वयम् अपि कवय:॥
मक्षिकेपरि चिवट। मनी मुळी बोथट॥
काव्य पाडुनि ओषट। संवेदना दाखवि॥१॥
मांडुनि भावनांचा बाजार। घेई फुकाचा कैवार॥
यासि शतोत्तरि चार। जोडे मोजुनि मारावे॥२॥
ऊर बडवि धडधडा। सदा फोडितसे हंबरडा॥
जणु एकटाचि बापुडा। सर्वांमाजि॥३॥
प्रसिद्धीची वखवख। मुखवटे घेई सुरेख॥
साहित्यशेतीचा काळोख। उजेड म्हणोनि दाखवि॥४॥
डास उडे पखियांपरि। काजवे तार्यांपरि॥
हा निव्वळ यमके करि। म्हणोनि कवि जाणावा॥५॥
दुग्ध क्रांतीच्या नावावर गोपालकांचा व्यवसाय चौपट केलाहे अमुल ला उद्देशून आहे का? यावर आवर्जुन लिहा.मुटे साहेबांची तळमळ मला तरी कळते.ओके मान्य. पण यावर आमच्यासारख्या असंवेदनशील शहरी लोकांना कळेल अशा भाषेत प्लीज लिहा आणि आम्ही मूर्खासारख्या शंका विचारल्या तर आमच्या बुद्धीवर शंका घेवू नका. कसे आहे.. आंम्हाला पण अनेक प्रश्न पडतात. ते पडतात कारण आंम्ही पूर्णवेळ शेती करत नाही. त्यामुळे नक्की काय? कसे? असे विचारल्यानंतर "मग शेती करा आणि उत्तरे मिळवा" असे उत्तर देणे सोपे असते पण त्याने आमचे प्रश्न अनुत्तरीतच राहतात आणि (कदाचित) खरी असणारी तळमळ रडगाणे वाटू लागते. तुमच्याकडून एका अभ्यासपूर्ण लेखमालेच्या प्रतिक्षेत.