Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शांतता

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Sun, 08/07/2016 - 20:33
कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फारच जीवघेणी असते नाही? ----- परवा तू अचानक आलीस दारात तुला पाहुन चमकलो मग सुखावलो येतांना तू आणलेला मोगरा सगळं घर व्यापून उरला गजरा करायला घेतला तुझ्या केसात माळतांना अवचित एक गाठ सुटली गजरा विखुरला, अन् एकदम जाग आली ---- कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फार जीवघेणी असते नाही? ------ किनार्‍यावर एकटचं भटकतांना 'तो' खडक दिसला पहिली भेट नजरेसमोरुन तराळून गेली तासन् तास त्या खडकावर सुख म्हणजे कायं? ते अनुभवलं आता कां कोण जाणे 'तो' खडक खुपच ओबडधोबड वाटला बेढब दिसला --- कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फारच जीवघेणी असते नाही? ---- शेवटी काय पाऊस जाण्यासाठीच येतो जीवघेणी शांतता तेवढी राहते सोबतीला --- कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फारच जीवघेणी असते नाही? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०८/०८/२०१६)

प्रतिक्रिया द्या
5378 वाचन

💬 प्रतिसाद (32)
ध
धनावडे Sun, 08/07/2016 - 20:43 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 08/07/2016 - 21:13 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 08/07/2016 - 21:36 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
न
निखिल निरगुडे Mon, 08/08/2016 - 02:00 नवीन
कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फारच जीवघेणी असते नाही...... अगदी! आणि मनाला हुरहूर लागलेली असताना न कोसळणाऱ्या पावसाची शांतता सुद्धा!
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Mon, 08/08/2016 - 11:35 नवीन
कोसळेस्तोवर तुडुंब भरलेलं आभाळ असतं आणि पाण्याचा एक टिपूसही पडत नाही, तेव्हा जीव नकोसा होतो. अप्रतिम कविता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल निरगुडे
च
चाणक्य Mon, 08/08/2016 - 03:09 नवीन
सुरेख जमलीये. कासावीस करणारी रचना.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 08/08/2016 - 03:21 नवीन
मस्स्स्स्स्स्त
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 08/08/2016 - 03:33 नवीन
वाह..
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 08/08/2016 - 03:55 नवीन
एक नंबर
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Mon, 08/08/2016 - 03:56 नवीन
Class
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 08/08/2016 - 04:26 नवीन
अप्रतिम रे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 08/08/2016 - 06:05 नवीन
फार दिवस वाट पहायला लावलीस. पण त्या प्रतिक्षेचे चिज झाले ही कविता वाचून. तू लिहित रहा आम्ही त्याचा आनंद घेत राहू पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 08/08/2016 - 06:44 नवीन
अह्हाहाहा, मिका, बरसत रहा. शांतता नकोसी असते खरेच.
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Mon, 08/08/2016 - 11:02 नवीन
हेच बोल्तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रीत-मोहर Mon, 08/08/2016 - 10:52 नवीन
अ प्र तिम कविता मिका!!!
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 08/08/2016 - 11:24 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Mon, 08/08/2016 - 12:20 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Mon, 08/08/2016 - 12:32 नवीन
सुंदर..
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 08/08/2016 - 13:21 नवीन
अप्रतिम!!
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला Tue, 08/09/2016 - 09:39 नवीन
अरे खास च कविता मि का भाऊ.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 08/09/2016 - 13:47 नवीन
याला म्हणतात ट्च मिकाचा आणि टचीही मिकाचीच कवीता... खडकासारखा ओबड धोबड नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
ज
जगप्रवासी Tue, 08/09/2016 - 09:46 नवीन
खूप छान
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 08/09/2016 - 12:08 नवीन
जीवघेणं लिहितोस.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 08/10/2016 - 07:44 नवीन
आवडली कविता. लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 08/10/2016 - 07:46 नवीन
अगदी नेमके !!
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 08/10/2016 - 07:51 नवीन
मी कविता सहसा वाचत नाही. एकतर फारस्या कळत नाहित आणि कळाल्याच तर खुप नाटकी वाटतात. पण मिकाच्या कविता मात्र सहसा चुकवत नाही. एक नंबर जमली आहे ही कविता पण. बाबारे मिका कधी भेटलो तर तुझ्या सह्या घेउन ठेवीन म्हणतो. मोठा कवी झाल्यावर लोकांना दाखवता येतील.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 08/10/2016 - 08:27 नवीन
सही?? सहीचा जमाना गेला, आता आपण सेल्फी काढू, ;) आणि मोठा कवी होण्याच नंतर बघू पण मी आताच अभिमानाने दाखवीन लोकांना. बघा हे आमचे मित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पैसा Wed, 08/10/2016 - 07:51 नवीन
अहा!
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Wed, 08/10/2016 - 07:57 नवीन
दंडवत!
  • Log in or register to post comments
व
विप्लव Wed, 08/10/2016 - 08:20 नवीन
परवा तू अचानक आलीस दारात तुला पाहुन चमकलो मग सुखावलो येतांना तू आणलेला मोगरा सगळं घर व्यापून उरला गजरा करायला घेतला तुझ्या केसात माळतांना अवचित एक गाठ सुटली गजरा विखुरला, अन् एकदम जाग आली
आई ग कसलं दर्दी
  • Log in or register to post comments
न
निनाव Fri, 09/16/2016 - 19:49 नवीन
मि.का ३वार _/\_... जब्बर्दस्त..
  • Log in or register to post comments
फ
फिझा Wed, 09/28/2016 - 06:10 नवीन
खूप सुंदर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा