Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोदो आला गोदो आला

स — स्वामी संकेतानंद, Wed, 08/10/2016 - 04:37
गोदो आला गोदो आला खेळखेळणी घेउन आला गोदो आला गोदो आला अहा हर्ष तो मनी दाटला! गोदो आला गोदो आला कसा दरबार पाहा सजला स्वागत करण्या एक गलबला हरहर गोदो निनाद झाला गोदो आला गोदो आला ओवाळावे पटकन त्याला भेटवस्तु द्या माणिकमोती त्रिशुलतलवार बरछ्याभाला गोदो आला गोदो आला जो जो बोले कुजबुजवाला कोल्ह्यांची ती ऐकून कुई हरिण बोलले सिंहच आला गोदो आला गोदो आला हिरवी राने हिरवा पाला दुधात न्हाले गोकुळ सगळे आनंदी त्या गोकुळबाला गोदो आला गोदो आला जलौघ वाहे अरण्यातला तूतीवरचा रेशमकीड़ा खुशीत आला अन् वळवळला! गोदो आला गोदो आला अंधास दिसे पंगु धावला बहिरा ऐके मुक्यास वाचा मंदबुद्धि तो पंडित झाला गोदो आला गोदो आला कोण पुसे त्या अंधाराला ओढा त्यावर सफ़ेद वस्त्रे ओहोटी का आनंदाला? गोदो आला गोदो आला कोण रडला नि कोण हासला? रडणाऱ्यांचे मुसमुसणे ते हसणाऱ्यांचा झिंगालाला! गोदो आला गोदो आला उन्मादाचा नाद टिपेला गोदो आला जगणे झाले देवकिनन्दन जय गोपाला - स्वामी संकेतानंद

प्रतिक्रिया द्या
5203 वाचन

💬 प्रतिसाद (31)
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 08/10/2016 - 05:08 नवीन
म्हातारबाबांना प्रचंड जास्त आवडेल अशी कविता
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Wed, 08/10/2016 - 05:27 नवीन
म्हाताऱ्याचे आठवत नाही, पण मागच्या वर्षी फेसबुकवर ही कविता टाकली होती तेव्हा त्याच्या समविचारी दाढीवाल्या कवींनी ही कविता शेअर केली होती! :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
प्रमोद देर्देकर Wed, 08/10/2016 - 05:30 नवीन
वेटींग फॉर गोदो नाटकाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 08/10/2016 - 05:31 नवीन
काहीच कळले नाही, हुच्च असावे
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 08/10/2016 - 07:33 नवीन
झेपले नाही... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/10/2016 - 13:18 नवीन
प्लस वण टू पांडुब्बा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/10/2016 - 13:19 नवीन
प्लस वण टू पांडुब्बा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
म
मुक्त विहारि Wed, 08/10/2016 - 15:59 नवीन
स्पा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मन१ Wed, 08/10/2016 - 05:40 नवीन
झकास. मस्त गेयता आहे. पण अ‍ॅब्सर्डिस्ट हा प्रकार नाटक पाहिलं तेव्हाही झेपला नव्हता, अजूनही समजत नाही.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 08/10/2016 - 05:44 नवीन
गोदो आला गोदो आला अंधास दिसे पंगु धावला बहिरा ऐके मुक्यास वाचा मंदबुद्धि तो पंडित झाला गोदो आला गोदो आला कोण पुसे त्या अंधाराला ओढा त्यावर सफ़ेद वस्त्रे ओहोटी का आनंदाला? गोदो आला गोदो आला कोण रडला नि कोण हासला? रडणाऱ्यांचे मुसमुसणे ते हसणाऱ्यांचा झिंगालाला! गोदो आला गोदो आला उन्मादाचा नाद टिपेला गोदो आला जगणे झाले देवकिनन्दन जय गोपाला
आवडले.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 08/10/2016 - 05:51 नवीन
आला का एकदाचा! अच्छे दिन आले तर!
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Wed, 08/10/2016 - 05:53 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
स्वामी संकेतानंद Wed, 08/10/2016 - 06:02 नवीन
गोदो आला गोदो आला अच्छे दिन घेऊनी आला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पगला गजोधर Wed, 08/10/2016 - 15:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
ए
एस Wed, 08/10/2016 - 06:48 नवीन
प्रचंड आवडली. आला का एकदाचा असा प्रश्न शीर्षक वाचून मलाही पडला ;-)
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला Wed, 08/10/2016 - 07:02 नवीन
गोदो चं स्पेलिंग चुकलंय.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 08/10/2016 - 07:13 नवीन
स्वाम्या नवं काही लिहिलंय का? किती दिवस ह्यो स्टॉक क्लियरन्स सेल चालू ठेवणार?? :P
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Wed, 08/10/2016 - 07:19 नवीन
नवनिर्माण सध्या बंद आहे.कारण तुला माहीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
पैसा Wed, 08/10/2016 - 07:56 नवीन
आमच्या मरतुकड्या बीएसेनेल ब्रॉडबँडमधून असं बरंच काही वाचायचं चुकलेलं असतं. येऊ दे इथे. काही लिखाण पुन्हा वाचायलाही छान असतं. स्वाम्याचा त्यात नक्कीच नंबर आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
सतिश गावडे Wed, 08/10/2016 - 07:40 नवीन
हे गोदो काय आहे?
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Wed, 08/10/2016 - 08:14 नवीन
गोदो म्हणजे मो दी ????
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 08/10/2016 - 08:19 नवीन
होप, नॉट. मोदी हा संदर्भही आला नाही डोक्यात कविता वाचताना पण काही प्रतिसाद वाचताना मात्र आला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड
व
विप्लव Wed, 08/10/2016 - 08:17 नवीन
गोदो आला गोदो आला अंधास दिसे पंगु धावला बहिरा ऐके मुक्यास वाचा मंदबुद्धि तो पंडित झाला गोदो आला गोदो आला कोण पुसे त्या अंधाराला ओढा त्यावर सफ़ेद वस्त्रे ओहोटी का आनंदाला?
  • Log in or register to post comments
व
विप्लव Wed, 08/10/2016 - 08:18 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विप्लव
प
पगला गजोधर Wed, 08/10/2016 - 08:36 नवीन
सायोनारा सायोनारा ची चाल लावायची का ? (रेफ- लव इन टोकियो )
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 08/10/2016 - 12:03 नवीन
नाही. "ये रे घना"ची. ____________ गोदो आला गोदो आला पोकल बांबू पला पला मुले त्याची कुतांगलू, मास्तर बघे मुरगालू बोलावतो त्या सोट्याला, शालेमागे गच्पानाला गोदो आला... (सॉरी!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पैसा Wed, 08/10/2016 - 12:09 नवीन
ळॉळ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अजया Wed, 08/10/2016 - 12:30 नवीन
=))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ग
गणामास्तर Wed, 08/10/2016 - 09:02 नवीन
दुर्बोध वगैरे काय तरी म्हणतात तशी कविता.
  • Log in or register to post comments
व
विशाखा पाटील Wed, 08/10/2016 - 16:34 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 08/10/2016 - 17:40 नवीन
मज्जा आली स्वामी!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा