अस्वस्थामा...
आभासी सुखाची शंभर शकले
डोक्यावर मिरवत फिरत होता
एक उन्मत्त अश्वत्थामा...
पोतडीतले उद्याच्या चिंतेचे
बाटलीबंद भूत
पाठीवरल्या गाठोड्यातून
शोधत होते सुटकेचा रस्ता ...
निराश सुस्काऱ्याचे फवारे
शकलांच्या सुकल्या खपल्या भेदून
चौफेर उसळत धावत सुटले
भळाळत्या चिळकांड्या
कारंजी होऊन नाचू लागल्या...
बाटलीतलं भूत बाहेर काढून
रिती बाटली फिरवत
अस्वस्थ अश्वत्थामा फिरतोय
दारोदार, तेलाची भीक मागत...
बाटलीतलं भूत आता
मानगुटीवर बसलंय!!
💬 प्रतिसाद
(9)
य
यशोधरा
Sat, 07/30/2016 - 08:37
नवीन
अस्वस्थामा :)
आवडली कविता.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Sat, 07/30/2016 - 08:41
नवीन
अस्वस्थामा येऊन मानगूट धरतील बर्का...
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Sat, 07/30/2016 - 08:46
नवीन
अ'श्व'- अश्वत्थामा.
बाकी ठीकठाक.
- Log in or register to post comments
द
दिनेश५७
Sat, 07/30/2016 - 08:59
नवीन
- Log in or register to post comments
द
दिनेश५७
Sat, 07/30/2016 - 08:59
नवीन
हममम
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Sat, 07/30/2016 - 10:12
नवीन
कॉलिंग प्रत्यक्ष अस्वस्थामा.....!
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Sat, 07/30/2016 - 11:53
नवीन
ओ मालक.. आमचा कॉपीराईट आयडी हय राव.
तरीपण धन्यवाद. ;)
(आदुबाळा, मी मानगूट धरतो व्हय रे?)
- Log in or register to post comments
द
दिनेश५७
Sat, 07/30/2016 - 12:32
नवीन
बापरे... म्हंजे खरंच आसतंय की!!
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Sat, 07/30/2016 - 13:40
नवीन
मस्त कविता
- Log in or register to post comments