Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुम्ही टी.व्ही. वर नक्की काय बघता?

म
मुक्त विहारि
Wed, 07/27/2016 - 07:59
🗣 92 प्रतिसाद
प्रिय मिपाकरांनो, गेली १०-१२ वर्षे मी अजिबात टी.व्ही. वरील कार्यक्रम बघीतलेला नाही आणि ह्यामुळे माझे काही अडलेले पण नाही. पुर्वी टी.व्ही. बघायचो ते नॅ.जि. आणि डिस्कवरी बघण्यासाठी, पण आजकाल यु-ट्युब वर नॅ.जि अणि डिस्कवरीचे बरेच भाग उपलब्ध आहेत, त्यामुळे गेली २ वर्षे आमच्याकडे टी.व्ही. बंदच आहे. केबल नसणारे आणि टी.व्ही. असून पण तो चालू नसलेले, डोंबोलीत आमचे एकमेव घर असावे. पण, कधी कुणाकडे जायचा प्रसंग आला तर, त्या घरातील व्यक्ती बराच वेळ टी.व्ही. बघत असलेल्या दिसतात. साधारण पणे अशा घरी, मी माझे काम झाले की लगेच निघतो. कुणाकडे रात्र भर रहायचा प्रश्र्न आला की, एखादी खोली बघून, जवळ असलेले पुस्तक वाचत बसतो. मध्यंतरी, म्हणजे ६-७ वर्षांपुर्वी, माझ्या सख्ख्या भावाकडे गेलो होतो,खूप दिवसांनी त्याच्याकडे गेलो असल्याने एक-दोन दिवस रहायचा बेत होता.संध्याकाळी ६ च्या सुमारास त्याच्याकडे गेलो. चहा आणि अंघोळ होई पर्यंत, ७ वाजले. आता म्हटले मस्त गप्पा मारू या. तर तो म्हणाला थांब, आता ही फलाणा-ढेकणा मालिका सुरु आहे, ती बघतो, मग बोलू. मालिका बघता-बघता जाहीराती लागल्या की त्या वेळांत तो इतर ठिकाणी काय-काय सुरु आहे, ते पण चाळणे चालू होतेच. त्याचे हे खेळ चालू असतांना, माझे २ पेपर वाचून झाले आणि एक मासिक पण चाळून झाले. साडे सात वाजता, त्याच्या बायकोने टी.व्ही.चा रिमोट आपल्या ताब्यात घेतला आणि मी माझ्या साडवाला फोन केला.त्याने घरी यायचे आमंत्रण दिले आणि मी भावाकडे जेवून त्याच्याकडे जायचे ठरवले. साडे आठ पर्यंत जेवण झाले ते पण टी.व्ही. बघता बघता. अध्ये-मध्ये भावाशी जुजबी बोलणे चालू होतेच. नऊ वाजता साडू घ्यायला आला आणि मी सडवाकडे रहायला गेलो. रात्री साडे नऊला आमची जी गप्पांची मैफिल (अपेय पान विरहित) जमली ती पहाटे पहाटे ४-५ च्या सुमारास संपली.मध्येच एकदा गाडीवर भुर्जी-पाव पण खाऊन झाला. हे अनुभव बर्‍याच ठिकाणी आले, आमच्या साडू सारखी माणसे अपवादात्मक. आता कुणाकडे रहायला जायचे असले की, आधी मी विचारतो,"तुम्ही मालिका बघता का?" उत्तर होकारार्थी आले की, आम्ही सरळ हॉटेल शोधायला लागतो. एखादी रूम बूक करून तिथेच नातेवाइकांना बोलावतो.निदान त्या हॉटेलमधील टी.व्ही. तरी आपल्याला बंद करता येतो. व्यत्यय न येता, कामाची बोलणी होतात आणि त्यांना मालिका बघायची घाई असल्याने ते लगेच निघतात पण. पुर्वी मी टी.व्ही. वर क्रिकेटचे सामने बघत असे. मी मस्त पैकी पुस्तक वाचता-वाचता क्रिकेट बघत असायचो. एखादी विकेट पडते, मी पुस्तकातून डो़के काढतो, तर लगेच जाहीरात सुरु.हायलाईट दाखवे पर्यंत उगाच ३-४ जाहीराती बघायला लागायच्या. मालिकेत तर दर २-३ मिनिटांनी एकमेकांची तोंडेच दाखवतात. बातम्यां मध्ये मुळ बातमी सोडून फाफट्पसाराच जास्त असतो आणि त्या बातम्या दुसर्‍या दिवशी पेपर मध्ये वाचता येतातच की. सिनेमे न बघता आपण जाहीराती बघता-बघता सिनेमा हुडकत असतो. म्हणूनच मला हा एक प्रश्र्न पडला आहे की, आलेल्या पाहूण्यांना वेळ न देण्या इतपत तुम्ही टी.व्ही. वर नक्की काय कार्यक्रम बघता?
वर्गीकरण
तुम्ही टी.व्ही. वर नक्की काय बघता?

प्रतिक्रिया द्या
17358 वाचन

💬 प्रतिसाद (92)
अ
अभ्या.. Wed, 07/27/2016 - 18:11 नवीन
तो पॉन्डस डबा चालेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
भ
भाग्यश्री कुलकर्णी Wed, 07/27/2016 - 16:01 नवीन
मी काहीही बघु शकते. समोर चालु असेल ते.नसले तरी फरक पड्त नाही. हे सर्व उपकरणाना लागु होते.मला काहीही चालते.समोरचा ज्या विषयावर बोलू शकतो त्यावर बोलायला मला काही अडचण नाही.सो सिरियल प्रेमींशी बोलण्यापुरते जुजबी ज्ञान आहे.
  • Log in or register to post comments
स
साधा मुलगा Wed, 07/27/2016 - 18:09 नवीन
आमच्या कडे tata sky आहे, त्यावर आम्ही a la carte वापरून फक्त मराठी आणि इंग्लिश चॅनल पाहतो. ८ वाजता everybody loves raymond मग friends किव्वा two & half men वगैरे मग आई मराठी लावते नन्तर रात्री उशिरा वेळ मिळाला तर जिम्मी किंमेल बघतो. हिंदी वाहिन्या आणि हिंदी वृत्तवाहिन्या घेतलेल्या नाहीत आणि चुकून सुद्धा बघत नाही. मराठी वृत्तवाहिन्या जर काही महत्वाची बातमी असेल किव्वा स्पोर्ट्स विषयी असेल तर बघतो. हल्ली आईने चॅनल बदलू दिला तर कबड्डी पण चालू असते मध्ये मध्ये. teenager होतो तेव्हा M , V किव्वा तत्सम गाणी वाले चॅनल बघायचो. तेव्हा roadie आत्मीयतेने पाहायचो आता तिथे पोरापोरींच्या लफद्याची मालिका असतात. अरे कुठे नेवून ठेवला M tv माझा! बाकी GOT चा एपिसोड सोमवारी झकत online बघावा लागतो नाहीतर व्हात्साप्प आणि फेसबुक वर स्पोईलर येतात. आई वडील भरपूर मराठी मालिका बघतात.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 07/27/2016 - 18:51 नवीन
आमच्याकडे दोन टीव्ही आहेत. एकावार सकाळपासून संध्याकाळ पर्यंत बातम्या (वडील होते तेव्हा) आणि दुसर्‍यावर सतत पोगो आणि तत्सम. त्यामुळे....:(
  • Log in or register to post comments
स
सुंड्या Wed, 07/27/2016 - 18:53 नवीन
माझेही १०-१२ वर्षांपासून 'मूर्ख डब्बा' पाहणे बंद आहे. मुख्य कारणे- प्रत्येक कार्यक्रमात ते रसभंग करणारे ब्रेक्स आणि कमी होत जाणारी कार्यक्रमांची गुणवत्ता, तो 'सेटोप बॉक्स' प्रकार त्याचे वेगवेगळे रिचार्ज आणि टीवी-सेटोप बॉक्सच्या रिमोटस मधली सर्कस. वाढत्या लॅपटॉप-नेटच्या वापराने टीवी नावाची वस्तू अडगळीत. चुकून एखद्यावेळेस टीवी बघण्याची वेळ ओढावते तेव्हा फक्त- Nat.Geo., डिस्कव्हरी, डिस्कव्हरी सायन्स, हिस्टरी टीव्ही 18 इत्यादी सारख्या वाहिन्या बघण्याचा प्रयत्न करतो. बाकी इंडिअन मूर्ख डब्ब्या बद्दल माझे मत .
  • Log in or register to post comments
स
सत्याचे प्रयोग Wed, 07/27/2016 - 19:23 नवीन
आम्ही दूरदर्शनवर काय पाहतो हे आसपास कोण आहे त्यावर अवलंबून असते . म्हणजे एकटा असेल तर आस्था, धर्मात्मा इ. एकटा असल्याने धार्मिक कार्यक्रम विनाअडथळा ऐकता पाहता येतात. तर सौ. घरात असल्यावर सास बहू तर बच्चे कंपनी असल्यावर कार्टून. मला दूरदर्शनच्या बाबतीत एकांत मिळतच नाही त्यामुळे आस्था धर्मात्मा वाट्याला येत नाहीत बादवे दूरदर्शनचे कार्यक्रम नेटवर नंतर पाहणे म्हणजे आजचे वर्तमानपत्र उद्या वाचण्यासारखे वाटते.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 07/27/2016 - 19:26 नवीन
Nowadays Not watching TV is coool thing yaa
  • Log in or register to post comments
स
साहेब.. गुरुवार, 07/28/2016 - 13:03 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
संदीप डांगे Wed, 07/27/2016 - 20:07 नवीन
पाहुणे आले तरी टीवीला चिकटून बसणारे बघितले की वाटतं 'दे आर हॅन्ग्ड् टिल डेथ'
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 07/27/2016 - 22:25 नवीन
माझ्याकडेही टी.व्ही. नाही. नेटफ्लिक्स, हुलु इत्यादी काही नाही. त्यामुळे पाहुणे आल्यावर आम्ही त्यांच्याशी गप्पाच मारतो. :) अधूनमधून वेळ असला तर क्वचित यू-ट्युबवर काहीतरी पाहण्यात येते. तुम्ही लिहिलं आहे तसंच, टी.व्ही. न पाहिल्यामुळे काही अडलेलं नाहिये.
  • Log in or register to post comments
स
साती गुरुवार, 07/28/2016 - 04:19 नवीन
मी पण कित्येक वर्षांत टिव्ही फारसा पाहिलेला नाही. सासरी किंवा माहेरी गेल्यास येता जाता मालिका दिसतात्,तेवढ्याच. तुम्ही लिहिल्याप्रमाणे उत्तमोत्तम माहितीपर डिव्हीडीज, मुलांसाठी चांगले कार्टून्स यांच्या सिडीज आणून ठेवल्यात आणि कधीतरी मुलांना तासभर ते लावून देते. मुलांच्या उन्हाळी सुट्टीत मात्र टाटास्काय सर्विस चालू करून घेऊन किड्स पॅक घालते. त्यावेळी आमच्या गावातल्या टळटळीत उन्हात मुलांनी फिरण्यापेक्षा टिव्ही पाहिलेला बरा. अश्या टिव्ही चालू असण्याच्या काही महिन्यांत नवरा केव्हातरी रात्रीच्या न्यूज बघतो आणि मी कुकरी शोज. मला नापतोल सारखे वेगवेगळे प्रॉडक्टस विकणारे कार्यक्रम त्यातल्या विचित्र बडबडीमुळे फार मजेशीर वाटतात. त्यामुळे एकही वस्तू विकत घेत नसले तरी हे प्रमोशनल कार्यक्रम क्वचित बघते.
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू गुरुवार, 07/28/2016 - 07:05 नवीन
दिवसभर कामाच्या वेळात मिपाकर पडीक असलेल्या टवाळांकरून टीव्हीमुळे वेळ वाया जातो हे वाचून अंमळ मजा आली.. बाकी असले धागे काढून व त्याला प्रतिसाद देऊन तुम्ही काय करता ?
  • Log in or register to post comments
द
देशपांडे विनायक गुरुवार, 07/28/2016 - 08:00 नवीन
खरा जुना प्रश्ण आहे हा @ म्हणूनच मला हा एक प्रश्र्न पडला आहे की, आलेल्या पाहूण्यांना वेळ न देण्या इतपत तुम्ही टी.व्ही. वर नक्की काय कार्यक्रम बघता? मला वाटत तुम्हाला पाहुण्यांना वेळ न देण्याबद्दल बोलावयाचे आहे टी व्ही पाहणारे बहुमतात आहेत आणि पाहुण्यांना वेळ न देणारेही त्यामुळे तुमच खरं दुखणं '' पाहुण्यांना वेळ न देणारे लोक '' याचा राग तुम्ही टी व्ही वर काढत आहात असं माझ मत झाले आहे @ समान शीले समान व्यसने मैत्री होतेच होते, असा आमचा स्वानुभव आहे. माणूस संगतीला आणि पंगतीला असला म्हणजे समजतो असाही अनुभव तुम्ही घेतला असेलच तुम्हाला संगतीचे आणि पंगतीचे कसे निमंत्रण दिले म्हणजे स्विकारता ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/28/2016 - 08:26 नवीन
व्यनि केलात तरी पण चालते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडे विनायक
न
नीळा गुरुवार, 07/28/2016 - 09:04 नवीन
मी फक्त एकच शो पहातो तारक मेहता अजीबात डोक्याला ताप नाय कधी कधी सेलेब्रेटीज येऊन स्वतःचीच जाहीरात करून काव आणतात पण मजा येते ईथे कोणी पाहात नाहीका ऊल्टाचष्मा?
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 07/28/2016 - 12:22 नवीन
ईथे कोणी पाहात नाहीका ऊल्टाचष्मा?
..मैं हूं ना !!! मलाही खूप आवडतं. फील गुड सीरियल आहे. डोक्याला ताप नाही. त्या सर्व गोकुलधाम वासियांची आपसातली केमिस्ट्री मस्तं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीळा
इ
इशा१२३ गुरुवार, 07/28/2016 - 13:47 नवीन
माझ्याकडेही आहेत ना तारकमेहताला प्रेक्षक.दोन्ही मूल आवडीने बघतात वेळ मिळाला की.बाकी मला आणि नवर्याला ट्रेव्हल एक्स पी पहायला आवडते.बाकी बघायला फार काहि वेळ नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीळा
ग
गणामास्तर गुरुवार, 07/28/2016 - 09:15 नवीन
आम्ही तर लै काय काय बघतो. झाडून सगळ्या क्रिकेट च्या मॅच, झालचं तर विम्बल्डन आणि कधी कधी फुटबॉल चे सामने. सध्या AXN वर शेरलॉक चा रिपीट टेलिकास्ट चालू आहे तो पण बघतोय. मधेच प्रिसन ब्रेक पण बघतो. एपिक चॅनल वरचे 'राजा,रसोई और अन्य कहानियाँ', देवदत्त पटनायकांचे 'देवलोक' आणि इतर काही कार्यक्रम सुद्धा बघतो. travel xp चॅनल वरती strictly street म्हणून एक कार्यक्रम लागतो त्यात भारतातील वेगवेगळया ठिकाणचे खायचे भारी भारी पदार्थ दाखवतात ते बघतो. टोरंट वरून उतरवलेल्या मालिका, सिनेमे सुद्धा आम्ही पेन ड्राइव्ह मध्ये टाकून टीव्ही वरचं पाहतो. अजून जमेल तशी भर घालतो काय काय पाहतो याची. आणि हो , हे सगळं आम्ही घरात कुणी पाहुणे आलेले असताना करत नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 07/28/2016 - 14:54 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
श
श्रीरंगपंत गुरुवार, 07/28/2016 - 12:16 नवीन
टिव्हीवर दिसणारे चांगले कार्यक्रम हे युट्युब वर अथवा दुसऱ्या ठिकाणी पण दिसतात त्यामुळे टिव्हीची गरज भासली नाही. टिव्ही नसल्यामुळे घरी आलेल्या नातेवाइकांबरोबर अथवा पाहुण्यांबरोबर यथेच्छ गप्पा मारता येतात आणि घरच्यांबरोबर दिवस / संध्याकाळ अगदी मजेत घालवता येते हा सगळ्यात मोठा फायदा. तसेच घरी असताना वाचन अथवा घराच्या इतर बारीक सारीक कामांना व्यवस्थित वेळ देता येतो.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 07/28/2016 - 13:26 नवीन
बिंगोबा????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंगपंत
ज
ज्ञानव गुरुवार, 07/28/2016 - 12:46 नवीन
आमच्याकडे टीव्हीच नाही. पण यु ट्यूबवर आणि इतर काही संकेत स्थळांवर दर्जेदार इंग्रजी सिनेमा, लघुपट दर शुक्रवारी पाहतो. चैन आहे एकदम. टीव्ही नसण्याचे अनेक फायदे होतात.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी गुरुवार, 07/28/2016 - 13:33 नवीन
माझ्याकडे गेली सव्वा वर्षे टि. व्ही. नाही. त्यामुळे काहीहि अड्ले नाही. उलट अनेक उत्तम चित्रपट बघुन झाले. वाचायची राहिलेली बरीच पुस्तके वाचुन झाली. मुख्य म्ह्णजे मिपावर मनसोक्त वेळ घालवता आला. आता मात्र येत्या १५ अ‍ॅगस्टला एल.ई.डि घेणार आहे.
  • Log in or register to post comments
क
कबीरा गुरुवार, 07/28/2016 - 14:00 नवीन
झी मराठी वरच्या मालिकांमुळे टीव्ही बघण्याचा कॉन्फिडन्स निघून गेलाय. आणि त्यात रविवारी हे एक तासाचा विशेष भाग दाखवून अजूनच खच्चीकरण करतात.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 07/28/2016 - 14:36 नवीन
काय इलाज नाय. जाहिरातींच्या अधेमधे प्रोग्राम्स असतात. कोणतीही शिर्यल तुम्ही दोन महिने गॅपनंतर पाहिली तरी फरक पडत नाही. मला भरपूर वेळ क्वचित मिळतो तेव्हा किंवा आई आली की मी झी मराठीच्या शिर्यली बघते. नंतर मायबोलीवर जाऊन त्यांची पिसे काढायला लै मज्जा येते. आमच्याकडे कोणी आले तर फक्त क्रिकेट किंवा फूटबॉल मॅच असेल तर टीव्ही चालू रहातो. एरवी नाही. आपण कोणाकडे गेलो आणि ते लोक टीव्ही बघत बसले तर वाईट वाटून न घेता मी मोबाईलव्रून मिपा किंवा व्हॉट्स अ‍ॅप वर टाईमपास करते. दुसरे काय करणार!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/28/2016 - 15:04 नवीन
....वाईट वाटून न घेता मी मोबाईलव्रून मिपा किंवा व्हॉट्स अ‍ॅप वर टाईमपास करते." ह्या आयडिया बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कपिलमुनी गुरुवार, 07/28/2016 - 14:42 नवीन
स्मार्ट टीव्ही ( नेट कनेशन सहीत) तर पूर्ण लांबीचे सीरीयल , लाइव्ह बातम्या कुठे पहाता येतात?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/28/2016 - 15:01 नवीन
सिरियल आणि बातम्या मी अजिबात पहात नसल्याने आणि पुढील आयुष्यात पण ह्यांच्या नादी न लागायचे ठरवल्याने, आपला पास. १९४७चा काश्मीर प्रश्न अद्यापही पहिल्या पानावर स्थान मिळवून आहे आणि एकमेकांची तोंडॅ दाखवत असलेल्या मालिकांमधीअ तेच तेच चेहरे बघण्यापेक्षा आणि त्यातच आपला वेळ घालवण्यापेक्षा, मित्रांच्या बरोबर गप्पांचा फड रंगवणे, मला जास्त आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
शिवाजी नाठे गुरुवार, 07/28/2016 - 15:38 नवीन
टी.व्ही. व केबल दोन्ही नसलेले, कल्याण मध्ये आमचे एकमेव घर. घरी येणाऱ्या सर्वना प्रश्न पडतो टि .वी . कुठे आहे ?
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा गुरुवार, 07/28/2016 - 16:32 नवीन
बर्‍याच लोकांकडे टिव्ही नाही हे बघुन आपण फार काही वेगळे नाही ही सुखद जाणिव झाली. मुवि तुम्ही म्हणता तसं सिरियल आणि बातम्या आम्ही पण अजिबात पहात नाही. आणि एकंदरीत असं लक्षात आलयं कि त्यामुळे आपलं काही आडतं नाही. गेले दोन महिने नेटफ्लिक्सपण बंद करुन टाकल्यामुळे अजुनच जस्त वेळ हातात मिळाला आहे. आजकाल रोज निवांत पुस्तकं वाचायला भर्पुर वेळ मिळतो. पोरीला पण टिव्ही किंवा कंप्युटरवर काही बघायची सवय नसल्यामुळे मुलांचा स्क्रिन टाईम कसा कमी करावा वगैरे गोष्टींवर चर्चा आणि चिंतन करावे लागत नाही हा पण एक फायदा आहे. =)
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Fri, 07/29/2016 - 03:23 नवीन
बर्याच गोष्टी बघते.त्यात मुख्य कार्यक्रम म्हणजे travel xp चॅनल.राॅकी आणी मयुर चा शो. बाकी मुलीमुळे छोटा भीम चालु असताना. पण रोजचा टीव्ही पहायचा वेळ एक तासापेक्षा जास्त नाही. सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे म्युझिक चॅनल लाऊन गाण्यांचा तालावर कामे करणे.
  • Log in or register to post comments
स
संत घोडेकर Fri, 07/29/2016 - 05:15 नवीन
टीव्ही चे व्यसन आम्हाला नसले तरी घरातील जेष्ठ नागरिकांचे मालिका बघितल्यावाचून पान हालत नाही. तरी डिस्कवरी सारखे इतर माहितीप्रद कार्यक्रम आवर्जून पाहिले जातात.
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 07/29/2016 - 06:49 नवीन
टीव्ही बघताना मी कायम म्यूट करुनच बघतो. त्यामुळे खालील फायदे होतात. १. बातम्या वाचून समजतात. २. चर्चांमधले अँकर अंगावर येऊ शकत नाहीत. ३. इंग्रजी चित्रपटांत सब टायटल्स असल्यामुळे ते आवाजाशिवायच समजतात. ४. सिरियल्स डम्ब असल्यामुळे नुसते ओव्हरअ‍ॅक्टिंग बघूनच स्टोरी समजते, बॅकग्राऊंड म्युझिकचा त्रास होत नाही. ५. म्यूट अवस्थेत जाहिरातीही एनजॉय करता येतात. ६. घरांतील इतरांना त्रास होत नाही. ७. पाहुणे आले तर त्याक्षणी टीव्ही बंद करता येतो. अपवादः फक्त जुनी गाणी दिसली तरच हळु आवाजात ऐकतो.
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 07/29/2016 - 19:49 नवीन
८० च्या दशकातली गाणी म्युट करुन बघण्यातली मजा वेगळीच आहे. काही गाणी बघताना तर ह.ह.पु.वा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ग
गुंड्या Fri, 07/29/2016 - 07:59 नवीन
लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही ही चॅनल्स आवर्जून बघतो. विशेषकरून राज्यसभेतल्या चर्चा.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 07/29/2016 - 10:19 नवीन
टीव्ही बंदच असतो. आम्ही उगाच व्हिडीयोकॉन डीटुएचवाल्यांना पोसतोय असे बर्‍याचदा वाटत राहते. पण क्वचीत वीकेंण्डी वापरण्यात येतो.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 07/29/2016 - 11:55 नवीन
टी.व्ही. पहाणे आणि वाहिन्यावरील कार्यक्रम पहाणे यात बर्‍याच जणांचा घोळ झाला आहे. मी टी.व्ही. पहातो. लॅपटॉप किंवा मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर चित्रपट , खेळ , मालिका यांचा आनंद घेता येत नाही. ३२" ,४०" किंवा मोठ्या टीव्हीवर गेम ऑफ थ्रोन्स सारखी मालिका किंवा अवतार(James Cameron) सरखे चित्रपट पाहणे हा आनंददायक अनुभव असतो . मोठ्या स्क्रीन वर बरेच डिटेलिंग दिसतात. ग्राफिक्स असलेले मालिका, चित्रपट बघताना मजा येते. आजकालच्या स्मार्ट टीव्हीमुळे यूट्यूब चे व्हिडीओ सुद्धा टीव्हीवर बघु शकतो. सहकुटूंब एखादी डॉक्युमेंटरी पहाता येता , मित्र, भाउ- बहिणी एकत्र जमून मॅच बघत त्यावर चर्चा करता येते , लहान मुले असतील तर ई लर्निंगचे व्हिडीओ लवून हसत खेळत अभ्यास करता येतो . घरी कोणी वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांच्या आवडीची जुनी गाणी , चित्रपट पहाता येतात. अर्थात शाळेच्या निबंधाप्रमाणे टीव्ही शाप कि वरदान अशा दोन्ही बाजू लिहिता येतील. आलेल्या पाहूण्यांना वेळ न देण , जेवत टीव्ही पहाणे , गप्पा सोडून फक्त टीव्हीच पहाणे , टीव्हीमधल्या मालिकांवर चर्चा करत रहाणे हे वर्ज्य आहे , पण हे टाळूनसुद्धा टीव्हीचा भरपूर आनंद घेता येतो. बाकी कशावाचून कुणाचा काही अडत नाही ,हजारो लोकांचा पुस्तकावाचून अडत नाही , लाखो लोकांचा इंटरनेट वाचून अडलेले नाही. ज्यचा त्याचा चॉईस
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 07/29/2016 - 12:17 नवीन
मस्त प्रतिसाद!! आवडला!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
न
नाखु Fri, 07/29/2016 - 12:30 नवीन
बाकी कशावाचून कुणाचा काही अडत नाही ,हजारो लोकांचा पुस्तकावाचून अडत नाही , लाखो लोकांचा इंटरनेट वाचून अडलेले नाही. ज्यचा त्याचा चॉईस
शाळेतल्या सारखेच नांव राखलेस हो,असाच लिहायचा निबंधातही असे आम्चे "हे" सांगत होते काल गुरुजी भावजींना.. पुन्हा मिसामा "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
असंका Fri, 07/29/2016 - 18:22 नवीन
वा वा कपिलमुनी...अगदी मश्त लिहिलंयत!! एकच नंबर...!! (ते पहिलं वाक्य जरा बौन्सर गेलं खरं... )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
र
राधी Fri, 07/29/2016 - 19:56 नवीन
दिवसातला बराचसा वेळ कामात जात असल्यामुळे टि.व्ही वरील कार्यक्रम पाहायला मिळत नाहीत, अर्थात त्यावाचून काही अडत नाही हे ही तितकेच खरे.
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Mon, 08/01/2016 - 12:26 नवीन
जेमी ऑलिव्हर नामक माणसाचे जेमी'स 30 मिनिट मिल्स आणि जेमी At होम हे शो बघायला आवडतात. तो सतत काम करत असतो आणि सतत बडबडत असतो. 30 मिनिट्स मिल्स मध्ये तो ज्या वेगाने फटाफट पदार्थ बनवतो ते बघून मस्त वाटते आणि अगदी ते ही सलाड डेझर्ट सकट. बऱ्याचदा पापड भाजून तोंडी लावायला असतात हे पण भारी वाटते. त्याची बडबड प्रचंड आवडते. रॉकी अँड मयूर चा एक शो लागतो, तो पण चांगला वाटतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा