Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काश्मीर - वल्गना आणि वास्तव.

स
संदीप ताम्हनकर
गुरुवार, 07/21/2016 - 10:10
🗣 271 प्रतिसाद
काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते. याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत. हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता. पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की. ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा. पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल. आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.
वर्गीकरण
काश्मीर

प्रतिक्रिया द्या
64887 वाचन

💬 प्रतिसाद (271)
क
कपिलमुनी गुरुवार, 07/21/2016 - 10:40 नवीन
टोळधाड येत आहे
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/21/2016 - 10:52 नवीन
याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच....
हे वाक्य वाचले आणि पुढचे काही वाचायची इच्छाच राहिली नाही. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
आ
आकाश कंदील गुरुवार, 07/21/2016 - 11:02 नवीन
मूळ मुद्दा असा आहे की 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' हा कायदा काश्मिरात का आणि पुण्यात का नाही याचा जरा निरपेक्ष विचार करा उत्तर तुंम्हाला सापडेल आणि तुमचे मुद्दे किती योग्य ते तुम्ही ठरवू शकाल
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील गुरुवार, 07/21/2016 - 11:09 नवीन
उचलली जीभ अणि लावली टाळ्याला
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 07/21/2016 - 11:12 नवीन
अतिराष्ट्रवाद्यांना म्हणजे काय? राष्ट्रवादात पण ३०-६०-९०-क्वार्टर-हाफ-फुल अशी सिस्टम असते काय? तुम्ही लिबरल असाल अन लिबरल तत्वातच देशाच्या १२५ कोटी जनतेचे हित समाविष्ट असल्याचे तुम्हाला ठामपणे वाटत असेल तर ते उघड मान्य करा, मोदी, डोवल वगैरे असू दे, आधी ताकाला जाऊन भांडी लपवणे सोडावेत हे सुचवतो. अवांतर - डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला जर आपण हेटाळत असाल तर आपल्याला अभिनिवेष सोडून अभ्यास वाढवावा लागेल इतके मात्र तूर्तास सुचवतो तुम्हाला मी.
  • Log in or register to post comments
ग
गंम्बा Fri, 07/22/2016 - 08:56 नवीन
अवांतर - डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला जर आपण हेटाळत असाल तर आपल्याला अभिनिवेष सोडून अभ्यास वाढवावा लागेल इतके मात्र तूर्तास सुचवतो तुम्हाला मी.
बाप्पु, हे तुम्हीच लिहीलेत हे बरे झाले. तसेच सैन्यावर जी पातळी सोडुन टिका आहे त्याचे पण तुम्ही खरमरीत उत्तर द्याच. काश्मीर मधे सैन्याला कीती हात बांधुन आणि पॉलिटीकली करेक्ट भुमिका घेउन ( पटत नसली तरी ) काम करावे लागते ह्या बद्दल पण लिहाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 07/22/2016 - 10:11 नवीन
डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला जर आपण हेटाळत असाल तर आपल्याला अभिनिवेष सोडून अभ्यास वाढवावा लागेल इतके मात्र तूर्तास सुचवतो तुम्हाला मी. +१००० काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? असे अवास्तव आणि प्रक्षोभक लिहिण्याऐवजी खालीलप्रमाणे लिहिणे वास्तवाला धरून होईल... काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात जेथे, (अ) लष्कराला दोषी ठरवून स्वार्थी हितसंबंध साधणारे राजकिय व अराजकीय (पन इंटेंडेड) नेते शेकड्याने आहेत, (आ) सीमेपलिकडून येणारा पैशाच्या लालचीपायी काश्मीर घगघगत ठेवण्यासाठी प्रयत्नशील लोक आहेत, (इ) पाकिस्तानाचे बाहेरून अतिरेकी पाठवणे आणि स्थानिक मुलकी नागरिकांना फूस देणे सतत चालू असते, व (ई) संकुचित स्वार्थासाठी देशाला धोका पोचणारा कांगावाही करायला मागेपुढे न पाहणारे व नसलेले दोष हुडकून काढणारे तथाकथित लिबरल मोठमोठी बहिर्गोल भिंगे रोखून सतत तयार आहेत... ज्यांच्या लेखी अतिरेक्यांच्या मानवी हक्कांचा कळवळा सर्वोच्च आहे पण अतिरेक्यांच्या गोळांना बळी पडणार्‍या निरपराध सामान्य नागरिकांच्या व त्यांचे संरक्षण करणार्‍या सैनिक-पोलिसांच्या जीवाची किंमत शून्य आहे; अशा ठिकाणी भारतिय लष्कराला किती संयमाने, धोकादायक व तणावपूर्ण परिस्थितीत काम करावे लागत असेल याची कल्पनाही करणे कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
महासंग्राम Sat, 07/23/2016 - 08:59 नवीन
https://www.youtube.com/watch?v=qLjZl0ay3oc इंडियन आर्मी वरची documentry पाहून बहुदा यांचे डोळे उघडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 07/21/2016 - 11:25 नवीन
हैदर चित्रपट बघा उडत पंजाब ला कात्री आणि त्याला नाही
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 07/21/2016 - 11:35 नवीन
काश्मीरातील वास्तव हे आहे की बहुसंख्य काश्मीरींना (पश्चिमी भागातल्या) स्वतंत्र होण्याची मनांतून इच्छा आहे. अगदी २५-३० वर्षांपूर्वी आम्ही गेलो होतो, तेंव्हाही हॉटेल मालकापासून अनेकांनी, 'तुम्ही हिंदुस्तानातून आलात का' असे आम्हाला विचारले होते. ते स्वतःला अजूनही भारताचे मानायला तयार नाहीत. पण त्याचवेळी, पाकिस्तानात जावे लागले तर, या भीतिने, त्यातले मवाळ जास्त आग्रह धरत नाहीत. पण पाकिस्तानची फूस असल्यामुळे जहालवादी हिंसक आंदोलने करतात आणि अतिरेक्यांनाही मदत करतात. सैन्यदलाकडून त्यांच्यावर काहीच अत्याचार झाले नाहीत असे कोणीच म्हणणार नाही. पण बहुसंख्य केसेसमधे भारतीय लष्कराने त्यांना शिक्षा दिली आहे. तिथल्या विचित्र परिस्थितीला बाकीच्या राज्यांसारखे नॉर्मल वातावरण करणे, हे अतिशय कठीण काम आहे. याच काश्मीर राज्यात लेह, लडाख देखील आहे. तिथे अशी आंदोलने होत नाहीत. उलट तिथले लोक प्रत्यक्ष भेटीत खूपच शांत व चांगल्या स्वभावाचे वाटले. तिथे विकासावरही फारच अल्प खर्च केला जातो.तरीही तिथल्या लोकांना सैन्यदलाचा का बरे त्रास होत नाही, वेगळे व्हावेसे का वाटत नाही,हा प्रश्न स्वतःस विचारुन पहावा.
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 07/22/2016 - 09:20 नवीन
साल २०१० : सख्खे नातेवाईक जाऊन आले
'तुम्ही हिंदुस्तानातून आलात का'+१ आणि आम्हाला तुम्ही पयर्टनाला या पण आमहाला स्वतंत्र व्हायचे आहे आणि भारताच्या कुठल्याही व्य्वस्थेवर प्रेम नाही पण रागच आहे
साल २०१३ : जुन्या कंपनीतील सहकारी काश्मीरला जाऊन आले त्याने थेट विचारले तुमचे उप्जीवीकेचे एक्मेव साधन काय तर पर्यटन (राहण्यास शिकार्यात होता तो कुटुंबासहीत).
'तुम्ही हिंदुस्तानातून आलात का'+१ आणि आम्हाला तुम्ही पयर्टनाला या पण आमहाला स्वतंत्र व्हायचे आहे आणि भारताच्या कुठल्याही व्य्वस्थेवर प्रेम नाही पण रागच आहे
साल २०१५: नुकताच कंपनीतील एक सहकारी जाऊन आला त्यांनाही असाच अनुभव जर या शिल्लक राहिलेल्यांना (हिंदु पंडीत कधीच नेसत्या वस्त्रानिशी निर्वासीत झालेत तिथून) तर उर्वरीत भारताला का त्यांच्याबद्दल अनुकंपा/ममत्व वाटावे. उलट मी म्हणेन अश्या क्रुतघ्न (खाल्ल्या थाळीत **णार्यांच्या उपजीवेकेला आधारभूत ठरण्यापेक्षा पूर्वांचल राज्यात पर्य्टन करावे ती जनता कष्टाळूही आहे आणि बहुअंशी मुख्य प्रवाहाशी फटकून नाही. ता:कः खालच्या एका प्रतिसादातील उल्लेखाबद्दल धन्यवाद. पेराल तेच उगवेल यावर विश्वास असलेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 07/24/2016 - 09:07 नवीन
आपण नॉर्थ ईस्टला फिरले आहात काय? असल्यास आपण उलट मी म्हणेन अश्या क्रुतघ्न (खाल्ल्या थाळीत **णार्यांच्या उपजीवेकेला आधारभूत ठरण्यापेक्षा पूर्वांचल राज्यात पर्य्टन करावे ती जनता कष्टाळूही आहे आणि बहुअंशी मुख्य प्रवाहाशी फटकून नाही. हे बोलला नसतात असे म्हणू धजतो. शिलाँग (रॉक म्युझिक कॅपिटल ऑफ इंडिया) सोडून बऱ्याच ठिकाणी प्रचंड अवघड आहे सगळे, ब्लॉकेड लागले एक एक की 20 30 दिवस आयुष्य उभे राहते, बटाटे 400 रुपये किलो अन पेट्रोल 600 रुपये लिटर घ्यायला लागते, तिकडे फुटीरतावादाचा चेहरा शांत अन सटल दिसतो पण खूप भयानक असतो. अर्थात पहिल्या पेक्षा बरेच आहे तरी ते मेनस्ट्रीम मध्ये वगैरे अजिबात नसतात, इतके मी आत्मविश्वासपूर्वक सांगतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
श
शाम भागवत Sun, 07/24/2016 - 10:45 नवीन
आजही नॉर्थ इस्ट वगळता उर्वरीत भारतातील रहिवासी असलेले असे केंद्र सरकार व आस्थापनातले अधिकारी यांना तिथे पोस्टिंग नको असते. त्यासाठी केंद्र सरकार व आस्थापनातील अधिकार्‍यांना बर्‍याच सवलती, जास्त पगार वगैरेचे आमिष दाखवावे लागते. रिझर्व्ह बँक, नाबार्ड मधे आजही हा भाग अशांत टापू म्हणूनच ओळखला जातो व त्यासाठी तेथे काम करायला तयार असणार्‍यांना विशेष पॅकेज असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
न
नाखु Mon, 07/25/2016 - 05:35 नवीन
कार्यरत असलेल्याकडून माहीती आलेली असल्याने (पुर्वांचलबाबत) आमची सपशेल माघार, तरी पण खाल्लाय घरचे वासे मोजणार्या कश्मीरीम्बाबतचे मत तेच राहिल. पुर्वांचल निसर्गसौंदर्याने नटलेले आहे असे नेहमीच पेपेरात्/मिपावरहीही वाचतो पण तिथली सामाजीक आणि अशांत बाजूबद्दल फारसे लिखाण वाचनात आले नाही म्हणून असेल. तरी सोन्याबापुंनी कळफलक धूळ झटकून एखादा प्रसंग जमल्यास मालीकाच लिहावी ही विनंती.. चू भू देणे घेणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Mon, 07/25/2016 - 07:28 नवीन
१) आजही गौहत्तीला फॅमीली न्यायला लोक तयार असतात पण मिझोराम, नागालँड, मणिपूर, मेघालय व त्रिपुरा येथे राजधानीच्या ठिकाणी जरी पोस्टिंग असेल तरी फॅमीली न नेता एकटेच जातात. २) पण ही माणसे आपल्याकडे आली तर त्यांना कोणी भारतीय समजत नाही. नेपाळी समजतात. जर एखादी स्त्री गोरी व दिसायला चांगली व सुखवस्तू असेल तर जपानीही समजतात. काही काळा नंतर ही लोकं यालाही सरावतात पण आत मधे एक बोच राहातेच. पुण्या मुंबई सारख्या प्रगत भागात असे होत असेल तर महाराष्ट्राच्या इतर भागात काय होत असेल? असो. ३) भारत खूप खूप मोठा आहे. सगळ्याच बाबतीत खूपच विविधता आहे. नीट समजावून घेता आले पाहिजे. म्हणजे सगळे गुणदोष लक्षात येतात व उपाय ही सापडतात व मुख्य म्हणजे राग आवरून हे साधता येऊ शकते व जेव्हा राग आवरून उपाय योजना केली जाते तेव्हा उपायापेक्षा रोग बरा म्हणायची वेळ येत नाही. जाऊ दे. विषयांतर नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
पैसा Mon, 07/25/2016 - 10:36 नवीन
http://www.misalpav.com/node/27810 हा चिगोचा लेख सहजच आठवला. ------- काश्मिर आणि सैन्याबद्दलच्या या आताच्या लेखातील मते बुद्धिभेद करणारी आहेतच. त्याचा निषेध. त्याशिवाय लेखकाने काही मिपाकरांबद्दल जे वयक्तिक शेरे मारले आहेत त्याची संपादक मंडळाने दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी ही विनंती आणि अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
स
सामान्य वाचक Mon, 07/25/2016 - 14:02 नवीन
वैयक्तिक शेऱ्या पेक्षाही हा लेख जास्त आक्षेपार्ह आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा Mon, 07/25/2016 - 14:20 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
व
विनोद१८ Mon, 07/25/2016 - 14:37 नवीन
..देउ नये, कारण हा विषय अत्यंत्य संवेदन्शील आहे, हा बुद्धीभेद करणारा लेख आहे हे तर सरळ सरळ दिसतेच आहे. लेखक वरकरणी लिखणस्वातंत्र्याचा आधार / गैरफायदा घेउन आपल्या शत्रुदेशाचा अजेंडा पुढे रेटीत आहे असेच दिसते. त्यांचा हेतु शुध्ध दिसत नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ग
गॅरी ट्रुमन Mon, 07/25/2016 - 15:04 नवीन
हा विषय अत्यंत्य संवेदन्शील आहे, हा बुद्धीभेद करणारा लेख आहे हे तर सरळ सरळ दिसतेच आहे. लेखक वरकरणी लिखणस्वातंत्र्याचा आधार / गैरफायदा घेउन आपल्या शत्रुदेशाचा अजेंडा पुढे रेटीत आहे असेच दिसते. त्यांचा हेतु शुध्ध दिसत नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते.
अहो असले काहीतरी बरळणार्‍यांना हल्ली विचारवंत म्हणायची फ्याशन आहे हे माहित नाही का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८
भ
भंकस बाबा Mon, 07/25/2016 - 16:47 नवीन
पण यांचा बुरखा फाडणे पण जरूरी आहे,हया असल्या टीनपाट विचारवंतामुळे फुटिरतावाद्याना बळ मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
शाम भागवत Mon, 07/25/2016 - 15:51 नवीन
लिंक बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
श
शाम भागवत Mon, 07/25/2016 - 15:57 नवीन
लिंक बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
च
चलत मुसाफिर गुरुवार, 07/21/2016 - 11:37 नवीन
कलम 370 रद्दबातल करून जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेणे हा रामबाण उपाय आहे. तोपर्यंत मात्र अंतरिम उपाय म्हणून सरकार व सैन्य यांनी आपल्या प्रसिद्धीतंत्रात बदल करावा. "तुम्ही भारतीय आहात" असे म्हणण्याऐवजी "आम्हीही काश्मिरी आहोत" असे मुख्य सूत्र ठेवावे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/21/2016 - 11:50 नवीन
प्रतिक्रिया देणार नव्हतो. परंतु खालील वाक्य वाचल्यानंतर,
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल?
हेच लिहावेसे वाटते की वरील लेख म्हणजे पराकोटीचा मूर्खपणा आहे.
  • Log in or register to post comments
प
पी. के. गुरुवार, 07/21/2016 - 13:38 नवीन
"शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात " ये बात कुछ हजम नहीं हुई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पीके गुरुवार, 07/21/2016 - 13:58 नवीन
आँ ??? आप कहांसे पैदा हुये भाई??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी. के.
प
पी. के. गुरुवार, 07/21/2016 - 14:19 नवीन
सुरेश ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पीके
प
पीके गुरुवार, 07/21/2016 - 15:08 नवीन
रमेश ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी. के.
म
महासंग्राम गुरुवार, 07/21/2016 - 11:57 नवीन
ए शाम जरा चिज पॉपकॉर्न लाना रे बाबा, अब्बी ईदर भौत दंगा होणे वाला है !! नाखु अण्णाचा शिष्य
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 07/21/2016 - 11:59 नवीन
दंगा करण्याएवढे लॉजिकल मटेरीयल नाय धाग्यात ! ५० पण होनार न्हाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
महासंग्राम गुरुवार, 07/21/2016 - 12:04 नवीन
मुनिवर्य विषय काश्मीर आहे ना, अजून मात्तबर लोकांची एंट्री व्हायची आहे. जस्ट वेट & वॉच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
वाल्मिक गुरुवार, 07/21/2016 - 12:26 नवीन
लग्नाचा बाजार http://www.misalpav.com/node/36586 ला करा दंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
महासंग्राम गुरुवार, 07/21/2016 - 12:36 नवीन
छे हो तो जरा गंभीर अन जिव्हाळ्याचा विषय ए, उगाच लोकांचे शाप कशाला घ्या तिकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
म
महासंग्राम गुरुवार, 07/21/2016 - 12:02 नवीन
काही प्रश्न/शंका आहेत तुम्ही योग्य समाधान कारक उत्तरे देऊन दूर कराल अशी अपेक्षा
कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल
हे विधान कोणत्या आधारावर केले आहे काही संदर्भ नक्कीच असेल तो द्यावा. वरील परस्थिती आपण स्वतः अनुभवली आहे का की फक्त पेपर मधल्या बाटलंय/विश्लेषणे लेख लिहिला आहे ???
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते गुरुवार, 07/21/2016 - 12:10 नवीन
पुण्याचा माहित नाही काय खरं काय खोटा ह्या लेखात तो मुद्दा नव्हता आणायला पाहिजे ..बाकी काश्मीर मध्ये सिमेन्स बरोबर काम केलं आहे पण उधमपूर सोडलं की पुढच्या लोकांची इच्छा नसते भारतासोबत राहण्याची असा वाटतं ..३-३ महिने तिकडे राहिलो आहे म्हणून वाटलं बाकी चूक बरोबर डॉक खरे आणि सोन्याबापू सांगतील
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 07/21/2016 - 12:18 नवीन
Pune and Kashmir??? Kahitarich kaay Sandeep sir. Aamche nav kharab Karu nakaa ho ;) Lekh gandalay he ve saa na la
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 07/21/2016 - 12:20 नवीन
अगदी बाडीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बाळ सप्रे गुरुवार, 07/21/2016 - 12:36 नवीन
आता काश्मीर भारतात असल्याने नक्की प्रॉब्लेम काय आहे काश्मीरींचा?? भारतातील इतर राज्यांप्रमाणे एक राज्य म्हणून रहाण्यात नक्की काय तोटा आहे त्यांचा?? सैन्याचा त्रास वगैरे पाकिस्तानींची मदत घेतल्याने ओढवून घेतलेला आहे.
  • Log in or register to post comments
आ
आकाश कंदील गुरुवार, 07/21/2016 - 12:45 नवीन
खालील लिंक वाचा आणि विचार करा http://www.esakal.com/Tiny.aspx?K=OA5SLE
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 07/21/2016 - 12:46 नवीन
३१ जानेवारी २०१२ ला साडेचार वर्षे होउन गेली. इतक्या वेळात सीएमई ची एक अक्खी बॅच पास आउट झाली असेल.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 07/21/2016 - 12:48 नवीन
बाकी ते डोवाल साहेबांना कशाला मधे आणले उगाच ? जुनाच अजेंडा किती दिवस राबवणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अनुप ढेरे गुरुवार, 07/21/2016 - 13:03 नवीन
इतकी वर्ष अ‍ॅफ्स्पा खाली कोणालाही रहायला लागू नये असं मत आहे. इंडेफिनेट अ‍ॅफ्स्पा आणि लोकशाही हे एकत्र असणं पटत नाही.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 07/24/2016 - 08:03 नवीन
अनुपराव, तत्व म्हणून तुम्ही म्हणता ते मी मान्य करतोच, फक्त उत्तरपूर्वेतले अनुभव पाहता, आफस्पा तूर्तास तरी लेसर इव्हिल ऑफ द अव्हेलेबल इव्हिल्स वाटते मला तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 07/21/2016 - 13:17 नवीन
श्रीनगर- बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर पोलिस चौकीतच पोलिस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी आज (गुरुवार) दिली. http://www.esakal.com/Tiny.aspx?K=E3642t
  • Log in or register to post comments
श
शंतनु _०३१ गुरुवार, 07/21/2016 - 14:29 नवीन
फुकाच्या कल्पना ( विस्तार ) आणि निर्बुद्धतेचे वास्तव
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/21/2016 - 19:33 नवीन
संदीप ताम्हनकर, तुमची दोन विधानं खासकरून पटलं नाहीत. १. >> याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील >> अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत. वल्गनायुक्त पोष्टींमुळे अजित दोभाल यांचं महत्त्व जराही कमी होत नाही. कारण नसतांना कृपया त्यांना या विषयात ओढू नये. २. >> .... तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित >> असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? सैनिकांची बाजू घेणारा कुठलाही कायदा काश्मिरात अस्तित्वात नाही. उलट भारतीय सैन्य राष्ट्रीय मानवी हक्क आयोगास उत्तरदायी आहे. जगात कुठल्याही देशाचं सैन्य अशा प्रकारे बांधील नाही. त्यामुळे तुमचं हे विधान म्हणजे शुद्ध दिशाभूल आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Fri, 07/22/2016 - 13:49 नवीन
विकतचे दुखणे असेच मला वाट्ते. काश्मिरला राजकिय तोडग्याची गरज आहे. कोणी चाणक्य / चंद्रगुप्त / शिवाजीच्या प्रमाणे विचार करणारा नेता जोपर्यंत भारतात होत नाही तो पर्यंत चांगला तोडगा निघणे अशक्यच आहे. काश्मिरी आपले देशबांधव आहेत असा विचार जर मनात आला तर आपोआपच नेमके काय चुकत आहे हे समजणे सोपे होईल. मोदीजी कधी मौन सोडतील आणि चांगला दूरद्रष्टी नेता शोधतील तो पर्यंत अल्ला मालिक आणि परमेश्वराची इच्छा असेच म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Fri, 07/22/2016 - 14:05 नवीन
चंपाबाई आयडीबदले
  • Log in or register to post comments
म
मनो Fri, 07/22/2016 - 16:01 नवीन
हमीद दलवाई यांचा अनुभव (भाऊ तोरसेकर यांच्या ब्लॉग वरून उचलला आहे) http://bhautorsekar.in/काश्मिरची-समस्या-की-कांग/ ‘भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात काश्मिरला जायचा योग आला. श्रीनगरात ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्याचे मालक पंजाबी हिंदू होते. परंतू नोकर काश्मिरी मुसलमान होता. कसा कुणास ठाऊक त्याला मी मुसलमान असल्याचा पत्ता लागला. एका सकाळी बेसीनपाशी मी पाणी पिण्यासाठी ग्लास धुत होतो. मला ग्लास धुताना पाहताच तो लगबगीने पुढे आला. माझ्या हातातून ग्लास घेऊन स्वत: धुत तो मला म्हणाला, ‘मेरे साथ आप परेज मत किजिये. मै मुसलमान हू और आप भी मुसलमान है.’ मी नुसताच हसलो. त्याच्याशी काय बोलावे हे मला कळेनासे झाले. काही बोलता येण्यासारखेही नव्हते. ‘आप कल कहॉ गये थे?’ मग त्याने विचारले. मी त्याच्या बोलण्याला उत्साहाने प्रतिसाद देत नाही हे त्याच्या लक्षात आले असावे. ‘हाजीपीर’ मी त्याला सांगितले. हाजीपीरच्या उल्लेखाने त्याचा चेहरा काळवंडला. त्याने अस्वस्थपणे विचारले, ‘तेथे काय पाहिलेत?’ ‘लढाई चाललेली पाहिली.’ ‘कुणाची जीत होत आहे?’ ‘हिंदूस्तानी फ़ौजेची.’ कसली तरी अशुभ वार्ता ऐकल्यासारखा त्याचा चेहरा पडला, अधिकच पडला. मग तो बोलू लागला – अधिकच त्वेषाने. त्या बोलण्यातून त्याच्या भावनांचा होत असलेला उद्रेक मला जाणवला. पाकिस्तान्यांना भारतीय सैन्य मागे रेटीत आहे. याचे त्याला अतिशय दु:ख झाले होते! पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे? यायचे तर उघड यायचे. ‘चोरून येऊन आमच्या दु:खातच त्यांनी भर टाकली.’ असे मत त्याने अतिशय कडवटपणे व्यक्त केले. ‘तुम्हा भारतीय मुसलमानांसाठी आम्ही अद्याप संयम पाळला आहे’, असेही त्याने बोलून दाखवले. मी विचारले, ‘तुला पाकिस्तानात का जावेसे वाटते? येथे काय दु;ख आहे? कशाची कमतरता आहे?’ तो उत्तरला दु:ख कसलेच नाही. कमतरताही कसलीच नाही. येथे रोटी स्वस्त मिळते. लोकांची परिस्थिती देखील पाकिस्तानी काश्मिरातील लोकांहून बरी आहे. परंतु तेवढ्याने संपत नाही बाबूजी.’ आणि मग त्याचे डोळे लकाकले. अतिशय भावनात्मक स्वरात तो मला म्हणाला, ‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’ श्रीनगरच्या हॉटेलातील नोकराचे हे उद्गार अनेक दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिले. अजूनही रेंगाळत राहिले आहेत. त्याच्या भावनात्मक युक्तीवादापुढे माझ्या तार्किक दृष्टीकोनाचे मूल्य शून्यवत असल्याचे मला त्या दिवशी जाणवले.’
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा