Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुन्हा पाऊस

व — विश्वेश, Fri, 08/05/2016 - 11:59
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ... आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ... चांगली उन्हाची सवय झाली होती ... तो डबडबणारा घाम ते काळवंडलेले शरीर तो कोरडेपणा ... ती रखरख यांना चांगली लय आली होती ... कुठून हे काळे ढग आले ... आता सगळ बेताल होणार ... आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ... आता पुन्हा तो ओलावा पुन्हा तो हिरवेपणा पुन्हा त्या कोरड्या डोंगरावर उमटणार झर्यांच्या रेघा ... बुजणार पुन्हा ... पडलेल्या त्या सगळ्या भेगा ... पुन्हा नव्या आशेनी ... आता मन चल बिचल होणार ... आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ... पुन्हा एकट्याने भिजायचे पुन्हा एकटेच वाळायचे ... असेच नित्य नियमाने स्वताला ओलेत्यानी जाळायचे ... मग पावसाच्या पाण्यातूनच हळूच डोळ्यातून रक्त ... गाळायचे ... आता फ़क़्त पाणीच नाही ... तर रक्त पण गढूळ होणार ... आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ... या वर्षी ... पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ... - विश्वेश =============================== पावसाचे अन माझे तसे काही वैर नाही ! पण, मनातल्या मेघांनी कधीतरी असे बरसणे गैर नाही ! ===============================

प्रतिक्रिया द्या
2682 वाचन

💬 प्रतिसाद (8)
B
Bhagyashri sat… Fri, 08/05/2016 - 13:20 नवीन
मस्त:)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 08/05/2016 - 13:22 नवीन
अरे भारी लिहिलय की. मस्त मस्त
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 08/05/2016 - 15:59 नवीन
जबरदस्त
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 08/05/2016 - 19:38 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 08/05/2016 - 19:46 नवीन
फार सुरेख लिहिलंय राव. लिहित रहा नेहमी
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sat, 08/06/2016 - 00:52 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 08/06/2016 - 03:46 नवीन
छानच
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sun, 08/07/2016 - 19:47 नवीन
पुन्हा एकट्याने भिजायचे पुन्हा एकटेच वाळायचे ... असेच नित्य नियमाने स्वताला ओलेत्यानी जाळायचे ... ही कल्पना तर फारच छान
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा