Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी पॉपकॉर्न आता राणीच्या राज्यात !!!

स
सुहास बांदल
Wed, 08/17/2016 - 18:20
🗣 24 प्रतिसाद
नमस्कार Global मराठी मित्रांनो , गेल्या चार पाच वर्षांपासून 'मिसळपाव' चा नियमित वाचक आहे पण आज इथे लिहिण्या चा योग आला आहे. त्याला कारण हि तसेच आहे. नि:संदेह 'मिसळपाव चा आवाका खूपच प्रचंड आहे.कारण आमच्या सारख्या महाराष्ट्रा बाहेर राहणाऱ्या मराठी लोकांना या सारखे दुसरे व्यासपीठ नसावे. इथं मिळणारी माहिती नक्कीच आणि नेहमीच खुप उपयोगी पडते. तुम्हाला सर्वाना, एक आनंदाची बातमी देण्यासाठी ह्या पोस्ट चा खटाटोप.. आपल्या मधल्याच काही उत्साही मराठी लोकांनी मिळून एक नवीन उपक्रम हाती घेतलाय. देशाबाहेरच्या, खास करूनUK मधल्या मराठी आणि अमराठी लोकांसाठी खास आणि निवडक मराठी सिनेमांचे मोठ्या screen वर सादरीकरण करण्याचा ! चांगले मराठी सिनेमा पाहण्याची ओढ आणि त्या साठी पाहावी लागणारी वर्षभराची वाट, छोटी स्क्रीन व pirated कॉपी चा निषेध, आणि कामानिमित्त बाहेरच्या देशात असल्याने चांगले मराठी सिनेमे बघता न येणं हि खंत त्या उद्देशाला पुढे न्यायला युरेशी ठरली, आणि सुरु झाली तयारी.. बजेट, कॉन्टॅक्टस , मार्केटिंग, थिएटर्स, production हाऊसेस, मराठी communities अशा कितीतरी चर्चा झाल्या, आणि हळू हळू वेग वाढू लागला. पहिल्या पायरी वर आम्ही "Half Ticket" काढलं.म्हणजे.... * Marathi Popcorn हि टीम आता घेऊन येत आहे "Half Ticket" ह्या सिनेमाचा UK wide screening* येत्या २१ ऑगस्ट २०१६ ला UK मधील १२ Cineworld थिएटर्स मध्ये Half Ticket सादर होतोय. आमच्या कडून आम्ही सगळ्याना चांगल्या सिनेमा उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतोय. आमच्या ह्याउपक्रमाला आम्हाला साथ द्यायला बरेच मराठी celebrities सुद्धा पुढे आले आहेत .. आता साथ हवीये फक्त तुमची सगळ्यांची ! आमच्या फेसबुक पेज वर तुम्ही आम्हाला support करू शकता. तुम्ही "Half Ticket" हा सिनेमा पहिला असेल तर, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला द्या, आमच्या फेसबुक पेज वर ! तुमच्या UK मधल्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक याना सिनेमा recommend करा , त्यांना पण सांगा ना "Half Ticket" आणि Marathi पॉपकॉर्न बद्दल ! आपल्या मराठी सिनेमाचा आनंद आता UK मध्ये तो हि मोठ्या स्क्रीन वर घेऊयात... येताय ना मग "Half Ticket" बघायला फुल्ल तिकीट काढून.. :) तुम्ही खालील लिंक्स वरून आमच्याशी संपर्क साधू शकता, like करा, share करा आणि प्रेमाने support करा ... www.marathipopcorn.com https://www.facebook.com/marathipopcorn Tickets Booking : http://www.marathipopcorn.com/#!tickets/vyj3b

प्रतिक्रिया द्या
4580 वाचन

💬 प्रतिसाद (24)
ध
धर्मराजमुटके Wed, 08/17/2016 - 19:47 नवीन
सुंदर उपक्रम ! शुभेच्च्छा !! तिकडे मायबोलीवर देखील हे टाका. तिकडे भारताबाहेरील मंडळी अशा बाबतीत जास्त अ‍ॅक्टीव्ह असतात बहुतेक.
  • Log in or register to post comments
स
सुहास बांदल गुरुवार, 08/18/2016 - 15:47 नवीन
धन्यवाद, हो मायबोली वर टाकायचा प्रयत्न केला पण बहुतेक ते प्रशासनाला (admin )आवडलं नाहीये :( पोस्टच काढून टाकली त्यांनी... पहिल पाऊल उचललंय, आता आपली मराठी माणसांची साथ हवी आहे फक्त...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
प
पद्मावति Wed, 08/17/2016 - 20:06 नवीन
खूप छान उपक्रम.
  • Log in or register to post comments
स
सुहास बांदल गुरुवार, 08/18/2016 - 15:49 नवीन
धन्यवाद, आभारी आहोत ! जमलं तर तुमच्या ओळखीत असतील कुणी इकडे तर त्यांना हि निरोप द्या.. :) कि चांगला सिनेमा मिस नका करू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
प
पद्मावति गुरुवार, 08/18/2016 - 18:02 नवीन
नक्की सांगते. fb वर पण काल लाइक केलंय आणि हो, सैराट कधी येणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास बांदल
ख
खटपट्या Wed, 08/17/2016 - 20:10 नवीन
धागा दोनदा आलाय बहूतेक. संपादकांना सांगून एक डीलीट करुन घ्या
  • Log in or register to post comments
स
सुहास बांदल गुरुवार, 08/18/2016 - 15:50 नवीन
हो ना, काहीतरी गडबड झाली ... संपादकांना सांगितलंय आधीच धागा उडवायला आणि वेबसाइटचा पत्ता पण बदलायला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
व
विशाखा राऊत Wed, 08/17/2016 - 22:59 नवीन
अरे वाह मस्त उपक्रम
  • Log in or register to post comments
व
विशाखा राऊत Wed, 08/17/2016 - 23:00 नवीन
www.marathipopcorn.com ही लिंक वरील लेखात एडीट करणे. चालत नाही आहे
  • Log in or register to post comments
स
सुहास बांदल गुरुवार, 08/18/2016 - 16:10 नवीन
धन्यवाद विशाखा, ते बदलता येत नाहीये, admin ला निरोप पाठवलाय, पण तोवर नवीन लिंक देतो इथे http://www.marathipopcorn.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत
व
विवेकपटाईत गुरुवार, 08/18/2016 - 05:08 नवीन
सुन्दर उपक्रम, शुभेच्छा
  • Log in or register to post comments
स
सुहास बांदल गुरुवार, 08/18/2016 - 16:11 नवीन
आभारी आहोत ! जमलं तर तुमच्या ओळखीत असतील कुणी इकडे तर त्यांना हि निरोप द्या.. :) कि चांगला सिनेमा मिस नका करू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
ए
एस गुरुवार, 08/18/2016 - 06:16 नवीन
फार छान. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
सुहास बांदल गुरुवार, 08/18/2016 - 16:11 नवीन
आभारी आहोत ! जमलं तर तुमच्या ओळखीत असतील कुणी इकडे तर त्यांना हि निरोप द्या.. :) कि चांगला सिनेमा मिस नका करू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/18/2016 - 10:42 नवीन
सुंदर उपक्रम ! अनेक शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
स
सुहास बांदल गुरुवार, 08/18/2016 - 16:12 नवीन
धन्यवाद डॉ सुहास म्हात्रे , आभारी आहोत ! जमलं तर तुमच्या ओळखीत असतील कुणी इकडे तर त्यांना हि निरोप द्या.. :) कि चांगला सिनेमा मिस नका करू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/18/2016 - 13:21 नवीन
मराठी लाह्या आता राणीच्या राज्यात !!! गाभा: नमस्कार वैश्विक मराठी मित्रांनो , गेल्या चार पाच वर्षांपासून 'मिसळपाव' चा नियमित वाचक आहे पण आज इथे लिहिण्या चा योग आला आहे. त्याला कारण हि तसेच आहे. नि:संदेह 'मिसळपाव चा आवाका खूपच प्रचंड आहे. कारण आमच्या सारख्या महाराष्ट्रा बाहेर राहणाऱ्या मराठी लोकांना या सारखे दुसरे व्यासपीठ नसावे. इथं मिळणारी माहिती नक्कीच आणि नेहमीच खुप उपयोगी पडते. तुम्हाला सर्वाना, एक आनंदाची बातमी देण्यासाठी ह्या लेखाचा चा खटाटोप.. आपल्या मधल्याच काही उत्साही मराठी लोकांनी मिळून एक नवीन उपक्रम हाती घेतलाय. देशाबाहेरच्या, खास करून राणीच्या देशा मधल्या मराठी आणि अमराठी लोकांसाठी खास आणि निवडक मराठी सिनेमांचे मोठ्या पडद्यावर वर सादरीकरण करण्याचा ! चांगले मराठी सिनेमा पाहण्याची ओढ आणि त्या साठी पाहावी लागणारी वर्षभराची वाट, छोटा पडदा व चोरट्या प्रतींचा चा निषेध, आणि कामानिमित्त बाहेरच्या देशात असल्याने चांगले मराठी सिनेमे बघता न येणं हि खंत त्या उद्देशाला पुढे न्यायला पुरेशी ठरली, आणि सुरु झाली तयारी.. अर्थसंकल्प, संपर्कसुची, विक्रीव्यवस्था, चित्रपटगृह, निर्मिती संस्था, मराठी समाज अशा कितीतरी चर्चा झाल्या, आणि हळू हळू वेग वाढू लागला. पहिल्या पायरी वर आम्ही "हाफ टिकिट" काढलं. म्हणजे.... * मराठी लाह्यांची ही टिम आता घेऊन येत आहे "हाफ टिकिट" ह्या चित्रपटाला युकेच्या भव्य पडद्यावर* येत्या २१ ऑगस्ट २०१६ ला युके मधील १२ चित्रसृष्टीच्या चित्रपटगृहांमध्ये हाफ टिकिट सादर होतोय. आमच्या कडून आम्ही सगळ्याना चांगल्या सिनेमा उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतोय. आमच्या ह्याउपक्रमाला आम्हाला साथ द्यायला बर्‍याच मराठी प्रतिष्ठीत व्यक्तीसुद्धा पुढे आल्या आहेत .. आता साथ हवीये फक्त तुमची सगळ्यांची ! आमच्या फेसबुक पेज वर तुम्ही आम्हाला पाठींबा देऊ शकता. तुम्ही "हाफ टिकिट" हा सिनेमा पहिला असेल तर, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला द्या, आमच्या फेसबुक पानावर ! तुमच्या युके मधल्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक याना सिनेमाची शिफारस करा , त्यांना पण सांगा ना "हाफ टिकेट" आणि मराठी लाह्यां बद्दल ! आपल्या मराठी सिनेमाचा आनंद आता युके मध्ये तो हि मोठ्या पडद्यावर घेऊयात... येताय ना मग "हाफ टिकिट" बघायला पूर्ण तिकीट काढून.. :) ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- जिथे जिथे मराठीचा अनावश्यक आग्रह वाटेल तिथे तिथे मुळ इंग्रजी शब्द राहू द्यावा.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 08/18/2016 - 13:33 नवीन
अगदी बर्‍याच दिवसांनी दिसताय पेठकर काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/18/2016 - 13:41 नवीन
कार्यबाहुल्यामुळे (वर्कलोड) मिपापासून दूर होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
स
सुहास बांदल गुरुवार, 08/18/2016 - 16:15 नवीन
धन्यवाद प्रभाकर पेठकर , आभारी आहोत ! इतका मराठी वाचून एकदम भरून आलं .. पण खरंच छान वाटलं. आणि धन्यवाद , तुम्ही इतकी मेहनत करून सगळं भाषांतर केलंत.. (मला इतकं मराठी येत असतं तर १०० पैकी १०० मिळाले असते ) :) जमलं तर तुमच्या ओळखीत असतील कुणी इकडे तर त्यांना हि निरोप द्या.. :) कि चांगला सिनेमा मिस नका करू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/18/2016 - 16:37 नवीन
मला इतकं मराठी येत असतं........ इतकं म्हणण्यासारखं काय आहे त्यात? कुठले शब्द तुमच्यासाठी नविन आहेत? मला नाही वाटत मी योजलेले शब्द तुमच्यासाठी अनोळखी आहेत. हं! इच्छा मात्र पाहिजे. तिच नसेल तर मात्र कांहीच इलाज नाही. असो. तुमच्या प्रकल्पाला अनेकानेक शुभेच्छा. मी तिथे असतो तर नक्कीच आलो असतो. मिसळपाववर टाकले म्हणजे माझ्या ओळखितल्या तिथल्या सर्वांना पोहोचले आहे. माझ्या प्रतिसादाचा तुम्ही राग मानला नाहीत हे पाहून आनंद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास बांदल
स
सुहास बांदल गुरुवार, 08/18/2016 - 16:59 नवीन
अहो राग कसला मानायचा.. उलट छानच वाटलं.. 'इतक' फक्त या साठी म्हणालो, कारण काहीकाही शब्द, इंग्रजी मध्ये इतके रोजचे झाले आहेत कि आठवण करून सुद्धा त्याचे मराठी शब्द सुचत नाहीत, पण तेच शब्द तुमच्या कडून वाचले, म्हणून म्हटलं.. बाकी काही नाही हो.. पण एक मात्र खरं , मस्त वाटलं तुमच्याशी बोलून..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
पैसा गुरुवार, 08/18/2016 - 15:37 नवीन
यश मिळण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
सुहास बांदल गुरुवार, 08/18/2016 - 16:56 नवीन
धन्यवाद पैसा , आभारी आहोत ! तुमच्या शुभेच्छा अशाच पाठीशी असुद्या.. जमलं तर तुमच्या ओळखीत असतील कुणी इकडे तर त्यांना हि निरोप द्या.. :) कि चांगला सिनेमा मिस नका करू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा