Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाट वेगळी तिथेच नक्की झाली

D — drsunilahirrao, Mon, 08/15/2016 - 06:26
जगात साऱ्या ओळख पक्की झाली या देशाची खूप तरक्की झाली हाती मोठे घबाड आल्यावरती नियत आपली चोरउचक्की झाली दोन दिशांनी आलो होतो आपण वाट वेगळी तिथेच नक्की झाली दाणादाणा जमवीत आली जनता: पीठ तयाचे,ज्याची चक्की झाली पाउल माझे तेव्हा चुकले आहे नजर तुझी जेव्हाही शक्की झाली डॉ. सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
1405 वाचन

💬 प्रतिसाद (2)
च
चांदणे संदीप Mon, 08/15/2016 - 19:05 नवीन
हे एक कळत नाही आपल्याला. दोन शेर असतात, पण एकमेकांकडे पाठ करून! का? म्हणजे पहिला, दुसरा आणि चौथा एकमेकांशी तारतम्य बाळगून आहेत, पण तिसऱ्या आणि पाचव्याच प्रयोजन नाही कळाल. :( डॉ.साब जनता जबाव चाहती है! (जनता म्हणजे मीच, आणि जवाब-बिवाब काही नाही, असंच गरिबाला जरा उलगडून सांगितलत तर बरं होईल! ;) ) (डॉ. साहेबांच्या गझलेचा जरा बंद पडलेला पंखा) Sandy
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Wed, 08/17/2016 - 13:20 नवीन
संदीप चांदणे, प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार! गझलेचा प्रत्येक शेर म्हणजे एक स्वतंत्र कविता असते.तिचा आधीच्या वा नंतरच्या शेरांशी संबंध असतोच असे नाही.ज्यात एकच विषय पहिल्या शेरापासून शेवटच्या शेरापर्यंत उलगडत नेला जातो तिला मुसलसल गझल म्हणतात. या गझलेत एक विषय शेवटपर्यंत हाताळलेला नाही.त्यामुळे प्रत्येक शेर स्वतंत्र समजावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा