Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेमाची?? गोष्ट

प
पी. के.
Fri, 08/19/2016 - 13:53
🗣 23 प्रतिसाद
सुबोध खरे साहेबांचा शृंगापत्ती हा धागा वाचताना ही गोष्ट आठवली. प्रथम माफीनामा.. वीस वर्षा नंतर मराठीत लिहायचा पहिला प्रयत्न करतोय कारण शेवटचा प्रयत्न मी दहावीत असताना केला होता आणि मागच्या जन्माच्या पुण्याईने काठावर पास पण झालो होतो. थोडकयात सांगायचा ऊद्देश..सांभाळून घ्या. ( ही गोष्ट पुस्तकाची/ सिनेमाची कथा आसू शकते जी मिपा कराना आगोदर पासून माहित असेल.) ही गोष्ट आहे युरोपातली पण माझ्या मराठी वरून ती पश्चिम महाराष्ट्रातील वाटू शकते आणि वाटलं तरी काय फरक पडणार नाय.. भावना पोहोचवणं महत्वाचं. तर फार फार वर्षा पूर्वी (म्हणजे मला माझ्या मित्रांनी सांगून दहा वर्षे झाली त्याच्या अगोदरची) एका युरोपातली (कलाकारांच्या नावावरून असाच वाटतंय) आटपाट नगरात एका अनाथ आश्रमात सर्व मुले मुली आनंदात राहत होती. त्यातच आपल्या गोष्टीची हिरॊयन लीना ( गोष्ट वाचून हिरॊयन का व्हिलन तुमचं तुमी ठरवा) राहत होती. आता हिरॊयन म्हणल्यावर सुंदर तर असणारच. आशा ह्या सुंदर हिरॊयन बरोबरच सैफ नावाचं आणखी एक पात्र असतं (गोष्ट वाचून हिरो का व्हिलन तुमचं तुमी ठरवा). शाळेत असताना सैफ च्या मनात लीना घुसती आणि तो तिला विचारायचे ठरवतो. सैफ:- (लीना ओ लीना दिल तुने छिना आस काहीहि नं म्हणता) तू मला आवडती तुझं काय मत माझ्या बद्दल? लीना:- ( ऐ माकडा आरशात तोंड बग, आला म्होटा..आस काहीहि नं म्हणता) माझ्या मनात आस काहीही नाही. मला अभ्यास करून मोठं व्हायचेय. सैफ:- लीना.... हा चेहरा नीट लक्षात ठेव लीना...., मै तुमे भूल जाऊं ये हो नाही सकता और तुम मुझे भूल जावं ये मै होणे नही दुगा. आस काय बाय म्हणून तणतणत निगुन गेला. दिवसा मागून दिवस गेले. पावसाळ्या नंतर हिवाळा आला आणि निगुन गेला, हिवाळ्या नंतर उन्हाळा आला आणि तो हि निगुन गेला. वर्षा मागून वर्षे गेली. लीनाने शाळा कॉलेज संपवून कंपनीत जॉब पकडला. त्याचं कंपनीत व्हिक्टर नावाचं एक पात्र असतं ( गोष्ट वाचून हिरो का व्हिलन तुमचं तुमी ठरवा). कंपनीत असताना व्हिक्टर च्या मनात लीना घुसती आणि तो तिला विचारायचे ठरवतो. व्हिक्टर:- (लीना ओ लीना दिल तुने छिना आस काहीहि नं म्हणता) तू मला आवडती तुझं काय मत माझ्या बद्दल? लीना:- अरे वा..( माझा पगार xx आणि त्याचा पगार xxxx असा काहीही विचार नं करता) मला ही आवडेल तुझ्या बरोबर लगीन करायला. व्हिक्टर:- ओकचं.. मग ठरलं.. तुळशी च्या लग्नाच्या दुसाऱ्या दिवशी आपण लगीन करायचं. प्रॉमिस लीना:- प्रॉमिस.. दिवसा मागून दिवस गेले. गणपती आले आणि निगुन गेले. दसऱ्या नंतर दिवाळी आली आणि तीही निगुन गेली. तुळशीचंही लगीन झालं आणि तो दिवस आला. ( तो किव्हा त्या नंतरचा दिवस असे दोनच मुहुर्थ आहेत त्या नंतर त्यांचे लगीन नाहीं हौऊ शकत, का ते विचारू नका, नाय तर गोष्टी ची गरज समजा). नदीच्या पलीकडील एका चर्च मधी लगीन करायचं ठरत. दोघे चर्च मधी जातात. व्हिक्टर:- लीना आज आपल्या आयुषातला सगळ्यात महत्वाचा दिवस... तुही अनाथ मीही अनाथ... मेरे यार कि शादी है म्हणणारे आपले मित्र पाहिजे होते. लीना: ठीक हाय. तू तुझे मित्र बोलावं मी माझे बोलावते. लीना नावेतून नदी पार करून अलीकडे येण्यासाठी निघते. त्याचं नावेत नावाडी मार्टिन नावाचं एक पात्र असतं (गोष्ट वाचून हिरो का व्हिलन तुमचं तुमी ठरवा). लीना:- भैया, पलीकडं जानेका है. मार्टिन:- सो रुपये लागेगा. लीना:- लास्ट टाईम तो पचास लिया था. मार्टिन:- सो रुपये लागेगा आणा है तो आओ. बिचार्या लीलांनी तिच्याकडे असणारी शेम्भार ची नोट मार्टिन ला दिली. तिनं गावात जाऊन चेक केलं पण तिला कुणीही मित्र भेटला नाहीं. भेटला तो फक्त सैफ. लीना:- अरे तू सैफ ना. ओळखलंस मला? सैफ:- तुला विसरीन तो टाईम वेगळा असेल सर्वांच्या डोळयात पाणी आणि या जगात मी नसेन.. लीना:- अरे एका ना. उदय माझे लगीन हाय ये (माझ्या नवऱ्याचा कान पिळायला). असा म्हणून लीना ने सैफ च्या जुन्या जखमेवर मीठ चोळले. सैफ च्या मनात विचारांचे आणि त्या गावात वाऱ्याचे वादळ उठले. लीना च्या लक्षात आले कि आता आपल्याला लवकर मागे गेलं पाहिजे. लीना पळत पळत नावे जवळ आली. लीना:- भैया, पलीकडं जानेका है. मार्टिन:- पाचसो रुपये लागेगा. लीना:- लास्ट टाईम तो सो लिया था. मार्टिन:- जोरसे हवा चल रही है. सो रुपये के लिये मै मेरी जान धोके में नाहीं डलुंगा. (पाचसो रुपये के लिये डलुंगा) लीना:- मेरे पास तो सो रुपये ही है. मार्टिन:- तो किसी के पास से लेके आओ. लीना परत सैफ पाशी येते आणि घडलेली हकीकत सांगते आणि चारशे रुपये मागते. सैफ (मनातल्या मनात) हीच ती वेळ हाच तो टाईम. सैफ:- हे बग. मी तुला पैसे देतो पण पण पण .... आजची रात्र माझ्याबरोबर घालावं. लीना:- निर्लज्य, नालायक. बीप बीप बीप ( शव्या देऊन जाते ) घडलेली हकीकत नावाडी मार्टिन सांगते आणि विनंती करते कि पलीकडं गेल्यावर व्हिक्टर कडून घेऊन सर्व पैसे देते. पण ऐकेल तो मार्टिन कसला.. मार्टिन:- मॅडम, घोडा घास के साथ दोस्ती करेगा तो खयेगा क्या? शेवटी लीना कडे कुठला हि पर्याय शिल्लक राहत नाय आणि अपरीहार्य कारणा मुळे ती रात्र सैफ बरोबर घालवते. लग्नाचा दिवस.. गोष्टीतलं शेवट चा पात्र (पाव्हणा कलाकार) त्याचं नाव फेडरर असतं (गोष्ट वाचून हिरो का व्हिलन तुमचं तुमी ठरवा) जो कि कॉमन दोस्त असतो सैफ आणि व्हिक्टर चा. त्याला रात्री चा प्रकार माहित असतो आणि लीना च आपल्या दोस्तांशी लगीन होणार हे समजल्यावर तो व्हिक्टर ला सर्व हकीकत सांगतो.. व्हिक्टर:- लगीन कॅन्सल... पॅक अप.. द एन्ड.. आता ह्या गोष्टीत पाच पात्र आहेत. 1) लीना 2) सैफ (लीना चा शाळेतील दोस्त) 3) व्हिक्टर (लीना चा होणारा नवरा) 4) मार्टिन (नावाडी) 5) फेडरर (कॉमन दोस्त सैफ आणि व्हिक्टर चा) प्रत्येक पात्र बरं केव्हा वाईट आहे. तुमच्या नजरेतून सगळ्यात चांगलं पात्र कुठलं. पाचही जणांना क्रमाने लावून प्रतिसाद द्या. आणखी एकदा माफीनामा. पहिला प्रयत्न सांभाळून घ्या

प्रतिक्रिया द्या
4464 वाचन

💬 प्रतिसाद (23)
अ
अभ्या.. Fri, 08/19/2016 - 14:03 नवीन
तुमच्या नजरेतून सगळ्यात चांगलं पात्र कुठलं. पाचही जणांना क्रमाने लावून प्रतिसाद द्या.
शृंगापत्तीच हाय राव.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Fri, 08/19/2016 - 15:15 नवीन
हे म्हणजे वेताळाने गोष्ट सांगितल्यावर विक्रमला प्रश्न विचारल्या सारखं झालं..
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 08/19/2016 - 17:02 नवीन
काय मस्त शैली...मजा आली.. लिहीत रहा
  • Log in or register to post comments
स
सोनुली Fri, 08/19/2016 - 17:44 नवीन
अगदी विचारप्रवर्तक
  • Log in or register to post comments
क
क्षमस्व Fri, 08/19/2016 - 17:49 नवीन
गुड।।
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 08/19/2016 - 18:51 नवीन
सगळेच कमीजास्त बरेवाईट आहेत. कोण हिरो नाही. त्यातल्या त्यात काहीच संबंध नसताना कळ लावणारा मित्र व्हिलन नंबर वन म्हणता येईल. गोष्ट आवडली. अजून सांगा.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 08/20/2016 - 13:39 नवीन
सगळ्यात चांगला फेडरर आणि सगळ्यात वाईट व्हिक्टर. गोष्ट आणि सांगण्याची पद्धत आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ल
लालगरूड Fri, 08/19/2016 - 18:57 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 08/19/2016 - 19:33 नवीन
ष्टुरी लिहिणारे तुम्ही सर्वात वाईट आणि ती वाचणारे आम्ही सर्वात चांगले. बाकीचे याच्यामध्ये कुठेतरी!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 08/20/2016 - 06:53 नवीन
बाडीस, बाडीस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
असंका Sat, 08/20/2016 - 14:31 नवीन
+१..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ज
ज्योति अळवणी Fri, 08/19/2016 - 20:15 नवीन
गोष्ट एखाद्या सिनेमाचा प्लॉट वाटतो आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 08/19/2016 - 23:04 नवीन
पी.के., हे विधान थोडं स्पष्ट करायला हवंय : >> शेवटी लीना कडे कुठला हि पर्याय शिल्लक राहत नाय आणि अपरीहार्य कारणा मुळे ती रात्र सैफ बरोबर घालवते. लीना जर नावाड्यासोबत परतते नेलं, तर सैफ अलीकडेच राहतो ना? का दोघांनाही परत आणतो नावाडी? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Sat, 08/20/2016 - 00:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 08/20/2016 - 05:22 नवीन
ह्यो व्हिक्टर भौ पल्याडन अल्याड कसा येतु? त्येबी लगीन व्हायचा आत ?
  • Log in or register to post comments
प
पी. के. Sat, 08/20/2016 - 06:05 नवीन
व्हिक्टर भौ पल्याड गेलेलाच नसतो. अल्याड याचा प्रस्नच नाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
उ
उडन खटोला Sat, 08/20/2016 - 12:17 नवीन
क्या बात क्या बात क्या बात!
  • Log in or register to post comments
B
bhaktipargaonkar Sat, 08/20/2016 - 14:10 नवीन
खूपच सुंदर शैली...भाषा आणि मांडणी आवडली...विशेष म्हणजे तुळशीच लग्न आणि चर्च मध्ये लग्न....भन्नाट .. नवर्याचा कान पिळायला...ते पण आवडल... राहता राहिला प्रश्न चांगल्या न वीत पात्राचा ...तर सगळ्यात चांगला नावाडी ...नावाडी कसला तो share मार्केटच ते..आत्ता एक भाव..तर थोड्यावेळाने वाढलेला...मला आवडेल त्याच्या नावेत पैसे गुंतवायला..
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 08/20/2016 - 14:18 नवीन
पैल्याच प्रयत्नात गोष्तीत येवडी सूचक वाक्ये वाचून ड्वाळे पानावले. दिवसा मागून दिवस गेले. गणपती आले आणि निगुन गेले ओकचं.. मग ठरलं.. सो रुपये लागेगा मॅडम, घोडा घास के साथ दोस्ती करेगा तो खयेगा क्या? तुमाला उजवल भविश्य हाये हे तुमी शेम्भराची नोट न देताच सांग्तो. तुमाला पीकेमौजी हा प्रुस्कार आवदेल काय ?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sat, 08/20/2016 - 14:23 नवीन
थोडा बदल करुन एक वेगळी वर्जन बनवतो. मार्टिन:- मॅडम, घोडा घास के साथ दोस्ती करेगा तो खयेगा क्या? लीना निराश होवून गावकडे निघते...तिला फेडररचा फोन येतो... फेडरर एका प्रायवेट बँकेत सेल्स मध्ये आहे. आज काहीहि करुन त्याला लोनचं टार्गेट पुर्ण करायचंय...फेडररचा मित्र असलेल्या मार्टिननेच त्याला फोन करुन टिप दिलीय... "लीना..माझ्यकडून लोन घे..तुझं काम होईल माझा जॉब वाचेल" "इंटरेस्ट रेट किती ?" "वीस टक्के..तू व्हॅल्युड कस्टमर म्हणून तुझ्यासाठी अठराचं जुगाड करतो" "हट मेल्या ..."असं म्हणंत (आणि यापेक्षा सैफची ऑफर बरी असं मनात म्हणत) नाईलाजाने सैफकडे जाते. फेडररचं टार्गेट पुर्ण न झाल्याने त्याला बॉस जीपीएल करतो, मग निराश मनाने मित्राच्या बारमध्ये पहाटेपर्यंत दारु ढोसून बाहेर पडल्यावर समोर सैफच्या घरातून लिनाला बाहेर पडताना पाहतो आणि सूडाच्या भावनेने व्हिक्टरला फोन लावतो. पुढचं तुम्ही लिहिलं आहेच आता लावा क्रम
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 08/20/2016 - 15:06 नवीन
मी टायटल देतो. लोन लेना लीना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Sat, 08/20/2016 - 15:07 नवीन
हा हा हा ...धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
इ
इल्यूमिनाटस Sat, 08/20/2016 - 17:43 नवीन
रात्र नावाड्याभौ सोबत घालविली असती तर कसलाच प्रोब्लेल आला नसता न्हाई का?! या काणाच त्या काणाला गेलं नसतं. चुकलंच जरा लिणा ताईंचं;) असो गोष्ट मस्त!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा