Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वगत...

फ — फुंटी, Mon, 08/01/2016 - 20:33
रातकिड्यांची किरकिर ,पानांची सळसळ ,बेडकांचे रोमांटिक ड्रांव ड्रांव,दुरून गाजही येतेय कानी , तो मुसळधार बरसून शांत झाल्यावर ही काळी रात्र...विजेचा लपंडाव माझ्या खिजगणतीत नाही...दुपारी झोपल की रात्र जागते.विषयासक्ती कमी झाल्यावर रात्री रिकाम्या भासतात .आधी जागायचो F टीव्ही पहायला.विषय संपला ...पुढे काय? आता उरत काय ? रिपीटेशन.... खाणं,पिणं,हगण,मुतण,मेैथून ....बस .... कसल आकर्षण वाटेल तर ती शक्यता नाही...अजुनही किरकिरतोय तो...काय मिळत असेल रातकिड्यांना किरकिर करून ?? मादी??? शरिरधर्मा नंतरची पहीली प्रेरणा ही मादी गटवणे ...सुसुत्र विचार करणारे एकसंध ,समाजमान्य लिहू ,बोलू शकतात.विचारांची साखळी जोडत सुसह्य लिहण कृत्रिम म्हणाव की नैसर्गिक....हाच माझा वांदा आहे..विचारांची अबोर्शन होतात माझ्याकडून....विचार कुठून येतात? का येतात? विचारांच खोदकाम सुरू केल की साखळी तुटू लागते.क्षण न क्षण अलग होतो आणि असंबद्ध अस बाहेर येत...वर्णनं अनेकांनी करून ठेवली आहेत..भूमिका ,विचारसरण्या अनेक आहेत.त्यांचे फाँलैअर्स अनेक आहेत.या सगळ्यांनी मिळून हे जग बनलय.यात मी कुठे आहे? कुठल्याही प्रवाहात मी नाही. मी दारू पित नाही म्हणून गटारीला कुणी बोलवत नाही.माझी गँग नाही.रातकिड्यांची सेटिंग अजून झाली नाही...माझी 12 वर्षे नाही झाली....किरकिरून सुद्धा ....या जगाचे नियम आहेत. कमेंटमधे टिंब टाकून लाईक वाढविण्यासाठी पोस्ट वरती आणावी लागते ...माणस वाचायचा वैताग आला ...रातकिडेच सारे.... मलापण फेमस व्हायचय ..ज्ञानपीठ वगैरे मिळाव अस सगळ्या लेखकांना वाटत पण कुणी बोलत नाही...सध्या नम्रतेची फ्याशन आहे...विद्या विनयेन शोभते वगैरे...एवढी लोकसंख्या असताना मी का जन्मलो??? विचारचक्र फिरण म्हणजे भिकेचे धंदे आहेत...चक्र फिरत राहत ...डोक्यात एकेक क्षण सुटा होतो ...असो....

प्रतिक्रिया द्या
1640 वाचन

💬 प्रतिसाद (12)
अ
अभ्या.. Mon, 08/01/2016 - 20:41 नवीन
च्यायला, डोसक्याची मंडईच की.
  • Log in or register to post comments
फ
फुंटी Mon, 08/01/2016 - 20:45 नवीन
तुमच डोक म्हणजे २१ व्या माळ्यावरचा सी फेसिंग फ्लॅट आहे असं म्हणताय का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Wed, 08/03/2016 - 14:16 नवीन
बहुतेक असावा. जौदेकी. झाली ना मंडई आता. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुंटी
ज
ज्योति अळवणी Tue, 08/02/2016 - 14:05 नवीन
नाही आवडल
  • Log in or register to post comments
फ
फुंटी Tue, 08/02/2016 - 18:59 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी
ज
जव्हेरगंज Tue, 08/02/2016 - 17:13 नवीन
च्यामारी..
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Tue, 08/02/2016 - 19:44 नवीन
आता आहे हे असं आहे, काय करता
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 08/02/2016 - 20:06 नवीन
असा झाला तर प्रकार तो सगळा!
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 08/04/2016 - 12:37 नवीन
नाही तर इथे गुंत्ता आणलाय सोडा(व्)यला !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ज
ज्योति अळवणी Sun, 08/07/2016 - 19:53 नवीन
इतका गोंधळ का बर तुमच्या मनात, मेंदूत आणि ................ एकूणच!
  • Log in or register to post comments
फ
फुंटी Sun, 08/07/2016 - 20:09 नवीन
मनात ,मेंदूत गोंधळ आहे म्हणता?? :-) असो बरं ..........म्हणजे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी
ल
लालगरूड Sun, 08/07/2016 - 20:01 नवीन
हे गद्य प्रमाणे वाचा.छान आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा