Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मोहमद्द अली रोड वरची खादाडी

व
वेदांत
Fri, 07/29/2016 - 11:49
💬 59
मोहमद्द अली रोड वरची खादाडी दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही रमजान दरम्यान मोहमद्द अली रोड येथे गेलो होतो. मांसाहारी लोकांसाठी मोहमद्द अली रोड म्हणजे 'जन्नत' आहे. येथील अनेक दुकाने जगप्रसिद्ध आहेत. उदाहरण द्यायच तर सुलेमान-उसमान मिठाईवाला , तव्क्क्ल स्वीट्स, जेजे जिलेबीवाला , हॉटेल नूर मोहमदी ई. नेहमीप्रमाणे संध्याकाळी मस्जीद बंदर स्टेशनला उतरून मित्रांची वाट पाहत बसलो,येणारे सगळे या खाद्यजत्रेतले नवखे होते. ७.३०वाजता सर्वजण जमले आणि मग आम्ही निघालो 'जन्नत' कडे.. मस्जीद बंदर रेल्वे स्टेशन वरुन कल्याण दिशेने बाहेर पडलो. समोरच एक हॉटेल आहे (सध्या नाव आठवत नाही), तिथे अप्रतिम कश्मीरी पुलाव मिळतो , तो ही एकदम स्वस्त आणि चवीला मस्त. (अंदाजे ७० रुपये ). पण आलेल्या सर्वाना आज व्हेज नकोच होते,फक्त नॉनव्हेज वर ताव मारायचा होत. तसच पुढे चालत राहिलो आणि मग उजवीकडे वळून मोहमद्द अली रोड कड़े चालू लागलो. पहिल्यांदा सुलेमान-उसमान मिठाईवाल्या कडे जायचे ठरले. एका मोठ्या कढईत मलपुआ तळ्त होते. येथे मालपुआ दोन प्रकारचे असतात,व्हेज आणि नॉनव्हेज (१किवा२ अंडी टाकून). एक-एक मालपुआ (रबडी सहीत)३-४ जणाना पुरून उरतो. भूक तर खूप लागली होती,पण स्वीट डिश नंतर खाउया असे त्याना मी सुचवले आणि मग तसेच पुढे निघालो मिनारा मस्जीद गल्ली मधे................ व्हेज मालपुआ Malpua नॉनव्हेज मालपुआ Nonvej Malpua मिनारा मस्जीदची गल्ली खूप प्रसिद्ध आहे. येथे कबाब पासून बकर्‍याच्या ईतर अवयवांपासून बनवलेले अनेक चविष्ट पदार्थ मिळतात. पहिला ताव आम्ही तेथील चीकन कबाब वर मारला,आणि त्यानंतर मलई कबाब वर. दोन्ही पदार्थ खूपच छान आणि चविष्ट होते. उजव्या बाजूला जेजे जिलेबीवाला होता आणि पुढे शोरमा हा प्रकार .. आम्ही चिकन शोरमा घेतला. शोरमा खाताना समोर लक्ष गेल आणि पाटी पहिली तर चक्क बडे मिया ... येथे सूप छान मिळते अशी माहिती मिळाली. शोरमा खाउन मागे फिरलो आणी निघालो नूर मोहमद्दी हॉटेल कडे.. शोरमा Shorma मलई कबाब malai kabab नूर मोहमददी हॉटेल खूप प्रसिद्ध आहे. यावेळेस त्याने दुकान बरेच वाढवले होते, फुटपाथ पण दुकानाचा भाग बनवला होता. येथील फेमस डिश म्हणजे 'चिकन संजूबाबा' आणि 'चिकन हाकिमी' . आम्ही चिकन संजूबाबा मागवले आणि सोबत रोटी. पहिला घास खातानाच कळले की ही डिश का फेमस आहे. नूर मोहमददी हॉटेल nur mohd चिकन संजूबाबा Chikan sanjubaba तिथून पुढे निघालो माझ्या आवडत्या दुकानात, तवकक्ल स्वीट्स .. तवकक्ल स्वीटसच्या बाजूला एका दुकानात चिकन बैदा रोटी खाल्ली आणि ती खात असतानाच डबल एग मालपुआची ऑर्डर दिली. पण तेवढ्यात तवकक्लच्या मालकाने हाक मारुन आत बोलावले. त्याने मलई खाजाची खूप तारीफ केली आणि एकदा खाउन बघाच असा आग्रह केला. मग आम्हीही त्याच्या विनंतीला मान देऊन मलई खाजा मागवला. माझ्या आयुष्यात मी बरेच मलई खाजा खाल्ले आहेत,पण याची टेस्ट काही न्यारीच होती.. तो पर्यंत मालपुआ पण आलाच होता, तो ही आम्ही हादडला आणि त्यानंतर ईद्रिस कोलडड्रींक मधून खस सरबत मागवले. आता आमचे पोट फुटायची पाळी आली होती. तिथून परत येताना मग आम्ही घरच्यांसाठी जेजे जिलेबी मधून जिलेबी आणि चीज&ग्रील मधून बिर्यानी पार्सल घेतली . बैदा रोटी baida roti बैदा रोल baida roll रंगीत कबाब kabab चिकन तंदुरी kabab फिरनी firani

प्रतिक्रिया द्या
25897 वाचन

💬 प्रतिसाद (59)
प
पद्मावति Fri, 07/29/2016 - 11:55 नवीन
मस्तं!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 07/29/2016 - 11:56 नवीन
काय त्रास आहे चायला...पोटातले कावळे खवळले...कोणी या रैवारी येईल का कट्टा खादाडीसाठी
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Fri, 07/29/2016 - 11:58 नवीन
मस्त खादाडी पण तिथे मान्साहारामधे चिकनचे पदार्थ चाखणे बरे कारण बोकडा बरोबर अन्य प्राण्याचेही मटण मिळण्याची शक्यता असते.
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला Fri, 07/29/2016 - 12:09 नवीन
आधी विचारलं तर व्यवस्थित च देतात असा अनुभव आहे. माणूस बघून चौकशी करावी लागते एवढं च. खोटं बोलण्याची वृत्ती वैयक्तिक असते, सामाजिक नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
ज
जगप्रवासी Fri, 07/29/2016 - 12:47 नवीन
एखादी अनोळखी डिश मागवली तर मालकाने ती मला खाऊ नको सांगितली कारण त्यात बीफ होते. त्याऐवजी मस्त चिकन डिश सजेस्ट केली आणि ती डिश अप्रतिम होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
च
चंपाबाई Fri, 07/29/2016 - 11:58 नवीन
छान
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Fri, 07/29/2016 - 12:00 नवीन
मस्त !!!. फोटु पण भारी आहेत. फक्त त्या फोटोंखाली पदार्थंची नावे टाकली असतीत तर अजुन मजा आली आसती.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Fri, 07/29/2016 - 13:07 नवीन
फोटोंखाली पदार्थंची नावे टाकली आहेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ
र
राजाभाउ Fri, 07/29/2016 - 13:27 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत
अ
अनुप ढेरे Fri, 07/29/2016 - 12:06 नवीन
कहर!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 07/29/2016 - 12:35 नवीन
कहर केलायत राव ! ! ! श्या! ते फोटोखाली पदार्थाचं नाव टाका ना प्लीज. वेड लागलंय. नेक्स्ट टॅम जाणार.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Fri, 07/29/2016 - 12:55 नवीन
फोटो खाली नावं टाकलीत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
स
सुधांशुनूलकर Fri, 07/29/2016 - 12:44 नवीन
एका दुकानात (दुकानाचं नाव आठवत नाहि) पात्रा बिर्यानीही मिळते. ही चिकन बिर्यानीच असते, त्यात पात्रा (अळूवड्या) घातलेल्या असतात. @ टवाळ कार्टा - एकदा महम्मद अली रोड खादाडी कट्टा झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Fri, 07/29/2016 - 12:52 नवीन
त्या दुकानच नाव फिरोझ फरसाण ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधांशुनूलकर
ब
बोका-ए-आझम Fri, 07/29/2016 - 12:45 नवीन
पण तीन गोष्टी अजून हव्या होत्या - निहारी, हलीम आणि अफलातून. सुलेमान उस्मानकडेच अफलातून नामक मिठाई मिळते. ती कशापासून बनवलेली असते असा प्रश्न पडत नाही कारण ती खाल्ल्यावर जी गुंगी येते त्यात काही आठवण राहात नाही.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 07/29/2016 - 12:47 नवीन
अफलातून खाल्लीय दोन चार दा. जब्बरदस्त असते. एक नंबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
वेदांत Fri, 07/29/2016 - 12:53 नवीन
अफलातुन छान असते. त्यात ही अंड मिसळतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
सुधांशुनूलकर Fri, 07/29/2016 - 13:07 नवीन
नहारी नल्ली आणि पाया हे नूर महम्मदी होटलची खासियत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
भ
भिंगरी Fri, 07/29/2016 - 20:55 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
मोदक Fri, 07/29/2016 - 12:51 नवीन
भारी फोटो.. आम्ही मित्रांनी पुण्यात कौसरबागमध्ये खादाडी केली. बाकी तो प्रकार "शोरमा" असा नसून "शवारमा" असा आहे. अरबी / लॅबनीज प्रकार आहे हा.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Fri, 07/29/2016 - 13:06 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
र
राजाभाउ Fri, 07/29/2016 - 13:31 नवीन
बरोबर. टर्कीचा खाला होता, भारीय तो प्रकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मृत्युन्जय Fri, 07/29/2016 - 13:12 नवीन
लैच भारी
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 07/29/2016 - 13:17 नवीन
कोणतेही फोटो दिसत नाहीयेत. सर्व अक्षरंही गायब आहेत. एकूण धागा दिसत नाहीये. काय तांत्रिक समस्या आहे काय की..
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 07/29/2016 - 14:58 नवीन
वेदांत साहेब, गविना थेट मु रोड वर घेऊन गेल्याशिवाय त्यांना धागा दिसणार नाही याची नोंद घ्यावी ☺
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मुक्त विहारि Fri, 07/29/2016 - 13:26 नवीन
अशी जोडीच आहे. छान एंजॉय केलेले दिसत आहे.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 07/29/2016 - 13:46 नवीन
कहर आहे हा धागा राव.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 07/29/2016 - 13:49 नवीन
कहर आहे हा धागा राव.
  • Log in or register to post comments
प
पी. के. Fri, 07/29/2016 - 14:05 नवीन
5:30 ला असला धागा... पोटातले कावळे खवळले ना राव. कावळे शांत करण्यासाठी आता एका कोंबडीचा बळी जाणार.. या हि रमजान मध्ये शवारमा खायचा राहून गेला. दोस्तांनी चोकशी केली होती, हॉटेल नूर मोहमदी मध्ये मिळाला नाही. आता मुंबई मध्ये कुठे भेटेल शवारमा? बाकी फोटो आणि वर्णन अप्रतिम.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 07/29/2016 - 15:28 नवीन
पम्याच्या कळव्यात मिळतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी. के.
प
प्रमोद देर्देकर Mon, 08/01/2016 - 11:44 नवीन
बरोबर आहे तु कळव्याच्या बाहेरच राहातोयस. खरा कळवा (पुण्याच्या धर्तीवर) फक्त जुना बेलापुररोड ते जुना पुणारोड यात वसलेला आहे. तद्वत मनिषानगर म्हणजे तुम्ही कळव्याच्या पलिकडे रहाता. कोई शक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मुक्त विहारि Fri, 07/29/2016 - 15:48 नवीन
आमच्या डोंबोलीतील पी.अँड टी. कॉलनीत, गिरनार चौकात मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी. के.
ब
बोका-ए-आझम Fri, 07/29/2016 - 16:08 नवीन
Shawarma Factory नावाची जागा आहे. अप्रतिम मिळतो. शिवाय मारूश मध्येही बरा मिळतो लोअर परेलच्या हाय स्ट्रीट फिनिक्समध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी. के.
स
सिरुसेरि Fri, 07/29/2016 - 15:18 नवीन
महम्मद अली रोड वरचा फालुदा फेमस आहे .
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Fri, 07/29/2016 - 15:50 नवीन
बरीच वर्ष गेलोय पण गेली आणितीन चार वर्षे जायला मिळत नाहीय मोहम्मद अली रोडवर,पण ती कसर माहीमला,कापडबाजारात भरून काढता येते.जुन्या आठवणी जागवल्यात मात्र.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 07/31/2016 - 15:37 नवीन
तिथे खिचडा अफाट मिळतो. पण बाकी प्रकारही मिळतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत
न
नूतन सावंत Mon, 08/22/2016 - 18:36 नवीन
लेडी जमशेटजी मागरगाच्या सुरुवातीपासून वीर सावरकर मार्गपर्यंत आणि कापडबाजार ठेले लागलेच असतात.तसेच ताजा,सागर,पॅरामाउंट,शहनाझ,आणि आता दिल्लीदरबार आहेच.शावरमा दिल्लीदरबारमध्येही छान मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
शिद Fri, 07/29/2016 - 17:52 नवीन
जबरदस्त आलेत फोटो...भुक चाळवली. महंमद अली रोडला मी माझ्या मुस्लिम मित्रांसोबत जात असे ते दिवस आठवले. दिवसभर त्यांची ईदच्या खरेदीसाठी सोबत फिरून इफ्तारनंतर भरपूर पेटपूजा...धम्माल होती. द फुडीचा खालील एपिसोडपण पाहण्यासारखा आहे.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 07/29/2016 - 18:03 नवीन
बाबौ...नका ओ नका
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 07/29/2016 - 18:11 नवीन
फोटोतले रंग मात्र छानच !
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Fri, 07/29/2016 - 18:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
र
राधी Fri, 07/29/2016 - 19:47 नवीन
टेम्प्टींग आहेत सगळे फोटो...यातला एकही पदार्थ खाण्याचा योग अजून आला नाहीये.
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Sun, 07/31/2016 - 16:09 नवीन
बिफचं टेंशन घेऊ नका ,आजकाल ढाब्यावर मिळणार्या खिमा पदार्थात सर्रास बीफचा खिमा असतो.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Mon, 08/22/2016 - 06:58 नवीन
शनिवारी अत्तर आणण्यासाठी मोहमद्द अली रोड ला गेलो होतो, येताना तवक्कल स्वीट्स मधून सीतफळ मलई, मँगो मलई आणी मलई खाजा घेऊन आलो. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 08/22/2016 - 12:30 नवीन
ओह....वॉव....मस्तं, मस्तं! sinfully आकर्षक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत
अ
अभ्या.. Mon, 08/22/2016 - 13:01 नवीन
च्यामारी. कसलं भारीय हे. एक लंबर टेम्प्टिंग फटू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत
ब
बोका-ए-आझम Tue, 08/23/2016 - 21:06 नवीन
जुलूम आहे तवक्कल म्हणजे. मलई खाजात अगदी हलकं केशर असतं. त्याने अशी भूक चाळवते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत
व
वेदांत Wed, 08/24/2016 - 06:12 नवीन
गुलाबजल ही असतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/22/2016 - 10:30 नवीन
जुलुमी धागा आणि प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 08/22/2016 - 10:54 नवीन
नुसती नावे वाचूनच तोंडाला पाणि सुटले. हे एक बर झाल मला फोटोच दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा