Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डू आयडी आणि अंदाज

स
संत घोडेकर
Sat, 07/23/2016 - 12:42
🗣 35 प्रतिसाद
डू आयडी हा नेहमीच माझ्या उत्सुकतेचा विषय राहिला आहे. हि परंपरा कदाचित अहिरावण-महिरावणाच्या काळापासून सुरु झाली असावी. एक धारातीर्थी पडला कि दुसरा जणू त्याच्या रक्तातून उठून पुन्हा युध्दाला तयार! जणू काही आपला जन्मच यासाठी आहे असे डू आयडी ला वाटत असावे. चक्रव्युहात घेरून एखाद्या योद्ध्याला मारणे एकवेळ खूप सोपे हो, पण हा डू आयडी स्वतःच बाकीच्यांना चक्रव्युहात ओढून आपल्याभोवती घेरा घालून आपल्याशी लढण्यास भाग पडतो. अर्थात त्यानंतर तुंबळ युद्ध होऊन अपेक्षेप्रमाणे त्याची अवतार समाप्ती तेथेच होते, पण सर्वांचे लक्ष वेधण्यात तो यशस्वी झाला असतो. कारण हे युध्द रणांगणावरील योद्ध्यांबरोबर इतर प्रेक्षक हि पाहत असतात. विजयीवीरांना आपल्या यशाचा आनंद फारकाळ मात्र घेऊ न देता पुनर्जन्म घेऊन नव्या जोमाने सर्वांसमोर उभा ठाकतो. आता तुम्ही म्हणाल याला डू आयडीची एवढी उठाठेव का? हा इतका रस घेतो म्हणजे नक्कीच अवतारी पुरुष दिसतोय. होय, मला ही तेच मांडायचंय. म्हणजे ‘तो मी नव्हेच’ इतकंच सांगायचंय. तसे मिपा मला अजिबात अनोळखी नाही, पण मी मात्र मिपासाठी अजून तरी पूर्णपणे ओळखीचा नाही. तसे येथे प्रथम आलेला प्रत्येकजण अनोळखीच होता. तो आला, तो रमला, आणि शेवटी इथेच टिकला ही क्रांती बरेच आयडींच्या बाबतीत घडल्याचा मी अनेक वर्ष साक्षीदार आहे. मूळ आयडी बरोबरच भूछत्रासारखे उगवलेले अनेक डू आयडी आणि त्यांचे मिपावरील ‘दीर्घ’ आयुष्य ही पाहत आलो आहे. तसे आपले मिपाकर आहेतच मुळी हुशार. नवीन आयडी दिसला की आधी त्याची पारख जुने जाणते मिपाकर एखाद्या जवाहीऱ्याला लाजवतील अशा पद्धतीने करतात, याचेच मला नेहमी अप्रूप आहे. माझा पहिला लेख काही दिवसांपूर्वी मिपावर प्रकाशित झाला. पदार्पणात सर्वांनी अनपेक्षितरीत्या अर्धशतकवीराचा बहुमान मिळवून दिला. सर्वच प्रतिसाद उत्साह दुणावणारे होते. अचानक कुठे तरी माशी शिंकली आणि प्रतिसादांचा रोख डू आयडी कडे वळला. कदाचित माझ्या आयडीमुळेच हा गोंधळ सुरु झाला. त्याबरोबर हाच गोंधळ माझ्या मनातही सुरु झाला. कुठली कसोटी लावली ज्यामुळे सर्वाना मी डू आयडी वाटू लागलो? मात्र, अक्षर कळले संकट टळले, नाना-माई यांच्या वंशाला दिवा मिळाला किंवा तुम्हाला ओळखले, जसे पोलीस ओळखपरेड मधून बरोबर गुन्हेगाराला ओळखून काढत्तात. अशा पद्धतीच्या प्रतिसादांमुळे मात्र माझे कुतूहल चांगलेच जागृत झाले. जरा आपल्याही ज्ञानातही काही तरी भर पडेल आणि आपल्यालाही “जवाहरी विद्यापीठ” मध्ये प्रवेश घेता येईल या विचाराने हा लेखनप्रपंच करावा वाटला. तर मग अनुभवाने जेष्ठ मिपाकरांनो, आपल्या शिष्यासाठी आपले ज्ञानभांडार खुले करा. -आपलाच नम्र गुरुविण ज्ञानप्राप्ती करणारा एकलव्य. टीप – गुरुदक्षिणा म्हणून अंगठा देण्यात दाखविण्यात येईल.

प्रतिक्रिया द्या
6936 वाचन

💬 प्रतिसाद (35)
क
कंजूस Sat, 07/23/2016 - 12:51 नवीन
फारच सरळ धोपट लेख झाला डुआइडी या तिर्कट विषयावर.मजा नाय.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/27/2016 - 07:02 नवीन
तुम्ही डू आय डी नाही हे प्रथम सिद्ध करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
संत घोडेकर Wed, 07/27/2016 - 07:31 नवीन
ते कसे करायचे? काही अग्निपरीक्षा आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/23/2016 - 12:59 नवीन
पांडु मोड अॉन ~ अॉॉSss! अचं जाल चल! पांडु मोड अॉफ
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 07/23/2016 - 13:00 नवीन
टेक्स्टबुक पाहिजे असल्यास मिपा वाचत राहावे. नवनीत अपेक्षित हवे अस्ल्यास आयडींबरोबर ओळखी वाढवाव्यात. डायरेक्ट प्रश्नपत्रिका मात्र मिळत नसते. टीपः ही गुरुची शिकवणी नाही. एक्स्पर्टाकडून पेड सल्ला आहे. फी खात्यावर मांडून ठेवली जाईल.
  • Log in or register to post comments
स
संत घोडेकर Sat, 07/23/2016 - 14:20 नवीन
ओळखी कश्या वाढवाव्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 07/23/2016 - 14:26 नवीन
ह्याचा अर्थ तुम्हाला 21 अपेक्षितच हवे आहे. रोज एकवीस आयडीना खरडवहित राम राम घालून यायचा. रोज एकवीस प्रतिसाद तरी द्यायचेच. एंट्रीनंतर किमान एकवीस आठवडे नवीन धागा टाकायचा नाही. त्यानंतरच्या दोन धाग्यात 21 दिवसाचे अंतर ठेवायचे. आपोआप ओळखी होतील. जमेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संत घोडेकर
च
चौकटराजा Mon, 07/25/2016 - 07:16 नवीन
रोह एकवीस जोडे दुसर्यास मारायचे की आपली आय्डी परशीद्द होते .हे र्‍यालंच की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नितिन थत्ते Sun, 07/24/2016 - 18:33 नवीन
"मज्यशि मय्तरी क्रनार क?" असा व्यनि शक्यतो महिला आयडींना करावा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संत घोडेकर
आ
आनंदी गोपाळ Tue, 07/26/2016 - 17:01 नवीन
मला करू नये. मी गोपाळ आहे, व सदैव आनंदी असतो. असा त्या आनंदी गोपाळचा अर्थ आहे. मय्त्री वाले लय पीयम येतात बा मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/23/2016 - 13:11 नवीन
वरिजनल आयडी काय अन डु आयडी काय, आयडीने उत्तम लेखन करावं, उत्तम प्रतिसाद लिहावेत, कौतुक करून घ्यावेत. वैचारिक वाद करावेत आणि थोडं व्यक्तिगत सोडून भांड्न करावं,आणि नाय पटलं तर चपला स्ट्यांड वरुन चपला काढाव्यात, घालाव्यात आणि चालू लागावं. :) -दिलीप बिरुटे (मिपा उत्तम जगणारा)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 07/23/2016 - 14:36 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विवेकपटाईत Sat, 07/23/2016 - 13:26 नवीन

थोडं व्यक्तिगत सोडून भांड्न करावं,

चांगले वैचारिक प्रतिसाद देण्यासाठी कोण डु आयडी घेणार. खरा आनंद दुसर्याला .... देण्यातच आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 07/23/2016 - 13:34 नवीन
सांगा बघू, माझे किती डुप्लिकेट आयडी आहेत.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sat, 07/23/2016 - 14:20 नवीन
कट्ट्याला भेटा की राव एकदा.... किंवा याच विषयी कट्टा ठेवा ....हाकानाका !
  • Log in or register to post comments
स
संत घोडेकर Sat, 07/23/2016 - 14:22 नवीन
भेटूयात की, पण कधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
मुक्त विहारि Sat, 07/23/2016 - 14:25 नवीन
"तो आला, तो रमला, आणि शेवटी इथेच टिकला ही क्रांती बरेच आयडींच्या बाबतीत घडल्याचा मी अनेक वर्ष साक्षीदार आहे." त्यामुळे आधी बरीच वर्षे वामामिपा आणि मग मिपास, असा प्रवास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
प
प्रचेतस Sun, 07/24/2016 - 16:41 नवीन
छान लिहिताय हो घोडेकर. मिपा कट्ट्यात भेटायला आवडेल.
  • Log in or register to post comments
स
संत घोडेकर Sun, 07/24/2016 - 17:00 नवीन
ठरावा कि राव एखादा कट्टा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sun, 07/24/2016 - 17:02 नवीन
पुढच्या शनिवारी संध्याकाळी पाताळेश्वर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संत घोडेकर
स
संत घोडेकर Sun, 07/24/2016 - 17:24 नवीन
वा! चालेल की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ख
खटपट्या Sun, 07/24/2016 - 17:31 नवीन
कट्टा करा फोटो पाठवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मुक्त विहारि Sun, 07/24/2016 - 18:09 नवीन
तुम्ही असे किती दिवस कट्ट्याच्या फोटोवर समाधान मानणार? आता, भारतात आलात की तुम्ही पण एक कट्टा आयोजीत करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Sun, 07/24/2016 - 18:25 नवीन
अमीत गार्डनला आमचा रोजचा कट्टा असेल. कधीही या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 07/26/2016 - 20:12 नवीन
पुण्यात असेल तर शक्य नाही. आमची मजल जेमतेम आकुर्डी पर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Tue, 07/26/2016 - 20:35 नवीन
आला होतात की. पारसिक नगर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 07/27/2016 - 04:57 नवीन
हां, हां, आठवले. (आमच्या मेंदूत एक आठवणींचा खंदक आहे, त्या खंदकात कुठेतरी ही आठवण लपली होती.आत्ता मिळाली.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Sun, 07/24/2016 - 18:59 नवीन
हे नाना माई कोण आहेत ,लैइच फेमस आहेत म्हणुन विचारले.
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Mon, 07/25/2016 - 15:38 नवीन
=((
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
प
पक्षी Mon, 07/25/2016 - 07:02 नवीन
किती तो साळसूद प्रश्न...!
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Mon, 07/25/2016 - 07:19 नवीन
सरावलेल्या हातांनाही स्वत नवीन असल्याचे का सांगावे लागते?
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 07/25/2016 - 16:36 नवीन
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 07/25/2016 - 18:02 नवीन
वेळेवर मिळाली नाही कि सुटतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अभ्या.. Mon, 07/25/2016 - 18:02 नवीन
वेळेवर मिळाली नाही कि सुटतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
मितभाषी Tue, 07/26/2016 - 19:45 नवीन
कंप
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा