खजुराचं लोणचं
Primary tabs
साहित्य
१ १/२ वाटी खजूर
२ खडे हिंग
१ चमचा काळीमिरी
१/२ चमचा मेथ्या (दाणे)
३ चमचे मोहरी
२ चमचे हळकुंड (नसेल तर हळद पावडर)
६ चमचे लाल मिरची पावडर (३ चमचे काश्मिरी किंवा ब्याडगी आणि ३ चमचे चवीला तिखट असलेली)
२ लिंबं
१ वाटी तेल (अधिक थोडे मसाले भाजायला)
मीठ, चवीनुसार
कृती
खजूर चिरून बी काढून टाका. खजुराचे उभे बारीक काप करून घ्या.
एक पॅन मध्ये एक चमचा तेल टाकून त्यात एक एक करून मेथ्या, काळीमिरी, मोहरी, हळकुंड आणि हिंग वेगवेगळं मंद आचेवर भाजून घ्या. त्याच पॅन मध्ये १ वाटी तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झालं (थोडा धूर यायला लागला की लगेच) गॅस बंद करून बाजूला ठेवा.
भाजलेल्या मसाल्यांची मिक्सर मधून बारीक पूड करून घ्या. चिरलेल्या खजूरा मध्ये आपण तयार केलेला मसाला, लाल मिरची पावडर, (हळद, वापरत असलात तर), २ लिंबांचा रस आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या. गरम केलेले तेल घालून लोणचं एकजीव करून घ्या.
एक कोरड्या काचेच्या किंवा लोणच्याच्या बरणीत भरून दोन ते तीन दिवस लोणचं मुरू द्या व मग खायला घ्या!
एकदा कशातरी खजूराच्या वड्या केल्या होत्या.
आजकाल त्या पण करता येत नाहीत.कधी वड्यांची आठवण झाली तर, ती पा.कृ. वाचून मनाची समजूत काढावी लागते.
हे खजूराचे लोणचे खाणारा मी पहिलाच वाटते.
केदार, फोटो आणि लोंचं आवडलं.
टीव्हीच्या कोणत्या वाहिनीवर असतो हा पाककृतीचा कार्यक्रम आणि किती वाजता ?
पाहीन म्हणतो.
पुपाशु.
-दिलीप बिरुटे
वर कसल्या कार्येक्रमाबद्दल आपण म्हणत आहात?
माझी स्वतःची एक वेबसाईट आहे, त्यावर मी माझे पाककलेचे प्रयोग टाकत असतो।
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
>>>> माझी स्वतःची एक वेबसाईट आहे, त्यावर मी माझे पाककलेचे प्रयोग टाकत असतो।
अरे वा. लिंक द्या ना.
पुपाशु.
-दिलीप बिरुटे
http://www.EatLiveCook.com
जियो यार... चक्कर मारुन आलो. भन्नाट आहे.
मिपावर एकापेक्षा एक सरस पाककृत्या येतील अशी अपेक्षा.
-दिलीप बिरुटे
....मनापासून आभार!
किती दिवस टिकतं हे लोणचं? (खाऊन संपवलं नाही तर, अर्थात!)
१५ दिवसांपूर्वी केले आहे। अजून थोडं उरलंय आणि उत्तम टिकून आहे। माझ्या अंदाजानुसार साधारण 1 महिना टिकेल, अर्थात तुम्ही म्हणताय तसं खाऊन संपवलं नाही तर.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
करण्यात येइल
मस्तय लाॅन्च. फोटो तर खतरी एकदम.
मस्त पाकृ.सर्व साहित्य घरात आहे.बनवावे की काय या विचारात..
आहा, खूपच मस्तं!
खारकेचे खाल्ले होते पण खजुराचे लोनचे पहिल्यांदाच वाचते आहे. पाकृ, फोटू आवडले.
भा री ये.वेबसाइटही आवडली.
मस्त.
अप्रतिम सुंदर पाकृ! फोटो तर खासच!
मला या लोणच्याची रेसिपी हवीच होती. एका सिंधी बाईकडे खाल्ले होते.
धन्यवाद !Kedar Dixit
सुंदर पाकृ व फोटो !
तुमची वेबसाईटही अप्रतिम आहे !
आपल्या प्रतिसादांनबद्दल आभार!
भारीच!!
आणि मिपावर चालू असलेल्या सांप्रत फ्याशनीनुसारः वीकांती करुन बघणेत येईल.
कॆडी,
कहर आहेस रे बाबा. कधी कट्टा होईल, आन कधी कॆडी च्या हातचे एकसे एक पदार्थ खायला मिळतील कोण जाणे.
भारी आहे वेबसाईट.
____/\____
वाट बघणारा,
बाबा योगीराज.
...एकदा नक्की, ये वादा रहा.
काहीतरी नविन चव मस्तच
काहीतरी नविन चव मस्तच
पण तेल कुठलं चांगलं लागेल ह्याच्यात ? मोहोरीचं ??
सुद्धा चांगलं लागेल, त्याला एक स्वतःचाच एक तिखट स्वाद असतो.
२ सेकंद 'खजुराहो'चं लोणचं असं वाचून कंफ्युज झालो राव!
खजुराच लोन्च हे १ स्ट ताइम च ऐक्ल मी , दिसतय सुरेख :)
फोटो आणि वेबसाईट छान आहे
भारिये लोणचं आणि वेबसाइट पण. वेबसाइट बुकमार्क केलि आहे.
बाकी रेसिपीज पण छान आहेत, फोटो अप्रतिम.
आपल्या प्रतिसादांनबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार!
फोटो पाहुन तोंडाला पाणी सुटल. नक्की करुन बघेन. खजूर साधा घ्यायचा की काळा?
साधाच खजूर वापरला.
ओके धन्यवाद.