Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आठवण

B — Bhagyashri satish vasane, गुरुवार, 08/04/2016 - 12:29
'काळोखाच्या वाटांमध्ये अंधार माझ्या सोबतीला, पावसाळ्याच्या चिंब रात्रीमध्ये तुझ्या आठवणी माझ्या सोबतीला, गेलेले क्षण साक्ष देतात आपल्या प्रितीची, त्या सोबत जागवलेल्या दिर्घ रात्रीची, अबोला तुझा छळतो गं मला क्षणाक्षणाला, असा कसा गं गुंतलो मी तुझ्यात झुगारुन सर्व बंधनांना, आज पाहिलं डोळ्यात तुझ्या जुन्या जखमा ओल्या होतांना.....!

प्रतिक्रिया द्या
3821 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 08/04/2016 - 12:56 नवीन
तुमचा जोडीदार असलेला रातपाळीचा वॉचमन तुमच्या संगट बोलत नाही का? त्याच्या नादाला नका लागू त्या पेक्षा तुम्ही रेडिओ मिर्ची वर लव गुरु ऐकत जावा लै मस्त टाइमपास होतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 08/04/2016 - 13:00 नवीन
खिक्क! थेट बॉलरच्या डोक्यावरूनच षटकार =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
अ
अभ्या.. Fri, 08/05/2016 - 13:19 नवीन
पैजारबुवांनाच खरोखर लवगुरु म्हणून एफेमला बसवायला पैजे. हाय कुणाची टाप प्रश्न इचारायची? रेडीओसिटीवाले थोड्या दिवसात नाव बदलतील शो चे. "मैने प्यार क्यु किया"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
B
Bhagyashri sat… Fri, 08/05/2016 - 13:13 नवीन
मग काय आम्ही कविता लिहायचं सोडून द्यायच का, त्यापेक्षा तुमीच असल्या कमेंट देण्या ऐवजी, रेडिओ ऐकेल बरं:(
  • Log in or register to post comments
क
कुणाल धस Fri, 08/05/2016 - 13:15 नवीन
कडक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhagyashri satish vasane
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 08/06/2016 - 06:47 नवीन
असल्या कॉमेंट आल्या म्हणुन तुम्ही कविता लिहिणे सोडू नका. त्या ऐवजी अशी कॉमेंट का आली या बद्दल विचार करा आणि जे सुचेल जसे सुचेल तसे लिहीतच रहा..... लिहिणे थांबवू नका. पण ते प्रसिध्द करण्या पूर्वी परत एकदा त्रयस्थ पणे वाचत जा. हळूहळू तुमच्या लिखाणात सुधारणा होत जाईल आणि मग असलया कॉमेंट येणे आपोआप बंद होईल. आणि अजून एका कारणासाठी कविता लिहीणे थांबवू नका. तुम्ही कविता लिहिल्या नाही तर आमच्या सारख्या विदूषकांना कच्चा माल कोण पुरवणार? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhagyashri satish vasane
न
नीलमोहर Fri, 08/05/2016 - 13:37 नवीन
कवींचं दु:ख कुण्णी कुण्णी समजून घेत नाहीत इथे हेच खरं, ते पैजारबुवा स्वतः मोठे लेखक, कवी आहेत, इतरांना किस झाड की पत्ती समजतात आणि असा हिरमोड करतात. करावं तरी काय नवकवींनी, एवढं मोठं आभाळभर दु:ख घेऊन जावं तरी कुठे ? तुम्ही लिहा हो, लक्ष देऊ नका, तसे बरेत सगळे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 08/06/2016 - 09:04 नवीन
नवकवींनी, एवढं मोठं आभाळभर दु:ख घेऊन जावं तरी कुठे ?
एका विदीर्ण करणार्या वाक्याबद्दल मूळ कवयत्रीचे,प्रोत्साहकांचे (पैजाबुवा) आणि सांत्वनकार नीमोतैंचे शतशः धन्य्वाद... तरी मी विचार करीत होतो गेले आठ दिवस पाऊस का बदबदा कोसळतोय महाराष्ट्रात !!!! त्याचं कनेक्शन इथं आहे तर.... पुभाप्र,पुलेशु,पुभालटा वाचकांचीच पत्रे नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ज
जव्हेरगंज Fri, 08/05/2016 - 16:00 नवीन
ऐ लै भारी! आवडलं आपल्याला! पुकप्र.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 08/05/2016 - 19:41 नवीन
चांगला प्रयत्न.
  • Log in or register to post comments
B
Bhagyashri sat… Sat, 08/06/2016 - 14:57 नवीन
धन्यवाद....ज्यांना माझी कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा