Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दोन मूठ राख

ग — गंगाधर मुटे, गुरुवार, 07/21/2016 - 22:42
दोन मूठ राख

अस्तित्वहीनाने एकदा
अस्तित्वाला आव्हान दिलं...

म्हणालं

"तुला लोळवायला दोन घटका
पुरेशा ठरतील.... माझ्यासाठी"

अस्तित्व हसलं......

म्हणालं

"जिंकणे किंवा हरणे... दोनपैकी एक
काहीतरी नक्कीच करू शकेन मी....

पण तुझं काय?
तुला ना नांव, ना गांव... ना हात ना पाय
ना बाप .......................... ना माय

माझ्याशी दोन हात करण्यापूर्वी
माझ्याशी बरोबरी कर
अंधुकसं का होईना...
पण स्वतःचं अस्तित्व तयार कर...

आणि

अभयपणे हे सुद्धा लक्षात घे की
मी संपलो तरी, मी नाहीच सरणार
माझी दोन मूठ राख तरी
नक्कीच उरणार....!"

पण
बिनमायबापाच्या लेकरा तुझं काय?????

                         - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया द्या
3992 वाचन

💬 प्रतिसाद (19)
स
संदीप डांगे गुरुवार, 07/21/2016 - 22:50 नवीन
कहर... जब्रा कविता मुटेसर. लै भारी. बाकी सगळं जाऊ द्या, पण तुम्ही कविता फार सुंदर करता. कीप इट अप!
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 07/22/2016 - 05:06 नवीन
काहीच कल्ले नाही, डांगे इतक्या आग्रहाने छान म्हतात मंजे असेलच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 07/21/2016 - 22:52 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 07/21/2016 - 22:52 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/22/2016 - 03:25 नवीन
रचना आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 07/22/2016 - 05:01 नवीन
छान आहे कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 07/22/2016 - 05:36 नवीन
सुरेख कविता!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 07/22/2016 - 05:44 नवीन
आशयघन कविता !
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 07/22/2016 - 05:45 नवीन
कडक!!!!
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Fri, 07/22/2016 - 06:05 नवीन
200 प्रतिसाद
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 07/22/2016 - 06:07 नवीन
कवितेतला विचार नकारात्मक आणि अपूर्ण वाटला. घराच्या कोणत्या तरी कोनाड्यात उलट्या टांगलेल्या काळ्या बाहूलीलाही असेच काहीसे वाटत असावे की "माझ्या मूळेच हे घर टिकून आहे, मी नसते तर....". घरमालका कडेही ती बाहूली तशीच मगृर पणे पहात असते. तसा काहीसा विचार अस्तित्व या कवितेमधे करते असे वाटले. आणि तशीही अस्तित्वाने अस्तित्वहिनाचा उपहास करावा ही तर जगरहाटीच आहे, त्यात विशेष ते काय? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 07/22/2016 - 06:45 नवीन
आणि तशीही अस्तित्वाने अस्तित्वहिनाचा उपहास करावा ही तर जगरहाटीच आहे, त्यात विशेष ते काय?
जरा वेगळ्या कोनातून पाहीले तर "अस्तित्व" कधी अस्तित्वहीनाचा उपहास करणार नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 07/22/2016 - 07:55 नवीन
हम्म... हे देखिल बरोबरच आहे खरे... आणि माझें जाणणें नेणणें । तें तंव भूतांचिया दैवाचें करणें । म्हणौनि भूतीं भावाचें होणें । विषम पडे ॥ माझे असे होते कधिकधि. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
स्पा Fri, 07/22/2016 - 09:09 नवीन
दोन मूठ राख कि किमत तुम क्या जाणो पैजार / सतीश बाबू -- शक्तिमान मुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सतिश गावडे Fri, 07/22/2016 - 06:26 नवीन
२०१० ला प्रकाशित झालेली कविता एका धाग्यावर चालू असलेल्या धुलवडीत उल्लेख करुन ती पुन्हा एकदा समोर आणणे यात शुद्ध हेतू दिसत नाही.
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 07/22/2016 - 06:23 नवीन
असे म्हणून तुम्ही झुंडशाहीचे समर्थक+सहभागी ठरू शकाल अशी मला सार्थ भीती वाटते. कवीता २०१० ला खरेच अर्थवाही होती पण अता...... मिपा वारकरी शहरी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अभ्या.. Fri, 07/22/2016 - 06:41 नवीन
मस्त कविता, काळाचे बंधन नाहीच ह्याला. अस्तित्वाचा नक्की अर्थ मात्र सापडला नाहीये मला. म्हणून मी आहेरे नाहीरे अर्थ लावून वाचली.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 07/22/2016 - 06:49 नवीन
मला या कवितेत लागलेले अर्थः अस्तित्व: कर्तृत्ववान, ज्याने स्वतःची अशी एक ओळख किंवा प्रतिमा जनमानसात तयार केली आहे असा अस्तित्वहीन: कर्तृत्वहीन, स्वतःची अशी एक ओळख किंवा प्रतिमा नाही असा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चांदणे संदीप Fri, 07/22/2016 - 08:06 नवीन
पण रूपकांचा गोंधळ होतोय का? अस्तित्वहिनाला बिनमायबापाचे लेकरू म्हणणे म्हणजे नक्की काय? कवितेचा आशय आणि एकंदरित रचना आवडलीच! Sandy
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा