Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चला हेल्मेट घाला रेऽऽऽ........

म
मनिषशिल्पाअनुसे
Fri, 07/22/2016 - 06:50
🗣 126 प्रतिसाद
काही ही हां ... दिवाकर साहेब थोड्याच वेळा पूर्वी बातम्या पाहिल्या , हेल्मेट परिधान केलेल्यांनाच् पंपा वर पेट्रोल मिळणार , दिवाकर रावतेंचा आदेश. काय म्हणावे याला , हेल्मेट सक्ती साठी काय नवीन नवीन शक्कल लढवली जाते यापेक्षा सार्वजानिक वाहतूक कशी समक्ष यासाठी अशी शक्कल का लढवत नाही रावते साहेब ??? मुळातच हेल्मेट अत्यंत जरुरी आहे पण त्यासाठी सक्ती कशा साठी करता..आणि हेल्मेट ही पूर्णपणे सुरक्षित आहे का , पुण्यात मंध्यतरी अपघातात हेल्मेट धारक दोन महिलांचा मृत्यु झाला मग यास जबाबदार कोण. हेल्मेट पेक्षाही महत्वाचे आहे वेगावर नियंत्रण आणि संयम व सक्षम वाहतूक प्रणाली ,उत्तम रस्ते. हे राहिले बाजूला आणि हेल्मेट सक्ती करता ,आधी हे सांगा पुण्यात 30 लाख दुचाकी वाहने आहेत तितके हेल्मेट उपलब्ध आहेत का ??? मग कुठल्या निकषा वर करता अशी हेल्मेट सक्ती. -मनिष अनुसे ७०५७२१८१०६

प्रतिक्रिया द्या
24561 वाचन

💬 प्रतिसाद (126)
ट
टवाळ कार्टा Fri, 07/22/2016 - 06:53 नवीन
पुणेकर का तुम्ही...मग चालूदे
  • Log in or register to post comments
म
मनिषशिल्पाअनुसे Fri, 07/22/2016 - 06:56 नवीन
आपला ह्या सक्तिला विरोध आहे का पाठिंबा???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ए
एकुलता एक डॉन Fri, 07/22/2016 - 07:06 नवीन
हेल्मेट होते म्हणून 2 महिलांचा मृत्यू झाला ,नसते तर 2000 असत्या
  • Log in or register to post comments
म
मनिषशिल्पाअनुसे Fri, 07/22/2016 - 07:19 नवीन
मान्य आहे की,हेल्मेट हे सुरक्षेचे साधन आहे....म्हणुन काय सक्ती????मुळात आपले रस्ते नीट नाही,ते राहील बाजुला.आणि बाकीचे ’उद्योग’ सुरु झाले आहेत......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Fri, 07/22/2016 - 07:22 नवीन
निवडून कोण देते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिषशिल्पाअनुसे
ए
एकुलता एक डॉन Fri, 07/22/2016 - 07:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिषशिल्पाअनुसे
च
चतुरंग Sat, 07/23/2016 - 18:51 नवीन
आंतर्पिके सुधा घेता येतील!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
प
पी. के. Fri, 07/22/2016 - 07:44 नवीन
दु चाकी स्वरांनी हेल्मेट घालावं हा प्राथमिक नियम आहे तो न पाळल्यामुळे सरकार ला सक्त्ती करावी लागतीय. रस्ते नीट नाही आणि हेल्मेट या दोन गोष्टीचे लॉजिक नाय समजलं. डोकं फुटून आपला जीव गेला तर यमाला असं नाय म्हणू शकत की रस्ते खराब केले ते लोक आगोदर उच्चल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिषशिल्पाअनुसे
र
रॉजरमूर Sun, 08/14/2016 - 17:39 नवीन
खड्डे आणि हेल्मेट च्या संबंधातील लॉजिक नसेल कळत तर आजची ही बातमी वाचा . सगळे लॉजिक क्लिअर होतील . इथे खड्डे ही आहेत आणि हेल्मेट ही आहे . हेल्मेट घातले की जणू तुम्हाला जीवन सुरक्षा कवच प्राप्त होते असा समज असणार्यांनीही ही आणि म्हणून त्याचा धोशा लावणार्यांनीही बातमी अवश्य वाचावी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी. के.
प
पी. के. Tue, 08/16/2016 - 11:38 नवीन
आतिशय दुःखद बातमी. अशी दुःखद बातमी दाखवून लॉजिक क्लिअर करण्याची काय हि मानसिकता.. हेल्मेट मुळे वाचला आशा खूप बातम्या असतात पण नकारात्मक चस्मा घातलेल्याना त्या नाही दिसतं. हेल्मेट घातलं म्हणून वाचलो सांगणार भेटतात, हेल्मेट नाही घातलं म्हणून वाचलो सांगणार नाही भेटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
थ
थॉर माणूस Wed, 08/17/2016 - 20:14 नवीन
हे तुमचे हेल्मेट न घालण्यामागचे लाॅजिक असेल तर तुम्हाला हेल्मेटची गरजच नाही. हेल्मेट आघात कमी करण्याकरीता असते, ते काही अभेद्य कवच नाही. पण हेल्मेट मुळे वाचलेले किमान 5-6 लोक मला माहिती आहेत. 2 केस नव्या को-या रस्त्यावर घडलेल्या. त्यामुळे हेल्मेट घालायचे नसेल तर राहूद्या, फक्त हा कायद्याने दंडनीय अपराध असल्याने (MVA 1988 section 129) अडवल्यावर पावती फाडली की रस्ते खराब म्हणून रडू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
स
सुबोध खरे Fri, 08/19/2016 - 05:47 नवीन
+१०० सुयोग्य प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
अ
अभ्या.. Fri, 07/22/2016 - 07:37 नवीन
चार हेल्मेट घ्यावेत अन सरळ पम्पाबाहेर स्टॉल लावावा. 10 रु. भाडे पेट्रोल भरेपर्यंत.
  • Log in or register to post comments
म
मनिषशिल्पाअनुसे Fri, 07/22/2016 - 07:40 नवीन
त्याशिवाय ह्यांना कळणार नाही.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ए
एकुलता एक डॉन Fri, 07/22/2016 - 08:09 नवीन
ह्याचा अर्थ सक्ती चा काही अर्थ नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिषशिल्पाअनुसे
आ
आनंदराव Fri, 07/22/2016 - 08:13 नवीन
ब्येष्ट धंदा. रोजचे 1000 तर कुठे नाही गेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 07/22/2016 - 08:17 नवीन
हा, जोपर्यंत पंपवाले ह्यात पडत नाहीत तोपर्यंत चांदीय. एकदा त्यांनी पंपावरच दोरीने बांधून हेलमेट लटकावले कि आपला बाजार उठला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदराव
आ
आनंदराव Fri, 07/22/2016 - 14:33 नवीन
त्ये बी खरयं म्हना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
S
sagarpdy Fri, 07/22/2016 - 08:46 नवीन
हा प्रकार बहुतेक म.प्रदेश मध्ये चालू आहे (बहुधा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ल
लोनली प्लॅनेट Sat, 07/23/2016 - 14:17 नवीन
लय भारी शक्कल लढवली तुम्ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ज
जागु Fri, 07/22/2016 - 07:41 नवीन
मला तर माझ्या घरातूनच सक्ती आहे. गेले ८-९ वर्षापूर्वी मी गाडी घेतली आणि ऑफिसला नेणार हे ठरले तेव्हा नवर्‍याने आधीच ताकिद दिली की हेल्मेट घालून गाडी नेणार असशील तर ने नाहीतर नको नेऊ. ह्यात पुर्ण काळजी होती. सात-आठ दिवस जरा मला जड गेल पण नंतर सवय झाली. आणि आता इतकी सवय झाली आहे की हेल्मेट नसेल तर मला त्रास होतो. ही सक्ती मला एकदा लाभदायक ठरलेली. ऑफिसच्या रोडला रेल्वे ट्रॅक आहे. एक दिवस ट्रेन आल्याने फाटक बंद होते व पुढे खुप गर्दी होती म्हणून एका झाडाखाली उन होत म्हणुन गाडी बाजूला घेऊन तिथेच थांबले. इथे रस्ता पूर्ण मोकळा होता. पण एक मागून क्रेन आली आणि माझ्या अ‍ॅक्टीवाच्या पुढच्या भागाला धडक दिली. ती दिल्या बरोबर गाडी पडून मी पाठच्या बाजूने डोक्यावर पडले. मला कळलेच नव्हते काय झाले कारण अपघात होण्यासारखी परिस्थितीच नव्हती. नंतर पाहीले क्रेन पुढे जात होती. त्याला ओरडून थांबवले. माझ्या गाडीचा पुढचा भाग तुटला. हेल्मेटला खालच्या बाजूने थोडी चिर गेली. तेव्हा मला जाणवले की जर आज हेल्मेट नसते तर काय झाले असते. कोणताही प्रसंग सांगून येत नाही. आता रोड चांगला होता, ट्रॅफिक नव्हती की काही नव्हत. त्या क्रेन वाल्याने क्लिनर बरोबर घेतला नव्हता ही त्याची चुकी होती. ह्या वरून मी हे शिकले की आपण स्वतःच्या सेफ्टीचा विचार करावा. सरकार सक्ती करतोय म्हणुन नाहीतर आपल्या स्वताच्या सेफ्टीसाठी हेल्मेट घाला. कोणाला त्याचा अगदीच त्रास होत असेल तर ती गोष्ट वेगळी.
  • Log in or register to post comments
म
मनिषशिल्पाअनुसे Fri, 07/22/2016 - 07:46 नवीन
बरोबर अगदी......पण आज कोणी स्वतचा विचार करत नाही.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
ज
ज्योति अळवणी Sat, 07/23/2016 - 16:56 नवीन
एकदम मान्य आणि अगदी बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
म
मराठी कथालेखक Sat, 08/20/2016 - 15:34 नवीन
नवर्‍याचं ऐकणारी पत्नी म्हणून तुमचा सत्कार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
त
तुषार काळभोर Fri, 07/22/2016 - 07:48 नवीन
मग आगपाखड होणे बरोबरच आहे!!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 07/22/2016 - 07:49 नवीन
कोर्टाने आदेश दिल्याचा संदर्भ देत दिवाकर रावते हे हेलमेट सक्तीच्या पाठीमागे लागले आहेत आपल्याकडून कोर्टाची बेअदबी होउ नये म्हणून कोणताही राज्यकर्ता हेच करील. त्यात त्याना दोष देण्याचे कारण नाही. याच प्रमाणे पिंपरी चिंचवड मधील ६६००० अनधिकृत बांधकामे पाडून टाका म्हणूनही कोर्टाने आदेश दिलेला आहे. जोपर्यंत त्यातील एखाद्या बांधकामाच्या ढिगार्‍याखाली एखादे बालक सापडणार नाही तो पर्यंत ती कोर्टाची बेअदबी झाली हे राजकारणी ठरवणार नाहीत. त्यात मतदानाचा मोठा भाग आहे. त्याला मग माणुसकीचा मुलामा नगरसेवक द्यायला एका पायावर तयार असणार आहेत. या संदर्भात पेट्रोल पंप चालकानी पोलिस खात्याची उपस्थिती पेट्रोल पंपावर मागितली आहे. आधीच वहातुक पोलीसांची संख्या कमी ( कॅमेरा सेक्शन मधे पुणे शहरासाठी केवळ ६ पोलिस आहेत) असताना ह्या पेट्रोल पंपासाठी नवीन भरती करावी लागेल. लोक या आदेशातून पळवाट अशी काढतील की हेलमेट घेऊन जायचे. पंपावर प्रवेश करताच घालायचे व पंपाबाहेर आल्यावर काढून टाकायचे. खरी तळमळ दिवाकर रावतेंची तेंव्हाच सिद्ध होईल जेंव्हा चौकाचौकात- ते ही पूर्ण महाराष्ट्राच्या, निर्दयपणे झेब्रा लाईन, सिग्नल तोडणे,उलट्या दिशेने घुसणे चुकीचा ओव्हरटेक ई बाबत जबरा दंड वसूल केला जाईल त्यावेळी हेलमेट सक्तीवर कोणालाच काही बोलता येणार नाही. पण या साठी वहातुक पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी पुन्हा स्पेशल कॅमेरे बसवावे लागतील कारण खरी गोची तिथेच आहे. हे जो पर्यंत होत नाही तो पर्यंत लोक म्हणत राहतील की हेल्मेट सक्ती हे कायद्याने बंधनकारक आहे व कोर्टाच्या आदेशामुळे सरकारचा नाईलाज आहे. पण मनातून नागरिकाना वाटेल की कुणाची तरी हेल्मेट खपविण्यार्या लॉबीचा यात वाटा आहे. सिग्नल सुधारणे, वहातुक पोलिसांच्या कामगिरीकडे करडी नजर ठेवणे झाल्यास, रस्ते सुधारल्यास, झिब्रा मार्किंग नेहमी अद्ययावत ठेवल्यास लोक आनंदाने हेलमेट घालतील. पण ..... पण.....
  • Log in or register to post comments
स
स्वीट टॉकर Fri, 07/22/2016 - 08:26 नवीन
काही वर्षांपूर्वी हेल्मेटसक्ती आली आणि खूप विरोध झाल्यामुळे विरून गेली. तेव्हां त्याबद्दल एक विनोदी लेख माझ्या वाचण्यात आला होता. त्याचा गाभा असा. सरसकट हेल्मेटसक्ती करणं चूक आहे. काही जण हेल्मेटसक्तीला विरोध करतात त्यात त्यांचा काहीही दोष नाही. ते सर्व बिनडोक असतात. त्यामुळे त्यांच्या डोक्याचं रक्षण करण्यात काहीच पॉइन्ट नसतो. मात्र त्यांचा मेंदू नेमका कुठे असतो हे नीट माहीत नसल्यामुळे शासनाने प्रत्येक दुचाकीस्वाराला चॉइस द्यायला हवा. एक तर डोक्यावर हेल्मेट घाला किंवा सबंद शरीरावर चिलखत! ;-)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 07/22/2016 - 08:32 नवीन
खरेच आहे ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर
ब
बाबा योगिराज Fri, 07/22/2016 - 08:33 नवीन
पयले माझ्या मापाच हेमलेट अणुनसनी द्या मग बगू...!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 07/22/2016 - 08:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज
अ
अभ्या.. Fri, 07/22/2016 - 08:56 नवीन
नीच कम्मू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बाबा योगिराज Sun, 07/24/2016 - 12:40 नवीन
दुत्त दुत्त...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ए
एकुलता एक डॉन Fri, 07/22/2016 - 08:52 नवीन
स्थळ पुणे. दोन युवक. अतिशय आनंदात. तिसरा मित्र भेटतो. मित्र: काय रे? आज एकदम एवढे खुश ? युवक 1: अरे तुला सांगणारच होतो फोन करून, आम्हाला दोघांना नोकरी लागली. मित्र: दोघांना एकदम? युवक 2: एकदम सोड. एकाच ठिकाणी. एकाच पेट्रोल पंपावर. मित्र: वा. मस्त. गम्मत आहे नाही ! युवक 1 : काम पण सोपं आहे. हा एंट्रन्स ला हेल्मेट देतो.कस्टमर पेट्रोल भरतो. आणि मी, पेट्रोल भरून झालं की त्या कस्टमर कडून एक्झिट ला ते कलेक्ट करतो.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 07/22/2016 - 08:59 नवीन
हेल्मेट सक्ती राज्य उलथवु शकते इंदिरा गांधी की जय
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला Fri, 07/22/2016 - 09:54 नवीन
वि प्र सर, जरासं अडीच तीन फूट वर या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
म
मोदक Fri, 07/22/2016 - 10:02 नवीन
संजय गांधी की जय हे जास्त संयुक्तीक ठरेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
क
कविता१९७८ Fri, 07/22/2016 - 09:01 नवीन
आमच्या ऑफीस मधे सक्ती आहे हेलमेटची आणि ती बरोबरच आहे असे मला वाटते कारण यामुळे मी रोज न चुकता हेलमेट घालते अगदी ऑफीस बाहेरही . सक्ती नसती तर कदाचित मला रोज हेलमेट घालायची सवय लागली नसती. लोकांना एलियन पाहिल्यासारखं वाटतं पण मला माझ्या सेफ्टीची जास्त चिंता आहे, हेलमेट घातल्याने कधी ट्रॅफीक पोलिसानेही अडवलं नाही इथे. इथे रस्त्यावर इतके खड्डे आहेत की रोज कुणा न कुणाचं अ‍ॅक्सिडंट होतच असतं मग तेव्हा लोकांना हेल्मेट ची आठवण येते . सक्ती केल्याशिवाय लोकांना हेलमेट घालण्याची सवय लागणार नाही हे माझे मत.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 07/22/2016 - 09:32 नवीन
सरकारने एखाद्या रस्त्यावर इतकया इतक्या मापाचे इतके इतके खड्डे असलेच पाहिजेत असेच टेण्डर काढावे. रोज चार पाच म्रुत्यू झाले की सक्ती न करताच सर्व हेल्मेट घालायला लागतील. अशीच सोय आयुर्विमा, गाडीचा विमा, घराचा विमा, टीव्हीचा विमा, पासपोर्टचा विमा, रेशनकार्ड , क्रेडिट कार्ड , आधार कार्ड चोरीला जाण्याची शक्यता, मधुमेह बी पी होण्याची शक्यता , मूल न होण्याची शक्यता , आगीचा विमा, परदेश प्रवासात विमान रद्द होण्याचा विमा अशी दोन उत्तरे असलेल्या सर्वा॑ची भिति समाजाला घालावी. सर्वीस सेक्टर फोफावून मजबूत सर्वीस टेक्स सरकारला मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
प
पगला गजोधर Fri, 07/22/2016 - 10:00 नवीन
मस्तच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
आ
आदूबाळ Fri, 07/22/2016 - 14:13 नवीन
आमच्या ऑफीस मधे सक्ती आहे हेलमेटची
उकडत असेल नै दिवसभर हेल्मेट घालून बसायचं म्हणजे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
उ
उडन खटोला Fri, 07/22/2016 - 14:20 नवीन
हल्कत बव्लत अच्रत आदुबाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अभ्या.. Fri, 07/22/2016 - 14:35 नवीन
यात काय हल्कत्पना? पुढे लिहिलय की
यामुळे मी रोज न चुकता हेलमेट घालते अगदी ऑफीस बाहेरही
वाचले नै का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
क
कविता१९७८ Fri, 07/22/2016 - 16:28 नवीन
अच्छा, मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
उ
उडन खटोला Fri, 07/22/2016 - 17:01 नवीन
जौ द्या ओ, कुठे या लोकाना प्रतिसाद द्यायचा. आपण आपली सुरक्षितता सांभाळायची हेल्मेट घालून. ऑफिसमध्ये काय, बाहेर काय, हेल्मेट मस्ट, सेफ्टी फर्स्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
क
कविता१९७८ Fri, 07/22/2016 - 19:21 नवीन
हो का? पालघरला हेल्मेट घालुन फीरताना तर पाहील नाही कधी तुम्हाला परान्जपे भौ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
उ
उडन खटोला Fri, 07/22/2016 - 19:30 नवीन
मी पालघरचा परांजपे असल्याचं सांगितल्याबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
अ
अद्द्या Fri, 07/22/2016 - 10:01 नवीन
मुळात , सक्ती करावी लागेपर्यंत लोकांना अक्कल येत नाही.. मग रडत बसता असले धागे काढत . चालूदे
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 07/22/2016 - 10:10 नवीन
अहो... गरजेचे आहेच आहे. आजचे उदाहरण बघा. मी ऑफिसला येतो त्या एका सिमेंटच्या रस्त्यावर एकदम कमी प्रमाणात ऑईल सांडले होते. त्यात रिमझिम पाऊस पडत होता. सिमेटचा रस्ता + ऑईल + जी असेल नसेल तितकी माती / चिखल यामुळे माझ्या आधी २, नंतर मी आणि माझ्यानंतर ३ असे ६ दुचाकीस्वार ३० च्या वेगाने जातानाही पडले. माझ्या गाडीवर आणि हेल्मेटवर अपघाताच्या खुणा शिल्लक आहेत. आणि मी ऑफिसात बसून प्रतिसाद लिहित आहे. :)
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 07/22/2016 - 10:16 नवीन
हेल्मेट घाला. नाय तर फाईन भरा!!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 07/22/2016 - 11:04 नवीन
सरदारजी कसे घालतात हेल्मेट?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा