Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तृप्ती

ज — ज्योति अळवणी, Fri, 07/22/2016 - 21:00
कंच हिरव्या ओल्या गाली मधुमती फुलांचा बहर फुलवि मोहक धरती आर्जवि हसती घननिळा बरस..मी एक प्यासी क्षितिजावर मग तो ही झुकला शामल देहि कवळुनि तिजला चुंबुन म्हणे त्या गौरीला तुज ओटी माझा अंकुर रुजला नव यौवना ती धरा बहरली अंग अंग कांतिही भरली पर्जन्याच्या सहस्त्र स्पर्शी  नव जन्माने तृप्त जाहली

प्रतिक्रिया द्या
1682 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ए
एस Sat, 07/23/2016 - 01:54 नवीन
रविकिरण मंडळाची आठवण आली.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sat, 07/23/2016 - 07:51 नवीन
+१ अगदी. मध्येच एखादा उर्दू / फारसी शब्द घालणे वगैरे तर एकदम फिट्ट. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
न
नाखु Sat, 07/23/2016 - 05:30 नवीन
पर्जन्याच्या सहस्त्र स्पर्शी
ही कल्पना फार फार आवडली
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sat, 07/23/2016 - 05:30 नवीन
छान झालीय कविता..!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sat, 07/23/2016 - 05:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/23/2016 - 05:34 नवीन
का बात! बहुतै खुबै रचायी है जी ये कविता!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा