कॅनव्हास
गेले अनेक दिवस
तुझे नि माझे रंग
एकमेकात मिसळतो आहे मी …
मला माहिती नव्हते
कि सगळे रंग एकत्र आले
कि बनतो तो काळा रंग …
आता चाचपडतो आहे
त्या अंधारात शोधत
तुझ्या त्या वेगवेगळ्या छटा …
तुझ्या डोळ्यांचा निळा
त्या अधरांचा गुलाबी
अन तुझ्या हातातल्या गुलमोहराचा लाल …
खूप वेळा पुसायचा प्रयत्न केला
स्वताला, स्वताच्या रंगांना
पण, सगळे इतके गडद झाले आहे कि …
पुसताना भीती वाटते आता,
कॅनव्हास फाटण्याची …
किंवा
पुन्हा पांढरा पडण्याची …
नकोच ते ....
- विश्वेश
💬 प्रतिसाद
(1)
ज
ज्योति अळवणी
Fri, 09/02/2016 - 16:47
नवीन
विरह अनावर झालाय... छान कल्पना
- Log in or register to post comments