Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रश्न

इ — इना, Tue, 08/09/2016 - 23:40
हलकेचं आलीस आयुष्यात वाऱ्याच्या झुळूकीसारखी मनात मात्र माझ्या वादळासारखी राहिलीयेस तुझं हसणं, तुझं दिसणं कोरलय माझ्या अस्तित्वावर रात्रीच्या आकाशात ध्रुव चमकत रहावा तसा गुणगुणत राहतो तुझा आवाज माझ्या कानात त्या क्षणी जवळ असतीस तर मिठीत घेतली असती तुला किती आवडतेस तू मला मीही सांगितलं असत मग पण नाही सांगता आलं तेव्हाही आणि आताही आता फक्त स्वप्नं पाहतो त्या स्वप्नातही तू भेटतेस तेही दूर जाण्यासाठीच मग भेटतेस तरी का ते तुलाच माहीत तुझ्याचंजवळ हरवून आलोय मी स्वतःला बेमालूमपणे पण तुझ्या नाही येतं लक्षात आणि माझ्याजवळ असलेला मी अजूनच अगतिक होतो पण यातलं काहीही तुला कळून उपयोग नाही कारण तुला सगळी उत्तरं माहितीयेत आणि मला आता कुठे प्रश्न पडायला सुरुवात झालीये.

प्रतिक्रिया द्या
1983 वाचन

💬 प्रतिसाद (9)
र
रातराणी Wed, 08/10/2016 - 04:48 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Wed, 08/10/2016 - 13:05 नवीन
भावना सुरेख मांडल्या आहेत. पण कविता म्हणून काहीतरी चुकत आहे अस वाटत.
  • Log in or register to post comments
इ
इना गुरुवार, 08/11/2016 - 00:50 नवीन
धन्यवाद रातराणी आणि ज्योती अलवनि. पहिला प्रयत्न फसलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी
च
चांदणे संदीप गुरुवार, 08/11/2016 - 07:07 नवीन
फारच आवडली कविता! लिहित रहा! Sandy
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 08/11/2016 - 09:57 नवीन
सुंदर कविता !
  • Log in or register to post comments
ज
जावई गुरुवार, 08/11/2016 - 17:42 नवीन
पहिला प्रयत्न, मस्त लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
इ
इना गुरुवार, 08/11/2016 - 22:38 नवीन
आभार!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 08/12/2016 - 05:14 नवीन
.
  • Log in or register to post comments
B
Bhagyashri sat… Sat, 08/13/2016 - 11:08 नवीन
आवडली आपल्याला
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा