - 09:06 नवीन
कवितेसंबंधीत प्रतिसाद नसल्याने (मी धागाकर्ता नसलो तरी) माझा पास :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
सामान्य वाचक Wed, 07/20/2016 - 08:37 नवीन
मारता का काय बाकी कविता भारी अवांतर : विडंबन असे म्हणून परत कुणाचा रोष पत्कारायला नको म्हणून कविता
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 08:53 नवीन
आमची "कविता" नहमीच भारी असते. कृपया आमच्या "कविते" बद्दल काही बोलू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
ग
गंम्बा Wed, 07/20/2016 - 08:45 नवीन
शेतकर्‍यांना तुमच्या बार मधे डीस्काऊंट मिळणार की नाही ते सांगा आधी...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 08:50 नवीन
अट फक्त एकच, त्यांनी इन्कम टॅक्स भरल्याची पावती दाखवायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/20/2016 - 09:07 नवीन
आरारारारा! =)) मुटे परेंत मारणार अता लोक!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/20/2016 - 09:15 नवीन
कविता --आय माय स्वारी -- मला त्यातील "क"सुद्धा कळत नाही म्हणून विडंबन म्हणतो विडंबन छान आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Wed, 07/20/2016 - 09:17 नवीन
तुमच्या बारचा पत्ता द्या. ५००-६०० पानी आमंत्रण पत्रिका चापून देईन म्हणतो. प्रवासखर्च पाठवून द्या. आणि हो, आम्ही तिकडे आल्यावर कटोर्‍यात बिअर पाजलीत तरी चालेल.
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज Wed, 07/20/2016 - 09:39 नवीन
ठ्ठो !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
न
नाखु Wed, 07/20/2016 - 11:26 नवीन
कटोरा आधी तपासून घेणे, नंतर त्याला खालून छिद्र होते ही तक्रार चालणार नाही.. सहाय्यक व्य्वस्थापक मुवी आर्य बीअर मदीरा मंडळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
म
माम्लेदारचा पन्खा Wed, 07/20/2016 - 10:08 नवीन
मात्र बियर विका तरच नोट दिसेल !
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 07/20/2016 - 10:53 नवीन
Aso. Shetipeksha beer madhe paisaa jaast aahe. =))
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 13:02 नवीन
+ १ पण नुसत्या बियर शॉपीत जास्त पैसा नाही, त्याच्या बरोबर वाईन शॉप पण हवेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Wed, 07/20/2016 - 14:24 नवीन
शेजारी हॉटेल पण टाका..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
स्वच्छंदी_मनोज Wed, 07/20/2016 - 15:26 नवीन
आणी टाकलेत की आम्हाला पत्ता द्या :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 15:37 नवीन
आयला, कुठे कुठे धागाकर्ते पत्ते मागतात, तर आमच्या बारचे आणि त्या अनुशंगाने असणार्‍या बर्‍याच गोष्टींचे पत्ते, वाचकांना हवे आहेत. बार, हॉटेल आणि पानाची टपरी उघडले की लगेच पत्ता देतो. बादवे, पानाची टपरी हा एकदम मस्त धंदा आहे. ओन्ली इन्कम, नो इन्कम टॅक्स. शेतीचा व्यवसाय नसता केला तर, पानाची टपरी टाकायचाच विचार होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
म
मोदक Wed, 07/20/2016 - 15:48 नवीन
पानाची टपरी टाकायचाच विचार होता. कुठे? पत्ता द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 15:56 नवीन
टिळकनगर शाळे जवळ. सध्या त्या भागांत एक पण पान-टपरी नाही. तुमचा पत्ता न मागता, आम्ही पत्ता दिलेला आहे. ह्याची जरा नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/20/2016 - 19:04 नवीन
शेतीत पानमळा करा आणि पानाची टपरी पण टाका... अपवर्ड आणि डाऊनवर्ड इंटिग्रेशन होईल, हाकानाका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ज
जावई Wed, 07/20/2016 - 14:15 नवीन
बिअरची चव चाखून पाहीन म्हणतो.. म्यापण दारु प्यायला शिकावं म्हणतो..! बाई,बाटली..अन् मटणाची ताटली..यांच्या नादी लागावं म्हणतो! म्यापण दारु प्यायला शिकावं म्हणतो...!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 14:36 नवीन
मादक गोष्टींपासून जितके दूर राहता येईल तितके रहा. (ह्या विडंबनांत मुद्दामच "मादक" पदार्थ वापरला आहे. सत्तेचे आणि पैशाचे व्यसन ह्या अशा मादक गोष्टीं पेक्षा जास्त हानीकारक असते. जमल्यास "वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट" हा सिनेमा किंवा गेला बाजार आपला "सामना" हा सिनेमा बघीतलात तर मी "बियर"चा उल्लेख का केला ते समजेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जावई
ट
टवाळ कार्टा Wed, 07/20/2016 - 14:41 नवीन
आणि त्यांचे सासरेबुआ रागवले तर??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 15:22 नवीन
मिया बिबी राज़ी, तो क्या करेंगे पापाज़ी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 07/20/2016 - 15:38 नवीन
"मादक गोष्टींपासून जितके दूर राहता येईल तितके रहा." यासाठी लिहिलेले ते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 15:44 नवीन
ह्यासाठी हे अजून एक उदाहरण मिळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
स्वामी संकेतानंद Wed, 07/20/2016 - 16:11 नवीन
'मोदक' पोस्टींपासून जितके दूर राहता येईल तितके दूर राहा, असेही म्हणता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 16:27 नवीन
...अजिबात नाही. आम्हाला गूळ-खोबरे घातलेले, उकडीचे मोदक आवडत नाहीत. पण हे मिपाचे "मोदक" आणि "खिमा-मोदक" आवडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
सूड Wed, 07/20/2016 - 16:30 नवीन
उकडीचे मोदक आवडत नाहीत.
आता कधी कट्टा ठरला तर मेनु ठरवायला बरं!! अजून कोणाकोणाला आवडत नाहीत पटापट सांगा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 16:35 नवीन
तुम एक बार, खिमा-मोदक खाऊन देखना, ये गूळ-खोबरेवाला मोदक भूल जायेंगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
स्वामी संकेतानंद Wed, 07/20/2016 - 16:38 नवीन
मायला! हा माणूस बाटवणार आम्हाला! ( प्रामाणिक प्रश्न- खीमा कोणत्या प्राण्यापासून करतात? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
सूड Wed, 07/20/2016 - 16:43 नवीन
ते सोड्याचं कालवण कोणत्या सोड्याचं असतं? खाणाच्या, पिण्याच्या की धुण्याच्या!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 16:47 नवीन
अरेरे अरेरे अरेरे... हे देवा, काही लोकं वांग्याच्या भाजीत पण सोडे घालत नाहीत, त्यांना माफ कर. बादवे, सोडे हे बोलण्याचे प्रकरण नाही.ती एक मैफिल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 16:44 नवीन
आम्ही "जो जे वांछिल, तो ते लाहो." ह्या पंथातील. त्यामुळे तुम्ही मांसाहार करत नसाल तर एखादा बटाटे-वडा कट्टा पण करू. वाटल्यास चिंचेची चटणी पण खाऊ. खीमा कोणत्या प्राण्यापासून करतात? आमच्याकडे बोकडापासून किंवा कोंबडी पासून. मला व्यक्तीशः कोंबडी-खिमा आवडत नाही.बोकडाचा खिमा उत्तम लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
म
मोदक Wed, 07/20/2016 - 18:58 नवीन
मला व्यक्तीशः कोंबडी-खिमा आवडत नाही.बोकडाचा खिमा उत्तम लागतो. मुवि.. तुम्ही माझाच डुआयडी असल्यासारखे वाटत आहे. बोकडाचा खिम झक्कास लागतो. तुम्ही ससा खाल्ला आहे का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ट
टवाळ कार्टा Wed, 07/20/2016 - 20:43 नवीन
ससा? उद्या हरिण खाशील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
इ
इरसाल गुरुवार, 07/21/2016 - 07:17 नवीन
मी ससा, हरिण(आल्प्स मधलं), टर्की(कोरियन), कोंबडी, बोकड, मेंढा आणी जंगली डुक्कर खाल्लय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/21/2016 - 08:45 नवीन
उंट मात्र एकदम बेचव. खरी मजा डुकराचे मटण खाण्यात. बाकी, ससा एकदा ट्राय करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
ज
जावई Wed, 07/20/2016 - 15:34 नवीन
अजून माझं वरील गोष्टींनी हाड बाटलं नाही.या गोष्टींपासून चार हात दूर आहे,अन् दूरच राहीन.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 15:38 नवीन
मस्त... आमचे कंजूस काका पण तुमच्या सारखेच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जावई
स
सूड Wed, 07/20/2016 - 16:25 नवीन
ते मिपाचे आंतरजालीय, मोष्ट इलिगिबल जावई तेच का तुमी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जावई
ज
जेपी Wed, 07/20/2016 - 17:15 नवीन
बार चा पत्ता द्या. बार बाहेर अंडा आम्लेट भुर्जीची गाडी टाकावी म्हणतो
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा