व्हेज नुडल्स्
Primary tabs
व्हेज नुडल्स
साहीत्य:
नुडल्स - ३ पाकीट
व्हिनेगार - ४ चमचे
ग्रीन चीली सॉस - ४ चमचे
टमाटो सॉस - २ चमचे
लसुण - १२/१५. बारीक चिरुन
तेल - ४ /५ मोठे चमचे
मीठ - चवीनुसार
मिरपुड - १ चमचा
भाज्या आवडी प्रमाणे. मी खालील घेतल्या
कांदा १
ढब्बु मिर्ची - १
गाजर - १
पत्ता कोबी - वाटी भर बारीक चीरुन
वाटाणे - १/२ वाटी
कृती:
सर्व भाज्या बारीक उभ्या चीरुन घ्या.
व्हिनेगार व दोन्ही सॉस एकत्र करुन घ्या.
एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळा. १ चमचा मीठ आणी १ चमचा तेल घाला. नुडल्स पाण्यात शिजवुन घ्या. चाळणी वर उपसुन ठेवा.
एका नॉनस्टीक भांड्या मधे ४ चमचे तेल गरम करा.
लसुण घाला व कच्चट वास जाई पर्यंत फ्राय करा.
आता बाकी भाज्या घाला व थोडे परतवुन घ्या.
मीठ आणी मिरपुड टाकुन नीट मिक्स करा. एक हलकी वाफ काढा. भाज्या खुप शिजवायच्या नाही. थोडं क्रंची / कच्चट असु दे.
व्हिनेगार - सॉस मिश्रण घाला
शेवटी नुडल्स घालुन हलक्या हाताने मिसळुन घ्या.
व्हेज नुडल्स तयार. आपल्या आवडीच्या साइड डीश सोबत गरम गरम सर्व्ह करा
छान पाकृ.
छान
रेसिपी छान !
चायनीज लोकं, अत्यंत उच्चं तापमानावर भाज्या थोड्या वेळेत फ्राय करतात कारण,
भाज्यांचे बाहेरील आवरण क्रंची होते तर गाभा ज्युसी राहतो. कमी टेम्परेचरवर हे शक्य नाही...
भाज्या थोड्या फ्राय केल्या तर लुळ्या पडतात प्लेट मध्ये.
लक्षात घ्या जास्ती टेम्परेचर वर थोडावेळ ३-४ मिनिटे फ्राय करा भाज्या, लसूण शेवटी फ्राय करा, कारण लसूण आधी फ्राय केला, तर जास्ती वेळ फ्राय झाल्याने उग्र होतो. (आणि पावसाळ्याच्या या दिवसात उग्र लसूण आहारात आला, तर तो शरीरावर उलटतो )
पुढच्या वेळी हे नक्की करीन.
हां. हेच लिहायला आलो होतो. नूडल्स करायची "वोक" पद्धत.
वोकचे इतर फायदेही आहेत - आपापल्या चॉईसप्रमाणे भाज्यांचं प्रमाण ठरवता येतं. दर वेळेला वोक नव्याने केला गेल्याने काही चूक झाली तर ती एका सर्व्हिंगपुरतीच मर्यादित राहते. एका चवीचा कंटाळा आला तर दुसर्या सर्व्हिंगच्या वेळेस सॉसेस बदलता येतात.
वोक मिळत नाहीत सहज.कढयाच मिळतात.
कढई तर कढई. सम-थिंग इज ऑलवेज बेटर दॅन अजिब्बात न-थिंग ;)