मी बी बियर बार काढीन म्हणतो : सामान्य मानव
हजारांच्या नोटेची चमक पाहीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
बियरला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
पिणार्यांच्या मनांत
असल्या भूक्कड गोष्टी येतच नाय
मी पण थोडे फार कमवीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
पिणार्यांना नशा
चढली काय, न चढली काय
पिणार्यांना भरपुर रिचवायची सवयच हाय
मी पण थोडे फार कमवीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
अन्नाचे भाव आणि दूधाचे भाव
वाढले काय, अन चकण्याचे भाव पण वाढले काय
या पिणार्यांना उपजत अक्कलच नाय
बियरच्या साथीने वाईन पण विकीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
बियर विकून सत्तेत येता येते
बियर पिणार्यांना उधार देणारा
खड्ड्यामधी जाते
बियर पिणार्याचे नाव फक्त
कागदोपत्री घ्यावे
बियर शॉपीचे, वाईन शॉप झाले की
भाव अजुन वाढवावे
सतत भाव वाढ करतच रहावे
तरच मिळतो भरपूर मलिदा
"चियर्स" करून बियर वर बियर पिऊ!
आणि म्हणू...
मदिराक्षीचा विजय असो....!!!
💬 प्रतिसाद
(64)
म
मुक्त विहारि
Wed, 07/20/2016 - 17:19
नवीन
आणि फक्त गाडी नको टाकूस, त्या जोडीला पानाची टपरी पण टाक.
तुला पानाची टपरी नको असेल तर, दुसर्या कुणा मिपाकराला देईन म्हणतो.
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Wed, 07/20/2016 - 17:20
नवीन
गरीब शेतकऱ्याला द्या, चार पैसे मिळतील.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 07/20/2016 - 17:26
नवीन
ओके.
आता तुम्ही म्हणताच आहात देवू या की.
पण मग त्याच्या शेतीचे काय?
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Wed, 07/20/2016 - 17:34
नवीन
ती तो कार्यक्षम आणि आवश्यक ती साधने असलेल्या शेतकऱ्याला भाड्याने देईल.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 07/20/2016 - 18:11
नवीन
आयजीच्या जीवावर बायजी उदार....
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 07/20/2016 - 19:36
नवीन
तुमच्या बारमध्ये कांप्लीमेंटरी काय मिळणार चकना म्ह्णून. चकली, काकडी...
आजकाल काम्प्लिमेंटरी चाकना बंद केलाय बार वाल्यांनी, आणि मी फक्त त्यासाठीच मित्रांबरोबर जात असल्यामुळे आजकाल बीयर बारमधे फेर्या कमी हैत.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 07/20/2016 - 19:38
नवीन
आता टकाने पुढील प्रमाणे धागा काढावा राव!
"मी बी यंदा बार काढीन म्हणतो"
००टकेश, हल्केच घेणे का भौ, तुला सुवर्णपेयाची शपथ००
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 07/20/2016 - 19:57
नवीन
टक्या नुसताच चखणा खात बसला तर बसून बसून बारच काढणार.
त्याला असल्या शपथा काय घालताय? उपेगाच्या नाहीत.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 07/20/2016 - 20:42
नवीन
=))
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 07/21/2016 - 05:41
नवीन
हजार बार देखो.....की ना देखने की चीज है......
अश्या मैफीलीत अनुपस्थीत असलेला नाखु
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 07/21/2016 - 11:07
नवीन
हवाबाण हरडे, बार काढी हर डे!! =))
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 07/21/2016 - 07:11
नवीन
सोता पिनार्याने हा धंदा करु नये. जो सोता न पिता दुसर्यांना प्यायला लावतो तो लई भारी धंदा करतोय!
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 03:48
नवीन
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
या कवितेचे विडंबन केल्याबद्दल धन्यवाद!
एखाद्या कवितेचे विडंबन होणे किंवा विडंबन करावेसे वाटणे हे त्या कवीचे आणि कवितेचे फार मोठे यश असते. कवितेचा आशय किंवा आकृतीबंध म्हणजे दोन किंवा एक किंवा दोन्हीही जेव्हा रसिकाच्या थेट हृदयाच्या आरपार जाते, रसिकाला खुणावते किंवा वेड लावते तेव्हाच ती कविता सफल होते, असे मला वाटते. आणि अशीच सफल कविता विडंबनाला पात्र ठरत असते. कवितेचे विडंबन म्हणजे रसिकाने कवीच्या कौशल्याला दिलखुलास दाद असते.
आता या कवितेच्या विडंबनकाराला असेही वाटेल की मी जे वर लिहिले ते खोटे आहे. मी तर मूळ कवीची चेष्टा करण्यासाठी, टर उडवण्यासाठी हे विडंबन केले आहे, हे निखालस असत्य असून त्या विडंनकाराने करून घेतलेली स्वतःची फसगत आहे.
विडंबनकाराने आता हे लक्षात घ्यावे;
मूळ कवितेच्या कविचे आणि विडंबनकाराचे कवितेच्या आकृतीबंधाशी मतभेद नसून कवितेतल्या आशयाशी मतभेद आहे किंवा कवितेबाहेरच्या व्यक्तीगत आकसाशी निगडीत आहे.
पण या विडंबनाने मूळ कवितेच्या आशयाला कुठेही धक्का लागलेला नाही किंवा कवीच्या व्यक्तीगत विचारधारेलाही धक्का लागलेला नाही.
कवितेच्या आकृतीबंधाने विडंबनकारावर मोहिनी घातली, असा त्याचा अर्थ असल्याने मूळ कविता ही कवीची अत्यंत सफल कलाकृती असल्याचे सिद्ध होत आहे.
मात्र विडंबनाच्या खाली किंवा वर मूळ कवितेची लिंक आणि कवीचा उल्लेख यायला हवा होता. पण मानवी मनाचा कोतेपणा लक्षात घेतला तर त्यातही काही वावगे वाटून घेण्याची आवश्यकता उरत नाही.
(ही पोस्ट लिहिताना मी प्रताधिकाराच्या बाबीकडे दुर्ल्क्ष केले आहे)
- गंगाधर मुटे
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 04:11
नवीन
विडंबनाबद्दल खास नजराना म्हणून एक शेर पेश करतो. विडंबनकाराने सहर्ष स्विकार करावा, अशी अपेक्षा आहे.
घमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2