तुम्ही टी.व्ही. वर नक्की काय बघता?
प्रिय मिपाकरांनो,
गेली १०-१२ वर्षे मी अजिबात टी.व्ही. वरील कार्यक्रम बघीतलेला नाही आणि ह्यामुळे माझे काही अडलेले पण नाही.
पुर्वी टी.व्ही. बघायचो ते नॅ.जि. आणि डिस्कवरी बघण्यासाठी, पण आजकाल यु-ट्युब वर नॅ.जि अणि डिस्कवरीचे बरेच भाग उपलब्ध आहेत, त्यामुळे गेली २ वर्षे आमच्याकडे टी.व्ही. बंदच आहे.
केबल नसणारे आणि टी.व्ही. असून पण तो चालू नसलेले, डोंबोलीत आमचे एकमेव घर असावे.
पण,
कधी कुणाकडे जायचा प्रसंग आला तर, त्या घरातील व्यक्ती बराच वेळ टी.व्ही. बघत असलेल्या दिसतात.
साधारण पणे अशा घरी, मी माझे काम झाले की लगेच निघतो.
कुणाकडे रात्र भर रहायचा प्रश्र्न आला की, एखादी खोली बघून, जवळ असलेले पुस्तक वाचत बसतो.
मध्यंतरी, म्हणजे ६-७ वर्षांपुर्वी, माझ्या सख्ख्या भावाकडे गेलो होतो,खूप दिवसांनी त्याच्याकडे गेलो असल्याने एक-दोन दिवस रहायचा बेत होता.संध्याकाळी ६ च्या सुमारास त्याच्याकडे गेलो.
चहा आणि अंघोळ होई पर्यंत, ७ वाजले.
आता म्हटले मस्त गप्पा मारू या.
तर तो म्हणाला थांब, आता ही फलाणा-ढेकणा मालिका सुरु आहे, ती बघतो, मग बोलू.
मालिका बघता-बघता जाहीराती लागल्या की त्या वेळांत तो इतर ठिकाणी काय-काय सुरु आहे, ते पण चाळणे चालू होतेच.
त्याचे हे खेळ चालू असतांना, माझे २ पेपर वाचून झाले आणि एक मासिक पण चाळून झाले.
साडे सात वाजता, त्याच्या बायकोने टी.व्ही.चा रिमोट आपल्या ताब्यात घेतला आणि मी माझ्या साडवाला फोन केला.त्याने घरी यायचे आमंत्रण दिले आणि मी भावाकडे जेवून त्याच्याकडे जायचे ठरवले.
साडे आठ पर्यंत जेवण झाले ते पण टी.व्ही. बघता बघता.
अध्ये-मध्ये भावाशी जुजबी बोलणे चालू होतेच.
नऊ वाजता साडू घ्यायला आला आणि मी सडवाकडे रहायला गेलो.
रात्री साडे नऊला आमची जी गप्पांची मैफिल (अपेय पान विरहित) जमली ती पहाटे पहाटे ४-५ च्या सुमारास संपली.मध्येच एकदा गाडीवर भुर्जी-पाव पण खाऊन झाला.
हे अनुभव बर्याच ठिकाणी आले, आमच्या साडू सारखी माणसे अपवादात्मक.
आता कुणाकडे रहायला जायचे असले की, आधी मी विचारतो,"तुम्ही मालिका बघता का?"
उत्तर होकारार्थी आले की, आम्ही सरळ हॉटेल शोधायला लागतो.
एखादी रूम बूक करून तिथेच नातेवाइकांना बोलावतो.निदान त्या हॉटेलमधील टी.व्ही. तरी आपल्याला बंद करता येतो.
व्यत्यय न येता, कामाची बोलणी होतात आणि त्यांना मालिका बघायची घाई असल्याने ते लगेच निघतात पण.
पुर्वी मी टी.व्ही. वर क्रिकेटचे सामने बघत असे.
मी मस्त पैकी पुस्तक वाचता-वाचता क्रिकेट बघत असायचो. एखादी विकेट पडते, मी पुस्तकातून डो़के काढतो, तर लगेच जाहीरात सुरु.हायलाईट दाखवे पर्यंत उगाच ३-४ जाहीराती बघायला लागायच्या.
मालिकेत तर दर २-३ मिनिटांनी एकमेकांची तोंडेच दाखवतात.
बातम्यां मध्ये मुळ बातमी सोडून फाफट्पसाराच जास्त असतो आणि त्या बातम्या दुसर्या दिवशी पेपर मध्ये वाचता येतातच की.
सिनेमे न बघता आपण जाहीराती बघता-बघता सिनेमा हुडकत असतो.
म्हणूनच मला हा एक प्रश्र्न पडला आहे की, आलेल्या पाहूण्यांना वेळ न देण्या इतपत तुम्ही टी.व्ही. वर नक्की काय कार्यक्रम बघता?
💬 प्रतिसाद
(92)
स
सामान्य वाचक
Wed, 07/27/2016 - 08:22
नवीन
म्हणून आम्ही कुणाच्या घरी जात नाही किंवा कुणाला घरी बोलावत नाही। ☺
विनोद सोडून द्या। पण खरीच अशी परिस्थिती आहे
मालिका पाहता पाहता च पाहुण्यांशी गप्पा होतात त्यापण सिरीयल बद्दल च
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 07/27/2016 - 08:23
नवीन
इतर टेलीविजन वर काय बघतात ते जाणून घेऊन तुमचा नक्की काय फायदा होणारे ते समजले तर बरे होईल ;)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 07/27/2016 - 08:31
नवीन
समान शीले समान व्यसने मैत्री होतेच होते, असा आमचा स्वानुभव आहे.
आमच्या सारखीच, त्या येड्या खोक्याच्या नादी न लागलेली, किती मानव अद्याप भुतलावर आहेत, त्यांना शोधत आहे.
तुझ्या त्या पोकिमॅनच्या धाग्यामुळे, पण तुला फयदा झाला असेलच की.
आम्ही त्या खेळाच्या नादी नाही, हे तर तुला नक्कीच समजले असेलच.
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 07/27/2016 - 08:35
नवीन
तुम्ही पोकेमोन खेळता का असे मी विचारले नव्हते त्या धाग्यात ;)
असो .
समान मित्र शोध मोहिमेला शुभेच्छा ;)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 07/27/2016 - 08:37
नवीन
धन्यवाद.
तुमच्या अशा शुभेच्छांचे, आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 07/29/2016 - 09:45
नवीन
मिपावर येवुन हे असे प्रेमसंवाद वाचायला मला फार्फार आवडते :))))
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 07/29/2016 - 10:11
नवीन
ते ठाकूर आळीतले तर आम्ही डोंब आळीतले, त्यामुळे ते आणि आम्ही सख्खे शेजारीच आहोत.
नळावरची भांडणे, आम्ही दोघेही जास्त मनावर घेत नाही.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 07/29/2016 - 10:13
नवीन
मिपा म्हणजे सार्वजनीक नळ?? =))
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 07/29/2016 - 10:17
नवीन
कधी कधी झालंय असं.
कुणी जिलब्यांचा रतीब पण टाकत असतातच की.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 07/29/2016 - 11:05
नवीन
मिपा खासगी नळ आहे रे !
एकदा 'अणूबव' आलाय ना तुला =))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 07/29/2016 - 11:34
नवीन
शिव शिव शिव
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Fri, 07/29/2016 - 17:59
नवीन
आज नळावर भजनाचं पाणी वाहतंय बदाबदा. अंघोळ करुन घ्या...
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 07/27/2016 - 08:24
नवीन
मी पूर्वी टी व्ही वर बरेच पिक्चर बघायचो, मग तेच तेच रेपीट व्हायला लागल्यावर सोडून दिले.
बाकी, कोणतीही गोष्ट वाया जात नाही, दॄष्टी पाहिजे, त्या रटाळ डायलोग्समधून कधीकधी एखादा चांगला पंच मिळून जातो.
बाकी, चांगली पुस्तके असतील तर मला माणसांची पण गरज पडत नाही.
- Log in or register to post comments
स
समी
Wed, 07/27/2016 - 08:26
नवीन
:)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 07/27/2016 - 08:33
नवीन
+ १
आजकाल बरेच सिनेमे "यु-ट्युब" वर बघायला मिळतात आणि ते पण जाहीरातींशिवाय.
- Log in or register to post comments
म
मंदार कात्रे
Wed, 07/27/2016 - 08:38
नवीन
निदान एपिक चॅनेल साठी तरी टीव्ही पाहणे मस्ट आहे
बाकी इतर फालतू चॅनेल वरचे अतिमहाफालतू कार्यक्रम न बघणे हा उत्तम पर्याय आहे
क्रिकेट मॅचेस बघतो अधून मधून , प्रो-कबड्डॅ पण मस्त
नो आयपीएल
पूर्वी बीबीसी / डिस्कव्हरी / नॅट्जियो / एन एच के / डोय्जे वेला वर खूप चांगले कार्यक्रम असायचे
अल-जझीरा च्या डॉक्युमेन्टरीज चांगल्या असतात
एन एच के / डोय्जे वेला / आर टी / एबीसी इत्यादि खूप चांगल्या वाहिन्या दूरदर्शन च्या फ्री डिश वर उपलब्ध आहेत , त्यामुळे वन टाइम २०००/- खर्च करून डी डी फ्री डिश बसवून घेणे हा तुलनेने सोपा व बिनखर्चाचा पर्याय आहे .
परन्तु एपिक चॅनेल आणि घरातल्याना हव्यात म्हणून मराठी मालिकांसाठी १४०/- रुपयांचा टाटा स्काय चा पॅक मारतो. त्यात श्री शन्करा टीव्ही आणि तिरुपति बालाजी चे दोन उत्क्रूष्ट चॅनेल फ्री मिळतात
बाकी युट्युब आणि टॉरेन्ट बाबा की जय हो!
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Wed, 07/27/2016 - 08:41
नवीन
कुणी ही आमच्याकडे आलं (अगदी दूध बिल घ्यायला आलेले दादादेखील) आणि टीव्ही सुरु असला तर आम्ही टीव्ही बंदच करतो. कधी कधी येणारेच टीव्ही मध्ये इतके गुंतून पडतात की आम्हीच एकमेकांची तोंडे बघत बसतो. आमच्या घरी संध्याकाळी 8:30 ते रात्री 10:00 या दीड तासातच टीव्ही सुरु असतो. बाकी संपूर्ण वेळ बंदच असतो. शनिवारी - रविवारीदेखील आम्ही घरी असलो तरी दिवसभर टीव्ही सुरु केला जातच नाही. संध्याकाळी 8 ते 10:30 पर्यंत फक्त! बाकी इतर वेळ मी पुस्तक - पेपर वगैरे वाचतो किंवा घरातली कामे करतो. बाहेर असलो तर प्रश्नच येत नाही. मी कुणी माझ्याशी बोलत असेल तर मोबाईलमध्ये अजिबात डोकावत नाही. तसंही मी मोबाईल फक्त कॉल्स आणि इमेल्ससाठीच वापरतो. त्यामुळे मला एकदा चार्ज केल्यावर दोन दिवस बेटरी पुरते. व्हॉट्सएप वापरत नाही. इंस्टालच केलेले नाही.
पण मी आज-काल 'काहे दिया परदेस' बऱ्यापैकी नियमितपणे बघतो. 'खुलता कळी खुलेना' च्या पहिल्याच एपिसोडमध्ये नायकाला लग्नात सात फेरे घेताना नायिका गरोदर असल्याचं कळतं. मग हा सस्पेन्स बघावाच लागतो. :-)
व्हॉट्सएप नसल्याने खूप वेळ वाचतो असे निरीक्षण नोंदवतो.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 07/27/2016 - 08:49
नवीन
मी पण "व्हॉट्सएप" वर जास्त वेळ वाया घालवत नाही.
दुपारी जेवण झाले की २०-२५ मिनिटे आणि संध्याकाळी १०-१५ मिनिटे पुरतात.
कधी-कधी तर २-३ दिवस पण स्मार्ट फोन ह्या कामासाठी वापरत नाही.
आमचे बाबा महाराज म्हणतात,"यंत्रे मानवासाठी असतात.मानव यंत्रात गुंतला की वेळेचा दुरुपयोग व्हायला सुरुवात होते."
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 07/27/2016 - 08:58
नवीन
....की आम्हीच एकमेकांची तोंडे बघत बसतो."
अशावेळी सरळ विचारायचे, "तुम्ही मला भेटायला आलात? की टी.व्ही. वरचे कार्यक्रम बघायला?"
- Log in or register to post comments
र
रातराणी
Wed, 07/27/2016 - 08:46
नवीन
मी फ्रेंडस सुरू केलय परत रिपीट रिपीट :)
फक्त विनोदी मालिकाचं पाहते मोस्ट्ली. दॅट सेवन्टीज शो, साइनफिल्ड, द ऑफिस, फ्रेजर, एवरी बडी लवज रेमंड, चियर्स, मॉडर्न फॅमिली हेचं सुरू असत लूपमधे. हाउ आय मेट युअर मदर फक्त बार्न्यी स्टिंनसन असेल तेवढे सीन बघते.
ड्रामा मधे फक्त हाउस ऑफ कार्ड्स आणि वेस्ट विंग आवडलं आहे आता पर्यंत. डाउनटाउन एबी ओके ओके आहे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 07/27/2016 - 09:36
नवीन
two and a half men नाही????
- Log in or register to post comments
र
रातराणी
Wed, 07/27/2016 - 10:51
नवीन
अर्र्र ते राहून गेलं लिहायचं. चार्ली शीनच्या नखाची सुद्धा सर नाही आली एश्न्ट्न कुशरला आणि मग माझा इंटेरेस्ट संपला. :)
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Wed, 07/27/2016 - 10:18
नवीन
टक्या, coupling too...!
- Log in or register to post comments
र
रातराणी
Wed, 07/27/2016 - 10:53
नवीन
हे नाही पाहिलं. बीबीसीवरचचं द आय टी क्राउड पण बर होतं. काही काही एपिसोड्स भारी होते.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 07/27/2016 - 14:52
नवीन
अर्रे coupling तर भन्नाट =))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 07/27/2016 - 14:53
नवीन
rules of engagement??
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Fri, 07/29/2016 - 11:20
नवीन
रातराणी,
फ्रेंड्स, एवेरिबडी लव्स रेमंड मी कितीही वेळा रिपीट बघू शकते. एवरग्रीन.
ऑफीस आता नाही पहात. तेही आवडायचं. अजुन सुरू आहे का ते?
हाउस ऑफ कार्ड्स केवळ सुपर्ब!!
downton abey मला तरी आवडतं. कदाचीत पीरियड ड्रामा आवडत असल्यामुळे असेल पण मस्तं वाटतं. रिवेंज बघितली नसेल तर नक्की पहा. खूप छान आहे.
- Log in or register to post comments
म
मंदार कात्रे
Wed, 07/27/2016 - 08:52
नवीन
http://www.freedish.in/p/dd-direct-plus-tv-channels-list-updated.html
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Wed, 07/27/2016 - 09:20
नवीन
मस्तच..तुमच्या सारखी माणसं दुर्मिळच. आम्ही लग्ना अगोदर फ्रेन्डस, प्रिझन ब्रेक, गेम ऑफ थ्रोन्स तसेच इंग्रजी चित्रपट पाहायचो...लग्नानंतर आम्ही श्री आणि जाणवी चे रामायण, आस संसार सुरेख बाई तसेच मराठी चित्रपट तल्लीन तेने पाहतो...मुल झाल्यानंतर कार्टून पाहत राहीन आस तरी सध्या दिसतंय...बाकी मिपा आणि माबो सारख्या स्थळानी मला बराच आधार दिला असेच म्हणेन.
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Wed, 07/27/2016 - 09:21
नवीन
यावरून महाभारत पण करतो.....मज्जा असते !
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
Wed, 07/27/2016 - 09:54
नवीन
Only "times now"
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 07/27/2016 - 09:57
नवीन
मी टिव्हीवर माझा कॉम्प्यूटर पाहतो.
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 07/27/2016 - 13:52
नवीन
मी कॉम्प्युटर वर टिव्ही बघतो.
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 07/27/2016 - 14:03
नवीन
मी स्मार्ट एलईडीवर कॉम्प्यूटर आणि टिव्ही दोन्ही बघतो
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 07/27/2016 - 10:04
नवीन
मी झी मराठीच्या शिर्यलांचा मोठ्ठा फॅन आहे.
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 07/27/2016 - 15:16
नवीन
रात्रीस खेळ चाले बघता काय..?
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 07/27/2016 - 19:00
नवीन
कसला खेळ चाल्तो त्यात अजून कळलेलं नैये.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 07/27/2016 - 19:51
नवीन
बरेच प्रयत्न करूनही बूथ ना दिसल्याने मी तो नाद सोडला
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 07/27/2016 - 21:34
नवीन
मध्ये फीलर सारखे एपिसोड आले बरेच. पण आता काहीतरी चालूए...
एक खून, एक बेपत्ता आणि घरात आलेला एक पोलीस..एक दोन भागांपासून मजा येतीये जरा.
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Wed, 07/27/2016 - 10:33
नवीन
लग्नाला ३.५ वर्षे झालेली आहेत. पण अजुन TV विकत घेतला नाही.
घरी लॅपटॉपवर GOT, POI, BURN NOTICE, ARROW वेग्रे पाहतो. नवा सिजन आला की पहिलेपासुन सर्व रिपिट.
पाहुणॅ आश्चर्याने विचारतात, "अय्या TV नाही का? बरा कंट्रोल आहे तुमचा."
मागचा महिनाभर घरी(माहेरी) होतो तेव्हा "काहे दिया परदेस" पाहायचो आज्जीमुळे. छान वाटली शिरेल.
- Log in or register to post comments
ग
गणेश उमाजी पाजवे
Wed, 07/27/2016 - 10:37
नवीन
खर म्हणजे हि यंत्र आणि सुविधा आपल्यासाठीच बनलेल्या आहेत त्यामुळे त्या किती आणि कशा वापराव्या हे आपल्याच हातात आहे. असो ..मी टीव्ही वर मराठी सिरिअल्स तर चूकुनही लावत नाही आणि आमच्या मातोश्री बघत असतील तर काहीतरी वाचणे किंवा कॉम्पुटर वर काहीतरी शोधात बसणे यात वेळ घालवतो...नेट जिओ, डिस्कव्हरी, डिस्कव्हरी सायन्स, हिस्टरी टीव्ही 18 (सर्वात आवडते), टी.एल.सी. ट्रॅव्हल अँड लिविंग, आणि सगळी इंग्लिश मुविंची चॅनेल यामुळे सध्या तरी टीव्ही बघावासा वाटतो.झी 24 तास आणि ए.बी.पी माझा वरचे शेतीविषयक कार्यक्रम सुद्धा बघतो...झी 24 तास वर सकाळी 11:30 वाजता सुवर्ण कोकण म्हणून एक कार्यक्रम लागतो त्यात कोकणात विविध प्रकारची शेती व व्यवसाय करून कशा प्रकारे पैसे मिळवता येतो ते दाखवतात.तुम्ही म्हणता तसे युट्युब वर भाग येतात पण त्याला वेळ लागतो. कधी कधी तर येतच नाहीत.डिस्कव्हरी वरचे Man Vs Wild , Dual Survival , हिस्टरी टीव्ही 18 वरचे Ancient Aliens , Pawn Stars , Baggage Battles , Hunting Hitler अशा एपिसोड्स मुळे सध्या तरी मी टीव्ही सहन करू शकतो ;)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 07/27/2016 - 10:50
नवीन
त्यांची वेब साईट पण आहे.
http://suvarnakonkan.com
- Log in or register to post comments
म
मित्रहो
Wed, 07/27/2016 - 13:51
नवीन
गेली आठ वर्षे आमच्याकडे टिव्ही आहे पण केबल किंवा डीश वगेरे नाही असे आहे. मुल त्यांचे कार्टून यु ट्युब वर बघतात. मी क्रिकेटच्या मॅचेस ऑनलाइन बघतो. काही मिनिटे उशीरा असते पण ठीक आहे. आधीची यु ट्युब अॅप टिव्हीवर चालायची नवीन अॅप चालत नाही त्यामुळे लॅपटॉप जोडावा लागतो. बायको मालिका तिच्या फावल्या वेळात बघते. सर्वांना सारे बघता येते. मोबाइल, लॅपटॉप पासवर्ड असल्याने मुलांनी केंव्हा बघायचे ते ठरविता येते. तरीही समस्या येतात, कधी गोंधळ होतो, भांडणे होतात. परत केबल सुरु करायचा अजिबात विचार नाही. मराठी चित्रपटांच्या बाबतीत मात्र समस्या होते. बरेच चांगले मराठी चित्रपट ओरीजनल लिगल स्वरुपात ऑनलाइन उपलब्ध नाहीत.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Wed, 07/27/2016 - 14:31
नवीन
तुमच्या टी व्ही चा आवाज जरा कमी करा व प्रशन सलग विचारा......
मला संपविण्याचे हे राजकीय षडयंत्र आहे.....
अहो आता मला बोलू द्याना तुमच्या वेळी मी गप्प होतो ना,,,,?
रॉबर्ट माल आनेकी खबर किसने दी पुलीसको..... ?
मी सगळे सेंद्रीय खत वापरले .. म्हणताना यकरी दोन क्विण्टल पीक गीउन आहे.
याड लागलं याड लागलं
ख्यान आय खिस यू डालिंग....
फार्मा सेक्टरमे पिछले चार महिनेमे गिरावट लगातार देखी है......
अॅन्ड दिस इज ऑल अबोउट क्यापटन कूल..... ही इज द बेस्ट फिनिशर.....
थट्टी फोट्टी अॅडवानटेज विनस ...
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 07/27/2016 - 14:48
नवीन
गेले कित्येक दिवस टीव्ही बघितलेला नाही. जेव्हा बघतोच तेव्हा सर्वात जास्त रद्दी चित्रपट बघत बसतो असे बायकोचे मत आहे :)
- Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर
Fri, 07/29/2016 - 12:32
नवीन
तुमचं-आमचं सगळं अगदी सेम असतं,
म्हणूनच तर तुमचं-आमचं झक्क जमतं!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 07/28/2016 - 09:16
नवीन
+ १
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Wed, 07/27/2016 - 15:33
नवीन
टीवी वरचे काही कार्यक्रम छानच असतात फक्त live बघू नये. मी नेहमी रेकॉर्ड करून नंतर जाहिराती फॉर्वर्ड करून कार्यक्रम पाहते. आपल्या सोइीने मग टीवी पाहता येतो. एका तासात तीन टीवी शोज उरकता येतात. मी ये है मोहब्बातें, तारक मेहेता आणि बडी दूर से आए है पाहते.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 07/27/2016 - 15:39
नवीन
माझ्याकडे टीव्ही नाही. एक घेतला त्याचा मॉनिटर करून ऑफिसात ठेवला. घ्यावा अशी तमन्ना पण नाहीये.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 07/27/2016 - 15:49
नवीन
भाटीयांकडे आहे
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »