Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शोभिवंत होळी

श — शब्दबम्बाळ, Sat, 07/23/2016 - 14:05
शोभिवंत होळी निरव शांततेच्या मिट्ट रात्र वेळी, आली झोपडीत माझ्या 'लाघवी' लुटारुंची टोळी वदले नकोत चिंता आता तुझ्या कपाळी, खाऊन भाजलेली माझीच गोड पोळी पाहुन तारका ते भलतेच तृप्त झाले, श्रीमंत पामराची झोपडी चंद्रमोळी करुनी दानधर्म ते पुण्यवंत झाले, परी पापसमुच्चयाने फाटली दीन झोळी जखमा करुन ताज्या ते दाविती जगाला, चितेचीही माझ्या केली शोभिवंत होळी विझले जसे 'निखारे' झाले पसार सारे, तीच तीच दुःखे कोणी कशा ऊगाळी भोगले जे ही होते लिहीले माझ्याच भाळी, सावध असा गड्यांनो येता आपुली पाळी... आशिष

प्रतिक्रिया द्या
1211 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ए
एस Sat, 07/23/2016 - 15:21 नवीन
काव्य आवडले.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Sun, 07/24/2016 - 08:15 नवीन
धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ज
ज्योति अळवणी Sat, 07/23/2016 - 16:41 नवीन
नाही समजले
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Sun, 07/24/2016 - 08:16 नवीन
परिस्थितीने पिचलेल्या गरीबाच्या दुःखाचे आपल्या स्वार्थासाठी भांडवल करणार्या राजकारणी, वार्ताहर ई. लोकांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी
ज
जव्हेरगंज Sun, 07/24/2016 - 11:13 नवीन
कडक!!
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Mon, 07/25/2016 - 09:23 नवीन
मोठ्या लोकांकडून तारीफ!! धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा