भारतीय सैन्य आणि प्रांतिक सीमेचे शिक्के ...
आज टीव्हीवर १६ मराठा बटालियनच्या जवानांचे मनोगत ऐकत होतो तेव्हा एक गोष्ट जाणवली की भारतीय सैन्य हे मराठा गोरखा जाट अशा अनेक रेजिमेंटमध्ये विभागलेलं आहे...आपल्या लढाईत सगळे एकत्र येतात पण मग असे वर्गीकरण का ?देशाच्या सैनिकाला प्रांतिक सीमावादाच्या पलीकडे असायला हवं....अशा रेजिमेंटमुळे नक्की काय साध्य होतं ?
मुळात जर सैन्य भरतीसाठी हे वर्गीकरण असेल तर सैन्यात आल्यावर ते तसे असता कामा नये...कारण प्रांतिक सीमा मागे टाकून तो सैनिक भारतीय म्हणून आलेला असतो....
ब्रिटिशांनी जर हे रेजिमेंट बनवले असतील तर ते अजूनही हद्दपार का करण्यात आलेले नाहीत?
जाणकारांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत !
💬 प्रतिसाद
(169)
अ
अर्धवटराव
Wed, 08/24/2016 - 20:08
नवीन
काय खतरनाक फिलॉसॉफी आहे.
डांगे साहेब आणि बापुसाहेब.. दोघांनाही धन्यवाद.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 08/25/2016 - 15:28
नवीन
उत्तम धागा!
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 08/26/2016 - 10:56
नवीन
सैन्यामध्ये अधिकारी, सुभेदार आणि इतर रँक मध्ये जातीय आणि प्रांतिक भेदभाव नसला तरी उच्च निच्चतेचे भेदभाव खूप असतात असे ऐकले होते. जसं की वेगळी मेस, आहाराचा मेनू, वेगळी स्वच्छता गृहे, वेगळी क्लब्स, वेगळ्या गाड्या. प्रोटोकॉल समजू शकतो पण तोच न्याय त्यांच्या कुटुंबाला पण लागू असतो वाटतो. प्रांतिक सीमावाद नसतो हे म्हण्यासाठी ठीक आहे पण "ग्राही-ग्राही" हा शब्द खूप प्रचलित आहे सैन्यामध्ये. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
- Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर
Fri, 08/26/2016 - 18:49
नवीन
सेनेत अधिकारी आणि जवान हे खांद्याला खांदा लावून छातीवर गोळी झेलतात. कारगिलपासून मागे इतिहासात जात जात कोणतेही युद्ध घ्या, तुम्हाला प्रत्येक लढाई-चकमकीत अधिकारी कामी आलेले आढळतील. युद्धभूमीवर तुम्ही मागे उभे राहून, कमरेवर हात ठेवून हुकूम सोडू शकत नाही. तुमच्या एका हुकुमावर तुमचे जवान जिवाची पर्वा न करता शिर हातावर घेऊन लढावेत अशी जर तुमची अधिकारी म्हणून अपेक्षा असेल (आणि ती तशी असायलाच हवी. शेवटी देशाचा प्रश्न आहे), तर तेवढा आदर, दरारा, विश्वास, प्रेम आणि धाक हे तुम्हाला घाम गाळून, प्रसंगी रक्त सांडून कमवावे लागतात. कारण ज्याने बॉम्बगोळ्यांच्या वर्षावात तुमचा हुकूम मानायचा आहे, तोही एक अभिमानी, कर्तव्यपरायण सैनिक असतो.
हे असे नाते निर्माण करायचे असेल, तर अधिकारी आणि जवान यांच्यामध्ये प्रसंगी निकटता आणि प्रसंगी अंतर हे दोन्ही असणे जरुरी आहे.
जातिसंस्था हे आजही भारतीय समाजातील एक कटुसत्य आहे. सेना ही समाजाचाच भाग असून सैनिक हे व्यापक समाजाइतकेच भले-बुरे असतात. जातिअंत हे ध्येय म्हणून कितीही उच्च असले, तरी ते अंमलात आणणे हे सेनेचे कार्य नव्हे. समाजाच्या सर्व बलाबलस्थानांनी युक्त असे सैनिक एकत्र करून, त्यांना प्रशिक्षित करून, त्यांना कुशल आणि प्रेरणादायक नेतृत्व देऊन देशरक्षणासाठी तयार करणे हे सेनेचे कार्य आहे.
जातिभावनेमुळे कुणाही सैनिकावर अन्याय होणार नाही आणि या भावनेचा राष्ट्रकार्यासाठी सकारात्मक उपयोग होईल इतकेच सेना करू शकते, आणि करतेही.
वरील शब्द politically incorrect वाटतील, पण ते सत्य आहेत. पण उद्या, जातिविरहित सैन्य हे आपले कार्य अधिक निष्ठेने व कुशलतेने करू शकेल अशी सामाजिक प्रगती भारतात झाली तर भारतीय सेना सर्व जातिविशिष्ट पलटणी ताबडतोब विसर्जित करील याबद्दल मला तरी मुळीच शंका नाही. पण ती वेळ अजून यायची आहे.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Sat, 08/27/2016 - 09:19
नवीन
जातीच्या संदर्भाबाबत प्रतिक्रियेशी सहमत. सैन्यामध्ये कोणाची जात काढणे हा खूप मोठा गुन्हा आहे. पण माझा सैन्यामधील हुद्यानुसार उच्च- निचतेबद्दल संभ्रम आहे. ट्रूप/कंपनीच्या आतमध्ये आणि युद्धजन्य परिस्थिती मध्ये हा प्रोटोकॉल समजू शकतो पण "फॅमिली वेलफेर" सारख्या कार्यक्रमामध्ये जो सैनिकांच्या कुटुंबियांसाठी असतो तिथे ही हा भेदभाव पाहायला मिळाला, हे मी माझ्या एका काकांच्या बरोबर दिघी येथे अनुभवलं आहे.
कमांड हॉस्पिटल मध्ये सुद्धा अधिकारी-सुभेदार हुद्यावर असणाऱ्यांना विशेष वागणूक दिली जाते, असे मला आलेल्या अनुभवावरून दिसले.
आहाराच्या मेनू/रेशन मध्ये सुद्धा रँक नुसार फरक असतो, असे ऐकले आहे. असे का हे समजले नाही.
CSD कॅन्टीनमध्ये सुद्धा अधिकारी-सुभेदार-आणि इतर रँक वाल्यांसाठी वेगळी लाईन असते, हे पटलं नाही.
मी अधिकारी वर्गाच्या आकसातून हे लिहले नाही पण प्रत्येक सैनिकाला त्याच्या कामा व्यतिरिक्त सोयी सुविधा आणि वागणूक समान मिळाली पाहिजे, ह्या मताचा मी आहे. शेवटी प्रत्येक सैनिक हा प्राण पणाला लावून, हाल अपेष्टा सोसत देशाचं रक्षण करत असतात. (इथे "प्रत्येक सैनिक" सर्व सैनिक या अर्थाने घ्यावा)
मिपा/अन्य सोशल मीडिया वरती भारतीय सैन्याच्या कार्यपद्धती बदल विचार मांडणे, विरोध करणे, चुका शोधणे हे कायदेशीर/नैतिकतेच्या कक्षेत बसते का? हे जाणकारांनी समजून सांगावे, ही विनंती. नसेल तर मी माझी प्रतिक्रिया मागे घेतो. (हा पळपुटेपणा समजला जाऊ शकतो पण भारतीय सैन्य ही आपल्या भारतीयांसाठी अति संवेदनशील बाब आहे आणि मला तो आदर टुचभर ही कमी होऊन द्यायचा नाही)
- Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर
Sat, 08/27/2016 - 10:51
नवीन
हेतू निर्दोष असेल तर कोणत्याही विषयावर चर्चा होऊ शकते
- Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर
Sat, 08/27/2016 - 11:03
नवीन
सैन्यातील हुद्द्यांची उतरंड ही युद्धक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी निर्माण केलेली आहे. शंभर लोकांची कंपनी जर एका व्यूहरचनेनुसार बिनचूक हल्ला करू शकली नाही तर लढाई जिंकता येणार नाही. युद्ध सांगून होत नसते. आज्ञापालनाची मानसिकता सैन्यातील प्रत्येकाच्या (अधिकारी व जवान दोन्ही) रक्तात भिनलेली असते. ती शांतिकालातही तशीच शाबूत रहावी यासाठी सदोदित, निरंतर, कठोर प्रशिक्षण हे सेनेचे इतिकर्तव्य होऊन बसते. त्यात मानसिकता हा मूळ मुद्दा असल्यामुळे "नोकरी आणि घर" असा फरक करणे अशक्य असते. पण हुद्दा काहीही असला तरी अखेर प्रत्येकजण हा पलटणीसाठी प्राणाला पेटून लढणारा सैनिकच असतो.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 08/27/2016 - 11:10
नवीन
विशुमत सर, चमु सर,
थोड्या वेळात ह्या विषयावर माझे विचार मांडतो, ते परिपूर्ण असावेत त्यांच्यावर प्रश्न येऊ नयेत असे नाही तर माझ्या अल्पमतीला जे सुचतील ते सांगतो
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 08/27/2016 - 14:43
नवीन
चमु ह्यांच्याशी सहमत! :)
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 08/27/2016 - 15:45
नवीन
विशुमित साहेब
भारतीय सैन्यात कॊणतीही जात किंवा धर्म मानला जात नाही. धर्म हा प्रत्येकाच्या घरात बंदिस्त असतो. उदा दहीहंडीसाठी हुल्लडबाजी किंवा मशिदीवर भोंगे लावले जात नाहीत. परंतु ज्येष्ठ आणि कनिष्ठ हे मात्र फार कसोशीने पाळले जाते. लष्करात एका पातळीपर्यंत लोकशाही आहे आणि जेवढी आहे ती नागरी लोकांच्या पेक्षाही नक्कीच जास्त चांगली आहे.
परंतु जेंव्हा प्रत्यक्ष कामाची वेळ येते तेंव्हा हुकूमशाहीच आहे(आणि असावी लागते.) एखाद्या वेळेस अधिकाऱ्यांनी सैनिकाला दिसताक्षणीच गोळ्या घालायचा आदेश दिला तर तो त्याने विनातक्रार पाळलाच पाहिजे. अन्यथा दंगली, आंदोलने इ. वेळेस हे तर आपलेच लोक आहेत मी गोळ्या चालवणार नाही असे सैनिक म्हणून लागले तर अनागोंदी होऊ शकते.
मी विक्रांत वर असताना आमच्या कॅप्टन ने मला स्पष्ट शब्दात सांगितले होते कि डॉक्टर, बहुसंख्य वेळेस मी तुला असे का करायचे त्याचे स्पष्टीकरण देईन. परंतु काही वेळेस हे स्पष्टीकरण तुला मिळणार नाही आणि तू केवळ मी आज्ञा दिली म्हणून ती तंतोतंत पाळणे आवश्यक आहे.
अधिकारी आणि सैनिक यामध्ये सुद्धा असा सुस्पष्ट फरक केला जातो आणि हा भरती पासून कसोशीने पाळला जातो. सैनिकांच्या डोक्यात हा माणूस अधिकारी आहे आणि त्याची आज्ञा पाळलीच पाहिजे याबद्दल कोणताही किंतु असता कामा नये. यासाठी पायदळ नौदल आणि वायुदलात त्यांची मेस वेगळी असते. त्यांची घरे वेगळी असतात. त्यांना मिळणाऱ्या सुविधा या त्यांच्या हुद्दयाप्रमाणेच असतात.रेशन मध्ये फरक नाही. उलट सैनिकांना गणवेश बूट इ गोष्टी फुकट मिळत असत आणि अधिकाऱ्यांना मात्र विकत घ्याव्या लागत.
अधिकाऱ्यांना गणवेश भत्ता मिळत असे (पण २००५ साली सात वर्षात एकदा ७०००/- रुपये मिळत आणि माझ्या नौदलातील पांढरा गणवेश विकत घेऊन धुवून पांढरा शुभ्र वापरण्यायोग्य ठेवणे यासाठी हा भत्ता फारच अपुरा असे) आता तो १४०००/- आहे.
मेस मध्ये सैनिकांना जेवण पूर्ण फुकट असते. अधिकाऱ्यांना आपले जेवण अधिकाऱ्यांच्या इतमामाने ठेवण्यासाठी साधारणपाने रेशन मिळून सुद्धा महिना १८००-२००० रुपये अतिरिक्त द्यावे लागत. बाहेरून दिसताना अधिकाऱ्यांचे जेवण हे जास्त चकाचक दिसते आणि लोकांचा गैरसमज होतो.
CSD कॅन्टीनमध्ये सुद्धा अधिकारी-सुभेदार-आणि इतर रँक वाल्यांसाठी वेगळी लाईन असते हे एक बहुसंख्य नागरी माणसांना न पटणारे कारण आहे. पण कुठेतरी हा माणूस वरिष्ठ आहे हे सारखे सैनिकांच्या मनावर बिंबवले जावे यासाठी या गोष्टी वेगळ्या असत.
जहाजात किंवा रेजिमेंट मध्ये रोज सैनिक आणि अधिकारी एकाच वातावरणात राहत असतात. त्यातून लष्करी अधिकारी आणि आजकाल सैनिक यांची पदवी एकच असते. बी ए किंवा बी एस सी. त्यामुळे सैनिकांना आपण अधिकाऱ्यांपेक्षा कमी नाही असा गंड निर्माण होऊ शकतो, इंजिनियर किंवा डॉक्टर या अधिकाऱ्यांच्या बाबतीत असा प्रश्न कमी वेळेस येतो. इंजिनियरिंगचे वरिष्ट सैनिक हे पदविका धारक (डिप्लोमा) असतात. आणि अधिकारी पदवी धारक असतात. वैद्यकीय खात्यात तर डॉक्टर आणि इतर असा सरळ फरक असल्याने हा प्रश्न कधीच येत नाही.
"अतिपरिचयात अवज्ञा" होऊ नये म्हणून या गोष्टी फार कसोशीने पाळाव्या लागतात.
वायुदलात (आणि नौदलात) एकंदर सैनिकांचे शिक्षण बऱ्याच वरच्या पातळीचे असते आणि बरेच सैनिक पदवीधर आहेत त्यामुळे सैनिकांना आपण अधिकाऱ्यांपेक्षा कमी नाही असा गंड पटकन होऊ शकतो त्यातून वायुदल हे फक्त ८० वर्षे अस्तित्वात आहे आणि त्यांच्या परंपरा अशा नाहीतच. त्यामुळे तेथे शिस्तीच्या बाबतीत परिस्थिती थोडी कठीण आहे. वायुदल हे वैमानिकांचे, वैमानिकांसाठी आणि वैमानिकाने चालविलेले असे मला एका वायुदलाच्या तळावर वायुसैनिकाने सांगितले होते. त्याला मी ताडकन जबाब दिला होता कि जेंव्हा युद्ध होईल तेंव्हा वायुदलात प्रत्यक्ष लढाईत लढणारा माणूस हा वैमानिकच असेल आणि तू वायुदलाच्या तळावर शान्त बसलेला असशील. नौदलात आणि पायदळात अधिकारी आणि सैनिक (च काय डॉक्टर सुद्धा) दोघेही प्रत्यक्ष युद्धात भाग घेत असतात. त्याच्या आगाऊपणाला उत्तर देण्यासाठी मी थोडी अतिशयोक्ती केली असली तरी हि सत्य गोष्ट आहे.
नौदलात असताना आमच्या कॅप्टनने स्पष्ट आदेश दिलेले होते कि अन्न फुकट गेले तरी चालेल पण अधिकाऱ्यांचे अन्न सैनिकांना( अधिकाऱ्यांचे आचारी वाढपी इ सैनिक असले तरीही) देता येणार नाही. त्यांनी त्यांचे जेवण सैनिकांच्या मेस मध्ये "च" जाऊन घेतले पाहिजे. सैनिक आणि अधिकारी यातील हा फरक त्यांना कायम डोक्यात ठेवलाच पाहिजे.
युद्धजन्य परिस्थिती मध्ये हा प्रोटोकॉल समजू शकतो पण "फॅमिली वेलफेर" सारख्या कार्यक्रमामध्ये जो सैनिकांच्या कुटुंबियांसाठी असतो तिथे ही हा भेदभाव पाहायला मिळतो कारण प्रत्यक्ष युद्धाचे वेळेस सैनिकांना शिस्त लावायला वेळ मिळत नाही.
जगभरात कोणत्याही लष्करात पूर्ण लोकशाही आणणे अशक्य आहे. मग ते अमेरिकन असो कि फ्रेंच. तेथील सैनिक ही अशाच तर्हेच्या तक्रारी करत असतात.
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sat, 08/27/2016 - 20:31
नवीन
पाकिस्तानात असेच असते का ? की ते अब्दालीला फॉलो करतात ?
( अब्दाली रात्री टेहळणी करत असताना मराठा सैन्य तळात त्याला छोट्या छोट्या शेकोट्या व धूर दिसला.. उसने पूछा ये क्या है ? उसका नौकर बोल्या ... खाविंद ! ये लोग जात , पोटजात , धर्म , पद , वर्ण के अनुसार अलग अलग खाना पकाते है..
अब्दाली बोल्या ... जो लोग खाने कू एक नहीं होते वो लडने कू एक कैसे होंगे ? देख लेना अल्ला की दुवा से हमही जीतेंगे !
इस्वास पाटलांच्या पुस्तकात लिवलय . )
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Sun, 08/28/2016 - 05:29
नवीन
वॉव! मग तो जिंकलाच असता ;)
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sun, 08/28/2016 - 05:58
नवीन
विश्वास पाटलानी पुस्तकात लिहिलय.
( फादर ऑफ हिंदुस्तान, फादर ऑफ पाकिस्तान व फादर ऑफ अफगाणिस्तान ... हे तीन्ही आम्ही प्रातःस्मरणीय मानतो. )
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sun, 08/28/2016 - 06:03
नवीन
( फादर ऑफ हिंदुस्तान, फादर ऑफ पाकिस्तान व फादर ऑफ अफगाणिस्तान ... हे तीन्ही आम्ही प्रातःस्मरणीय मानतो. ) हे वाक्य माझे म्हणजे चंपाबाईचे आहे...
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 08/28/2016 - 07:01
नवीन
हो ना अब्दाली त्याच्या खानसाम्या आणि चोपदाराबरोबरच जेवत असे आणि
म्हणूनच त्याने बंगालपासून कन्याकुमारीपर्यःत दैदिप्यमान विजय मिळवलै
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 08/28/2016 - 07:07
नवीन
आणि तुमच्या इतर दोन्ही फादर ची राष्ट्रे पहा कशी सोन्याचा धूर काढत आहेत.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Sun, 08/28/2016 - 07:39
नवीन
परम दयाळु अब्दाली हिंदुस्थानाच्या धर्मशाळेत मुक्काम न ठेवता परत गेलेत ते ही युद्धात जिंकलेलं सगळे परत टाकुन!
दैवी नायक ;)
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sun, 08/28/2016 - 08:26
नवीन
ते कुठले तरी प्रभू जन्मभूमी गरियसी की कायसे म्हणून परत आले...
तसेच अब्दालीही बोलले व त्यानी कविता लिहिली ...
By blood, we are immersed in love of you.
The youth lose their heads for your sake.
I come to you and my heart finds rest.
Away from you, grief clings to my heart like a snake.
I forget the throne of Delhi
when I remember the mountain tops of my Afghan land.
If I must choose between the world and you,
I shall not hesitate to claim your barren deserts as my own
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 08/28/2016 - 09:23
नवीन
अब्दालीनं विंग्रजाना विंग्लिस शिकिवला काय?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 08/28/2016 - 09:29
नवीन
आणि अफगाण लोक सुद्धा किती स्वामीभक्त?
त्यांनी आपला देश जसाच्या तसा ठेवला आहे. सतराव्या शतकात
बापाची आठवण तशीच.
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sun, 08/28/2016 - 10:14
नवीन
ते मूळ पश्तू कवितेचे इंग्रजी भाषंतर आहे.
लव ऑफ ए नेशन.
http://www.itdunya.com/showthread.php?57326-Ahmad-Shah-Abdali-Poetry
इथे मूळ कविता आहे... गांधारीची भाषा !
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 08/28/2016 - 14:24
नवीन
मग अब्दाली तर हराम झाला.
त्याला जन्मभूमी जन्नतपेक्षा प्यारी झाली.
मुसलमान असून अल्ला सोडून जन्मभूमी
तोबा तोबा
लाहौल विला कुवत
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 08/28/2016 - 14:28
नवीन
आणि ते 17 व्या शतकातून सहाव्या शतकात (पैगंबरांच्या)काळात केंव्हा जाणार?
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Sun, 08/28/2016 - 14:55
नवीन
आता टेंशन नाही डॉक...जाऊदे तुम्ही नका इतकं महत्त्व देऊ...
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Sun, 08/28/2016 - 17:01
नवीन
कविता छान आहे! आवडली.
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Sun, 08/28/2016 - 16:07
नवीन
चंपू, लौ यु.
नेहमीप्रमाणेच अभ्यासु प्रतिसाद द्यायला इतरांना उद्युक्त करतेस. किती उचक्या लागत असतील नै तुला? फ़क्त जनसेवा म्हणून च सहन करतेस ना गं?
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Sat, 08/27/2016 - 14:40
नवीन
उत्तम प्रतिसाद
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 08/27/2016 - 16:38
नवीन
उच्च निच्चतेचे भेदभाव खूप असतात असे ऐकले होते. जसं की वेगळी मेस, आहाराचा मेनू, वेगळी स्वच्छता गृहे, वेगळी क्लब्स, वेगळ्या गाड्या. प्रोटोकॉल समजू शकतो पण तोच न्याय त्यांच्या कुटुंबाला पण लागू असतो वाटतो.
त्याला "उच्च-नीच" असे नकारात्मक पाहिले तर कठीण होऊन बसेल, त्याला (व्यावसायिक दृष्ट्या)"वरिष्ठ-कनिष्ठ" असे म्हणाल्यास आपण त्या "रँक कॉन्शसनेस" चे "इसेन्स" पकडू शकू असे वाटते.ऑफिसर्स-जेसीओ-ओआर मेस वेगवेगळ्या का असतात? तर शुद्ध उत्तर प्लॅनिंग (पर्सोनेल मॅनेजमेंट ते कॉम्बॅट) ते भडास काढणे, सगळ्यासाठी. कारण आर्मी पूर्णपणे नीड टू नो बेसिस वर काम करते, कोणाला कुठल्या मिशन बद्दल काय अन किती माहिती असावे ह्याचेसुद्धा कडक नियम असतात, उदाहरणार्थ ,एखादे मिशन पार पाडताना केजुअल्टी किती होऊ शकतात, जखमी लोकांना बाहेर कसे काढायचे, शत्रूच्या गोटात हत्यारे कुठली आहेत ह्याचे (जर उपलब्ध असले तर) इंटेलिजन्स रिपोर्ट्स त्या हत्यारामुळे कुठल्या प्रतीच्या अन किती जखमा होऊ शकतात, त्यांना टेकल करायला कुठली औषधे हत्यारे फिल्ड हॉस्पिटलला असावी, फिल्ड मेडीक युनिट ड्युटी ला किती जवान डेप्युट करायचे हे डिटेल्स सीओ ने डॉक्टर सोबत डिस्कस करायचे असतात, ही डिस्कशन होतात मेस मध्ये! आता मेस मध्ये का ? तर वरती खरे साहेब म्हणाले आहेत तसे माणुस जरी 24 तास काम करत नसला तरी सैन्य करते, अन कठीण परिस्थिती मध्ये सीओ अव्याहत फक्त "बॉईज"चा विचार करत असतो, अश्यावेळी जर ऑफिसर्स/ओआर मेस एक केली अन एखाद्या ओआर (शिपायाने) जर वरती दिलेली मेडिकल कॉन्टिनजन्सी डिस्कशन ऐकली तर काय होऊ शकते, कर्णोपर्णी वार्ता होऊन एकंदरीत पूर्ण युनिटचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते, जवान साधे असतात, 10-12वी पास पोरे असतात ती तरुण, 18 ते 22 मधली सहसा 22 पर्यंत पोरे लान्स नाईक होऊन जातात, त्या पोरांना फक्त "कॉम्बॅट" शिकवलेली असते, "कॉम्बॅट मॅनेजमेन्ट" नाही, त्यांचा विश्वास असतो "सीओ साब" वर हा सीओ साब तोच असतो ज्याला वर्षानुवर्ष अगोदर एनडीए मध्ये शिकवतात "Lead your men into battle, because there is no runner up trophy for the war" , एक कारण हे झाले मेस वेगळी ठेवायचे,उरला मुद्दा भडास, जवान अगदी आज्ञाधारक बाळे असतात असे नाही, कधीमधी एखाद्या अधिकाऱ्याचा त्यांनाही राग येतो, दिलेली शिक्षा रुचत नाही पण कडक लष्करी शिस्तीपाई ती निभवावी लागते, परत संध्याकाळी जर तोच अधिकारी अन तोच जवान एकाच मेस मध्ये असले तर त्या जवानाला परत डिनर प्रोटोकॉल पाळणे क्रमप्राप्त झाले, मग भडास काढणार कुठे तर ओआर मेस! मजबूत दारू प्या आपापसात त्या अधिकाऱ्याचा उद्धार करा, मनाची पाटी कोरी करा अन दुसऱ्या दिवशी सकाळी परत फ्रेश मूड ने पीटी परेडला फॉलइन व्हा, अशी ती सोपी सुलभ अनलॉजी असते!. दुसरे म्हणजे मेनू, तो वेगळा असतो असे माझ्या ऐकिवात नाही, त्याबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल, फॅमिली, ह्या बाबतीत मला तितकीशी कल्पना नाही, पण आर्मी ऑफिसर्स वाईव्ज ह्यांनी चालवलेले "आर्मी वाईव्ज वेल्फेर असोसिअशन" त्याच्या अंतर्गत भरवलेली प्रदर्शने, त्यांनी आर्मी पेराप्लेजिक सेंटरला वेळोवेळी दिलेला भरघोस आर्थिक अन भावनिक आधार हे पाहता आर्मी हीच एक प्रचंड मोठी फॅमिली असल्याचे पटते. ह्यावर अजून काही मुद्दे आहेत, मांडलेल्या मुद्दयांनी जर तुमचे तार्किक समाधान होत नसले तर अजून मांडेन म्हणतो मी मुद्दे :)
ता. क. - स्वच्छतागृहे वेगळी असली तरी एखाद्या आयएएस अधिकऱ्याच्या हापिसात असतील त्या तोडीची स्वच्छ असतात, बाकी हायरर्की हे जीवनात कायम असलेले सत्य आहे, तुलना करायची म्हणूनच नाही पण हेच सेम मुलकी प्रशासनात सुद्धा असते, किंबहुना तिथे तर आयएएस मेस अन क्लर्क मेस मध्ये दर्जात्मक अंतर दाखवून देणारे घटकही असतात, इतकेच कश्याला कॉर्पोरेट-इंडस्ट्रियल मध्ये पहा, एमप्लॉयी लोकांना सोडेक्सो कूपन अन मॅनेजमेन्ट मधल्या हाय लेव्हल जनतेला गोल्फ क्लब मेम्बरशिप्स वगैरे, हे सुद्धा "उच्चं नीच" म्हणावे का?? माझ्यामते नाही :)
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 08/30/2016 - 12:35
नवीन
बापू साहेब-
कोणत्या ही संस्थेमध्ये वरिष्ठ- कनिष्ठ चा मुद्दा मला पहिल्या पासूनच मान्य आहे. त्या बाबत माझे काहीच दुमत नाही.
तशी मी माझ्या मनाशी पक्की खून गाठ बांधून ठेवली आहे की कनिष्ठ-मध्यम-वरिष्ठ ही उतरंड युगें न युगे चालत आली आहे आणि ती अशीच युगें युगे चालत राहणार आहे . त्याला कोणतेच क्षेत्र अपवाद नसणार आहे.
आणखी फक्त एका गोष्टीचे वाईट वाटते ते म्हणजे अधिकाऱ्यांच्या घरी सहायक (हेल्पर) म्हणून काम करणाऱ्या जवानांचे. ह्याच्यावर थोडा प्रकाश टाकला तर या मागची पार्श्व भूमी समजेल. तुमचे काही अनुभव असतील तर अति उत्तम.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Tue, 08/30/2016 - 13:12
नवीन
साहेब,
नक्की प्रॉब्लेम काय आहे ? शिक्षण कमी असणार्या, गरीब घरातल्या आणि शारिरीक क्षमता उच्च असणार्या लोकांनी हमाली कामे किंवा टगेगिरी करत बसण्यापेक्षा एक शिस्तबद्ध, प्रगतीकडे नेणारी, क्रीडा/शिक्षण यासाठी उद्युक्त करणारी जीवनशैली स्वीकारली तर आनंदाची गोष्ट नाही का ?
या पार्श्वभूमीची माणसे जी लष्करात नसतात त्यांना सहसा अन-ऑर्गनाइझ्ड सेक्टर मधे जसे हेल्पर, अनस्किल्ड वर्कर वगैरे पद्धतीचे काम करावे लागते.
तिथे त्यांना कोणती मानाची वागणूक मिळणार आहे ?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 08/30/2016 - 13:56
नवीन
अप्पा साहेब जी,
मी सैन्यामध्ये भरती होण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्यांत यशस्वी होऊन आणि प्रशिक्षण घेऊन सुद्धा हेल्परच काम करावं लागणाऱ्या जवानांबद्दल बोलत आहे.
"शिक्षण कमी असणार्या, गरीब घरातल्या आणि शारिरीक क्षमता उच्च असणार्या लोकांनी हमाली कामे किंवा टगेगिरी करत बसण्यापेक्षा">>>> ह्याच्याशी असहमत...!! याचा अर्थ असा घायचा का की सैन्यात भरती होणारे बहुतांश अगोदर हमाली आणि टगेगिरी करायचे?
माझ्या पाहण्यात असलेली चांगली आर्थिक परिस्थिती असणारी गावातील प्रत्येक घरातील लोक सैन्यात रुजू आहेत.
(तसं मला प्रॉब्लेम माझ्या घरातील व्यक्तीची, जी सैन्यात आहे, ह्या कथित वरिष्ठ-कनिष्ठ पद्धतीमुळे हेळसांड होते त्याचे दुःख वाटले म्हणून हा लेखन प्रपंच)
सैन्याबद्दल प्रश्न उपस्थित करणे हे नेहमी अति संवेदनशील असते, हे मी आधीच नमूद केले आहे. तुम्हाला माझे प्रश्न विचारणे आवडले नसेल तर माझा पूर्ण विराम.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Wed, 08/31/2016 - 08:06
नवीन
ह्याच्याशी असहमत...!! याचा अर्थ असा घायचा का की सैन्यात भरती होणारे बहुतांश अगोदर हमाली आणि टगेगिरी करायचे?
साहेब मी सैनिक केडरच्या लोकांबद्दल बोलत आहे. कमिशन्ड किंवा नॉन कमिशन्ड अधिकारी नव्हे.
सधन घरातील किती टक्के लोक सैनिक म्हणून भरती होतात ?
सैन्याबद्दल प्रश्न उपस्थित करणे हे नेहमी अति संवेदनशील असते, हे मी आधीच नमूद केले आहे
असे काही नाही. होली काऊ असे काहीच नसते.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 08/31/2016 - 09:05
नवीन
म्हणजे गरीब घरातील आहेत म्हणून, ज्या उद्देशासाठी सैन्यात भरती झाले तो उद्देश सोडून अधिकाऱ्यांची हेल्पर गिरी करायला मिळणे हे थोर भाग्य आहे असे म्हणायचं आहे का तुम्हाला? नेमका हाच विचार मला खटकला
सधन घरातील किती टक्के लोक सैनिक म्हणून भरती होतात ?>>>>>
सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, इ मधील अशी किती तर गावं आहेत जिथे घरागणीस मुले सैन्यात आहेत. पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तरांचल, हरियाणा राज्यातील किती तरी सधन घरातील मुले सैन्यात जाणे प्रतिष्ठेचे मानतात.
तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश या राज्यामधील किती तरी उच्च शिक्षित मुले सैन्यात भरती होतात. (ही मी प्रातिनिधिक उदाहरणे दिली आहेत, बाकी प्रांतांचे पण योगदान आहेच )
मी सैन्य संस्थेला होली कॉव च मानतो.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 08/30/2016 - 15:06
नवीन
आणखी फक्त एका गोष्टीचे वाईट वाटते ते म्हणजे अधिकाऱ्यांच्या घरी सहायक (हेल्पर) म्हणून काम करणाऱ्या जवानांचे
विशुमितजी,
बहुतेक आपला एकसारखे दिसणारे गणवेश असल्यामुळे आर्मीचे वेगवेगळे आर्म/कोर त्यांची फंक्शन इत्यादी बद्दल प्रचंड जास्त गोंधळ उडालेला आहे असे वाटते, ऑर्डर्ली ज्यांना बॅटमॅन असेही म्हणतात हे खास प्रशिक्षित असे लोक असतात, ही मंडळी आर्मी सर्विस कोरची असते, ह्यांचे शास्त्रशुद्ध हाऊसकिपिंग, केटरिंग बार टेंडिंगचे ट्रेनिंग बंगलोर स्थित कॉलेज मध्ये मिळते, ह्या व्यतिरिक्त "सहाय्यक" ही एक पोस्ट असते ज्यात एक सैनिक strictly अधिकाऱ्याचा पर्सर म्हणून डेप्युटेड असतो, अश्या सैनिकांना कधीही अधिकाऱ्याची वैयक्तिक कामे करावी लागत नसतात, एखादा अधिकारी तसे करवून घेत असल्यास ते दुर्दैवी अन वन ऑफ इट्स काईन्ड उदाहरण होय, बाकी डिटेल नंतर बोलतो तूर्तास ह्या 2 लिंक्स कामी याव्यात, प्रश्न असल्यास जरूर विचारावेत ही विनंती विशेष, मला उत्तर द्यायला आवडेल
लिंक क्रमांक एक
लिंक क्रमांक दोन
ह्याच्याशिवाय एक वैयक्तिक प्रश्न विचारतो, राग मानू नये ही विनंती, इंडियन आर्मी विषयी आपल्या मनात काही अढी बसलेली आहे का? असल्यास ती चूक आहे असे मी म्हणणार नाही, ती जर काही चुकीच्या संकल्पनांमुळे बसली असेल तर त्या मी साफ करायचा प्रयत्न करू शकेल, अन ती अढी ठेवायचा तुम्हाला हक्कही आहेच, शेवटी आर्मी ही पण हाडामांसाच्या माणसांची बनलेली असते, हे तुम्ही काय किंवा मी काय कोणीच विसरू शकत नाही, हे ही खरेच
-कळावे
बाप्या
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 08/31/2016 - 06:27
नवीन
बापू साहेब-
माहिती साठी तुमचे खूप खूप आभार..!!
सैन्याबद्दल मला नितांत आदर आणि आपुलकी आहे. फक्त घरातील एक व्यक्ती जी सैन्यामध्ये आहे, त्यांच्या बरोबर काही काळ राहण्याची संधी मिळाली. त्यावेळेस जे काही खटकलं त्याबद्दल मी माझे काही प्रश्न मांडले.
बहुदा मी नागरी आयुष्य आणि आर्मीचे आयुष्य यांची तुलना करत होतो त्यामुळे असेल कदाचित. आर्मी बद्दल अढी वगैरे असं काही ही नाही, गैरसमज नसावा.
- Log in or register to post comments
ग
गंम्बा
Wed, 08/31/2016 - 08:51
नवीन
विशुमत जी - नागरी आयुष्यात खटकण्यासारख्या गोष्टी आर्मीच्या आयुष्यापेक्षा १०० पट जास्त असतील.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 08/31/2016 - 09:07
नवीन
तीव्र सहमत..!!
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 01/13/2017 - 07:03
नवीन
माझा रोख याच गोष्टींसाठी होता.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/video-of-army-personnel-came-complaining-about-exploitation-1382981/
(पण अशी संवेदनशील माहिती जवानांनी उघड करू नये असे प्रामाणिक मत आहे. तक्रार करण्यासाठी प्रॉपर चॅनेल चा वापर करायला पाहिजे होता.)
- Log in or register to post comments
म
मारवा
Fri, 08/26/2016 - 11:38
नवीन
Armed Forces Special Powers Act च्या सैनिकांना अमर्याद पॉवर देणार्या तरतुदींवर, त्याच्या होत असलेल्या सुयोग्य/ गैर वापरावर त्याच्या आवश्यकतेवर अनावश्यकतेवर.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याचा धोका पत्करुन चर्चा व्हावयास हरकत नसावी.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 08/26/2016 - 17:53
नवीन
वेगळा धागा काढा
आरामखुर्चीत विचारवंत भरपूर आहेत मिपा वर त्यांचे म्हणणे (दुसरी बाजूही) हि ऐकायला मिळेल. ( हे मी उपहासाने नाही तर गंभीरपणे लिहीत आहे)
- Log in or register to post comments
म
मारवा
Sat, 08/27/2016 - 07:31
नवीन
खरय खरे साहेब
मुलभुत मानवी हक्काचा विचार करणारे सर्व चोर लफंगे
भारतीय घटना लिहीणारे व मुलभुत मानवी हक्काच्या तरतुदी त्यात करणारे सर्व समिती सदस्य
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश ज्यांनी अॅफ्स्पा संदर्भात जो नुकताच निकाल दिला
जीवन रेड्डी कमिशन
इरोम शर्मिला सारखे संधीसाधु वर्शानुवर्षे उपोषणाचे ढोंग करणारे व शेवटी हळूच चोरपावलाने राजकारणात घुसणारे
आणि सर्वसामान्य घरातल्या मणीपुरी गृहीणी ज्यांनी रस्त्यावर उतरुन अंगावरील सर्व कपडे काढुन
नग्नावस्थेत निदर्शने केली आणि मनोरमा
हे सर्वच आरामखुर्चीतलेच विचारवंत आहेत.
आणि हो हे मी उपहासाने लिहीत नाहीये गंभीरपणे लिहीतोय या लोकांचा नाटकीपणा या
गृहीणींचा लटका राग आणि अश्लील निदर्शन मला चुकीचाच वाटतो.
लेख लिहीतो स्वतंत्र तोपर्यंत हे वाचुन घ्या टाइमपास म्हणुन
आणि हो हे मी अजिबात उपहासाने लिहीत नाहीये
गंभीर विनोद करतोय
http://www.outlookindia.com/website/story/indian-army-rape-us/296634
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sat, 08/27/2016 - 09:25
नवीन
गंभीर अनुमोदन. फक्त एक दुरुस्ती इरोम शर्मिला हि आरामखुर्ची तील विचारवंत नसून पलंगावरील/गादीवरील विचारवंत आहे, कारण 16 वर्ष ती त्यावरच होती. आणखी एक लेख लिहताना संतोष हेगडे कमिटी चा रिपोर्ट चा हि विचार करा.
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sat, 08/27/2016 - 11:12
नवीन
वर्षानुवर्षे उपवास / उपोषण करणार्यानी नंतर राजकारणात जाउच नये का ?
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Sat, 08/27/2016 - 18:06
नवीन
नेहमी दहशतवादी वगैरेंचीच साईड घेऊन का बोलतात हो? येखाद दोन मानवी हक्कवाले दाखवा न ज्यांनी दहशतवादी कँपवर जाउन प्रबोधन्वगैरे काही केले असेल? दहशतवाद्यांचे व्हिक्टीम माणसेच असतात न? अन त्यांना कधी हक्क नसतो का जगण्याचा?
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Sat, 08/27/2016 - 14:39
नवीन
जातीय / धार्मिक पिंक, तेढ वाढविणारी वक्तव्ये ह्यांकडे दुर्लक्ष करून ह्या धाग्यावर चांगली चर्चा होत आहे हे निरीक्षण आणि होत राहील हे अपेक्षा.
काही आयडींना उत्तर देत बसण्यापेक्षा आपण आपली रेघ मोठी केली की ते आपोआप निष्प्रभ होतील ह्याची खात्री वाटते.
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 08/27/2016 - 16:01
नवीन
सहमत. धाग्यावरील बरेचसे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 08/27/2016 - 17:54
नवीन
Brigade of the Guards
Parachute Regiment
Mechanised Infantry Regiment
Punjab Regiment
Madras Regiment
The Grenadiers
Maratha Light Infantry
Rajputana Rifles
Rajput Regiment
Jat Regiment
Sikh Regiment
Sikh Light Infantry
Dogra Regiment
Garhwal Rifles
Kumaon Regiment
Assam Regiment
Bihar Regiment
Mahar Regiment
Jammu & Kashmir Rifles
Jammu & Kashmir Light Infantry
Naga Regiment
1 Gorkha Rifles (The Malaun Regiment)
3 Gorkha Rifles
4 Gorkha Rifles
5 Gorkha Rifles (Frontier Force)
8 Gorkha Rifles
9 Gorkha Rifles
11 Gorkha Rifles
Ladakh Scouts
Arunachal Scouts
Sikkim Scouts
भारतीय लष्कराच्या सर्व रेजिमेंटची नावे आपण पाहिलीत तर काही गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवतील त्या म्हणजे बहुसंख्य रेजिमेंट्स या सीमावर्ती भागातील राज्यांच्या आहेत. यात अंतर्गत चार राज्यांचे (फक्त बिहार मद्रास महार आणि मराठा) हे अपवाद आहेत. महाराष्ट्राच्या ( नावाने का होईना) दोन रेजिमेंटस आहेत. यात प्रांतिक वाद इ काही नसून प्रत्यक्ष ज्या प्रांतातील लोक जास्त युद्धमान राहिले तेथे योद्धे आणि वीर यांची गौरवशाली परंपरा असल्याने लष्करात जाणे हे मान सन्मानाचे समजले जाते.या रेजिमेंट्सच्या वैभवशाली परंपरा त्या लष्करातील कामगिरीला आवश्यक समजल्या जात असल्याने त्या तशाच कायम ठेवल्या गेल्या.
राहिली गोष्ट प्रत्यक्ष लढाईची. राजस्थान मध्ये युद्ध झाले तर राजपुताना रायफल्सचे लोक किंवा चीन बरोबर युद्ध झाले तर सिक्कीमचे किंवा अरुणाचल प्रदेशाचे लोक केवळ देशासाठीच नव्हे तर आपल्या भूमीसाठीशिवाय संस्कृती आणि भाषिक कारणासाठी प्राणपणाने लढतील हा गोष्ट वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी लक्षात घेतल्याने सरकारने हि प्रांतिक नावे असलेल्या रेजिमेंट्स चालू ठेवण्यासाठी अनुमती दिली. शिवाय सिक्कीम स्काऊट्स चे सैनिक तेथे युद्ध झाले तर आपल्या "मातृभूमी"शी आणि तेथील "हवामाना"शी चिरपरिचित असतात. एखादा राजस्थानी राजपूत तेथील स्थानिक माणसांकडून जितकी चांगली माहिती काढू शकेल तेवढी दुसऱ्या राज्यातील माणूस नाही.
महार रेजिमेंट हि बरखास्त झालेली असताना महार जातीतील योध्द्यांना मनाच्या नोकऱ्या मिळाव्यात म्हणून डॉ बाबासाहेब आंबेड्करांच्या आग्रहाखातर परत सुरु झाली आहे. परंतु या रेजिमेंट मध्ये सर्व जाती आणि धर्माच्या लोकांचे मिश्रण आहे केवळ महार नाहीत हि गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. महार रेजिमेंट हि सर्वात जास्त सरमिसळ असलेली रेजिमेंट आहे.
The Mahar Regiment was originally intended to be a regiment consisting of troops from the Mahars in Maharashtra, the Mahar Regiment is one of the only regiments in the Indian Army that is composed of troops from all communities and regions of India.
n the July 1941, B. R. Ambedkar was appointed to the Defence Advisory Committee of the Viceroy's Executive Council. He used this appointment to exert pressure within the military establishment for a Mahar regiment. He also appealed to the Mahars to join the Army in large numbers. In October, the Army gave in, and the 1st Battalion of the Mahar Regiment was raised in Belgaum
पहा -- https://en.wikipedia.org/wiki/Mahar_Regiment.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 08/28/2016 - 15:16
नवीन
चंपाबाई,
बांगलादेशास फक्त आई आहे. बिनबापाचा असल्याने प्रात:स्मरणीय नाहीये तुम्हाला वाट्टे?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
द
दा विन्ची
Wed, 08/31/2016 - 07:28
नवीन
मला भारतीय सैन्याबद्दल अतीव आदर आहे. अमित दादा, सोन्याबापू यांच्यामुळे चर्चाही खूप चांगली चालू आहे, म्हणून माझे एक निरीक्षण किंवा शंका नोंदवतो. शंका बरीच विशुमित यांच्याप्रमाणे आहे.
मी गेल्या चार महिन्यात सहलीसाठी म्हणून गढवाल रायफल्स चे मुख्यालय लॅन्सडाऊनी आणि कुमाऊ रायफल्स चे मुख्यालय रानीखेत पाहून आलो. मी सध्या बेंगाल इंजिनिअरिंग ग्रुप चे मुख्यालयआहे त्या रुरकी या ठिकाणी राहतो. इथे सैन्य दलातील लोकांची संख्या बरीच लक्षणीय आहे.
सर्वसाधारणपणे आपल्या मनात सैनिकी पेशाबद्दल खूप आदर असतो. मात्र मी इथे कामाच्या स्वरुपाविषयी काही वेगळेच पहिले.
माझ्या मुलांच्या शाळेतील पालक सभेला एका वेळीस किमान १० ते १२ गर्द शेवाळी रंगातील मिलिटरी जिप्सी गाड्या व त्यांचे चालक आलेले असतात. हा सरकारी पैश्याचा गैरवापर नाही काय ?
शक्तिमान गाडीचा सर्रास वापर शाळेच्या बस सारखा करतात, हे हि मनाला पटत नाही.
इतकेच काय, अधिकाऱ्याच्या पत्नी व मुलांसोबत मॉल आणि बहुपडदा चित्रपट गृहातसुद्धा गणवेशातील जवान येतो व मध्यंतरात चहापाणी आणून देतो. हे खरोखर योग्य आहे काय? यात कसली आलीय देशसेवा?
केवळ इतकेच नाही, संध्याकाळी व्हॉलीबॉल खेळायला माझे दोन कर्नल मित्र माझ्या टीममध्ये येतात. त्यांचं अनुभवही खूप भारी होता. बॉल कोर्टबाहेर गेल्यावर, ते आणायला जायचेच नाहीत, इतरांनी आणण्याची वाट पहायचे, शेवटी तुझा रुबाब ऑफिसमध्ये असे आम्ही स्पष्ट सांगितल्यावर थोडे माणसाळले. कदाचित हा एक व्यक्तिनिष्ठ अनुभव असू शकेल.
पण एकंदरीत जवानाच्या सेवेचा खासगी कामासाठी बराच गैरवापर होतो असे निरीक्षण नोंदवतो .
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Wed, 08/31/2016 - 08:44
नवीन
तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे. बऱ्याच वेळा भारतीय आर्मी विषयी आलेल्या अतीव प्रेमामुळे असले विषय चर्चेला येणे अवघड होऊन बसत, त्यामुळं काही चुकीच्या प्रक्टिस वर सुद्दा बोलणं अवघड होत. आर्मी ऑफिसर ना खरं तर पर्सनल गरजा साठी सहायक म्हणून जवानांची नेमणूक होते यांना बॅटमॅन बोललं जातं, परंतु सर्रास हे जवान ऑफिसर बरोबर त्याची पत्नी, मुले यांची ही सेवा करताना दिसतात. हि इंगजी पद्दती बद्दल अनेक जवान मध्ये असंतोष आहे. खालील दिलेली लिंक पहा यांच्यामध्ये एक NSG trained कमांडो जवान त्याची कार्यकीर्द फक्त ऑफिसर चा फॅमिली servent म्हणून घालवतो. हि आर्मी रेसौर्स च पूर्ण वेस्ट आहे. हे जुन्या काळामध्ये चालून गेलं, परंतु सामाजिक जाणावा प्रगल्भ असणाऱ्या पिढीतील जवनांना हे सध्या मानवात नाही, त्यातूनच मग जवान आणि ऑफिसर यांच्यात चकमकी झालेल्या दिसून आलेलं आहे.
सासंद कमिटी ने या पद्धती वर जोरदार आक्षेप नोंदवले आहेत. तसेच त्यावेळचे आर्मी चीफ VK सिंग यांनी सुद्धा हि पद्दत बंद करून आर्मी ऑफिसर ला फक्त buddies नेमण्याची गरज व्यक्त केलीय, जे फक्त ऑफिसर ना प्रोफेशनल तसेच कार्यालयीन कामात मदत करतील. हि पद्दत बहुदा वायुदल आणि नौदल यात नसावी, जाणकार अधिक प्रकाश टाकू शकतील. तसेच पोलीस दलातील उच्च पदस्थ ऑफिसर सुद्धा हि पद्दत वापरतात, बरेच पोलीस शिपाई घरघुती नोकर म्हणून वापरले जातात. याबद्दल मुंबई मिरर ने एक लेख प्रसिद्ध केलेला, जालावर शोधा, सापडेल.
http://www.tehelka.com/2014/04/army-officers-using-jawans-as-domestic-staff/
तसेच आणखी माहिती साठी जाणकारांचे वरचे तसेच येणारे प्रतिसाद वाचा.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »