Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्तनपान नाही, स्तन्यपान

V
vcdatrange
गुरुवार, 08/04/2016 - 16:28
🗣 22 प्रतिसाद
१ ते ७ ऑगस्ट हा आठवडा जगभरात World Breastfeeding week म्हणुन साजरा केला जातो. शासकीय पातळीवर देखिल खुपसारे कार्यक्रम राबवले जातात. मराठीत उल्लेख करताना बहुतेक ठिकाणी 'जागतिक स्तनपान सप्ताह' असा उल्लेख होतो. अभिप्रेत शब्द स्तन नसुन स्तन्य (स्तनावाटे जे स्त्रवते ते स्तन्य) असा असल्याने यात सुधारणा करुन 'जागतिक स्तन्यपान सप्ताह' असा असावा. चेहरापुस्तकावर सदर सुचना वैद्य. ज्योत्स्ना पेठकर यांनी नोंदवली आहे.

प्रतिक्रिया द्या
5444 वाचन

💬 प्रतिसाद (22)
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/04/2016 - 16:42 नवीन
हायला हे मिपावर असले तीनोळी धागे यायला लागले की एक्स्ट्रा टवाळ/ आगाऊ/काडीसारु प्रतिसाद द्यायला हात लय शिवशिवतात, पण आम्ही जरा चेष्ठा मस्करी केली की किसनदेवांची अवकृपा होते , अन 'कधी तरी गांभीर्याने घेत चला' असा सल्ला मिळतो. आता तो सल्ला किती वेळ शिरोधार्य धरायचा? खरेतरे मिपाच्या संपादकीय धोरणानुसार चारोळींपेक्षा छोटे धागे उडवल्या जातील असे म्हणले आहे , शिवाय मिपावर स्वलिखित लेखनच प्रकाशित करावे असेही म्हणले आहे ! हे असे उडवणेबल धागे उडवले जाई पर्यंत टवाळक्या करायची अधिकृत परवानगी काढावी काय ?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 08/04/2016 - 17:53 नवीन
काय घेत चला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
न
नाखु Fri, 08/05/2016 - 05:31 नवीन
कालावधीचे पास आहेत काय (पीएम्पील्च्या पासासारखे मासीक, त्रैमासीक वगैरे).तुला तीन चार महीने सारखी परवानगी काढायला लागून नये म्हणून ही विचारणा. अता राहिला प्र्श्न सल्ला शिरोधार्य धरायचा तर त्यातील जेष्ठ आणि माजी संपादक वल्ली आणि रा रा बिरूटे सर सांगू शकतील. त्यांनी इथेच (सल्ल+ऊपाय) दिला तर भावी-माजी-आजी-राजी-हाजी-पाजी-बाजी-खाजी-लाजी-फौजी-मौजी मिपाकरांना एक उपयुक्त सल्ला मिळेल आणि त्यांची मिपा वाटचाल सुखकर होईल. आप्लाच विनम्र नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
उ
उडन खटोला गुरुवार, 08/04/2016 - 16:55 नवीन
vcdatrange कसं उच्चारावं ते आधि सांगा. व्ही सी डी अतरंगे ? की व्ही सी दातरंगे? नंतर ते काय ते बघू म्हणजे ठरवू. (काय ही व्यक्तीगत टिप्पणि आहे शक्तीमान? असल्यास सॉरी शक्तीमान!)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 08/04/2016 - 19:50 नवीन
'वाचायचं कसं? 'हा प्रश्न मलाही बर्याचदा पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 08/04/2016 - 17:15 नवीन
माझ्या अल्पमतीनुसार, दूध या अर्थी "स्तन्य" बरोबर असले, तरी बाळाला ते डायरेक्ट आईच्या स्तनातून प्यायला द्यायचे आहे. वाटी, कप, बोंडलं, बाटली यातून वा गायीम्हशीगाढवबकरीवाघिणीचेही नव्हे. यामुळेच 'ब्रेस्ट-फीडींग' हा इंग्रजी शब्दप्रयोग आहे. मिल्क-फिडींग नव्हे. वैद्या सौ. पेटकरांना हे जरूर कळवा. :) बाकी फेसबुकावरील बहुमोल माहिती इथे पुरवल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 08/04/2016 - 17:32 नवीन
पॉईंट आहे. कपातून चहा पिण्याला कपपान म्हणत नाहीत. ग्लासातून दारू पिण्याला ग्लासपान म्हणत नाहीत. अर्थात ही सुधारणा करून नेमकं काय साध्य होणार आहे ते समजलं नाहीये.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 08/04/2016 - 17:37 नवीन
३००!
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 08/04/2016 - 17:38 नवीन
कपातून चहा पिण्याला कपपान म्हणत नाहीत. ग्लासातून दारू पिण्याला ग्लासपान म्हणत नाहीत. << "अधरपान" बद्दल काय म्हणता?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 08/04/2016 - 17:44 नवीन
नया है यह! पण तरीही: अधरपानात जे प्यायलं (!) जात आहे ते अधराच्या आतलं नसून प्रत्यक्ष अधरच आहे. त्यामुळे [ज्या गोष्टीचं सेवन करायचं आहे ती गोष्ट]+पान हा फॉर्म्युला बरोबर वाटतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 08/04/2016 - 18:27 नवीन
ब्रेस्टफीडींग सप्ताह बेसिकली, आपल्या स्तनांचा आकार स्तनपान दिल्याने बिघडेल, अशी भीती बाळगणार्‍या/व इतरही सर्वच मातांनी, बाळांना डायरेक्ट स्तनांतून दूध पाजावे, यासाठी पाळला जातो. Feed the child directly from the breasts. बाळ स्तनाग्रे चोखून दूध पिते, तेव्हा एक 'लेट डाऊन रिफ्लेक्स' नावाचा प्रकार स्तनांत अधिक दूध उत्पन्न करतो. आईच्या दुधातून बाळाला अत्यावश्यक असणारी इम्युनिटी, व पचायला अतिसुलभ असे सर्व पोषक घटक मिळत असतात. बाळ आईच्या कुशीत राहून दूध पिते, तेव्हा जे सायकॉलॉजिकल बाँडिंग व सेक्युअर फीलिंग येते, तेही बाळाच्या निरामय वाढीसाठी प्रचण्ड प्रमाणात पूरक असते. या सर्व वैद्यकीय तथ्यातून अधिकाधिक मातांनी आपापल्या बाळांना आपल्या स्तनांतून सरळ दूध पाजावे यासाठी हा सप्ताह 'साजरा' केला जातो. आता यावर भाषेचा किती कीस पाडायचा, (कीस. अधरपानवाला किस नव्हे.) ते आपण आपलं पाहून घ्यावं. नुसतं स्तन्य पाजायचं, तर ब्रेस्ट पंप वापरून बोंडल्याने दूध पाजता येईल. ते इथे अभिप्रेत नाहिये, हे कृपया समजून घ्याल तर बरें.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ गुरुवार, 08/04/2016 - 18:39 नवीन
लोल! ह घ्या. मूळ धाग्याला शोभेलसा आचरटपणा करत होतो. तुम्ही शिरियस होऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 08/04/2016 - 19:32 नवीन
उगंच भाषेचा पिसारा फुलवल्यावर, पाठीमागं वैद्यकीय ज्ञान 'उघडं'' पडतंय, ह्याची जाणीव वैद्यांना पोहोचवा इतकंच पहिल्या प्रतिसादात लिहिलं होतं, पण इस्कटून सांगताना जरा चिडचिड झाली. माफी असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 08/04/2016 - 18:31 नवीन
लेट डाऊन रिफ्लेक्सबद्दल हे वाचाच. → https://www.breastfeeding.asn.au/bf-info/early-days/let-down-reflex Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 08/04/2016 - 18:32 नवीन
You need to actually feed the BREAST, not only the breast-milk. Capish?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 08/04/2016 - 18:14 नवीन
आणि झालंच तर .....चहापान,अपेयपान,जपान यांचे काय करावे ?
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar गुरुवार, 08/04/2016 - 18:31 नवीन
स्तनपान हा शब्द चुकीचा आहे हे खरे परन्तु मन्त्रालय हा चुकिचा शब्द अनेक वर्षे वापरात असल्याने तो चुकीचा आहे हे ही कुणाच्या लक्शातही येत नाही (अचूक शब्द 'मन्त्र्यालय' असा आहे). ज्य वेळेस मन्त्रालय हा शब्द वापरात नविन होत तेव्हा, सर्वसामान्यान्म्च्या सोयिसाठी अशी त्याची कारणमिमान्सा सान्गितली गेली होती.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 08/05/2016 - 00:02 नवीन
शब्द सापडत नसतील मराठीत तर गुजराती/कानडीतून/ घ्या.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 08/05/2016 - 01:24 नवीन
मसाला पानातून होणाऱ्या रसपानास पानपान म्हणावे काय?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 08/05/2016 - 11:38 नवीन
धागा उडालेला दिसत नाही , प्रतिसादही उडालेले दिसत नाहीत ! वाह वाह ! हा मिपातील बदल अत्यंत सुखावह आहे :) चीयर्स !!
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 08/05/2016 - 12:53 नवीन
काही वर्षांपूर्वी, दूरदर्शनच्या बातम्यांत, शेवटी जे 'तपमान' सांगायचे ते तापमान म्हणून सांगायला लागले. त्यावेळीही शब्दाचा कीस पाडण्यात आला होता.
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा Fri, 08/05/2016 - 18:12 नवीन
आनंदी गोपाळ यांनी पुरवलेली माहिती जास्त उपयुक्त आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा