Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चंद्र चांदण्या समुद्र पाऊस

र — रातराणी, Sat, 08/06/2016 - 10:41
चंद्र चांदण्या समुद्र पाऊस सगळ्या कविता झाल्या करून मग पाटी कोरी केली आणि खूप वाट पाहिली पण काहीच सुचेना मग एक चंद्र काढला आभाळासारख्या पाटीवर उठून दिसला मग त्याला सोबत म्हणून चार चांदण्या भरतीच्या लाटा आदळल्या खडकांवर मग लगोलग पाऊसही बरसला ओलेत्या वाळूत तुझं नावही लिहिलं तुला आवडतात म्हणून सगळ्यांना आणलं होतं सोबत चंद्र चांदण्या समुद्र पाऊस पण नेमकी तू आली नाहीस तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला एवढंचं कळवलंस मी त्या मेंदीत चंद्र असेल का? चांदण्या असतील का? समुद्राच्या लाटांसारखी नक्षी असेल का? तुझ्या डोळ्यातल्या पावसाने मेंदी ओलीचं राहिली का? काय काय विचार करत बसलो अचानक कुठून सर आली चंद्र चांदण्या समुद्र पाऊस सगळं चित्र पुसून गेलं तुझ्या मेंदीला रंग चढला असावा कारण माझी पाटी कोरीच राहिली

प्रतिक्रिया द्या
3844 वाचन

💬 प्रतिसाद (23)
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 08/06/2016 - 11:16 नवीन
कविता आवडली. छानच लिहिली आहे. मनापासुन. कविता वाचताना मिकाची आठवण आली. त्याची कविता लिहायची स्टाईल काहीशी अशीच आहे. सध्या स्वारी कुठे आहे त्याची कोणास ठाउक. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 08/06/2016 - 11:49 नवीन
एहेहे, भारिय हे. भारी म्हणजे काय एकदम दिलको छु लेनेवालेच है. मिकाची आठवण आली हे मात्र खरं. बँकॉक वरून आल्याशिवाय काय भेटत नाय तो.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 08/06/2016 - 12:07 नवीन
तुम्ही सध्या दमदार लेखन करताय :)
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Sat, 08/06/2016 - 12:20 नवीन
सुरेख लिहिलेय, सुरेश वाडकरांचं 'तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला, माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोळा' आठवलं.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 08/06/2016 - 12:24 नवीन
भारी.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 08/06/2016 - 13:45 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sat, 08/06/2016 - 14:26 नवीन
मस्तच! आवडली!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 08/06/2016 - 15:42 नवीन
कविता आवडली! Sandy
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 08/06/2016 - 15:50 नवीन
भारीच !!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sat, 08/06/2016 - 20:24 नवीन
सर्वांचे आभार :)
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 08/06/2016 - 23:37 नवीन
छान उतरलीये.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 08/07/2016 - 02:13 नवीन
व्वाह!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/07/2016 - 04:10 नवीन
आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 08/07/2016 - 04:53 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 08/07/2016 - 06:56 नवीन
कविता आवडली. आपले आयुष्य हि असेच आहे, शेवटी पाटी कोरीच राहते.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 08/07/2016 - 10:34 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sun, 08/07/2016 - 14:29 नवीन
:)
  • Log in or register to post comments
अ
अनुरागी Sun, 08/07/2016 - 16:19 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Sun, 08/07/2016 - 16:35 नवीन
छान कविता!
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sun, 08/07/2016 - 19:39 नवीन
सुंदर कल्पना... छान आहे कविता
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sun, 08/07/2016 - 20:35 नवीन
फार सुंदर रचना. आवडली. पाऊस असतोच त्रासदायक.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 08/08/2016 - 05:33 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 08/08/2016 - 05:50 नवीन
आवडली.मस्तच.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा