Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अभियांत्रिकी पदविका नंतर कोणते कोर्सेस करावे ????

न
निलम बुचडे
Mon, 08/22/2016 - 20:24
🗣 8 प्रतिसाद
मेकॕनिकल इंजीनिअरींग डिप्लोमा पूर्ण केल्यानंतरच्या कोर्सेसची माहिती हवी आहे . कृपया मार्गदर्शन करावे.
वर्गीकरण
माहिती हवी आहे

प्रतिक्रिया द्या
2867 वाचन

💬 प्रतिसाद (8)
अ
अभ्या.. Mon, 08/22/2016 - 20:48 नवीन
http://www.misalpav.com/node/35967 ताई तुमची समस्यां इथे मांडा. भाते दादा यायच्या आत बरंका ;)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 08/23/2016 - 11:11 नवीन
१) कोणत्यातरी महाविद्यालयातून बी.ई. च्या पदवीला प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करा. २) मेकॅनिकल इंजिनिअरने सॅप चे प्रशिक्षण घेतल्यास फायदा होईल.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 08/23/2016 - 12:56 नवीन
साठ टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्यास शॉपफ्लोरला काम स्वीकारावे. काम करत शिकता येते. चांगले टक्के असतील अन गणितात गती असेल तरच डिग्रीकडे जावे. बाकी कोर्सेस वगैरे काम करता-करता ( स्व- कमाईवर) करावेत. प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाची सर कोर्सला नाही. (अनुभवी पदविकाधारक) खेडूत.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Tue, 08/23/2016 - 15:47 नवीन
तुमचे ध्येय काय आहे जीवनात ? तुम्हाला कशात रुची आहे ? मोठ्या कंपनीत नोकरी करायची आहे ? स्वतःचा व्यवसाय / वर्कशॉप / कारखाना सुरु करायचा आहे ? किंवा लग्नानंतर किंवा माहेरच्यांचा एखादा व्यवसाय / वर्कशॉप / कारखाना यामध्ये वृद्धी आणायची आहे ? किंवा आहे तो पसारा सांभाळायचा आहे ? तुम्हाला अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात काम करायचं आहे ? किंवा यंत्र अभियांत्रिकीत संशोधन करायला आवडेल ? किंवा शॉप फ्लोर वर काम करायचंय ? किंवा रेल्वे / राज्य सेवा / संरक्षण दले यात प्रवेश परीक्षा द्यायच्यात ? तुमचे ध्येय काय ? तुमचा कल काय ?
  • Log in or register to post comments
न
नितीनचंद्र Wed, 09/14/2016 - 17:58 नवीन
पोस्ट डिप्लोमा इन टुल अ‍ॅड डाय डिझाईन - आय जी टी आर - औरंगाबाद नुकतीच जाहीरात येऊन गेली. आय जी टी आर औरंगाबाद येथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मी पण मुळचा डिप्लोमा होल्डर आहे. पण मुळातले गुण तपासुन प्रगती करता येते. http://www.literacynet.org/mi/assessment/findyourstrengths.html ही लिंक ओपन करा आणि आपल्या मुळच्या इंटेलिजन्स बद्दलचा रिपोर्ट मला जर इमेल वर पाठवला तर मार्गदर्शन करणे सोपे होईल. joglekar.nitin@gmail.com
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 09/14/2016 - 19:47 नवीन
डिप्लोमा नीट पूर्ण केला असेल तर सरळ डिग्री करावी, डिग्री नसेल तर नोकरी शोधायचे हाल होतील
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित गुरुवार, 09/15/2016 - 06:50 नवीन
जॅाब नाही म्हणतात ,खरच इंजीनिअरींगचे हाल चालु आहेत का हो
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 09/15/2016 - 08:06 नवीन
संधी आहेत पण दुर्दैवाने, १० पास आउट होणाऱ्या इंजिनिअरपैकी माझ्या मते १ हा इंडस्ट्रीमधे काम करण्यास सक्षम आहे (माझ्या वैयक्तिक मते. एका क्ष हौसिंग सोसायटीत डझनावारी इंजिनीअर आहेत (ते सुद्धा मेरिटवाले), पाण्याच्या पंपाने एअर पकडली, किंवा बिल्डिंग वरची टाकी अर्धीच भरल्यामुळे ३ ऱ्या, ४ थ्या मजल्याला, पुरेश्या दाबाने पाणी येत नाही. या/अश्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा समजत नाही त्या ठोंब्यांना.... सोल्युशन देणे तर दूरच. (परंतु मनमोहनसिंग यांनी कुठल्या प्रकारे इंडस्ट्री विकास करायाला हवा होता, म्हणजे जॉब उपलब्ध झाले असते, याबद्दल तासनतास गफ्फा हाणू शकतील.) असो तर इंडस्ट्रीला तुम्ही पदविका धारक /पदवी धारक याच्याशी फारच कमी घेणं देणं असतं.... तुम्ही कॉलेजात भलेही हायड्रॉलिक्स चे युनिव्हर्सिटी टॉपर असाल हो, पण प्रॉडक्शन लाईन मधे प्रेशरगेज जास्त प्रेशर अचानक दाखवायला लागलं, तर नक्की काय तपासायचं (काय कारणं असू शकतात) हेच जर लक्षात येत नसेल... मग् काय एकूणच आनंद आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वलिखित
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा