मुंबईत खादाडीसाठी-खरेदीसाठी कुठे काय?
बरेच दिवस झाले मुंबई दर्शन झाले नाही, आधी फक्त मुंबई वारी कामासाठी व्हायची. पण आता मुद्दामहून एक-दोन दिवस काढून मुंबई अनुभवायची असा विचार आहे.
"मनसोक्त हादडायची ठिकाणे कुठली?" - एक पुणेकर खवय्या. (दादर मधले गोमंतक बद्दल ऐकून आहे), पण अजून जाण्याचा योग आला नाही.
आणि सपत्नीक जात आहे त्यामुळे खरेदी करण हे ओघानी आलंच.
तर मिपाकरांनो कुठले पर्याय सुचवाल?
💬 प्रतिसाद
(66)
क
कपिलमुनी
Tue, 08/02/2016 - 10:03
नवीन
गोमंतक भारी आहे . प्रवासाचा साधन काय असणार आहे ?
अवांतर : पावसात मुंबईमधे फिरायचा खूळ कुठुन आलाय?
- Log in or register to post comments
क
कबीरा
Tue, 08/02/2016 - 10:42
नवीन
मुनीम, आज कुछ तुफानी करते हे.
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Tue, 08/02/2016 - 18:52
नवीन
बाबूराव से बाबू....भाडा डबल करना पडेगा रे बाबा !!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 08/02/2016 - 11:15
नवीन
हाय तुम्ने पिईच नै
- Log in or register to post comments
स
सचिन कुलकर्णी
Tue, 08/02/2016 - 10:14
नवीन
मुंबईतला पाऊस पुण्यासारख्या रिपरिप नसून खरोखरचा मुसळधार असतो. ;) (पळा आता)
त्यामुळे सध्या येण्याचे टाळा.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 08/02/2016 - 10:18
नवीन
गाववाले ह्या वर्षी आपल्या गावाच्या जीवाची मुंबई झाली म्हणतेत बुआ !!! गांधीग्राम चे शिवलिंग डुबले पाण्याआंद्रे पूल कट झाल्ता 2 दिवस आकोट ले जायले काहीच नोते
- Log in or register to post comments
स
सचिन कुलकर्णी
Tue, 08/02/2016 - 11:08
नवीन
काळजी घ्या.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 08/02/2016 - 11:22
नवीन
बापा बापा!! वाघोली डुबली काय?? पुर्नाचं असं तं मंग मोर्नेचं काय झालं असंन..??
- Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी
Tue, 08/02/2016 - 21:35
नवीन
Ama miya Bapu hum idhar hai yaar :).
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Wed, 08/03/2016 - 06:26
नवीन
बाप्पू काय सांगता कै डुबला गांधीग्राम पाण्याखाली
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 08/02/2016 - 10:24
नवीन
काय खायला आवडतं? इकडे त्याला क्विझीन म्हणतात. :)
कशा वातावरणात खायला आवडतं? म्हणजेच चव महत्वाची की अँबिऑन्स?
येणार्/फिरणार कसे? स्वतःचं वाहन असेल किंवा नाही?
हा आणि याशिवाय इतर असल्यास तपशील द्यावा. सुचवायला बरं पडेल.
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 08/02/2016 - 10:29
नवीन
मुंबईत म्हणजे कुठे असणार आहात नक्की? शाकाहारी खादाडी की सर्वाहारी.खरेदी कशाची करायची आहे सांगा.
एकेक सुचवत जाऊ.
- Log in or register to post comments
क
कबीरा
Tue, 08/02/2016 - 10:45
नवीन
शाकाहारी आणि सर्वाहारी दोन्ही चविष्ट मिळेल अशी ठिकाण सुचवा. मुंबईत साधारण दादर,town वेरिया मध्ये भटकण्याचा विचार आहे.
- Log in or register to post comments
अ
अबोली२१५
Tue, 08/02/2016 - 10:30
नवीन
मी मूळची दादरची आहे. गोमंतकसाठी २-३ तास वेगळे कडून ठेवा. गोमंतकला लाईन लावून जेवायला लागत.
लालबागला दत्ता बोर्डिंग (B. A. Road, 7 Narayan Hashram Lalug, 7, Dr Baba Saheb Ambedkar Rd, Naigaon, Mumbai, Maharashtra 400012) म्हणून हॉटेल आहे. ते सुद्धा चांगले आहे.
जर या पावसात सामोसे खायचे असतील तर गुरुकृपा (40, Guru Kripa Building, Near Sies College, Sion West, Mumbai, Maharashtra 400022)हे खूप छान आहे.
आणि रात्री मोगलाई पद्धतीच जेवायचं असेल तर दिल्ली दरबार माहीमला आहे
अशी बरीच ठीकाण आहेत जेथे तुम्हाला खादाडी करता येतील, पण वेळ पण काढून या.
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Tue, 08/02/2016 - 11:28
नवीन
दत्त बोर्डींग. दत्ता नाही.
तिथे जवळ मागे क्षीरसागर म्हणुन सुद्धा आहे.
दादरचं सायबिणी गोमांतक सुरु आहे का?
- Log in or register to post comments
ज
जगप्रवासी
Tue, 08/02/2016 - 15:03
नवीन
आणि खाण्यासाठी जरा फिरा
चित्रा सिनेमागृहाजवळ मिळणारे सॅन्डविच, तिथेच टायरच्या दुकानाच्या बाजूला वजनावर मिळणारी भजी.
चिंचपोकळीचा चिंतामणीच्या गल्लीच्या बाजूला असलेलं मुंबई मॅजिक
गांधी हॉस्पिटल जवळ राजकमल स्टुडिओला जायच्या रस्त्याच्या बाजूला एक छोट दुकान आहे, तिथला जम्बो वडापाव भारी आहे.
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
गुरुवार, 08/04/2016 - 05:48
नवीन
छ्या. .मला वाटत होतं कि हे असले प्रकार फक्त एकाचं शहरात चालतात.
- Log in or register to post comments
क
कबीरा
गुरुवार, 08/04/2016 - 06:05
नवीन
हा टोमणा समजावा का मास्तर
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
गुरुवार, 08/04/2016 - 07:41
नवीन
गोमंतक खरंच बेष्ट आहे.
मास्तर म्हणतात त्या शहरातली बरीचशी रेस्टॉरंट्स गंडलेली आहेत.
तिथे लाईन जेवणासाठी लावली जात नसावी असा संशय आहे. लाईन लावायला इतर बरीच कारणं असतात.
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
गुरुवार, 08/04/2016 - 08:08
नवीन
गोमंतक ला लाईन लावण्यासाठी काय काय कारणं असतात म्हणे ?
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
गुरुवार, 08/04/2016 - 09:20
नवीन
जेवण(मासे) बेस्ट.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 08/02/2016 - 12:12
नवीन
इटालियन, काँटिनेंटल
- अव्हनफ्रेश (इथे फक्त कॅश घेतात. ही माहिती देणं अत्यावश्यक आहे.)
- तर्तुलिया, चैत्यभूमी जवळ
मराठी
- आस्वाद, सेनाभवन
- जिप्सी कॉर्नर, सेनाभवन
- प्रकाश, गोखले रोड
चायनीज, थाई
- जिप्सी, सेनाभवन
- तमनक थाई, कॅडल रोड
मालवणी, मँगलोरियन
- सायबिणी गोमांतक
- मालवण कट्टा, सेनाभवनच्या मागच्या गल्लीत
- गोवा पोर्तुगीजा / दिवा महाराष्ट्राचा (इथे मिळणार्या खाद्यपदार्थांच्या नेमक्या खाद्यसंस्कृतीबद्दल संभ्रम आहे)
पावभाजी
- गोल्ड रश'स, रानडे रोड
फ्रँकी
- टिब्स शिवाजीपार्क
वडापाव
- नाईक, अनुग्रह हॉटेलच्या गल्लीत एक ओमनी उभी असते संध्याकाळी त्यात वडापाव, भजीपाव, समोसापाव मिळतो. अफाट चव. कीर्ती कॉलेजचा ओव्हरहाइप्ड वडापाव फिका पडतो यासमोर.
- स्वामी समर्थांच्या मठाजवळ, सेनाभवन
माटुंग्यात गेलात तर दाक्षिणात्य मेजवानी झोडता येईल
- राम आश्रय,
- शारदा भवन
- आर्यभवन
- मणीज
इत्यादी
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 08/02/2016 - 21:00
नवीन
मणीज आणि शारदा भुवन आहे पण कॅफे मद्रास नाही? हर हर!
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 08/03/2016 - 03:53
नवीन
इत्यादी लिहिलंय बोकोबा ! हर हर !
असं टिपिकल लोकांसारखं करू नये. सुतावरून स्वर्ग. तसं माटुंगा दाक्षिणात्य मेजवानीसाठी स्वर्गच असला तरी त्या स्वर्गाहूनही रम्य अशा डोंबिवलीला विसरता येणार नाही. अप्पम ही गोष्ट डोंबिवलीत जितकी मिळते तितकी कुठेच मिळत नाही. रादर, मिळतच नाही. एक्सेप्ट माटुंगा, तेही निवडक हॉटेलं. डोंबिवलीत मात्र अप्पमचं काय ते प्रस्थ आहे ब्वा. लव्हली! माय फेवरिट दाक्षिणात्य व्यंजन यु नो.
- Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय
Wed, 08/03/2016 - 08:07
नवीन
अगदि बरोबर.
अप्पम रॉक्स अॅट डोंबिवली.!
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 08/03/2016 - 03:57
नवीन
भाई एक-दोन राहिली...
माहिम मधे स्नेहा (फॉर म्यांगलोरियन नॉनव्हेज)
सिद्धिविनायक समोर एका बारिकशा गल्लीत डाउनटाऊन ढाबा. तंदुरी, इतर नॉनव्हेज आयटम ला-जवाब मिळतात. बडेमिया *क मारेल!
- Log in or register to post comments
प
प्रसन्न३००१
Wed, 08/03/2016 - 06:50
नवीन
दादर(प) मधल जयहिंद हा सुद्धा मालवणी पदार्थांसाठी उत्तम पर्याय आहे
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
Tue, 08/02/2016 - 13:20
नवीन
वेल्ला अरे अजुन एक वडा सेंटर राहिले की. छबिलस दासचा श्रीकृष्ण बटाटावडा.
त्याची चव कुठल्याच वड्याला नाही. दुसरा वडापाव
खास मराठमोळ्या पदार्थांसाठी :-
दादार आणि गिरगावचे पणशीकरांचे मिठाईचे दुकान - दुग्धजन्य पदार्थ ,
कॅडील रोडवरचे "मुंबई २८" हे उपहार गृह (सेनाभावन पासुन जवळ आहे) कोथींबीर वडीसाठी
मामा काणे उपहार गृह दादर स्टेशनच्या बाहेर
फक्त लस्सीसाठी नक्षत्र मॉलच्या समोर (दादार पश्चिम) कैलास लस्सीवाला
ताडदेवची सरदार पावभाजी.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 08/02/2016 - 13:44
नवीन
मला तरी जास्त आवडले नाही.
एका वाक्यात सांगायचे तर, पुण्यातल्या हॉटेल मध्ये गेल्यासारखे वाटते.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 08/02/2016 - 17:14
नवीन
मस्त. आमची भावकीची सभा छबीलदासला होते. बरेच लोक फक्त वडा खाण्यासाठी येतेत.
बाकी कामाचा धागा आहे. वा.खू. का साठवता येत नाहीये ?
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 08/03/2016 - 07:18
नवीन
कैलास आणि छबिलदाससाठी थंब्स अप.
सरदार पावभाजी बटरच्या स्लाईसपुरतीच आकर्षक आहे. चवीत मार खाते. त्यापेक्षा सरस आहेत मग बर्याच. पार्ल्यात शिवसागरची पावभाजी एक नंबर. त्यांचाच फालुदा पण भारी.
मामाकाणे येस... इट्स गुड.
- Log in or register to post comments
र
रंगासेठ
Tue, 08/02/2016 - 14:00
नवीन
मला क्रॉफर्ड मार्केटला जायचं आहे, छोट्या मोठ्या खरेदीसाठी. पुण्याहून कारने आलेलं चांगलं की ट्रेन/बसने येऊन फिरणं बरं राहील?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 08/02/2016 - 14:05
नवीन
त्यावर अवलंबून आहे.
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Tue, 08/02/2016 - 14:17
नवीन
क्रॉफर्ड मार्केट जवळ पार्किंग मिळायला खूप खूप त्रास होतो . अनेकदा मी कबदाडीत पार्किंग करून टॅक्सी ने फिरतो ..
आपल्याला काय घ्यायचे आहे ?
तसेच कमी सामान असेल / किंवा शेवटचा टप्पा क्रॉफर्ड मार्केट ठेवून सामान घेऊन छत्रपती शिवाजी टर्मिनस ला टॅक्सी करून जाणे बरे पडेल .
क्रॉफर्ड मार्केट होऊन छत्रपती शिवाजी टर्मिनस अतिशय जवळ आहे ..
- Log in or register to post comments
र
रंगासेठ
Tue, 08/02/2016 - 14:58
नवीन
माझी बायको सण-समारंभासाठी तसेच भेट म्हणून देण्यासाठी म्हणून विविध प्रकारच्या वस्तू/गिफ्ट आर्टिकल्स तयार करते. क्रॉफर्ड मार्केटला या आर्ट-क्राफ्ट साठी लागणारा कच्चा माल मुबलक व वाजवी दरात मिळतो असं कळालयं.
जसे की मेटल प्लेट्स, प्लॅस्टिक/वेल्वेटची फुलं इ.
- Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय
Tue, 08/02/2016 - 15:41
नवीन
रंगासेठ .....
चांगली माहिति ...
पण कृपया क्रॉफर्ड मार्केटला ज्योतिबा फुले मार्केट म्हणा शक्य झाल्यास. हे नाव बदलून अनेक वर्षे झाली.
- Log in or register to post comments
र
रंगासेठ
Tue, 08/02/2016 - 18:29
नवीन
>>क्रॉफर्ड मार्केटला ज्योतिबा फुले मार्केट म्हणा शक्य झाल्यास.<<
खरच माहिती नव्हतं. यापुढे लक्षात ठेवेन. :-)
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Tue, 08/02/2016 - 14:10
नवीन
दादर हे अतिशय गर्दीचे आहे .. आणि पसल्यात तर कीछड़ होते .
छान अनुभवासाठी कुलाब्यात या इकडे सामिष खायचे असेल तर काही छान पर्याय आहेत
बडेमियाँ
बगदादी ( खूप स्वस्त पण सामान्य सजावट )
जर इकडचं अनुभव म्हणून ग्यायचा असेल तर ताज मद्ये बुफे लन्च असतो ( 3500 ते 4000 असा दार होता ) ऐकदाच बघायचे असेल तर जात येईल - इकडे ब्रेकफास्ट बुफे बराच कमी होता ..
तसेच खायचे आणि प्यायचे असेल तर मोंडेगार आणि लिओपोल्ड आहेतच .
गोकुळ हा ऐक छान बार आणि नॉन व्हेज जॉईंट आहे - मी कॉलेज मध्ये असतानाचा अतिशय आवडता ! पूर्वी दारू अगदी विद्यार्थ्यांना परवडण्याएवडी स्वस्त होती ..
तसेच तिकडे ऐक छान बिर्याणी चे हॉटेल आहे ( बहुदा Ideal )
तसेच तिकडे चर्चची आणि इतर बरेच कॅफे आहेत - ऐकदा burp .com बघा.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 08/02/2016 - 14:28
नवीन
बियर अजूनही स्वस्त आहे.
१९८१ एल.पी. ८.५०/- रु.
२०१६ एल.पी. ८५/- रु.
बियरची भाव वाढ १० पट.
=========================
१९८१ मध्ये सोने १८०० रु. ला १० ग्रॅम मिळायचे ते आज ३१,०००/- रु. ला मिळते.
सोन्याची भाव वाढ १७-१८ पट
===================
१९८१ भाजी ४/- रु. किलो
१९८१ भाजी ८०/- रु. किलो.
भाजीचा महागाई दर ४० पट
================
वरील सगळे दर डोंबोलीतले आहेत.
सध्या डोंबोलीत भाजी सोन्यापेक्षा महाग झाली आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 08/02/2016 - 15:17
नवीन
थोडी मिस्टेक झाली आहे.
भाजीचा दर २० पट वाढला
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 08/02/2016 - 15:53
नवीन
भाजीची सनावळी पण चुकली आहे मुवी... असूदे आता.. एल पी पासून सुरूवात असल्याने पब्लीक समजुन घेईल. ;)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 08/02/2016 - 16:52
नवीन
टायपिंग मिस्टेक...
"एल. पी. पासून सुरूवात असल्याने पब्लीक समजुन घेईल."
+ १
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 08/02/2016 - 15:12
नवीन
गेटवेला गेलात तर बडे मियाँ,कुलाब्यात कैलाश पर्वत
मरीन ड्राइव्ह ला रुस्तमचे आईसक्रिम
क्राॅफर्डला मी नेहमी कार नेते.लवकर पोहचल्यास व्यवस्थित पार्किंग मिळते.तिथे गेलातच तर बादशहात पावभाजी आणि सिताफळ क्रिम खाऊन या!
दादरला पारंपारिक साड्यांसाठी लाजरी रुपसंगम इ दुकानं
हिंदमाताला भरतक्षेत्र,झगमग साड्यांसाठी भुलेश्वर,तिथेच इमिटेशन ज्वेलरी पण मस्त मिळेल.
ड्रेसेस साठी छबिलदास लेनमधलं मैत्रीण बघा.
बांद्र्याला पण शाॅपिंग छान करता येईल.सोबत सिलिंक,बँडस्टॅंड, किल्ला, माउंट मेरी चर्च असे फिरणे पण होईल.बांद्र्याला गेलात तर एल्को मार्केटला रगडा पॅटिस पाणीपुरी जरुर खा.
- Log in or register to post comments
प
पक्षी
Tue, 08/02/2016 - 15:12
नवीन
तंदुरी
नूरानी, हाजी अली समोर, डाव्या बाजूला
झोमॅटो दुवा : https://www.zomato.com/mumbai/cafe-noorani-tardeo/menu
सँडविच
हाजी अली समोर उजव्या बाजूने चालत गेल्यास (नूरानी डाव्या बाजूला ठेवून), एक सँडविचचा स्टॉल लागेल. स्टॉलचं नाव विसरलो. ज्या स्टॉलला सँडविच मेनू चा मोठा बोर्ड असेल आणि त्यात जंगली सँडविच पर्याय असेल तेच हे स्टॉल. येथे जंगली सँडविच छान मिळतं
खरेदी साठी, हाजी अली समोर उजव्या बाजूला हिरा पन्ना शॉपिंग आहे. इथे सर्व ब्रॅण्डच्या फर्स्ट/सेकंड कॉपी मिळतात. पण किमतीत खूप घासाघीस करावी लागेल.
कबाब/तंदुरी
जय जवान, लिंकिंग रोड, बांद्रा पूर्व
झोमॅटो दुवा: https://www.zomato.com/mumbai/jai-jawan-linking-road-bandra-west
लिंकिंग रोड सुद्धा खरेदी साठी चांगला पर्याय आहे, खास करून महिला वर्गासाठी.
फालुदा
बाबा फालुदा, माहीम
फालुदा साठी (मस्ट गो),
खासियत: Baba Double Spl. Falooda
झोमॅटो दुवा: https://www.zomato.com/mumbai/baba-falooda-Mahim
कसे जायचे: माहीम दर्ग्या च्या गल्लीत डाव्या बाजूला पहिले किंवा दुसरे दुकान (किंवा तिसरे :-))
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 08/02/2016 - 17:44
नवीन
सँडविच आमदार निवासाच्या नेमके खाली खाल्ले होते एका ठिकाणी ! काय सँडविच महाराजा, मोठाल्या ब्रेड अन दाबून चीज!!
बाकी बडेमिया स्वस्त अन मस्त म्हणजे हे हे हे हे हे हे असो असो!!
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 08/02/2016 - 18:04
नवीन
कोणी प्रभादेवीच्या "जयहिंद"चं फ्यान नाही का?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 08/02/2016 - 20:58
नवीन
प्रभादेवी, बांद्रा, लोअर परेल - सगळीकडच्या जयहिंद चा मी फॅन आहे. पण जयहिंदपेक्षा समोरचं स्वराज्य जास्त आवडतं. आणि गजाली wins hands down against Jai Hind .
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Wed, 08/03/2016 - 10:36
नवीन
काय आहे?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 08/02/2016 - 20:55
नवीन
तुम्हाला खायचं असेल आणि व्यवस्थित फिरायचं असेल तर लोअर परेलला हाय स्ट्रीट फिनिक्स मध्ये जा. खरेदीही होईल आणि खाणंही होईल. गजाली, क्रीम सेंटर, मारूश, बाँबे ब्लूजण नूडल बार असे अनेक आॅप्शन्स आहेत. बाजूलाच पॅलॅडियम माॅल आहे. तिथेही अनेक पर्याय आहेत. Under one roof, सगळं होऊन जाईल.
- Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक
Tue, 08/02/2016 - 23:04
नवीन
मी दादरमध्ये कुठेही कितीही खादाडी केली तरी श्रीकृष्ण बटाटेवडाला एक चक्कर टाकतोच, पोटात एकदोन वडा ढकलायला जागा शिल्लक ठेवतोच, आणि अर्थातच घरीही पार्सल घेऊन जातोच.
बालपणी म्हणजे किमान वीस वर्षांपूर्वी खाल्लेला वडा आणि आजचा वडा.. तीच क्वालिटी, तोच फॉर्म्युला.. कमाल आहे.
त्याच सोबत कबुतरखान्याजवळ सौराष्ट्र फरसाणवाला आहे, त्याच्या जवळची तिखट शेव (लकडी) हि सुद्धा न्यावीच लागते.
हे दोन प्रकार काही कारणास्तव नाही करता आले तर दादरवारी फुकट गेली असे समजतो.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »