Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुंबईत खादाडीसाठी-खरेदीसाठी कुठे काय?

क
कबीरा
Tue, 08/02/2016 - 09:40
🗣 66 प्रतिसाद
बरेच दिवस झाले मुंबई दर्शन झाले नाही, आधी फक्त मुंबई वारी कामासाठी व्हायची. पण आता मुद्दामहून एक-दोन दिवस काढून मुंबई अनुभवायची असा विचार आहे. "मनसोक्त हादडायची ठिकाणे कुठली?" - एक पुणेकर खवय्या. (दादर मधले गोमंतक बद्दल ऐकून आहे), पण अजून जाण्याचा योग आला नाही. आणि सपत्नीक जात आहे त्यामुळे खरेदी करण हे ओघानी आलंच. तर मिपाकरांनो कुठले पर्याय सुचवाल?
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
13234 वाचन

💬 प्रतिसाद (66)
व
वेदांत Wed, 08/03/2016 - 06:21 नवीन
पोलिस कॅंटीनच कुणी नाव नाही घेतल ? .. आश्चर्य आहे.. क्रॉफर्ड मार्केट (ज्योतिबा फुले मार्केट) जवळ, हॉटेल ग्रँट हाउस(पोलिस कॅंटीन) येथे उत्तम मांसाहारी जेवण मिळते. खिमा पाव तर अप्रतिम... झोमॅटो दुवा:https://www.zomato.com/mumbai/hotel-grant-house-cst
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 08/03/2016 - 08:46 नवीन
उडिपी हॅाटेलात न जाणे. मूग भजी : महालक्ष्मी मंदिराच्या मागे अथवा मशिदबंदर स्टेशन-दादर एंड वरती.
  • Log in or register to post comments
न
नरेश माने Wed, 08/03/2016 - 11:53 नवीन
@ प्रदीप.......... जयहिंद एक रेस्टॉरेंट चेन आहे. त्यांचे सर्वात जुने हॉटेल हे परळ एस.टी. स्टँडच्या कोपर्‍यावर आहे. त्या नंतर दादर स्टेशन जवळ आणि लोअर परळला कमला मिल कंपाऊंड समोर दोन अजून आहेत पण हे दोन्ही बहुतेक फॅमिली बार आणि रेस्टॉरंट आहेत. तिथे नॉन व्हेज चांगले मिळते. बाकी दादरला गेल्यावर श्रीकृष्णचा बटाटावडा आणि कोहिनूर समोरची लस्सी मस्टच. गोमांतक जेवण चांगले आहे पण लाईन वगैरे लावून म्हणजे अतीच.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 08/03/2016 - 11:58 नवीन
धन्यवाद, नरेश. वरील प्रतिसादांत मला वाटते बांद्रॅच्या 'हायवे गोमांतक' चा उल्लेख आलेला नाही. तसेच 'सायबा गोमांतक' चा उल्लेख आहे, हे नक्की कुठले मला ठाऊक नाही. अनेक वर्षांपूर्वी वांद्रे पश्चिम येथे, मोठ्या मशिदीसमोरील 'सायबा' नावाच्या छोट्याश्या रेस्तॉरंट्मधे खाल्लेले आठवते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश माने
स
संदीप डांगे Wed, 08/03/2016 - 13:59 नवीन
हायवे गोमंतक, ☺
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
न
नरेश माने Wed, 08/03/2016 - 12:12 नवीन
ते सायबा रेस्टॉरंटबद्दल नाहीत॑र सायबिणी गोमांतक शिवसेनाभवन जवळ एक रेस्टॉरंट होते त्याबद्दल म्हणत आहेत. जे इमारतीच्या नुतनीकरणामुळे आता माझ्या मते शिवसेना भवनच्या गल्लीत शिफ्ट झाले आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 08/03/2016 - 12:18 नवीन
बांद्र्याला कलानगरपाशी अशेच एक गोमांतक टाईप नाव असलेले होते हो हॉटेल. भारी टेस्ट होती. जे जे च्या हॉस्टेलपासून जवळ होते ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश माने
प
प्रदीप Wed, 08/03/2016 - 16:40 नवीन
मी वर उल्लेखिले आहे-- 'हायवे गोमांतक'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सिरुसेरि Wed, 08/03/2016 - 12:30 नवीन
" कॉपर चिमनी " फेमस आहे .
  • Log in or register to post comments
न
नरेश माने Wed, 08/03/2016 - 12:42 नवीन
बांद्र्याला कलानगरपाशी अशेच एक गोमांतक टाईप नाव असलेले होते हो हॉटेल.
आहे की अजूनही त्याचे नाव हायवे गोमांतक - कोकण्याची खानावळ.
  • Log in or register to post comments
द
दिपुडी Wed, 08/03/2016 - 19:17 नवीन
चेंबूरमधे कुठे नि काय छान मिळते तेही सांगाल का
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 08/04/2016 - 07:40 नवीन
शण्मुखानंद हॅाल( किंगज सर्कल)च्या मागेही चक्कर टाका.पंजाबी पदार्थ.
  • Log in or register to post comments
व
विनटूविन गुरुवार, 08/04/2016 - 09:54 नवीन
गेले की एक सचिन नावाचे मासे आणि इतर साठी अतिशय प्रख्यात ठिकाण होते ते आता नाही का?
  • Log in or register to post comments
न
नरेश माने गुरुवार, 08/04/2016 - 10:02 नवीन
आहे अजून. गेल्याच महिन्यात खादाडी करून आलोय. चव तीच आहे पुर्वीची असे मित्र म्हणाला मी पहिल्यांदा गेलो होतो. चांगले होते जेवण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनटूविन
न
नरेश माने गुरुवार, 08/04/2016 - 10:04 नवीन
पण सचिनत रानडे रोडवर नसून गोखले रोडवर आहे. दादर स्टेशन वरून रानडे रोडच्या कोपर्‍यावर आलो की डाव्या बाजूला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश माने
व
विनटूविन गुरुवार, 08/04/2016 - 14:54 नवीन
मलाही जाऊन बरीच वर्षे झालीत. रानडे रोड बराच चालायला लागायचा एवढे आठवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश माने
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा