Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

घरातल्या गोष्टी-उपयुक्तता की अडगळ ?

म
माम्लेदारचा पन्खा
Fri, 07/22/2016 - 14:57
🗣 68 प्रतिसाद
सध्या जिथे कोणाच्या घरी जातोय तिथे एक गोष्ट नजरेआड करूच शकत नाही.... घरातला पसारा ! दर्शनीय खोली स्वच्छ ठेवून इतर खोल्या म्हणजे डम्पिंग ग्राउंड झालेलं असतं.... हल्ली बऱ्याच घरांमध्ये गरजेच्या नावाखाली भरमसाठ गोष्टींची खरेदी झालेली असते भले त्या उपयुक्त असोत अथवा नसोत.... दिसताक्षणीच गोळ्या घालण्याच्या आदेशासारखं दिसताक्षणी विकत घेण्याचे प्रकार चालू आहेत. मग ह्या सगळ्या स्वकष्टार्जित कमाईने जमा केलेल्या गोष्टी घरातली धूळ चवीने खाऊ लागतात. बरं , ज्याने आणलंय त्यांचं मनही मोडवत नाही पण तरीही हळूहळू घरातल्या कानाकोपऱ्यात एक एक करून अनावश्यक वस्तू साठत जातात आणि घराला अडगळीच्या खोलीचे रूप प्राप्त होते. मग सणावाराला आधी साफसफाई मोहीम उघडली जाते .... मुळात माणसाला इतक्या गोष्टींचा हव्यास असतोच का? आपल्या मानसिकतेचा नियम हेच सांगतो की जोपर्यन्त एखादी गोष्ट आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंतच आपल्याला तिचे आकर्षण असते... एकदा का ती आपल्या ताब्यात आली कि तिच्याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही आणि हे सरसकट सगळ्यांनाच लागू आहे. घरातला स्त्रीवर्ग विशेषतः ज्या गोष्टीत विशेष अडकलेला असतो ते म्हणजे जुने कपडे, भांडी, प्लास्टिकचे पदार्थ/पिशव्या आणि इतर भंगार सामान ! कधीतरी लागेल म्हणून वर्षानुवर्षे ती गोष्ट जीवापाड जपून ठेवायची ( विशेष म्हणजे ती कधीही "लागत" नाही)...या संदर्भातच मला काही प्रश्न पडले आहेत ते असे - १) अशा जपून ठेवलेल्या गोष्टी नक्की काय आणि कधी कामाला येतात ? २) घर सफाई मोहिमेत मध्येच घुसून घराबाहेर काढायच्या ठेवलेल्या वस्तूंवर आक्रमण करून सुरतेची लूट असल्यासारखे परत सगळे पदार्थ घराच्या आत का जातात? मग सफाई मोहिमेचे उद्दिष्ट काय असते ? फक्त धूळ हटवणे ? ३) एखादी गोष्ट आपल्याकडे होती पण आपण तिचा वापर केला नाही याची रुखरुख नेमकी किती दिवस टिकू शकते ? ४) आपले सामान ३ बीएचकेचे असून आपण १ बीएचकेमध्येच राहतो हे सत्य त्या कधी स्वीकारतात ? ५) सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे अश्या गोष्टींना ज्याला बोलीभाषेत अडगळ म्हणतात त्याच्याशी भावनिक नातं असणं म्हणजे नक्की काय?
वर्गीकरण
जीवनमान अनुभव

प्रतिक्रिया द्या
15512 वाचन

💬 प्रतिसाद (68)
द
दिपुडी Mon, 07/25/2016 - 06:33 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपुडी
द
दिपुडी Mon, 07/25/2016 - 06:31 नवीन
  • Log in or register to post comments
द
दिपुडी Mon, 07/25/2016 - 06:32 नवीन
  • Log in or register to post comments
द
दिपुडी Mon, 07/25/2016 - 06:33 नवीन
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 07/25/2016 - 09:01 नवीन
पुढची ओळ म्हणा की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपुडी
च
चौथा कोनाडा Tue, 07/26/2016 - 13:02 नवीन
:-))) एकंदरीत आठ ब्यागा संपवल्या उंदरानी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ट
टवाळ कार्टा Mon, 07/25/2016 - 09:34 नवीन
नुकतीच घरात साफसफाईची ऑर्डर मिळालेली दिसतेय =)) तुझ्याकडे झाले की माझ्या घरी ये मदतीला
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 07/25/2016 - 16:07 नवीन
हा माझ्या घरातला विषय नाही रे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अभ्या.. Mon, 07/25/2016 - 16:19 नवीन
मापं, असं नाई म्हणायचं बरका टकामालकांना. त्यांच्या साईटवरुन तुझे वाचन कमी म्हणून तुला बॅन करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 07/25/2016 - 16:22 नवीन
टकाशेट तुमचा फॉरम्याट द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ट
टवाळ कार्टा Mon, 07/25/2016 - 16:34 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
अ
अभ्या.. Mon, 07/25/2016 - 16:35 नवीन
लोळी आहे ना आतमध्ये? म्हणजे वाजतीय ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 07/25/2016 - 16:41 नवीन
लगे रहो मालिक !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 07/25/2016 - 16:43 नवीन
अभ्याशेट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 07/25/2016 - 16:42 नवीन
ये फेविकॉल का मजबूत जोड है...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कपिलमुनी Mon, 07/25/2016 - 16:17 नवीन
पहिलीच ओळ : सध्या जिथे कोणाच्या घरी जातोय तिथे एक गोष्ट नजरेआड करूच शकत नाही. टका ( नेहमीप्रमाणे ) न वाचाताच प्रतिसाद देउन रिकामा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 07/25/2016 - 16:19 नवीन
लेखात लिहिल्याप्रमाणेच असते असे विचार पाहून ड्वाळे पाणावले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बाळ सप्रे Wed, 07/27/2016 - 10:36 नवीन
हे डेटा बॅक-अप कींवा इंशुरन्स सारखं आहे. कधी वापरायला लागेल सांगता येत नाही. ओव्हरहेडस असल्या तरी मनाचं समाधान म्हणून केलं जात असं. त्यामुळे आयत्या वेळी लागल्यास मिळवायला किती कष्ट/खर्च/मनस्ताप यावरून बाळगायच्या की नाही ते ठरवायच.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा