माझ्या मनाचे कपाट....
माझ्या मनाच्या कपाटात टांगवले आहेत अनेक ह्यांगर्स...
भावना टांगवून ठेवल्यात मी त्यावर..
ते बघ गुलाबी रंगाच बायकोवरच प्रेम,
हल्ली सणासुदीलाच काढतो मी बाहेर..
तो पहा माझा रागाचा ब्लेझर ..
त्याच्या आतमध्ये लटकलेला अहंकाराचा शर्ट नि नेकटाय ..
सहज कळू देत नाही मी कुणाला मी सुद्धा वापरतो ब्लेझर...
समोरची माणस बघून ...
तो द्वेषाचा घामट ,कुबट सदरा..
सभ्यपणाच सेंट मारून वापरावा लागतो .
ते वेगवेगळ्या रंगाचे २ ह्यांगर्स दिसताहेत आहेत ना? .
खरे तर त्यावर आहेत कामभावनेची अंतर्वस्त्रे ...
सहज लक्षात नाही येत पण वापरतो मी रोजच ...
कुणालाही नकळत..
या मनाच्या कपाटाला ...
लावावी लागते वर्तमानाची घट्ट कडी...
तेव्हाच मी जगू शकतो सभ्य माणूस म्हणून...
💬 प्रतिसाद
(19)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/05/2016 - 19:07
नवीन
लिखते रहो.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 08/05/2016 - 19:07
नवीन
ओह्ह, जबरदस्तच की.
भई तू तो औलिया निकला.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Fri, 08/05/2016 - 19:10
नवीन
सुपर्ब!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 08/05/2016 - 19:13
नवीन
रोचक आहे !
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Fri, 08/05/2016 - 21:35
नवीन
येऊ देत अजून .....
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 08/06/2016 - 06:52
नवीन
मोकळं आणि थेट
पुलेशु
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sat, 08/06/2016 - 07:20
नवीन
फारच आवडली
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Sat, 08/06/2016 - 07:32
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments
अ
अमितसांगली
Sat, 08/06/2016 - 07:40
नवीन
विचारशैली मस्त...
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Sat, 08/06/2016 - 08:37
नवीन
भन्नाट कल्पना!
(अधूनमधूनहँगर्सनीटनेटकेकरणारा)रंगा
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Sat, 08/06/2016 - 08:49
नवीन
छान कल्पना...!
औरांदो..
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
Sat, 08/06/2016 - 09:10
नवीन
लिहित रहा
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Sat, 08/06/2016 - 09:18
नवीन
लिहित रहा. हे भन्नाट जमलंय...एक एक विशेषणं पर्फेक्त
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 08/06/2016 - 09:31
नवीन
भारी!
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Sat, 08/06/2016 - 09:50
नवीन
छान लिहिताय, पुलेशु.
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
Sat, 08/06/2016 - 09:58
नवीन
छान कल्पना... आवडलि...
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Sat, 08/06/2016 - 10:02
नवीन
fantastic.... खूप आवडली कल्पना. वर्णन देखील perfect fit होत आहे शब्दात. मस्तच
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sat, 08/06/2016 - 15:51
नवीन
कडक!
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sun, 08/07/2016 - 07:05
नवीन
खरे तर त्यावर आहेत कामभावनेची अंतर्वस्त्रे ...
सहज लक्षात नाही येत पण वापरतो मी रोजच ...
कुणालाही नकळत..
या मनाच्या कपाटाला ...
लावावी लागते वर्तमानाची घट्ट कडी...
तेव्हाच मी जगू शकतो सभ्य माणूस म्हणून..
जबरदस्तच.
- Log in or register to post comments