Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एम. एस. धोनी चित्रपटावरून चालू असलेला वाद

स
सुचिकांत
Wed, 08/24/2016 - 07:34
🗣 12 प्रतिसाद
हिंदी चित्रपट मराठीत डब करून मराठीसोबत प्रदर्शित केला गेला तर, मराठी चित्रपटसृष्टीचे नुकसान होईल की फायदा? काही मुद्द्यांवर माझी मते खालीलप्रमाणे : - हिंदी चित्रपट मराठीत डब होऊ लागले तर मराठी चित्रपट सृष्टी संपेल, कलाकार बेकार होतील. >>मला वाटते की यामुळे नुकसान होणार नाही उलट, डबिंग कलाकारांना, संवाद लेखकांना, नवीन संधीच मिळतील. आत्ता फॉक्सस्टार सारख्या मोठ्या चित्रपटसंस्थांना जर विरोध केला गेला तर भविष्यात अशा चित्रपटसंस्था कोणत्याही प्रकल्पाकरता मराठीचा विचार करताना हजारवेळा विचार करतील, जे मराठीसाठी घातक असेल. - मराठी माणसाला हिंदी समजते मग मराठीतून चित्रपटाची काय गरज? >>मला वाटते की, महाराष्ट्रामध्ये ५० पेक्षा जास्त बोली आहेत, त्यातील अनेक मराठीपेक्षा पूर्ण वेगळ्या असल्याने त्यांना मराठीच कसे बसे समजते, तर हिंदी कधी समजेल? अशा लोकांना मुख्य मराठीच्या प्रवाहाशी जोडण्याकरता, असे अनेक दर्जेदार चित्रपट, मालिका, मराठीत येणे गरजेचे आहे. शिवाय मराठी माणसाला हिंदी समजते म्हटले की, आपल्याला अनेक ठिकाणी मराठी मिळणारच नाही. तेव्हा हे आत्मघातकी विधान वाटते. याच करणातून, - मराठीत ग्राहक सेवा नाकारली जाते - मराठीत माहितीपत्रके नाकारली जाते - मराठीत बोलायचे/शिकायचे टाळले जाते इ.

प्रतिक्रिया द्या
3181 वाचन

💬 प्रतिसाद (12)
स
स्वामी संकेतानंद Wed, 08/24/2016 - 08:06 नवीन
मुद्दे पटले. माझेही तेच मत आहे. हिंदी चित्रपटाला मराठीत डब व्हावेसे वाटते हे मराठी भाषेचे एक 'मार्केट' म्हणून स्थान उंचावत असल्याचे चिन्ह आहे. कानडीमध्ये इतर भाषेतले चित्रपट डब करण्यावर बंदी आणून कानडी चित्रपटांना संरक्षण देण्याच्या नावाखाली कानडी लोकांचेच नुकसान केले गेले. इतर भाषांतील दर्जेदार चित्रपटांचे भंगार रिमेकच जास्त होतात. 'हिंदी समजते ना, मग कशाला करा डब?' ही मानसिकता आणि 'हिंदी समजते ना, मग कशाला पाहिजे मराठी पाट्या?' ही मानसिकता एकच आहे.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 08/24/2016 - 08:15 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
त
तुषार काळभोर Wed, 08/24/2016 - 09:31 नवीन
+१ हिंदी चित्रपटाला मराठीत डब व्हावेसे वाटते हे मराठी भाषेचे एक 'मार्केट' म्हणून स्थान उंचावत असल्याचे चिन्ह आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
र
राजाभाउ Wed, 08/24/2016 - 10:33 नवीन
+११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
संदीप डांगे Wed, 08/24/2016 - 08:17 नवीन
चित्रपट प्रसिद्धी आहे, बाकी कै नै, लोक स्वतःहून बघायला जातील असे काही नाही, त्यामुळे वाद घालून चर्चेत येण्याचा प्रयत्न
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 08/24/2016 - 19:00 नवीन
डांगेण्णा, नीरज पान्डे आहे दिग्दर्शक. लोक जातीलच जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
साहेब.. Wed, 08/24/2016 - 09:01 नवीन
एम. एस. धोनीवर आलेला माझ्या माहितीतील पहिला धागा आणि त्याचाही एम. एस. धोनीशी काहीही संबंध नाही. एम. एस. धोनी आवडत असल्याने चित्रपट हिंदीतूनच पाहणार आहे,
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक Wed, 08/24/2016 - 11:07 नवीन
आता इंग्लिश चित्रपट हिंदीत डूब झाले म्हणून हिंदी चित्रपट सृष्टी थोडी संपली ?
  • Log in or register to post comments
श
श्री Wed, 08/24/2016 - 11:13 नवीन
यातील मुख्य वादाचा मुद्दा हा आहे कि, मराठी चित्रपटांसाठी मल्टीप्लेक्स मध्ये जे राखीव खेळ, बंधन आहे त्याचा फायदा ह्या डब चित्रपटांनी घेतला तर मुळ मराठी चित्रपटांना टाईम स्लॉट, कमी किंवा मिळणार नाहीत.
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Wed, 08/24/2016 - 17:15 नवीन
निरर्थक मुद्दा आहे. मराठीला हिंदीइतकाच किंबहुना जास्त प्रेक्षक मिळतो कळाल्यावर राखीव वेळेपेक्षाही जास्त शो दाखवले जातील. मराठी चित्रपट, मूळ अथवा डब, यांनी जास्तीत जास्त शो व्यापले जातील आणि हिंदीचे प्रस्थ कमी होईल. आपण अजूनही 'राखीव/ बंधनकारक स्लॉटपुरतेच मराठी चित्रपट मर्यादित राहणार' या पराभूत मानसिकतेत का असतो? त्याउप्पर जास्त शो मिळणार हा सकारात्मक विचार का डोक्यात येत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री
स
संदीप डांगे Wed, 08/24/2016 - 17:57 नवीन
अगदी अगदी! सैराट च्या शंभर कोटीने भल्या भल्यांच्या झोपा उडवल्यात, त्यामुळे हिंदीवल्याना मराठी मार्केट लक्षात आलंय, त्याचेच हे पडसाद आहेत, मागे बहुतेक शाहरुखच चला हवा येऊ द्या च्या सेटवर आला होता ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
ब
बोका-ए-आझम Wed, 08/24/2016 - 19:58 नवीन
असे बरेच येऊन गेलेत. मुळात हा मुद्दा ज्या राजकीय पक्षाने उकरून काढलाय तो अस्तित्वासाठी लढतोय. त्यामुळे ते असे हातपाय मारताहेत. बाकी काही नाही. मुळात एम.एस.धोनी अजून खेळत असताना त्याच्यावर चित्रपट बनवण्याचं कारण कळलेलं नाही आणि अझर बघितल्यावर तर हिंदीवाल्यांना biography films बनवता येत नाहीत हे अगदी स्पष्टपणे समजलेलं आहे. शिवाय आपल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया - सुशांत सिंग राजपूत धोनीसारखा दिसतो की दिसत नाही यापासून चालू होऊन त्यावर संपणार आहेत. त्यामुळे चित्रपट येऊन, फ्लाॅप होऊन टीव्हीवर येईल तेव्हा बघू. नीरज पांडे चांगला दिग्दर्शक आहे, यात वाद नाही पण मला थिएटरमध्ये नेण्याएवढं चित्रपटात काही असेल असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा